Skip to main content

झुंजूमुंजू
दिनकर
संध्याकाळचे सहा वाजले असतील, शाळेतून नुकताच सुटलो आणि घरच्या वाटेवर थकलेले पाय टाकत होतो.
सर्वत्र पावसाचा धुमाकूळ माजला होता. काळया-निळया ढगांची टक्कर आणि प्रचंड गडगडाटात वातावरण भारलेलं होतं. सूर्याचं तेजच संपलं होतं.
वृक्षराई आपल्या शरीराची ढाल करून काळया ढगांचं शरसंधान आपल्यावर झेलत होती आणि त्यांचे पानापानांतून गळणारे रक्त, मातीच्या अश्रूत विरघळत होतं.
``सर... सर....'' मागून शब्द धावत येऊन कानांवर आदळले. तो दिनकर होता.
``सर, ओळखलंत का? मी तुमचा विद्यार्थी, दहावीला तुमच्याच वर्गात होतो.''
मी जरा भांबावलोच; पण माझ्या स्मरणशक्तीने माझा घात नाही केला. तो होता दिनकर, दिनकर घोरपडे. दहावीत तो एकटा मेरिट लिस्टमध्ये आला होता आमच्या शाळेतून.
आज चार-पाच वर्षांनी किती बदललेला दिसत होता तो. तो शरीराने हडकुळा आणि वर्ण जरा काळाच पडला होता. त्याला मी छत्रीत बोलावलं,
``अरे दिनकर, कसा आहेस? ये, छत्रीत ये, किती भिजतोयस!'' तो जरा लाजतच आला, आम्ही पुढे निघालो,
``मग, कसं चाललंय? काय करतोस आता?'' माझा शिक्षकी प्रश्न.
``काही नाही, सर, नोकरीच्या शोधात गेले आठ-दहा महिने नुसता भटकतोय...'' तो करड्या स्वरात उत्तरला.
मी आश्चर्यचकितच झालो. तो तर हुशार, कष्टाळू आणि धैर्यवेडा मुलगा होता. गरीब घरातून असूनही प्रामाणिक आणि शिस्तबद्ध होता.
माझी उत्कंठा मला स्वस्थ बसू देईना. ``अरे, तू तर दहावीला मेरिटमध्ये आला होतास. बारावीतही एका मार्काने तुझं मेरिट चुकल्याचं समजलं मला तुझ्या मित्रांकडून, मग पदवी शिक्षणात काही अडचण...''
माझं वाक्य तोडतच तो बोलला, ``नाही सर, पूर्ण तयारीनिशी बी.एसस्सी. पूर्ण केलं. प्रथम श्रेणीत पदवी मिळविली; पण करणार काय? या जगात पैशाशिवाय जगणं म्हणजे चुलीशिवाय अन्न शिजविण्याचा वेडेपणा करण्यासारखं आहे सर.''
`म्हणजे? काय झालं तरी काय? प्रथम श्रेणी मिळवूनही तुला नोकरी नाही? तुझ्या मनोरथाचे घोडे आज थकलेच कसे? त्यांचा लगाम तू खेचलासच कसा? चल, पुन्हा लढ.''
त्याला प्रोत्साहन देण्याचा एक प्रयत्न तरी... पण त्याची व्यथा खूप दूर होती.
``नाही सर, माझ्या मनोरथाचे घोडे हाकणारा सारथी `पैसा' आहे. त्याचे लगाम परिस्थितीचे बनलेले आहेत आणि `गरिबी' त्याची चाकं आहेत. तो रथ माझा असेल, ते घोडे माझे असतील पण पैशाने परिस्थितीचा लगाम खेचून धरला आहे आणि ही चाकं....! ही गरिबी किती वेळ पळणार? थकणारच ती.
सर, माणसाची मर्यादा त्याच्या कष्ट करण्याच्या प्रवृत्तीवर नाही तर पैसा या रोगावर अवलंबून असते. हा रोग ज्याच्यावर आघात करतो त्याची जगण्याची इच्छाच संपून जाते. या रोगावर अलिखित, शास्त्रज्ञांनाही न सापडणारा आणि केवळ त्या रोग्यालाच उमगणारा एकमेव उपाय असतो. मृत्यू, सुटका, मोक्ष.''
त्याच्या मनाचा तोल पार ढळला होता. अश्रू डोळयांनी अडविले नव्हते; पण पावसाचे अश्रू आणि त्याचे इतके एकरूप झाले की त्या मिलनात मला माझ्या अश्रूंचा सहभाग नको वाटला. दोघांचं दु:ख कदाचित तेवढंच पराकोटीचं होतं.
मी शब्दांची जुळवाजुळव करत होतो; पण माझ्या डोळयांतला प्रश्न, तो तयार होण्याआधीच त्याने पकडला, तो उत्तरला,
``सर, मला आठवतंय, दहावीत बोर्डात आलो असताना, तुम्हांला पेढे देण्यासाठीदेखील माझ्याकडे पैसे नव्हते.
आई-बाबांनी पोटावर दगड ठेवून माझी अकरावी-बारावी पूर्ण केली. मी एकुलता एक असलो तरी लाड कधीच केले गेले नाहीत. आई-बाबांच्या घामाच्या धारांतून माझ्या तळहातावरल्या रेषा स्पष्ट होत होत्या.
आई म्हणायची, `तू शिकणार, मोठा होणार, हेच स्वप्नं या डोळयांना दिसतंय, या डोळयांतले अश्रू खोटे आहेत. माझी स्वप्नं त्यांच्यासारखी गळणार नाहीत. तू त्यांना गळून देणार नाहीस. विश्वास आहे मला, हे डोळे आहेत साक्षीला.'
सर, आई वारली, तीन वर्षं झाली. बाबांना तर मोठा धक्काच बसला. मला ते दु:ख सहन होईना; पण ते डोळेच मला मदत करतात, आठवतात. सर, ते डोळे, `आईचे डोळे.''
बोलता-बोलता तो भावनाविवश होऊन रडू लागला.
``अरे दिनकर, सांभाळ स्वत:ला. दैवलेख कधी कुणाला टळत नसतो.''
``टळलाय सर, टळलाय....'' तो आवेशाने म्हणाला, ``पैशाला टळलाय, दैवलेखात पैसा हा जन्मच नाही. ती माणसाने स्वत:शी खेळायला जन्माला घातलेली तलवार आहे. तीच समशेर मग कापते आम्हांला. ती तलवार अमर आहे, अनंत आहे.''
``बाबांनी स्वत:ला सावरलं आणि मलाही त्या दु:खातून बाहेर ओढलं. पहिल्या वर्षात कमी पडलो तरी पुढच्या दोन वर्षांत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रथम श्रेणीत पास झालो. सर्वांनीच पाठ थोपटली आणि पैशाने.. पैशाने पाठीत सुरा खुपसला.''
तो क्षणभर थांबला आणि उपरोधिक हसत म्हणाला, ``आम्हां गरिबांचं जगणं या सावल्यांसारखं आहे, सूर्यप्रकाश असला तरच अस्तित्व. अन् अस्तित्व असूनही शरीरासोबत पळत राहायचं. आम्हांला चेहरा-मोहरा नसतोच. पैशाचा सूर्य मावळला की दरिद्री रात्रीशी एकरूप होऊन अंधारात मरायचं.''
मला खूपच वाईट वाटलं; पण मी तर पांढरपेशा पुणेरी माणूस. हळहळत बसण्यापेक्षा मला पुढे काहीच करता येत नाही.
पण दिनकर तर माझा विद्यार्थी आहे आणि त्याच्यासाठी मी काहीच ....हो! मला माझीच लाज वाटली.
तो बोलतच होता, ``फर्स्ट क्लासचं बी. एस्सी.चं सर्टिफिकेट घेऊन मी भीक मागत फिरतोय. मोठमोठ्या संस्थांमध्ये लाख-दीडलाख भरल्याशिवाय नोकरी नाही. आम्ही महिना तीन हजार एक वेळची भ्रांत पडून मिळविणारी माणसं; पण माणसाला कुठं किंमत आहे या जगात? सर्व श्रेय तुमच्या खिशाला. हिरव्या नोटांना. तुमच्या रक्ताला नाही, तुमच्या घामाला नाही.
दहा महिने भिकाऱ्यांसारखा भीक मागतोय. फक्त तो भिकारी अशिक्षित आणि मी शिकलेला अशिक्षित. कष्टांच्या मेरूपर्वतावर आज मुंग्यांचं वारूळ पसरलंय.''
मला त्याचं दु:ख पाहवेना. विषय थोडा बदलावा म्हणून मी विचारलं, ``आणि तुझे बाबा, सगळं घर तेच सांभाळतात?''
``ज्याच्या स्वत:च्या पोटावर कुऱ्हाड कोसळली आहे तो दुसऱ्याच्या पायातला काटा काय काढणार?''
``म्हणजे?'' आता कुऱ्हाड माझ्यावर कोसळली.
``दोन महिने झाले. बाबांना कारखान्यावरून बेशिस्तीच्या कारणावरून काढून टाकलंय. ते तरी काय करणार? सहकाऱ्यांनी त्यांना स्वत:च्या बायकोचा खुनी ठरवलंय. पहा हा समाज, सच्च्या प्रेमाला असत्याची सावलीदेखील किती छळते!
आईच्या आठवणीतून स्वत:ला बाहेर काढता काढता ते दारूच्या आहारी गेले. काय करणार! माणूसच तो, आपल्या प्रिय व्यक्तीच्या वियोगाचे दु:ख नाही सहन होत त्याला. सुखाच्या शोधार्थ तो दाही दिशांना भटकतो, वाटेवरचं प्रत्येक साधन, मिळणारी प्रत्येक वस्तू त्याला सुखी करू शकते. साक्षात् मृत्यू प्रकटला तरी तो त्याला आलिंगन देतो.'' माझ्या पायातलं त्राणच संपलं.
``म्हणजे, तुझे बाबा....''
``हो, कालच, काल रात्रीच गेले आईकडे. कुणालाही न सांगता. रात्रीचा अंधारदेखील सुन्न पडला होता. एक जीव, सर्वांना चुकवून पळून गेला. ठेवले ते फक्त दोन अश्रू. `सुखी' या शब्दातले दोन अश्रू.
माझं घर जवळ आलं होतं. मला काय बोलावं तेच कळेना, मग तोच बोलला, ``येतो सर, तुमचं घर आलं जवळ. मी निघतो पुढे. अंधारात चाचपडत बसत किती वेळ जगणार! मी परत तुम्हांला भेटेन की नाही... माहीत नाही सर.
पण माझ्यासारखा अजून कोणी दिनकर जीवनाचे तुकडे गोळा करत असेल, तर त्याला वाचवा, सर.
त्याला सावली नका बनवू सर, त्याला दिनकरही नका बनवू.
सावली आणि दिनकर, दोघं एकत्रच मावळतात त्यांना चेहरा नसतो, अस्तित्व नसतं.''
तो जरा थांबला आणि स्वत:शीच बोलल्यासारखा पुटपुटला. ``आणि जर तो सावलीच असेल, तर त्याला मावळत्या किरणांत नसलेली नवजीवनाची आस शोधायला शिकवा.
शिकवा, अरे कोणीतरी शिकवा... लवकर करा, पैशांचा अंधार मागे लागलाय, लवकर या.''
तो बोलता-बोलता निघून गेला, भिजत-भिजत, पावसात, आपल्याच अश्रूत की मावळत्या किरणांत!
त्या रात्री मला झोप लागलीच नाही. एकसारखा दिनकर डोळयांसमोर येत होता. मी सकाळीच त्याच्या घरी जाण्याचा विचार करत झोपलो.
सकाळ झाली. दिनकराचं दर्शन घेतलं. मनातल्या आणि ढगाआड लपलेल्या.
वर्तमानपत्रात कुठल्यातरी कोपऱ्यात एक बातमी, ``गरिबीला कंटाळून तरुणाची आत्महत्या'' मी गडबडलो. पूर्ण बातमी वाचली. तो तरुण दिनकरच होता. कालची संध्याकाळ मला आठवली. त्याचा एक-एक शब्द माझ्या हृदयावर काटा टोचत होता.
दिनकर राहायचा त्या झोपडवासीत मी एक नजर टाकली. तिथली घरं अजूनही मावळत्या किरणांतच होती.
मला ते बघवेना, मी वर पाहिलं, दिनकर ढगांआड अदृश्य झाला होता. पुन्हा तीच किरणे, मावळतीची.
पाऊस पडतच होता, वृक्ष वारं झेलतच होती आणि जमीन रडतच होती.
आणि माझे डोळे मात्र फक्त अश्रूंची श्रद्धांजली वाहत होती, फक्त गळून पडत होती.

- नागराज मुजुमदार,
पुणे

Office 2007 download

Office 2007 download commending you to office 2010 product key pay for the microsoft office 2007 download someone any person office professional plus 2010 who you consider microsoft office 2007 product key ideal colours your Office 2010 Pro record along with Microsoft Office 2007 Ultimate other is a Windows 7 convenience to and Windows 7 Home Premium also you bulk aesthetically.