कथा

जुळी

``काय करून राहिली व, सिंधू !''
``या पोर्गीच्या डोक्यात लयच जुंवा पळल्या व बैना,.... पायुन राहिली,....येन्ह !''
``हाव'' म्हणत गीता वट्याच्या पायऱ्या चढून जागीच बसली. वट्याच्या पायरीवर पाय हलवीत.

'नवीन लग्नाच्या नऊ रात्री नयनाच्या'

जीवनातील अनेक महत्त्वाच्या संस्कारांपैकी महत्त्वाचा मानला गेलेला एक संस्कार म्हणजे `लग्न'. दोन अपूर्ण जीवांना पूर्ण करणारा हा सोहळा माणसातील लैंगिक भावभावनांना समाजमान्यतेने अनुभवण्याचा हा एक विधी.

'लेडिज' बायकांची बडबड

राजेश तणतणतच घरातून बाहेर पडला. बॅग एका बाजूने गरम लागत होती.
``आई, तू भाजी इतकी गरम कशाला भरते गं ?''
``तू जेवेपर्यंत गार होईल राजा'' - ``आता इतका वेळ काय काख शेकत बसू बॅगेने ?''

नो मॅन्स लॅंड

विजय कांबळेनं पहाटे साडेपाचलाच घर सोडलं. महाबळेश्वरला जावं की जाऊ नये ?

मीठ

-हातानं नाही, अन्नासाठीही नाही, मिठासाठी तडफडवून मारीन या लोकांना म्हणाला होता उत्तमचंद बनिया. तो व्यापारी तर होताच पण सावकारही. कित्येक पिढ्यांपासून त्याच्याच पूर्वजांनी हा झंुझार-बेल्ट धाकात ठेवला होता.

ही खंत जाळते मना....

रात्र ढळून दोन प्रहर उलटले होते. अण्णा दचकून जागे झाले. कुणीतरी त्यांना अलगद आपल्या कवेत घेतल्यासारखे वाटले. ते थंडगार हात... ती मिठी त्यांच्या पत्नीची असल्याचे त्यांना जाणवले. ती तर आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि मग आता ...

नवी ओळख

उमाने मुगाच्या डाळीच्या खिचडीसाठी हॉटप्लेटवर पाण्याचं आधण ठेवलं. महेशला नि सोनयाला ती फार आवडते. ब्रॉकोली घालून केलेली खिचडी नि बरोबर कढी व पापड-लोणचं म्हणजे दोघांची चैनच असते. तेवढ्यात तिला बाथरूमला लागल्यासारखं वाटलं.

मर्म

``माझं म्हणणं ऐकून तरी घे रोशनी !''

आर्त

बिल्डिंगच्या खाली अजून तो गाडी काढतच होता, तेवढ्यात कमलचा नवरा आला. त्यानं विचारलं,
``साहेब, आज तुमच्या रस्त्यालाच काम हाय, जरा सोडता काय ?'' त्यानं डोक्यावर हेल्मेट चढवता चढवता सहज म्हटलं, ``चल, बस.''

जाण

लहानपणी आजीच्या मागेमागे देवळात जाताना सुप्रियाला खूप गंमत वाटे. मुरुमाच्या रस्त्यावरून चालताना आजीच्या चपलांचा `कुर्रुक कुर्रुक' असा आवाज येत असे. टाचेच्या भाराने छोटे छोटे दगड उडत असत. ती ते टक लावून पाही.