कथा
मी करू तरी काय?
``अगं ! जरा मला शाळा सुटल्यावर भेट. काम आहे.'' पाटील सर मला बोलून गेले आणि त्या क्षणापासून माझं मन हेलकावे खायला लागलंय. ह्यांचं काय काम असेल माझ्याकडे ? काय सांगणार असतील ? काय विचारणार असतील ?.... आणि शाळा सुटल्यावरच का ?
पडझड
खिडकीशी उभं राहून ती सारखी पक्ष्याांना बोलवत होती. ``अरे या, बघा, तुमच्यासाठी किती छान धान्य ठेवलं आहे. लेक हो तुमची मजा आहे. तुम्हांला बोलावून-बोलावून खायला घालतात. पिवळया रंगाचा माझा धिटुकला कुठे गेला ? आज तो रागावला की काय ?
हार
तेव्हा ती नवीनच लग्न होऊन या घरी आली होती. सासूबाइंर्ना सून म्हणून ती फारशी पसंत नव्हतीच. मुलाच्या आग्रहाखातर त्या तयार झालेल्या.
सत्ता संवाद
आलात ? आणि हे काय, हात हलवितच आलात ? मी आणायला सांगितलं होतं काहीतरी - विसरलात ? ते काय नवीन आहे म्हणा ! कधी काय आठवणीत राहतंय तेव्हा.... बाहेरही राबा आणि घरातलंही सारं आपणच निस्तरा. मरू दे. मलाच काय पडलंय् एवढं ?
तू नाही सुधारायचीस
तीनदा बेल वाजविल्याशिवाय दार उघडायचं नाही असा नियम आहे वाटतं ? एवढा कसला डोंगर उपशीत असतेस गं तू? माणसाने ऑफिसमधून दमून भागून यावं आणि दारावर पाच-पाच मिनिटं ताटकळत राहावं !
वादळवारा
आज कितीतरी वर्षांनी तिची गाठ पडत होती. ती म्हणजे ऊर्मी. ऊर्मी मनोहर. माझी बाल मैत्रीण. मी तेजस देसाई. प्रभात रोडला शेजारी एकमेकांना लागून आमचे बंगले होते. खूप वर्षं शेजारी असल्याने दोन्ही कुटुंबात चांगलीच मैत्री होती.
भोंगा
``ओ%%%% मा%%'' शिवा ढेरेनं दिली आरोळी. उजव्या हाताने चुटकी दिल्यावर सगळे एका सुरात हातगाडीला बिलगले. गाडीला नेट देऊन ओढू लागले. डेंग्या हुमणे खांद्याला पट्टा अडकवून दोन्ही हातांनी हॅन्डलवर जोर देऊन गाडी पुढं ओढू लागला.
विद्रोह
परभूने मुलाच्या नोकरीसाठी केलेल्या अर्जाला दोन वर्षांनी उत्तर आले, त्यावेळी तो मरायला टेकला होता. अन् त्याचा मुलगा जय मॅट्नीकच्या वर्गात शिकत होता.
नानी
एकदम काय झालं, ते नानींना कळलंच नाही. त्या टॉयलेटला गेल्या आणि त्यांचा एक पाय सटकन घसरला. एक पाय अगदी पुढे गेला तर एक पाठीमागे. शरीराचा जसा सरळाकोनच झाला. आता दोन्ही पाय जवळ आणून मधलं शरीर त्यावर कसं तोलायचं तेच त्यांना कळेना.

