बेहुला कथेचा उर्वरित भाग
वसंत कलकत्त्याला जाऊन अँटिसिरम घेऊन आला. ज्याच्याकडे जाई तो डुलक्या देत म्हणे, `ओ, अँटिसिरम?' मग थोडंसं देऊन कर्तव्यभावनेनं म्हणे, `पण या औषधाची रिअॅक्शन असते हे लक्षात ठेवा.'
`माहीत आहे.'
`काय माहीत आहे?'
नवागड हे एक लहानसं संस्थान किंवा मोठं जमीनदारीचं गाव. या गावाच्या सीमेलगत बस-रस्त्यापाशी लहानशी एक वस्ती. नवागडच्या जमीनदाराला `राजा' ही पदवी दिली जात असे. भारत स्वतंत्र झाला त्या वर्षी राजेसाहेबांचं वय होतं एक वर्षाचं.