बिल्डिंगच्या खाली अजून तो गाडी काढतच होता, तेवढ्यात कमलचा नवरा आला. त्यानं विचारलं, ``साहेब, आज तुमच्या रस्त्यालाच काम हाय, जरा सोडता काय ?'' त्यानं डोक्यावर हेल्मेट चढवता चढवता सहज म्हटलं, ``चल, बस.''