प्रिय वाचक,
सस्नेह नमस्कार
तुम्हा सर्वांची दिवाळी कशी झाली? यावर्षीचा सार्याजणीचा दिवाळी अंक प्रकाशनाचा बेळगावमधला कार्यक्रम रंगतदार झाला. ध्येयानं झपाटलेली अनेक मंडळी तिथे भेटल्यामुळे बेळगावचा मुक्काम कायम लक्षात राहील असा झाला.
प्रिय वाचक,
सस्नेह नमस्कार!
ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार हा मैत्रीदिन असतो. यावर्षी रविवारी ७ ऑगस्टला संध्या ५ वाजता अहमदनगरमध्ये आपल्या वर्षारंभ विशेषांकाचं प्रकाशन आहे. जुलै अंकाच्या कव्हरवर त्याचं निमंत्रण आहे ते वाचलंत ना? या कार्यक्रमाला आपण जरूर जरूर या. सार्याजणीबरोबरच्या मैत्रीचा जागर या कार्यक्रमात आपण करूया.
आज मी काहीशा वेगळयाच मन:स्थितीत आहे. गेल्या २/४ महिन्यात भारतभराच्या निवडणुका, त्यांचे प्रचार, त्यातले गैरप्रकार, त्यावेळची अनेकांची अर्वाच्य, उर्मट भाषा, या सगळयाची राळ आणि धूळ वातावरणात भरून राहिली होती.