जव्हार शाखेत पोस्टिंग होण्याआधी गेली १०-१२ वर्षं मी डोंबिवलीत काही संस्थांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाकरिता काम करत होते.
सगळयाची सुरुवात झाली, ती बँकेने काढलेल्या एका सर्क्युलरने. ग्रामीण शाखांनी आपल्या जवळपासचे एखादे खेडेगाव दत्तक घेऊन त्याचा सर्वांगीण विकास करावा अशी योजना.