Skip to main content

अश्विनी बर्वे

गोष्ट तशी साधी

हे ईश्वरा, तू माझ्या मनात असे समाजाला अमान्य असे विचार का पेरतोस? मी काहीबाही वागले तर तो मला सगळ्या वाईट-साईट शिव्या देईल. मी देऊ त्या शिव्या. देवू? देवू? नको ना. मग असे विचार तू का रुजवतोस? अर्थात असं समजणं म्हणजे तू काहीतरी करतोस यावर विश्वास ठेवणंच आहे. त्या दिदींनी काय सांगितलं आहे? लक्षात आहे ना? डोळे बंद करून थोडावेळ वज्रासनात बसायचं. कोणताही प्रश्न नाही, कोणतेही उत्तर नाही. मग पद्मासनात बसायचं. डोळे बंदच. डोळे बंद म्हणजे सगळं शांत आणि डोळे उघडे म्हणजे गोंधळ? वा रे वा! मी साध्वी व्हायला पाहिजे, सर्व आयुष्य धार्मिक कार्यात घालवलं पाहिजे.

पडझड

खिडकीशी उभं राहून ती सारखी पक्ष्याांना बोलवत होती. ``अरे या, बघा, तुमच्यासाठी किती छान धान्य ठेवलं आहे. लेक हो तुमची मजा आहे. तुम्हांला बोलावून-बोलावून खायला घालतात. पिवळया रंगाचा माझा धिटुकला कुठे गेला ? आज तो रागावला की काय ?

Syndicate content