`काय म्हणते आहे व्ही.आर्.एस्.?'
गेटमधून आत शिरतानाच समोरून आलेल्या या प्रश्नाने ती चांगलीच सुखावते. आपण इथे वीस वर्षे काढली... गेल्या दोन वर्षांत फारशा फिरकलो नाही तरीही लोकांच्या लक्षात आहोत तर! हसतच ती उत्तर देते, `निवांत!'
'टिकोझी'
कधीतरी, एखाद्या आजारी संध्याकाळी,
माझ्या भरल्या घरात, नांदत्या गोकुळात,
एकटेपणा उशाशी घेऊन,
मी एकाकी पहुडलेली असते.
बघता बघता, घरात माणसं असूनही,
त्या एकाकीपणाचे बोचरे वारे
सर्वांगाचे लचके तोडू लागतात.