ती विमानतळाबाहेर आली. हातात दोन बॅगा, गळयात लटकावलेली पर्स ! बाहेर आल्यावर हातातील बॅगा तिनं खाली ठेवल्या. तेवढ्यात तत्परतेनं ड्नयव्हर पुढे आला. त्यानं तिला अदबीनं नमस्कार केला. थोडंसं हसून ती म्हणाली.
``कसे आहात, अंकल ?''
फोनच्या आवाजाने तिची झोप मोडली. हॉलमध्ये येऊन तिनं रिसिव्हर हातात घेऊन म्हटलं, ``हॅलो !'' फोन करणारा गप्प झाला.