मुलीच्या शरीरावर तारुण्याच्या खुणा उमटू लागल्या. ती पाळी सुरू होण्याच्या उंबरठ्यावर उभी दिसली आणि सगळी भीती परत खिडक्या तोडून भेडसावू लागली. जे मी भोगलं ते हिच्या नशिबी कधीही येऊ द्यायचं नाही.