तो ऑफिसमधून घरी येतो. दमून सोफ्यावर बसतो. त्याची आई आतून येऊन त्याच्या हातात चहाचा कप देते. तो आईकडे बघून किंचित हसतो. आईची नजर त्याच्यावर स्थिरावलेली... त्याच्यात काहीतरी धुंडाळणारी... नेहमीप्रमाणेच...