ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात मी खूप प्रवास केला. नाशिकचं पुस्तक प्रकाशन, कोल्हापूरचा स्मृतिदिन, बेळगावचं ‘सार्याजणी’चं दिवाळी अंक प्रकाशन, इंदोरचा महिला मेळावा आणि बिहारभेट अशा वेगवेगळ्या कारणांनी, वेगळं गाव, वेगळा कार्यक्रम, वेगळी माणसं, खूप गाठीभेटी असं काय काय घडलं. प्रेम करणारी, मनापासून बोलणारी, कामं करणारी अनेक माणसं भेटली. त्यात थोडं काही भरीव/पोकळ स्वाभाविकपणे होतंच. तरीपण प्रेमाचं आणि चांगुलपणाचं पारडंच जड होतं. त्यामुळेच शरीर दमलं तरी मनाला अतिशय टवटवी आली! जरा दम खाल्ल्यावर थकवा गेला पण मन मात्र नवं काही बघण्यासाठी पुन्हा टवटवीत झालं.