Skip to main content

नीलिमा गुंडी

वाटचाल 'मिळून सार्‍याजणी'ची

`मिळून साऱ्याजणी' असे शीर्षकातूनच सर्व स्त्रियांना (शहरी-ग्रामीण, तसेच विविध समाजगटातीलही) - बरोबर घेऊन जायची ग्वाही देणारे हे मासिक वीस वर्षे पूर्ण करीत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.

वळण

वळण
तिच्या हाताला वळणच असे की
तिच्या हाती दिलेला चंद्रही
तिने बाटलीत भरून ठेवला
मिसळणाच्या डब्याजवळ
तिच्या तडतडणाऱ्या स्वप्नांचा
तो उरला साक्षीदार केवळ

तिची एकाग्रता फक्त
दूध उतू न जाऊ द्यायचा क्षण
नेमका गाठण्याची

Syndicate content