‘मिळून सार्याजणी’च्या २०११च्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा बेळगावातील लोकमान्य सभागृहात लोकमान्य ग्रंथालयाच्या सहकार्याने संपन्न झाला. प्रकाशन सोहळ्याच्या आदल्या दिवशी, २१ ऑक्टोबर रोजी लोकमान्य ग्रंथालयातील जी. ए. कुलकर्णी दालनात ‘गप्पांगण’ हा अनौपचारिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मिळून सार्याजणी, स्त्री चळवळ आणि एकूण समाजभान या विषयावर विद्याताई आणि गीतालीताई बोलल्या. या प्रसंगी उपस्थित वाचकांशी झालेली चर्चाही चांगलीच रंगली.