-हातानं नाही, अन्नासाठीही नाही, मिठासाठी तडफडवून मारीन या लोकांना म्हणाला होता उत्तमचंद बनिया. तो व्यापारी तर होताच पण सावकारही. कित्येक पिढ्यांपासून त्याच्याच पूर्वजांनी हा झंुझार-बेल्ट धाकात ठेवला होता.
नवागड हे एक लहानसं संस्थान किंवा मोठं जमीनदारीचं गाव. या गावाच्या सीमेलगत बस-रस्त्यापाशी लहानशी एक वस्ती. नवागडच्या जमीनदाराला `राजा' ही पदवी दिली जात असे. भारत स्वतंत्र झाला त्या वर्षी राजेसाहेबांचं वय होतं एक वर्षाचं.