बातम्या बघता बघताच
टी.व्ही. बंद करून
मी बाहेर येऊन उभा तर-
प्रकाश वेगानं आक्रसत असलेला
-आणि काळोखाचं काळंभोर अस्वल
रस्त्यापलीकडून प्रकाश झुडुपामागे दडून,
मला वाकुल्या दाखवत असलेले.
आत जळत मी मुठी आवळून उभा
भीतीचा नाग मनात फणा काढून उभा
मुलगी नेहमीसारखीच क्लासला गेलेली
अन् गावात दंगल उसळलेली.
बायको सात्विक संतापानं
दात-ओठ खात, मोर्चे, दंगली, जाळपोळ
सत्ता, लोभ, क्षोभ यावर बोटे मोडत बोलत
खुर्चीतच अस्वस्थशी बसलेली.
फोन केला तर डेड झालेला
मोबाइल रिचार्जला आलेला
आणि मुलगी रोजच्यासारखीच
आजही क्लासला गेलेली.
मुलींनी शिकलं पाहिजे
डॉक्टर, वकील, इंजिनिअर तरी
व्हायलाच पाहिजे.