Skip to main content

बरोब्बर सहा वाजता दारावरची बेल वाजली. मनूनं दार उघडलं, अमोलच होता. त्याच्या क्रॅसेटवरच्या फोटोत झळकत होता तसाच! गोरा, हसतमुख बारीक पण भेदक डोळयांचा, ``ये!'' त्याचं येणं अपेक्षित असूनही इतकी एक्साईट झाली होती ती की, एकच शब्द बोलू शकली. डोळे बारीक करून मिस्किल हसत आत येता येता तो म्हणाला, ``ओळखलंस म्हणजे मला, तू!''
`स्मार्ट झालायस खरा थोडा; पण चेहेऱ्यावरचं तेव्हाच ते`अमोलपण' तेच आहे अजून... म्हणून ओळखलं.''
``हो, पण तू मात्र अजूनही तश्शीच आणि तेवढीच आहेस हं, मला वाटलं होतं. बँकेत अधिकारी.. म्हणजे खुर्चीत बसून मस्त आडवी वाढली असशील.'' बोलत बोलत तो सोफ्यावर रिलॅक्स झाला. एवढ्यात टी शर्ट अंगात चढवत चढवत अनिल, तिचा नवरा बेडरूममधून बाहेर आला. त्याला पाहताच सोफ्यावरून उठत हात पुढे करून अमोल म्हणाला, ``हॅलो मित्रा! कसा आहेस?'' त्याचे हात आपल्या दोन्ही हातांत घेत अनिलनं त्याला हसत हसत काहीतरी उत्तर दिलं; पण तिचं लक्ष अनिलनं हातांत घेतलेल्या अमोलच्या हातांकडेच होतं- कमालीचे स्वच्छ, भरदार, लालसर गुलाबी हात- क्षणभर असूयेची एक लहरही मनात उमटून गेली. किंचितसा आशाळभूतपणाही चेहेऱ्यावर उमटला असावा. अमोलनं तिच्या चेहेऱ्याकडं न पाहताही ते कसं ओळखलं कुणास ठाऊक?.. पण अनिलच्या हातातले आपले हात सोडवून घेत त्यानं ते तिच्यासमोर धरले- तेवढ्यात तिनं आवरलं स्वत:ला- मग नि:संकोचपणे आपला हात त्याच्या हातात दिला आणि दोन क्षण त्याचा स्वच्छ, नितळ, गुलाबी स्पर्श सरसरून अनुभवला- रक्तात पैंजणाची रुणझुण उठायला लागली होती; पण त्याहीपेक्षा खूप डौलदार होता त्या स्पर्शातला निखळ आपलेपणा- विश्वासाची ऊब आणि त्याच्या बारीक भेदक डोळयांतलं स्वच्छ हसू...! त्याच क्षणी तिला वीसेक वर्षांपूर्वीचा कॉलेजमधला अमोल आठवला.. गॅदरिंगच्या नाटकात आणि युवक महोत्सवाच्या एकांकिकात मनूनं सलग तीन वर्षं त्याच्याबरोबर काम केलं होतं. त्या वेळी नाटकातल्या प्रसंगाची गरज असली तरीही आणि सरांनी सांगितलेलं असलं तरीही हा लेडीज को अॅक्टरला स्पर्श करायचं जनरली टाळायचा. एका वर्षी वसंत कानेटकरांचं `गोष्ट जन्मांतरीची' बसवलं होतं. ती माणिकच्या भूमिकेत होती आणि तो डॉक्टरच्या... माणिक डॉक्टरांच्या पायाला वाकून स्पर्श करते तेव्हा तिच्या खांद्याला धरून उठवायचं असं सरांनी वारंवार सांगितलेलं- पण हा त्याच्या हातांचा स्पर्श खांद्याला न व्हायची चक्क दक्षता घेत हा सीन करायचा. तिला खूपच राग यायचा त्याचा आणि आश्चर्यही वाटायचं. एकदा ती तावातावानं म्हणालीही होती त्याला, ``ज्यांचं स्वत:च्या भावनांवर नियंत्रण नसतं... किंवा ज्याला स्वत:बद्दल खात्री नसते ती माणसं अशी चोरट्यासारखं वागतात, अरे, इतका शिरतोस तू त्या भूमिकेत... मग खांद्याला धरून उठवताना कशाला स्वत:ची आठवण राहते तुला?'' त्यावेळी त्यानं मुकाट्याने ऐकून घेतलं होतं सगळं आणि कौशल्यानं विषयच बदलला होता.
त्या चार सेकंदात मनू इतकी मागं जाऊन आली आणि त्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या त्याच्या स्पर्शातल्या आत्मविश्वासाची नोंद मग तिच्या मनावर अधिकच गडदपणे झाली. त्याचे डोळे, आवाजातला मिस्किलपणा आणि मोकळं हसू- या तीन गोष्टी सोडल्या तर केवढा बदललाय तो! तेव्हाचं ते हडकुळेपण, पाठीतला बाक सगळं गायब झालंय- चक्क छान भारदस्त, ताठ आणि गोराही झालाय आता! स्वत:ला त्याच्या दिसण्याच्या गुंत्यातून बाहेर काढत मनू म्हणाली, ``वाटलं नव्हतं माझ्या एका इ-मेलला तू रिस्पॉन्स देशील आणि इतक्या बिझी शेड्यूलमधून घरी भेटायला येशील असं- ळीं ळी र्क्षीीीं र्ीपलशश्रर्ळींरलश्रश!- खरं तर वेळच लागणारे मला या धक्क्यातून सावरायला- तुझी वर्तमानपत्रातली मुलाखत वाचून मी तुला सहज एक इ-मेल देेते काय! ते मिळाल्यासरशी तुझा फोन येतो काय! तू चक्क घरी भेटायला यायचं म्हणतोस काय... नि...`
``ये %% बयाबाई, आता तुझी ही काय काय ची कावकाव थांबव आणि मस्त कॉफी कर पूर्वीसारखीच दोन चमचे साखर
घालून,ए, पण घर काय मस्त ठेवलंयस गं तू- एकदम प्रसन्न वाटलं आत पाऊल टाकल्यावर...''
``याचं श्रेय मात्र या माझ्या नवऱ्याकडे जातं बरं का! स्वत: लक्ष घालून चक्क महिन्याची रजा काढून केलंय त्यानं हे सगळं- जस्ट वर्षापूर्वीच आलोत इथे राहायला.''
``अरे, या अगोदर इथे शेजारीच राहत होतो भाड्यानं- म्हणून जमलं- चल, गॅलरीत बसू आपण. तोपर्यंत मनू आणेल कॉफी करून'' बोलत बोलत अनिलने खुर्च्या गॅलरीत नेल्या. तिथल्या ग्रिलला रेलून उभं राहून लांबवर एक स्वप्नाळू नजर टाकत अमोल म्हणाला, ``चक्क थेट डोंगर दिसताहेत- मस्तच आहे रे लोकेशन फ्लॅटचं आणि झाडं केवढी लावलीयत तुम्ही मी तर प्रेमात पडलो, यार!'
``अरे, बंगल्यातल्या बागेची हौस गॅलरीतल्या कुंड्यांवर भागवून घेतलीय झालं.''
``भागवून घेतलीय असं काय म्हणतोस वेड्या, अरे , इतकं छान सजवलंय तुम्ही घर- प्रत्येक गोष्टीत मन ओतलेलं दिसतंय... पण त्याहीपेक्षा मला आवडलं इथलं मोक ळं वातावरण! अरे, श्रीमंती उतू जाणारी, रसिकतेचं सुद्धा आेंगळवाणं प्रदर्शन करणारी घरं कमी पाहिली नाहीत मी- ... पण खरं सांगू तुला... आत पाऊल टाकलं ना की तिथं पहिल्या श्वासानं तुम्ही आत घेतलेली हवा तुम्हांला तिथल्या माणसांच्या मनाची ओळख करून देते- इतक्या बिकट परिस्थितीत सगळयांच्या विरोधाला तोंड देऊन लग्न केलंय तुम्ही- ... शून्यातून उभं केलंत हे विश्व- आणि मुख्य म्हणजे पुन्हा हळूहळू का होईना जोडलीत सगळी नाती, आणि सिद्ध करून दाखवलंत की तुमचा निर्णय योग्यच होता! खूप थोड्यांना जमलं रे हे- विशेषत: आपल्या पिढीबद्दल बोलतोय मी- प्रेमात पडायचे सगळेच पण पहिल्याच विरोधाच्या हल्ल्यात कितीतरी जणांनी माघारच घेतली आणि मस्त जगताहेत एकमेकांना पूर्ण विसरून आणि लग्न झालं तरी सगळयांना जिंकून इथवर येणं- ठशरश्रश्रू र्ूेी रीश सीशरीं, यार!''
कॉलेजमधे बायकोबरोबर नाटकात काम करणारा, कविता बिविता लिहिणारा तिचा एकेकाळचा मित्र, लग्नाच्या रिसेप्शनला शेवटचं भेटलेला, नंतरची दहाएक वर्षं फक्त मुंबईत नोकरी करतो एवढंच ठाऊक असलेल्या आणि मागच्या दोन चार वर्षांत अचानक स्वत:च्या कवितांचे स्टेजशो करून प्रकाशझोतात आलेला- कॉलेजकुमारात कविता लोकप्रिय करणारा- असा पैसा, मान, प्रतिष्ठा, प्रसिद्धी-सर्वार्थानं मोठा झालेला बायकोचा मित्र... त्याच्या तोंडून आपल्या वाटचालीचं इतकं मनमोकळं कौतुक ऐकून अनिलला क्षणभर काय बोलावं तेच सुचेना- पण त्याच्या आपुलकीनं घातलाच होता त्याच्या काळजाला हात... मग तोही मनापासून बोलायला लागला, ``खरं आहे तू म्हणतोस ते, पण त्यासाठी मोठी किंमत द्यावी लागली दोघांनाही रे!... माझं पत्रकार व्हायचं स्वप्न होतं... त्या वेळी ेषषशीी ही आलेल्या एक दोन चांगल्या, पण नाही स्वीकारता आल्या- आणि मनूचं तर माहितीये तुला लग्न झाल्यापासून नाटक करणं तर लांबच- बघणंसुद्धा होत नाही फारसं- त्यावेळी शिरली असती त्या क्षेत्रात तर आज नक्कीच कुणीतरी असती ती... त्यामुळं कधी कधी वाटतं की हे लव्हमॅरेज यशस्वी करून दाखवण्याच्या... माणसांना बदलवण्याच्या, जिंकण्याच्या आणि आता मुलांना न्याय देण्याच्या कारणांसाठी स्वत:ला न्याय नाहीच देऊ शकलो आम्ही- याची खंत आहे मनात... पण थश हर्रींश रललशिशींव ळीं र्र्ाीींीरश्रश्रू रपव हशरीींळश्रू .` `ढहरीं'ी ुहू ख ीरळव र्ूेी रीश सीशरीं! त्या दिवशी फोनवर मनूनं सगळं सांगितलं मला रपव र्ूेी ज्ञपेु...? डहश ळी ीे सीशरींर्षीश्र ींे र्ूेी- मुलांशी, घराशी असलेली तुझी रींींरलहाशपीं, तुझं लरीळपस पर्रींीीश, पिलं लहान असताना तू नाकारलेल्या चांगल्या ेषषशीी- हे सगळं सांगितलं तिनं मला... आणि तेव्हाच मी ठरवलं की आता पुण्यात शो लागला की तुमच्या घरी यायचं... आणि एक कबुलीही द्यायची तुझ्याजवळ. इथं-` अमोल किंचितसा थांबला; पण अनिलच्या चेेहेऱ्यावर उत्सुकतेशिवाय दुसरं काहीच नव्हतं, ``मनू फोनवर तुमच्या १५ वर्षांच्या लग्नानंतरच्या प्रवासाबद्दल सांगत होती ना- मला चक्क हेवा वाटला यार तुझा!... जेवढी तडतडी आणि आखडू होती ना कॉलेजमध्ये असताना- आता तेवढीच समंजस वाटली मला, हा तुमच्यातला एकमेकांबद्दलचा आदर आणि अंडरस्टँडिंग... जवळून बघायचा मोह झाला मला... मग ठरवून टाकलं आणि आलो!''
एकीकडे सुखावत होता अनिल पण असूयेची एक सूक्ष्म कळ उठलीच मनात- हे सगळं असं माझ्याशी कधीच बोलत नाही मनू- उलट बऱ्याच वेळा स्वत:च्याच त्यागाचा टेंभा मिरवत असते... तशी एवढी एक गोष्ट सोडली तर डहश ळी सीशरीं रपव र्श्रेींळपस, पे र्वेीलीं! आणि आता तर सगळं तुझं तेच माझं नि माझं तेच तुझं अशी अवस्था आलीय-
तिच्यावर रागवलं तर स्वत:वरच रागवल्यासारखं वाटतं... पण हे अमोलला कसं सांगावं याचा विचार अनिल करीत होता. तेवढ्यात मनू कॉफीचा ट्न्े घेऊन आली. दोन चमचे साखरेचा कप आठवणीनं अमोलच्या हातात दिला- अर्धा चमचा साखरेचा अनिलला आणि एक चमचा साखरेचा कप स्वत: घेऊन खुर्चीत बसली. पहिला कॉफीचा घोट घेऊन ती काहीतरी बोलणार होती एवढ्यात अमोल म्हणाला, `मन्या %%, तुझी दोन्ही हातांनी कप धरून चहा, कॉफी प्यायची सवय तशीच आहे की अजूनही!`
`अरे, नशीब आज कपाने तरी पितीय तुझ्यासमोर, एरवी दररोजचा चहा दोन्ही हातांनी बशी धरूनच पिते, अजूनही-` अनिलनं तिला चिडवण्याची संधी साधून घेतली. या कॉमेंटला नेहमीसारखं तडतडून उत्तर द्यायच्या मनस्थितीत ती आत्ता नव्हती... ती दचकली होती अमोलनं तिच्यासाठी पूर्वीइतक्याच सहजतेनं वापरलेल्या `मन्या' या हाकेवर, खरं तर कॉलेजमधल्या
त्यांच्या ग्रुपमध्ये तो एकमेव असा मुलगा होता की त्याच्याबरोबर बोलताना, काम करताना अगदी त्याच्या शेजारी बसताना किंवा गाडीवर त्याच्या मागे बसून जाताना... तिला अजिबात संकोच वाटायचा नाही- तो मुलगा- मी मुलगी हा विचारच मनात यायचा नाही.
अनिलशी झालेली तिची मैत्री- त्याला मिळालेलं प्रेमाचं वळण- मनात असूनही स्वत:च्या पायांवर उभं राहीपर्यंत तिचं त्या प्रेमाची कबुली न देणं- आणि नोकरी लागल्यावर होकार दिल्यानंतर.. लग्न होईपर्यंतचा संघर्ष... या सगळया गोष्टी मनूनं त्याच्याशी एक जवळचा मित्र या नात्यानं वेळोवेळी शेअर केल्या होत्या.. अगदी त्यांच्यात झालेली भांडणंसुद्धा ती त्याला सांगायची, बहुतेक वेळा त्याचीच बाजू घेऊन तो तिची समजूत घालायचा त्याला अधिक समजून घेण्यासाठी तिला मदत करायचा... त्याचं लग्न झालं त्याच वर्षी त्याला मुंबईला नोकरी लागली. मग लग्नानंतरचा त्यांचा संघर्ष, दोन बाळंतपणं, बदलीची नोकरी यातच दहा वर्षं गेली. या काळात तिला अमोलची आठवण होत नव्हती असं नव्हतं- एकदा दोनदा त्याचा पत्ता, फोन नंबर मिळवण्याचा प्रयत्नही केला होता तिनं, पण असं हात धुवून त्याच्या मागं लागता आलं नाही. ग्रुपमधलं कुणी भेटलं तर जुजबी बातम्या कळायच्या एवढंच! चार वर्षांपूर्वी दोघंही पुण्यात स्थिरावले आणि वर्षापूर्वी फ्लॅटही घेतला...! दरम्यान अमोल त्याच्या कवितांचे गाऊन स्टेज शो करतोय हे कळलं होतं कुणाकडून तरी- मागच्या वर्षीच त्याची क्रॅसेट मिळाली तिला पण पत्ता नाही मिळाला- एकदा दोनदा पुण्यातही कार्यक्रम लागल्याचं वाचलं; पण एकदा अनिल नेमका टूरवर होता आणि दुसऱ्यांदा मनूची कार्यक्रमाला जायची इच्छा पाहून अनिल म्हणाला होता- `तू जाऊन ये ना एकटी, मी आहे मुलांजवळ किंवा शुभमला घेऊन जा... आवडेल त्याला तो प्रोग्रॅम.'' पण घरापासून दहा-बारा कि. मी. अंतरावरच्या नाट्यगृहात रात्री ९ च्या शो ला ७-८ वर्षांच्या मुलाला गाडीवर घेऊन जायची रिस्क ती नाही घेऊ शकली- आणि ती जात नाही हे पाहून त्यालाही फारसं काही वाटलेलं दिसलं नाही. `आनंदच झाला असेल मनातून त्याला' असंही वाटून गेलं तिला त्या वेळी! आणि `त्याला बरं वाटावं म्हणूनच हा निर्णय घेतला आपण' असंही खुशाल वाटून दिलं स्वत:ला तिनं.
त्यानंतर चारपाच महिन्यांनी `लोकसत्ता'मध्ये त्याची मुलाखत वाचली तिनं- तिच्यात त्याचा इ-मेलचा अॅड्न्ेस मिळाला- लगेचच त्याला एक छोटंसं पत्र- त्याच्या क्रॅसेटवरच्या आणि मुलाखतीवरच्या प्रतिक्रिया देणारं- त्याला पाठवून दिलं- त्यात स्वत:चा पत्ता, फोन नं. द्यायला अजिबात विसरली नाही... त्याच रात्री त्याचा फोन आला... केवढं भरभरून आणि उत्साहाने बोलत होता- पूर्ण १५ मिनिटं- शेवटी फोन ठेवता ठेवता आपणहून म्हणाला, ``आता पुण्यात शो- लागला की येतो तुझ्या घरी''- आणि अगदी आधी आठ दिवस कळवून ठरलेल्या वेळी आलासुद्धा! खरं तर त्यानं दिवस कळवल्यापासूनच कधी नव्हे ती एक्साईट झाली होती मनू! पण ते बाहेर फारसं न दाखवता सहज केल्यासारखी रोज एक तयारी चाललीच होती तिची. अनिलचं पण हे करू या, ते करू या असं आठ दिवस चाललंच होतं. मनू म्हणाली पण त्याला एकदा, ``अरे, तो काही पाहुणा नाहीय कुणी महत्त्वाचा! मित्र म्हणून येतोय- तेही दोन अडीच तासांसाठी- आल्यावर गप्पा होणं जास्त महत्त्वाचं-''
``पाहुणा म्हणून नव्हे गं, पण मोठा झालाय तो आता- फार काही नाही पण जेवायला छानसा बेत करू- क्रोकरी काढू शोकेस मधली..'' ``.. छान म्हणजे माझा सगळा वेळ स्वयंपाकात आणि क्रोकरी स्वच्छ करून घेण्यातच जाणार...'' मनूचा आवाज तिच्याही नकळत चढला होता... `मित्र माझा येणार हजार वेळा सांगितलंय की त्याच्याशी गप्पा होणं जास्त महत्त्वाचं आहे सगळयापेक्षा...''
ती अशी संतापली की हल्ली अनिल एकदम शांतपणे तिची समजूत घालायचा... लग्नानंतरच्या पंधरा वर्षांत दोघांनाही केव्हा आग व्हायचं आणि केव्हा पाणी हे हळूहळू कळायला लागलं होतं. आत्ताही अनिलनं खउखउख च्या जाहिरातीतल्या माणसासारखी `हम है ना!' ची अॅक्शन केली आणि म्हणाला, ``तू कशाला काळजी करतीयस मी आहे ना- स्वयंपाकासाठी मावशींना एक दिवस संध्याकाळी बोलवू- तू फक्त सांग त्यांना काय बनवायचं ते- आणि बाकीची तयारी मी करेन ना... वेप'ीं ुेीीू...` हे ऐकल्यावर मात्र `चुकलंच आपलं' असा चेहेरा करीत शांत झाली होती. पण तरीही त्या आठ दिवसांत एक प्रश्न तिला सतत पडायचा- ``अमोल आल्यावर अनिल त्याच्याशी कसा वागेल?'' तिच्या नाटकाच्या ग्रुपमधला तिचा मित्र म्हणून त्या वेळी ओळख होतीच दोघांची... तीन-चार वेळा तिच्याबरोबर अनिलच्या घरीही आलेला तो लग्नाआधी पण तिच्या मनात हा प्रश्न येण्याचं कारणही तसंच होतं. एकदा लग्नाआधीच्याच काळात वादावादी करताना अनिलनं अमोलच्या तिला `मन्या' म्हणून हाक मारण्यावर आक्षेप घेतलेला- `तुमच्या मैत्रीबद्दल मला काही वाटत नाही; पण सगळयादेखत त्यानं तुला `मन्या' म्हटलेलं नाही आवडत मला' असं म्हणालेला अनिल तिला, ती खूप भांडलेली त्याच्याबरोबर यावरनं... आत्ताही इतक्या वर्षांनंतरच्या भेटीत अमोल सहजपणे तिला `मन्या' म्हणाला आणि ती आतून दचकली.. खरं तर आता इतकं ार्रींीीश झालं होतं त्यंाचं नातं तरीही अशा फटी का राहाव्यात एकमेकांना समजताना- का दचकायला व्हावं असं... या प्रश्नात कॉफी पिता पिताच ती हरवली होती... मनातला संघर्ष चेहेऱ्यावर उमटू न देण्याचा प्रयत्न करीत अनिलचा चेहेरा वाचायचा प्रयत्न करीत होती. अनिलनं सवयीनं ते हेरलं. `मन्या'चा इतिहास त्यालाही आठवला... काहीतरी छान बोलून तिच्या मनातला गोंधळ दूर करावा असा विचार तो करत होता
तेवढ्यात अमोलच म्हणाला, ``अनिल, म्हातारी झाली का रे ही इतक्यात, तुला आठवतं आपण पूर्वी तिला दोन्ही हातांनी कप धरून चहा पिण्यावरून चिडवायचो तेव्हा कशी ताडताड उडायची ही.. आणि आज चक्क पांढरं निशाण..?'' ``आपण चाळिशीला आलोयत, हे येतं असं कधी कधी लक्षात तिच्या..'' ... अनिल म्हणाला. त्यावर काहीही न बोलता रिकामे झालेले कॉफीचे कप ट्न्ेमध्ये ठेवून ते उचलत ती म्हणाली, ``जेवायला तुझ्या फर्माइशीनुसार पिठलं भाकरीचाच बेत आहे, मावशी आल्यायत त्यांना पुढचं सांगून मी आलेच...''
``थेपवशीर्षीश्र, लसणीचं पिठलं करायला सांग- थो % डंसं झणझणीत आणि जमलं तर कडक भाकरी... आपल्या सोलापूरसारख्या, मजा आयेगा!''
``ऊेप'ीं ुेीीू, हो जायेगा, मावशीचं माहेर सोलापूरकडचंच आहे- त्या छान बनवतात कडक भाकरी आणि... पावणे नऊला निघायचंय म्हणालास ना तुला.. आठच्या सुमारास बसू जेवायला..!''
``चलेगा... आताशी कुठं पावणेसात होताहेत अजून सव्वातास आहे आपल्याजवळ... तू ये लवकर..''
मनूनं मग स्वयंपाकघरात जाऊन मावशींना सगळया सूचना व्यवस्थित दिल्या.. पाहुणा सोलापूरकडचा आहे म्हटल्यावर मावशीही उत्साहानं कामाला लागल्या आणि मनू गॅलरीत आली. आज तिला जास्तीत जास्त वेळ अमोलशी बोलायचं होतं... म्हणूनच स्वाती बरोबरच धाकट्या शुभमलाही तिनं गाण्याच्या क्लासला पाठवलं होतं.. त्याला ते नेहमीच आवडायचं... दोघंजण साडेआठलाच येणार होती... सासू सासरेही चार दिवसांसाठी लेकीकडं गेलेले- `ते असते तर त्यांनीच निम्मा वेळ खाल्ला असता आपला'- तिच्या मनात येऊन गेलं... लग्नाआधी तीन-चार वेळाच आलेला घरी तसा पण आला की आधी थेट स्वयंपाकघरात घुसायचा- पाचच मिनिटं पण मांडी घालून आई शेजारी बसून गप्पा मारायचा... त्यांना स्वयंपाकाची चारी ठाव हौस- काहीतरी वेगळं असायचंच घरात केलेलं- ते खुशाल हातानं घेऊन खात खात बाहेरच्या खोलीत यायचा- अनिलच्या बहिणीला काहीतरी चिडवाचिडवी करायचा- बाबांशी दोन मिनिटं चक्क ऑफिसच्या कामाविषयी बोलायचा आणि मग नंतर आमच्यात येऊन मिसळायचा... त्या वेळी तिला वाटायचं... आपण जिथं जातो तिथं घरातल्या सगळया माणसांना असं `आपलसं' करून घेता आलं पाहिजे. विशेषत: अनिलला होकार दिल्यानंतरच्या काळात तीही अनिलच्या घरातल्यांशी असंच वागायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायची... पण त्याचं कौतुक त्या दोघांचा लग्नाचा निर्णय कळेपर्यंतच झालं. नंतर एखाद्या सिनेमात घडावं तसं जे घडायचं होतं ते रामायण घडलंच नंतर `स्वीकारलं' सगळं त्यांनी पण यातला `नाईलाज' अजूनही डोकं वर काढतोच अधूनमधून..! खरं तर या माणसांना जिंकायसाठी खू%% प चांगलं... म्हणजे त्यांच्या दृष्टीनं चांगलं वागायची, कायम नमतं घेऊन आधी त्यांचा विचार करायची- सुरुवातीला लावून घेतलेली सवय- मनूला आणि खुद्द अनिललाही मोडताच आली नाही आजपर्यंत कधी-!
त्यामुळं सगळया इकडच्या तिकडच्या नातेवाइकांत आदर्श ठरला संसार त्यांचा... पण त्यासाठी जे गमवावं लागलं त्याची दबलेली खंत आज अमोलच्या येण्यानं उसळून वर आली होती. तिचा उद्रेक अमोलसमोर निदान आज तरी होऊ नये असं मनापासून वाटत होतं तिला. आपला विषय फारसा वाढू न देता त्याच्या कविता, प्रोग्रॅम, क्रॅसेट्स यावरच बोलायचं असं मनाशी ठरवीत ती गॅलरीत आली... तेव्हा अनिल त्याला त्याच्या पब्लिसिटी ऑफिसमधल्या गमती जमती सांगत होता.. आणि अमोल एखाद्या निरागस लहान मुलाच्या जिज्ञासेनं आणि उत्सुकतेनं सगळं ऐकत होता. `कोणत्याही विषयात एवढा रस कसा काय घेऊ शकतो हा माणूस... की समोरच्याला खूष करण्यासाठी..?' विचार करत ती खुर्चीत जाऊन बसली तरी दोघांनाही त्याची दखल नव्हती. एरवी कदाचित तिला रागही आला असता- पण एके काळी त्यानं आपल्याला `मन्या' म्हणून संबोधलेलं ज्याला आवडायचं नाही तो आपला नवरा आणि ते अजूनही तसंच संबोधणारा खूप वर्षांनी तरी जसाच्या तसा भेटलेला तिचा मित्र- याचं ते हितगुज पाहताना आतलं कसलंतरी धुकं निवळत चालल्याचा अनुभव येत होता तिला...!
``चला, शेवटी जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही तिच्यात सामील न होता शपक्षेू करायला शिकलास तर तू.''
``अगदी नेमकं बोललास... पण आता मी थांबतो- मन्या आलाय बघ केव्हाचा... मी असाच बोलत राहिलो तर रात्री डोक्यावर शिल्लक आहेत तेवढे चार केस माझी मलाच उपटून घ्यायची वेळ येईल- मी आता जरा खाली जाऊन स्वीट घेऊन येतो मस्तपैकी आणि तयारी करतो जेवणाची तोवर तुम्ही तुमच्या जड जड गप्पा मारा..''
``अरे, स्वीट बीट काही नकोय मला...'' अमोल म्हणाला पण ते ऐकायलाही अनिल गॅलरीत थांबलेला नव्हता. ``गेलाय तो आता... त्याच्या मनात आलं ना एकदा की कुणाचंच नाही ऐकणार तो... जाऊ दे...'' मनू म्हणाली.
``ठीकैय बाबा, तुमच्या तावडीतच सापडलोय तेव्हा जाऊनच द्यायला हवं... आता तुम्ही बोला मनोरमाबाई... काय म्हणतोय तुमचा संसार, बँकेतली नोकरी.''
``माझं जाऊ दे रे... सगळं छान सरळसोट... सो कॉल्ड सुखी संसाराचं रूटीन चाललंय सध्या.. यात तुला सांगण्यासारखं वेगळं काहीच नाही... आता तुझं सांग... कार्यक्रम तर जोरात चालू आहेत तुझे... नोकरी सोडून यात पडायचा निर्णय कसा काय घेतलास तू? झगडावं तर लागलं असेलच ना?''
``खरं सांगू का, मनू.. याचं सगळं श्रेय माझ्या ींहश सीशरीं बायकोला जातं... डॉक्टर आहे ती, ठाऊक असेलच तुला...''
``हो संपदानं सांगितलं मला- ती आली होती नं लग्नाला
तुझ्या! कशी आहे बायको तुझी? म्हणजे दिसायला नव्हे हं स्वभावानं?''
``झशीषशलीं बायको आहे. तिची प्रॅक्टीस बऱ्यापैकी चालते मुंबईत शिवाय एका मेडिकल कॉलेजमध्ये र्सीशीीं श्रशर्लींीीशी म्हणूनही जाते- एकदा त्यांच्या कॉलेजात कुणा रिमिक्स वाल्यांचा एक चॅरिटी शो ठेवला होता. आणि त्यांच्या गाडीला कार्यक्रमाच्या आधी चारच दिवस अचानक अपघात झाला म्हणून तो क्रॅन्सल झाला- तिकीटं तर सगळी खपवलेली. पर्याय म्हणून बायकोनं माझं नाव सुचवलं... तोपर्यंत माझी दहाबारा गाणी चाली वगैरे लावून तयार होती- हौशी वादकांना घेऊन दोनचार कार्यक्रमही केले होते... कॉलनीतल्या गणेशोत्सवात वगैरे... चार दिवसांत कोरस, वादक सगळयांची जुळवाजुळव करून बारा बारा तास प्रॅक्टीस करून घेतली आमची पठ्ठीनं- प्रश्न तिच्या इभ्रतीचा होता... पण तिला माझ्यापेक्षाही जास्त विश्वास होता की कार्यक्रम चांगलाच होणार... आणि तुला सांगतो निवेदनाचं पाणी घालून घालून दोन तासांचा बसवलेला तो १५ गाण्यांचा कार्यक्रम... पोरांनी थिएटर डोक्यावर घेतलं. प्रत्येक गाण्याला `वन्समोअर'- साडे तीन तासानंतर शेवटी मी हात जोडून विनंती केली की बाबांनो आता थांबू या! आणि त्या एका रात्रीत आम्ही हौशी कलाकारांचे हिरो झालो- तरुणमंडळींना या रिमिक्सच्या जमान्यात कविता अशी आवडू शकते- ही गोष्टच मला... अख्ख्या जगण्यासाठीच आशादायक वाटली... मग खूप आमंत्रणं यायला लागली- क्रॅसेटही निघाली... बायको म्हणाली, दे आता सोडून नोकरी.. आम्ही ऐकलं आणि...''
``खरंच नशीबवान आहेस तू... म्हणजे तुला पैसा आणि प्रसिद्धी मिळत्येय म्हणून नाही म्हणतैय मी हे- पण आपल्या आवडीची गोष्ट २४ तास करायला मिळणं- तेच आपल्या चरितार्थाचं साधन होणं- याला खरंच नशीबच लागतं रे...''
मनूनं `नशिबा'च्या गोष्टी कराव्यात हे पाहून चक्रावलाच अमोल! दैव, नशीब र्शींशप देवालासुद्धा `सबकुछ झूट' म्हणणारी- आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास हवा असं ठामपणानं सांगणारी आणि ते सिद्ध करण्यासाठी तासन्तास वाद घालणारी मनू... एवढी कशी बदलली. मनूनं त्याच्या मनातला प्रश्न ओळखला- आणि म्हणाली, ``हो बदललीयत माझी मतं- शेवटी परिस्थिती बदलवू शकते रे माणसांना- आमच्या दोघांचंही बघना काय झालंय- एखादं युद्ध जिंकल्याच्या नशेत होतो लग्न झालं तेव्हा.. सगळी दुखावलेली माणसंही जीव लावून परत मिळवली... र्ूेी लरप'ीं लशश्रळर्शींश पण सासूबाइंर्नी आपली म्हणावं म्हणून सोवळयानं तासन्तास पूजा केल्यायत मी... आणि या सगळयाच गोष्टीत इतके गुंतत गेलो की स्वत:लाच हरवून बसलोयत आता.''
बोलायचं नाही असं ठरवूनही तिच्या मनातली खंत अशी सांडलीच त्याच्यासमोर. हे ऐकताना त्याच्या डोळयांतलं हसू
हरवलं- दोन दाट भिवयांच्या मधोमध एक अठी उमटली- डोळे अधिकच भेदक झाले- ते थेट तिच्यावर रोखून त्यानं एक मोठा श्वास घेतला-... समोरच्याचं म्हणणं पूर्ण ऐकून घ्यायचं, त्याची वाफ मोकळी होऊन द्यायची नि नंतर कमालीच्या संथ लयीत पण ठामपणानं एकेका मुद्द्याचा समाचार घ्यायचा. समोरच्याला फैलावर घ्यायचं असलं की तो अशीच सुरुवात करतो हे मनूला आठवलं... ती क्षणभर बिथरली पण त्याच्या शब्दांना सोसायला का कुणास ठाऊक पण आसुसली सुद्धा! ``इतकी नाराज का आहेस आयुष्यावर, मने तू? तू जे गमावलंय असं वाटतंय तुला त्यापेक्षा तू जे कमावलंय ते जास्त मोलाचं आहे हे समजून घे नीट आधी- हे जे कलेची आराधना- आवडती गोष्ट २४ तास... वगैरे डोक्यात आहे ना तुझ्या...? बकवास आहे- कविता लिहिताना जी तंद्री अनुभवतो ना तेवढी फक्त खरी... बाकीचं पळपींू शिीलशपीं नुसतं शिीीशिीरींळेप नाही तर निर्लज्जपणा आणि निर्ढावलेपणा असतो नुसता... आणि ही जी प्रसिद्धी अन् पैसा दिसतोय ना... त्यामागं काय काय लफडी दडलेली असतात, कुणाकुणाच्या कशा नाकदुऱ्या काढाव्या लागतात, किती हरामी माणसं मोठेपणाचे बुरखे पांघरून वावरतात... आणि लाळघोटेपणा.. दुसऱ्यांचा आणि स्वत:चाही %% ... जो सोसतोय ना मी सध्या, ते सगळं एक दिवसही सहन करू शकणार नाहीत तुमच्यासारखी माणसं- शेजारच्या टेबलावरच्या माणसानं शंभर दीडशेची लाच घेतलेली अन् ऑफिस अवर्समध्ये स्वत:ची कामं केलेली पाहून संतापता तुम्ही, मग या दुष्टचक्रात अडकून त्याचाच एक भाग होणं- तुझ्या या कलेसाठी... करू शकली असतीस तू?.. आणि अनेकांना वाटतो तसा मी सीशरीं वगैरे खरंच नाही गं!- रिमिक्सवर वेडावाकडा धिंगाणा घालणाऱ्या काही पोरांना कवितेच्या नादाला लावलं- एवढंच खरं- आणखी एक सांगू तुला..?.. या यशाची जशी एक नशा असते ना तसाच भारही असतो डोक्यावर- तो टिकवण्याचा- सतत नवं हवं असतं लोकांना- आणि पुढची निर्मिती तुमच्या दृष्टीनं ार्रींीीश असली तरी लोकांना नाही आवडत- काय करू शकता अशा वेळी तुम्ही? लोकांना आवडणारं लिहायचं म्हणून बसू शकता लिहायला? निर्मिती ही अशी कुणाला आवडण्या न आवडण्याचा विचार करून होणारी गोष्ट आहे का?...
इथं अमोलनं किंचितसा र्रिीीश घेतला, त्याचा फायदा घेत मनू म्हणाली, ``पण मला मनापासून वाटतं, अमोल... की तू थांबावंस काही काळ आता- थोडंसं आत स्वत:कडे परत जावं- मग नव्या जोमानं लिहायला लागशील बघ तू- हा र्रिीीश रललशिीं करायला काय हरकत आहे तुला?
``ढहशीश र्ूेी रीश! ख रा ींीूळपस ींहश ीराश रपव ींीूळपस ींे ींशश्रश्र र्ूेी ींहश ीराश... आपल्याच आयुष्याकडं असं वेगवेगळया रपसश्रश नी पाहता यायला हवं आपल्याला. होतं काय की... र्ूेी ींहळपज्ञ, ख रा श्रर्ळींळपस लशींींशी रपव ीे ींहळपज्ञ ख रर्लेीीं र्ूेी- पण अर्धसत्य असतं हे... म्हणजे नाण्याची एक बाजू... आणि हेही लक्षात ठेवायला हवं की नाण्याच्या सगळयाच बाजू एकाच वेळी कुणीच पाहू शकत नाही... तुला आठवतं, मनू.. नाटकात तुझ्या खांद्याला धरून तुला उठवायचो नाही म्हणून चिडायचीस तू माझ्यावर... एरवी रात्री १२/१२ वाजेपर्यंत बरोबर असायचो, गप्पा मारायचो आपण- तुला गाडीवरून घरी सोडायचो तेव्हा एकमेकांना स्पर्श न होण्याची काळजी नाही घ्यायचो आपण आणि संधी तर मुळीच शोधायचो नाही, पण नाटकात ही सहजता नाही जमायची मला कधीच- तू ते भूमिका जगणं बिगणं म्हणायचीस ना नुसत्या बोलायला नि ऐकायला भव्य दिव्य वाटणाऱ्या गोष्टी- अरे, प्रत्येक क्षणी भान असावंच लागतं तुम्हांला तुम्ही नाटक करताहात याचं... ते सुटलं तर काय होईल विचार कर... किंवा समज की माझ्यात नव्हती तेवढी रलींळपस ेुशिी.... आणि तू आत्ता म्हणालीस ना ते त्या वेळी रललशिीं केलं होतं मी- त्या वेळी तडतडली होतीस माझ्यावर... पण त्या वेळी हे असं सांगताही आलं नसतं तुला.. ही तुझ्या माझ्यातल्या नाण्याची दुसरी बाजू... माणूस असतो आपण... भान सुटू शकतं... आणि तसं ते सुटणं नैसर्गिकही असतं हे स्वीकारावं तसं ते सुटू नये म्हणून जपावंही- हेच माणूसपणाचं लक्षण ना?''
त्या क्षणी गॅलरीत आलेल्या अनिलनं फक्त शेवटचं वाक्य ऐकलं आणि ऐतिहासिक नाटकाच्या टोनिंगमध्ये तो म्हणाला, ``हे माणसांनो, आपलं वेळेचं भान सुटू नये म्हणून आपल्याला भानावर आणायचं पाप करतोय- ताटं तयार आहेत- जगाची काळजी करणाऱ्या माणसांनी आता जगाचं मूळ कारण असलेल्या पोटाची पूजा करण्यासाठी चलावं...'' नंतर नाटकीपणानं तीन वेळा कपाळाला हात लावीत कुर्निसात केला आणि म्हणाला, ``काय, जमलं की नाही?'' मनूनं डायनिंग टेबलाकडे पाहिलं- त्याचं वाक्य आणि अभिनयाइतकंच त्यानं केलेली जेवणाची तयारी सुंदर होती. एखाद्या कल्पक सुगृहिणीलाही लाजवेल अशी! तिनं फक्त एक अर्थपूर्ण हसरा कटाक्ष त्याच्याकडे टाकला... तेवढ्यात अमोल म्हणाला... ``थेपवशीर्षीश्र, बरं झालं नंदिताला नाही आणलं आज इकडे.. नाही तर हे सगळं पाहून माझी खैर नव्हती!'' मग याच मूडमध्ये गप्पा थट्टा मस्करी करीत जेवण सुरू झालं- मधेच मुलंही आली. मग अमोलनं अगदी निघण्याच्या क्षणापर्यंत त्यांचा ताबा घेतला- पुढच्यावेळी आला की स्वातीचं गाणं ऐकणार आणि येताना नंदिताला घेऊन येणारं असं िीेाळीश करून तो गेला... मागची आवराआवरी करताना मनू मात्र कमालीची अधीर झाली होती... आज तिला नव्यानं उमगलेली आयुष्याची सुंदरता अनिलबरोबर शेअर करण्यासाठी, गमावलेल्या गोष्टींकडे पाहण्यासाठी, तिला मिळालेला रपसश्रश त्याला दाखवण्यासाठी.. आणि सगळयात महत्त्वाचं म्हणजे तिच्या भोवतीच्या जगाशी असलेलं तिचं नातं अधिक सुंदर करणारी नाण्याची तिसरी बाजू... अमोलच्या मैत्रीची... त्याची आज उजळलेली प्रतिमा त्याच्यासमोर मांडायची !
- सुजाता लोहकरे, पुणे

viagra

bcfilwa viagra %-[[[ cialis DhboY viagra 1046 cialis tadalafil >:]] order cialis ozVLTS viagra %-[[[

viagra

uhwdnum viagra 3502 cialis 8393 viagra online 4328 order sildenafil 5307 cialis :-O cialis YFnbvc

viagra

tdptonfg http://yiuzpg.com/ hnhiap [url=http://dxwalx.com/]hnhiap[/url]

viagra

holitqgi http://kzbblp.com/ hkwipkf [url=http://qmcsgw.com/]hkwipkf[/url]

viagra

noohjc http://kckcmr.com/ gwmtwlo [url=http://akfhgk.com/]gwmtwlo[/url]

yenbeljl

vomnppcj

ychirlk

ejvglp

Office 2007 download

Office 2007 download commending you to office 2010 product key pay for the microsoft office 2007 download someone any person office professional plus 2010 who you consider microsoft office 2007 product key ideal colours your Office 2010 Pro record along with Microsoft Office 2007 Ultimate other is a Windows 7 convenience to and Windows 7 Home Premium also you bulk aesthetically.