Skip to main content

मुलाखत, लेख, कथा, कविता, वृत्तांत, हास्यचित्र, मुखपृष्ठ, संपादकीय, अंक

बारा रामांचं देऊळ

‘होऽऽ आज मालीकडे गेले होते तुमच्या... भाचीकडे तुमच्या. मधल्या सुट्टीत! खूप दिवसांत झालं नव्हतं जायला. ती जाऊन आले आज.’’
छान आहे की! झालंय काय तिच्या तब्बेतीला?
ती, मुलं, सगळी छान आहेत. तिची तर तब्बेत नको इतकी छान दिसली.
नको इतकी म्हणजे नेहमीचंच तिचं.
अहो दुसरं काय? सहावा-सातवा तरी महिना असेल.
मी आपलं पाह्यलं तिच्याकडे अन् थक्कच झाले. म्हटलं, ‘माले, अगं लग्नाला सात वर्षं नाही झाली तर हे पाचवं मूल तुझं. काय म्हणावं तुला!’

स्त्रीची सूक्ष्म भावांदोलने टिपणारी कथा

‘‘मराठी कथेचा जो उत्क्रांतीमार्ग आहे त्याच्या एकेका टप्प्यावर महत्त्वाच्या स्त्रीकथाकार उभ्या आहेत. त्यांपैकी काहीजणींच्या कथा आजच्या लेखक-वाचकांसमोर ठेवणं, त्यावर विचार करणं हे आजच्या काळातही प्रस्तुत ठरेल, असं वाटतं. स्त्रीकथाकारांना तत्कालीन स्त्रीप्रश्नांची जाणीव कसकशी होत गेली, हे पाहणं चांगल्या अर्थानं मनोरंजक आणि उद्बोधक ठरेल असं वाटलं.’’ त्या दृष्टीने ‘मिळून सार्‍याजणी’ मधून मार्च २०११ पासून एकेका स्त्रीकथाकाराची कथा पुनर्मुद्रित करत आहोत. कथांची निवड व त्यावर टिपण लिहिताहेत डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी.

सुख

Posted in

आम्हाला सिक्स्थ सेन्स असतो
म्हणून आमचा सेक्ससेन्स
मारला जातोय
आणि तुमचा पुरुषसत्ताकतेचा
सेन्सेक्स वधारतो
आम्हाला फक्त मार्केटिंगमधल्या
‘लालसा’ निर्माण करणार्‍या
भोगवस्तू ठरवून...
आम्हाला कोणी फसवू शकत नाही
नवरा बायको नाते पवित्र
एवढी घोर फसवणूक झाल्यावर
गप निपचित पडून राहायचं
मांड्या फाकून...
देह-स्वत्त्व-बुद्धीवरचे बलात्कार
सोसत...
डोळे-दृष्टी सेन्स असून...
निश्चय पक्का झाला! ठरलं?
दबलेला दाबलेला युगानयुगीचा
‘ऑरगॅझम’ एकदा तरी पुरा करते
माणूस-मादी बनून.
अंतरीच्या तिसर्‍या डोळ्याने ‘पर’ला
जाणणारी ‘मी’
इंद्राला स्वीकारलं...
नवरा-बायको वातड सत्ता नात्यातला

सुख

आम्हाला सिक्स्थ सेन्स असतो
म्हणून आमचा सेक्ससेन्स
मारला जातोय
आणि तुमचा पुरुषसत्ताकतेचा
सेन्सेक्स वधारतो
आम्हाला फक्त मार्केटिंगमधल्या
‘लालसा’ निर्माण करणार्‍या
भोगवस्तू ठरवून...
आम्हाला कोणी फसवू शकत नाही
नवरा बायको नाते पवित्र
एवढी घोर फसवणूक झाल्यावर
गप निपचित पडून राहायचं
मांड्या फाकून...
देह-स्वत्त्व-बुद्धीवरचे बलात्कार
सोसत...
डोळे-दृष्टी सेन्स असून...
निश्चय पक्का झाला! ठरलं?
दबलेला दाबलेला युगानयुगीचा
‘ऑरगॅझम’ एकदा तरी पुरा करते
माणूस-मादी बनून.
अंतरीच्या तिसर्‍या डोळ्याने ‘पर’ला
जाणणारी ‘मी’
इंद्राला स्वीकारलं...
नवरा-बायको वातड सत्ता नात्यातला

मुलींनो...

असणे आणि नसणे
यातले अंतर
तुम्ही ठरवायचे आहे
मुलींनो!
अंधाराचे मार्ग उजळणे
सोपे असते, कदाचित-
-पण प्रकाशाची वस्ती
सांभाळणे अवघडच असते.
असेलही असेच - मुलींनो,
या माळरानावर तुमच्या
अस्तित्वाच्या खुणेचा
अट्टाहास?-
त्या पलीकडे, त्याही पलीकडे-
तेथेच- तेव्हाच- एकच क्षण!
त्याच क्षणभरात फुलवा
फुलांचे ताटवे, किंवा
भूषवा खडकाळ प्रदेशाचेही
अनभिषक्त राज्ञीपण-
आणि निघून जा,
मुलींनो, नव्या
वस्त्यांच्या
शोधात-
जेथे
अंधार-प्रकाश या शब्दांना
अर्थच
असणार नाही
मुलींनो!
----
डॉ. माणिक वड्याळकर
चलभाष ः ९८२३८१५१९१

मीच आहे ती

कोण बरं आहे मी?
रूप आदिमायेचं
लेणं आभाळाचं
तेज सरस्वतीचं
भाग्य लक्ष्मीचं
मूळ सार्‍या आनंदाचं
मी सूर्याची प्रभा
बुद्धीची आभा
वात्सल्याची विभा
म्हणूनच घराची शोभा
मी निसर्गाची ऋतुजा
आकांक्षांची स्वप्नजा
शुचितेची नीरजा
तेजाची आत्मजा
मी मायेची ऋजुता
पत्थराची कठोरता
रंगांची विविधता
फुलांची निर्मलता
मी आहे बुद्धी
माझ्यातच रिद्धी-सिद्धी
माझ्यामुळेच वृद्धी
ब्रीद माझे संकल्पसिद्धी
मीच आहे निर्मिती
माझ्या कक्षेला नाही मिती
मला विनाशाची नाही भीती
मीच आहे यशोमती
होय, मी आहे मुलगी
सृष्टीची देणगी
आईचा पंचप्राण
बापाची सुवर्णखाण
माझे आहे सृजनाशी ईमान

किमान आज तरी

वाटलं
लक्षात असेल तुझ्या
किमान आज तरी...
भेटशील निवांत
बोलशील आरश्याशी
थोडा वेळ
नेसून, साडी एखादी नवीन
पावडरचे दोन हात
फिरवशील तोंडावर
अन्... हळूच... हळूवार
रोजच्यापेक्षा काही वेगळी
आठवणींच्या गाठोड्यात
बांधून ठेवलेली
चार शब्द जरतारी
तुझ्या-माझ्यासाठी
येतील तुझ्या ओठावर
बोलावं म्हटलं
बरंच काही
पण राहिलो शांत
विचार करून काही-
‘‘शोभतं काय तुम्हाला-
कळत कसं नाही
आलेत आता... नाती जावई’’
आताशी ठरून गेलेलं
उत्तर तुझं
फेकशील तोंडावर
या भीतीने-
दिले झोकून स्वतःला
‘‘मौनम् सर्वार्थ साधनम्’’
बरोबर आहे म्हणा तुझंही
का आठवावा तुला
तो दिवस... अन्

बाप आणि मुलगी

बातम्या बघता बघताच
टी.व्ही. बंद करून
मी बाहेर येऊन उभा तर-
प्रकाश वेगानं आक्रसत असलेला
-आणि काळोखाचं काळंभोर अस्वल
रस्त्यापलीकडून प्रकाश झुडुपामागे दडून,
मला वाकुल्या दाखवत असलेले.
आत जळत मी मुठी आवळून उभा
भीतीचा नाग मनात फणा काढून उभा
मुलगी नेहमीसारखीच क्लासला गेलेली
अन् गावात दंगल उसळलेली.
बायको सात्विक संतापानं
दात-ओठ खात, मोर्चे, दंगली, जाळपोळ
सत्ता, लोभ, क्षोभ यावर बोटे मोडत बोलत
खुर्चीतच अस्वस्थशी बसलेली.
फोन केला तर डेड झालेला
मोबाइल रिचार्जला आलेला
आणि मुलगी रोजच्यासारखीच
आजही क्लासला गेलेली.
मुलींनी शिकलं पाहिजे
डॉक्टर, वकील, इंजिनिअर तरी
व्हायलाच पाहिजे.

Syndicate content