लहानपणी आजीच्या मागेमागे देवळात जाताना सुप्रियाला खूप गंमत वाटे. मुरुमाच्या रस्त्यावरून चालताना आजीच्या चपलांचा `कुर्रुक कुर्रुक' असा आवाज येत असे. टाचेच्या भाराने छोटे छोटे दगड उडत असत. ती ते टक लावून पाही.