Skip to main content

अमोल बागूल

भूकपती

सूर्य डोक्यावर नाचत होता आणि भूक पोटात! रुक्ष वैराण आयुष्याचे ललाटनशीब घेऊन तो सैरभैर हिंडत होता. प्रखर उन्हाच्या स्पर्शाने त्याच्या भाकरीच्या साऱ्या जाणिवा करपून गेल्या होत्या आणि वाऱ्याच्या एखाद्या झोताने त्याच्या अंगावर फुंकर घालायचे ठरवले तरी वाऱ्याचे ओरखडे त्याला सहन होत नसत. सूर्य आग ओकू लागे आणि नेहमीप्रमाणे जीवाची लाही लाही ठरलेली. हिरव्या कोवळया भावनेला त्याच्या मनात थारा नाहीच.

Syndicate content