आपले अभिप्राय

नमस्कार,

या संकेतस्थळाविषयीचे आपले अभिप्राय आणि प्रतिसाद आपण येथे देऊ शकाल. आपल्याला एखाद्या विशिष्ट अंकावर वा अंकातल्या साहित्यावर प्रतिसाद द्यायचा असेल तर तो त्या त्या पानावर आपण देऊ शकालच पण एकुणातच या संकेतस्थळाबद्दलचे प्रतिसाद असतील तर ते या पानाखाली द्यावेत.

popular TV Shows posters

popular TV Shows posters Most popular TV Shows posters обои к фильму Ужас Амитивилля скачать обои к фильму Хранители схемы скачать схему ykapral2

चित्रे

कव्ह्रर्स अप्रतिम आहेत.ती क्रुपया उपलब्ध करुन द्यावीत.

abhipray

अतिशय सुन्दर लेख असात्तात कविता आनि लेख यात मि रमुन जातो आनि स्वत: चे परिक्शन करतो धन्यवाद

आपले अभिप्राय

Very good post! keep up the good work.
Find cheap airline tickets, hotels,great cruise and golf vacations packages, honeymoon resorts and travel guides, cheap flight information and more.

अभिप्रायासम्बंधी थोडेसे

फक्त अभिप्राय स्विकारुन ते प्रसिद्ध करणे हे आपले उद्दिष्ट नसावे. त्याऐवजी, निवडक अभिप्रायच जाहीर करावेत. तसेच त्यांचा आपल्या प्रसिद्धीला उपयोग होईल असे पाहावे. बदनामकारक आणि अर्धवट बुद्धीने लिहिलेले अभिप्राय कशासाठी जाहीर करता? तरीही, सर्व अभिप्रायांचा विचार जरुर करावा आणि योग्य ते बदलही आत्मसात करावेत.

श्रीमती बाळ ह्यांचा 'मिळून सार्‍याजणी विषयी' शीर्षकाचा लेख

'मिळून सार्‍याजणी विषयी' ह्या शीर्षकाखाली श्रीमती विद्या बाळ ह्यांनी लिहिलेल्या ’मुख्य पाना’त प्रदर्शित झालेली त्यांची मराठी लिखाण लिहिण्यासंबंधीची निकृष्ट कुवत पाहून मी स्तिमित झालो आहे.

श्रीमती बाळ ह्यांच्या ह्या ’मुख्य पाना’तल्या कितीतरी वाक्यांमधली शब्दरचना कमालीची गबाळी आहे; आणि सबंध ’पाना’त व्याकरणाचे दोष रेलचेलीने आहेत.

वीस वर्षे ’स्त्री’ मासिकाच्या आणि त्यानंतर वीस वर्षे 'मिळून सार्‍याजणी’ मासिकाच्या संपादिका असलेल्या श्रीमती बाळनी हे लिखाण लिहिले असेल ह्या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही.

('वेबसाइट'मधल्या काही वाक्यांमधल्या अनाकलनीय गबाळेपणाचे मूळ श्रीमती बाळ ह्यांच्या 'लेखणी'त नसून 'वेबसाइट' तयार करणार्या व्यक्तीच्या मराठी भाषेबद्दलच्या पार अज्ञानात असण्याची बरीच शक्यता आहे. पण लेखिका आणि संपादिका ह्या दोन्ही नात्यांनी सगळ्या गबाळेपणाची आणि व्याकरणदोषांची अंतिम जबाबदारी श्रीमती बाळ ह्यांची आहे. शिवाय बरीच सदोष वाक्ये निःसंशय श्रीमती बाळ ह्यांची स्वतःचीच आहेत.)

गबाळी शब्दरचना नाही तर कुठला ना कुठला व्याकरणदोष असलेली श्रीमती बाळ ह्यांच्या ’मुख्य पाना’तली सुरवातीची फक्त काही वाक्ये मी नमुन्यादाखल खाली उद्धृत करतो आणि एकाद्या सामान्य संपादकानेही त्या वाक्यांची जी संपादित रूपांतरे सुचवली असती तीदेखील लिहितो. (श्रीमती बाळ ह्यांची खालची वाक्ये आणि त्या वाक्यांची सुचवलेली रूपांतरे वाचकांनी बारकाईने पडताळून पहावीत.)

.....................................................................

* 'तेव्हापासून, आजपर्यंत एकही अंकाचा खंड पडता, दरमहा हे मासिक नियमितपणे प्रसिध्द होत आहे.' - श्रीमती बाळ

- 'तेव्हापासून आजपर्यंत एकाही अंकाचा खंड न पडता दरमहा हे मासिक नियमितपणे प्रसिध्द होत आहे.'

.....................................................................

* 'ऑगस्ट २००७ मध्ये 'मिळून साऱ्याजणी' १८ वर्षाची वाटचाल पूर्ण करून १९ व्या वर्षात पाऊल टाकत आहे.' - श्रीमती बाळ

- 'ऑगस्ट २००७ मध्ये 'मिळून साऱ्याजणी' १८ वर्षांची वाटचाल पूर्ण करून १९ व्या वर्षात पाऊल टाकत आहे.'

.....................................................................

* 'हे मासिक सुरू करण्यामागची पाश्वभूमी थोडक्यात सांगायची तर अशी सांगता येईल की, किर्लोस्कर प्रकाशन बंद करण्याचा निर्णय घेतला. गुडविलसह ही प्रकाशन प्रा. लि. यांनी विकत घेतली. मालकी आणि व्यवस्थापनातील बदलाच्या या टप्प्यावर, मी `स्त्री'च्या संपादकपदाचा राजिनामा देऊन बाहेर राखता येइेल असा विश्वास वाटला नाही. म्हणून `स्त्री' मधल्या कामाच्या सुरूवातीपासूनची २०-२२ वर्षांची अनुभवांची आणि जाणिवेची कमाई घेऊन मी त्या कामाचा निरोप घेतला.’ - श्रीमती बाळ

- 'हे मासिक सुरू करण्यामागची पार्श्वभूमी थोडक्यात सांगायची तर ती अशी सांगता येईल : [अमुक] साली [अमुक] संस्थेने किर्लोस्कर प्रकाशनसंस्था विकत घेतल्यानंतर [अमुक] कारणाकरता `स्त्री' मधल्या माझ्या कामाच्या २०-२२ वर्षांच्या अनुभवांची कमाई हाती घेऊन मी त्या मासिकाच्या संपादकपदाचा राजिनामा दिला.'

.....................................................................

* 'पत्रकारितेनं आणि स्त्रियांच्या चळवळींनं मला अनेक अंगांनी वाढण्याची संधी दिली. म्हणून `स्त्री' मासिक सोडलं तरी स्त्रियांच्या प्रश्नांविषयीची आस्था आणि पत्रकारितेबद्दलची कृतज्ञता माझ्या मदा होतीच. म्हणून वयाची पन्नाशी ओलांडलेल्या आयुष्याच्या टप्प्यावरही मी हा निर्णय घेतला. माणूस,सत्यकथा, हंस, मोहिनी सारखी दर्जेदार नियतकालिकं त्यावेळी बंद केली जात होती. काळ फारसा अनुकूल नव्हताच. तरीही, ' मिळून साऱ्याजणी' सारखं स्त्री मासिकाच्या पलीकडे अर्धंतरी पाऊल टाकता यावं, अशा स्वरूपाचं मासिक सुरू करण्याचा मी निश्चय केला आणि कामाला लागले. मासिकाची उद्दिष्टं मनामध्ये निश्चित केली.

मासिकाची उद्दिष्टे’

- श्रीमती बाळ

- 'पत्रकारितेने आणि स्त्रियांच्या चळवळींनी मला अनेक अंगांनी वाढण्याची संधी दिली. `स्त्री' मासिकाचे संपादकत्व मी सोडले तरी स्त्रियांच्या प्रश्नांविषयीची आस्था आणि पत्रकारितेबद्दलची कृतज्ञता माझ्या मनात होतीच. म्हणून वयाची पन्नाशी ओलांडलेल्या माझ्या आयुष्याच्या टप्प्यावरही मुख्यतः स्त्रियांच्या प्रश्नांची चर्चा करणारे एक नवीन मासिक सुरू करायचे मी ठरवले. 'माणूस', 'सत्यकथा', 'हंस', 'मोहिनी' ह्यांसारखी दर्जेदार नियतकालिके त्यावेळी बंद केली जात होती आणि कोणतीही नवीन मासिके सुरू करायला काळ फारसा अनुकूल नव्हता. तरीही 'स्त्री’ मासिकापलीकडे निदान अर्धेतरी पाऊल टाकता येईल अशा स्वरूपाचे ' मिळून साऱ्याजणी' नावाचे मासिक सुरू करायचा मी निश्चय केला आणि मी त्या कामाला लागले.

माझ्या मनात त्या वेळी मी निश्चित केलेली नव्या मासिकाची उद्दिष्टे अशी होती :'

.....................................................................

गौरी देशपांडे विशेषांक

स.न.वि.वि.
मला गौरी देशपान्डे यांच्यावर आपण काढलेल्या विशेषांकातील संजय जोशी आणि द.भि.कुलकर्णी यांचे लेख हवे आहेत.ते मला कसे मिळतील ते क्रुपया कळविणे.
---अश्विनी

संकेतस्थळाबद्दलचा अभप्राय

सेकोतसथळावरील मराठी फॉंट सुधारणे जरूर आहे.

फॉंट, इंग्रजी मजकूर आणि गमभन

मराठी फॉंट उपक्रम, सुरेश भट, मराठी गझल अथवा प्रसाद शिरगावकरांच्याच साधा-सोपा यांसरख्या संस्थळावरील फॉंटसारखा ठेवावा.
बर्‍याच ठिकाणी मजकुरात इंग्रजी अक्षरे असल्यास 'ब्सद्व्हद्क्फ्दिएम्क्द' असे निरर्थक लेखन उमटलेले आढळते. त्याचाही बंदोबस्त केल्यास उत्तम.
तसेच प्रतिसादासाठी जर 'गमभन' वापरले असेल तर त्याचा उल्लेख जरूर करावा.

एकंदर संस्थळ आवडले.

उपक्रम

उपक्रम असे वाचावे

उपसक्रम वरील प्रियालि यांचा लेख

सोबत दिलेल्या लिन्कवर प्रियालि यांचा लास वेगास वर चा चांगला लेख मिळून सार्‍या जणी साठी छापण्यास चांगला वाटतो
http://mr.upakram.org/node/532#comment-7765

फेब्रु २००८-दैवाकर कार्खानिस्स यान्चा लेख्

प्रिय मिलून सर्यजनिस्
सहचर- सहचरी हा दीवाका

कविते सबन्धि

मा.सपादक्
मिलुन्सर्यजनि

आपल्या मार्च २००८ च्या अकतल्या एक औरन्गबद्च्य कवियत्रिचि कविता मझ्या ऐकन्यत अलि.

"सवित्रि, म्मिच का वदचि पिज करवि? मि त्वो विलर चलवते,त्यहुन फास्त नेत चाल व्ते तर सत्यवनने हिच बयको मिलन्यसथि

वद पुजा करवि" अशा अशयचि कविता आप्ल्या अन्कतुन प्रसिध झालि आहे.तरि आपन ति कविता मला पाथ्वाल का?

आभरि आहे.

विजया सामत. ठाने. ९/३/०८

लेख:

प्रेरणा हिचा लेख खुप आवडला.
जया..बेळ्गाव्

कविता

हय ............!
मि मेय्थिल्य ....
मी अप्ले मग्झिन वाचाले अहे .माल यत सह्भगि व्हाय्चे आहे. यासायथि मला साहाय्य करावे.

हि माझि विनाथि अहे ..........