मथूआजींच्या आजारपणाचं स्वरूप आता गंभीर झालं होतं. डॉक्टरांनीपण आशा सोडली होती. फोन केल्याबरोबर मथूआजींचे सगळे मुलगे आणि मुलगी धावत आले होते. आजींना एकूण पाच मुलगे आणि एक मुलगी.