लबागचा पूल तोडत होते तेव्हाची गोष्ट. तोडकामाच्या पहिल्या दिवशी ट्रॅफिक जामचा प्रचंड त्रास झाला. त्याच दिवशी दादरचा फ्लायओव्हरसुद्धा किरकोळ दुरुस्तीसाठी बंद ठेवला होता. त्यामुळं प्रवाशांच्या हालांना पारावर राहिला नाही. त्या ट्रॅफिक जॅममध्ये मीही अडकले होते. बसच्या आत बसून हळहळण्याखेरीज काहीच करू शकत नव्हते.