Skip to main content

विद्या बाळ

‘पुण्याचं पाणी’ आणि लवासा

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात मी खूप प्रवास केला. नाशिकचं पुस्तक प्रकाशन, कोल्हापूरचा स्मृतिदिन, बेळगावचं ‘सार्‍याजणी’चं दिवाळी अंक प्रकाशन, इंदोरचा महिला मेळावा आणि बिहारभेट अशा वेगवेगळ्या कारणांनी, वेगळं गाव, वेगळा कार्यक्रम, वेगळी माणसं, खूप गाठीभेटी असं काय काय घडलं. प्रेम करणारी, मनापासून बोलणारी, कामं करणारी अनेक माणसं भेटली. त्यात थोडं काही भरीव/पोकळ स्वाभाविकपणे होतंच. तरीपण प्रेमाचं आणि चांगुलपणाचं पारडंच जड होतं. त्यामुळेच शरीर दमलं तरी मनाला अतिशय टवटवी आली! जरा दम खाल्ल्यावर थकवा गेला पण मन मात्र नवं काही बघण्यासाठी पुन्हा टवटवीत झालं.

‘सार्‍याजणी’कडे वळून पाहताना

ऑगस्ट महिना वेगवेगळ्या कारणांमुळे महत्त्वाचा महिना ठरतो. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे याच महिन्यात ६४ वर्षांपूर्वी आपला भारत देश स्वतंत्र झाला. क्रांतिदिन म्हणून साजरा होणारा ९ ऑगस्ट याच महिन्यातला. ‘हिरोशिमा नाही नाही, आता नाही आणि कधीच नाही’ ही घोषणा देत विश्वविनाशक अणुबॉंबच्या भयानकतेची आठवण देणारा ६ ऑगस्टचा ‘हिरोशिमा दिन’ही ऑगस्ट महिन्यात येतो. अशा कितीतरी बर्‍यावाईट पण महत्त्वाच्या कारणांबरोबरच आणखी एका कारणासाठी ऑगस्ट महिना माझ्या लक्षात राहतो आणि ठेवावासाही वाटतो. ९ ऑगस्ट १९८९ ही आपल्या मासिकाची जन्मतारीख आहे. या महिन्याचा अंक हा दरवर्षी वर्षारंभ विशेषांक म्हणून प्रसिद्ध होतो.

एक झुळुक हवीहवीशी

गेल्या दोन्ही महिन्यांतल्या लेखांतून माझ्या अस्वस्थतेची झळ तुम्हा सर्वांना लागली असेल. त्याबद्दल `माफ करा' असं मला म्हणवत नाही.

ना कर धूमधामसे शादी !

न्यायमूर्ती सुधा मिश्रा हे नाव अलीकडच्या वृत्तपत्रात वाचलेलं, ऐकलेलं आठवतं?

एक ठेवा

पुष्पा आणि मी, असं दोघींनी एकत्र काम करण्याची संधी मला जवळपास 12/15 वर्षं मिळाली. पहिली ओळख नारी समता मंचातून झाली. एक गृहिणी, प्रथमच घराबाहेरच्या कामात हळूहळू यायला लागणं ही त्यावेळी आणि आजही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट ठरली आहे.

संवाद

आज मी काहीशा वेगळयाच मन:स्थितीत आहे. गेल्या २/४ महिन्यात भारतभराच्या निवडणुका, त्यांचे प्रचार, त्यातले गैरप्रकार, त्यावेळची अनेकांची अर्वाच्य, उर्मट भाषा, या सगळयाची राळ आणि धूळ वातावरणात भरून राहिली होती.

संवाद

प्रिय वाचक,
काल होळी झाली. आज धुळवडीचा दिवस.
महाराष्ट्नतल्या ऋतुचक्रानुसार, होळीपर्यंत थंडीचे
दिवस. शिशिरातल्या पानगळीमुळे झाडांखाली
वाळलेल्या पानांचे, भिरभिरत उतरणारे थवे! हवेतला
कोरडेपणा वाढलेला. धूळ, सगळीकडे धूळ!

प्रतिष्ठेचे बळी

स्त्रियांवर होणाऱ्या बहुतेक अन्याय-अत्याचारांचा जन्म पुरुषसत्ताक व्यवस्थेनं घडवलेल्या मानसिकतेतून होतो.

Syndicate content