बेहुला कथेचा उर्वरित भाग
वसंत कलकत्त्याला जाऊन अँटिसिरम घेऊन आला. ज्याच्याकडे जाई तो डुलक्या देत म्हणे, `ओ, अँटिसिरम?' मग थोडंसं देऊन कर्तव्यभावनेनं म्हणे, `पण या औषधाची रिअॅक्शन असते हे लक्षात ठेवा.'
`माहीत आहे.'
`काय माहीत आहे?'
`हे औषध आमच्या इन्स्टिट्यूटमध्येच तयार होतं; पण का हो, हे इथेच पडून राहतं का?'
`तेच तर बघतोय मी इथं लागल्यापासून. कपाटांची शोभा अन् काय?' वसंतला वाटलं, हेच एखादं बाजारू औषध असतं तर! त्याला फारच असहाय वाटू लागतं. सर्पदंशावरचं औषध तयार करायला एखादी कंपनी का तयार होत नाही? काय तर म्हणे साप चार लाख माणसांना चावतात आणि त्यातले मरतात फक्त वीसेक हजार! वा रे वा! आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कित्येक वर्षांपासून हा वीस हजार मृत्यंूचा आकडा जसाच्या तसाच? भारतातल्या सापांमध्ये आणि माणसांमध्ये काही समझोता झालाय की काय?
बरं, औषधकंपन्या करत नसल्या तरी सरकार तर औषध तयार करतंय ना? महाविषारी सापांच्या विषानं घोड्याला हायपर-इम्युनाइझ करून घोड्याच्या प्लाझमापासून- प्लाझमा रासायनिक प्रक्रियेनं सुकवून! असं सुकलेलं अँटिव्हेनम पुष्कळ दिवस टिकतं. औषध तयार होतंय तर मग त्याचं वाटप का होत नाही? गोदामात भरून ठेवून काय उपयोग? की सर्पदंशाचा इलाज फक्त कलकत्त्यालाच झाला पाहिजे? कलकत्त्याच्या अगदी उंबरठ्याजवळ असलेल्या इरफानपूरच्या हेल्थ-सेंटरमध्ये औषध का नाही? बेहुला ब्लॉकमधल्या माणसांना अगतिकपणे सापांच्या मर्जीवरच का जगावं लागतं? हेदो नस्कर विटा का विकत नाही? हेदो नस्करला शिक्षा देण्याचा काहीही अधिकार प्रशासनाला नाही का?
एक ना अनेक विचार करत जाताजाता वसंतला हेल्थ-सेंटरमधल्या डॉक्टरचं बोलणं आठवलं. त्यानं स्टेराइल- फिेजऑलॉजिकल सॉल्ट सोल्युशन विकत घेताना त्याबरोबर दोन सिरिंजही विकत घेतल्या. एक टॉर्च आणि अंदाजानं श्रीपदच्या पायाच्या मापाचे फुटपाथवरचे सँडक पंप-शू घेतले.
मुद्दामच तो संध्याकाळच्या गाडीनं परतला. थेट हेल्थ-सेंटरच्या डॉक्टरच्या घरी जाऊन त्यांना अँटिव्हेनम व सोल्यूशन दिलं आणि म्हणाला की माझं नाव कोणाला सांगू नका नाहीतर तुम्ही व मी दोघेही फसू.
डॉक्टर भारावून म्हणाला, `हे उपकार कधीही विसरणार नाही, भाऊ! साप चावलेला रोगी इंजेक्शन नसल्यामुळं तडफडून मरतो हे पाहणं फार दु:खद आणि भयंकर असतं.'
वसंतला आठवली त्या हेल्थ-सेंटरच्या तडकलेल्या, पोपडे निघालेल्या क्रॅलेंडरवरची साईबाबा, शारदामाता, रामकृष्ण परमहंस इत्यादींची चित्रं. विज्ञानसंमत उपचार व त्या बाबतीतली प्रशासनाची उदासीनता बघून बिचाऱ्या डॉक्टनंही या उपरोक्त महापुरुषांची व मातांची मुळगावकरांनी काढलेली चित्रं पाहूनच मनाला धीर देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो; पण मण्यार डसला तर साईबाबांचा अंगारा आणि मध चाटवून काय होणार?
त्यानं विचारलं, `ट्न्ेिंनग घेतलंय ना?'
`कसलं?'
`अँटिव्हेनम देण्याचं.'
`हो, हो.'
`अँटि-रिअॅक्शनचं औषध मात्र तुम्हीच कसंही करून आणवा.'
`ठीक आहे.'
`चलतो मग मी.'
`ते बाकीचं तुम्हीच ठेवताय?'
`थोडं असावं माझ्याजवळही.'
`खूप लोक मरतात हो.'
`मला माहीत आहे.'
`अंधार झालाय फार.'
`टॉर्च आहे माझ्याजवळ.'
अंधारातून टॉर्चच्या उजेडात बेहुला गावाकडे चालत जाताना आज वसंतला मनातून खूप आनंद होत होता. आज जे काम झालं त्यामुळे नव्हे, वेगळयाच कारणासाठी. दुसऱ्याच दिवशी श्रीपदच्या घरी जाऊन त्यानं त्याला टॉर्च आणि जोडे दिले व म्हणाला, `फुकट नाही देत बरं, काम करवून घेणार आहे.'
`माझ्याकडून?' श्रीपद जोड्यांवरून प्रेमानं हात फिरवत होता, वास घेत होता आणि शब्दातीत कृतज्ञतेनं वसंतकडे पाहत होता.
`हं, आता आठवा बरं एखादा मण्यार डसलेला; पण फारसं विष न भिनलेला रोगी. तुम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले; पण रोगी काही दिवसांतच मरून गेला, अशी केस.''
`भूनीमावशी.'
`ती कोण?'
`स्मशानातला डोंब आहे नं सागर, त्याची बायको.'
`हं सांग, केसबद्दल सगळं सांगा.'
`लिहून घेता?'
`हो.'
`चहा सांगू?'
`सांगा.'
`राधी, चहा ठेव गं जरा.'
`हं, बोला.'
`भूनीमावशी झोपली होती. जमिनीवर चटई टाकूनच झोपतो आम्ही इथे, तर झोपेतच तिच्या हाताच्या करंगळीला डसला. मला बोलावलं, गेलो. झाड-फूक केली, पट्ट्या बांधल्या, चिरा दिल्या, रक्त शोषलं, रात्रभर तिथंच राहिलो. पहाट होईपर्यंत संकट टळलं होतं. तरी पट्ट्या सोडल्या नाहीत, थोड्या अंतरावर सरकवून पुन्हा बांधल्या. संध्याकाळपर्यंत चांगली बोलू लागली. नजरही स्वच्छ झाली. पाहिलं तर पडलेलं रक्त हवा लागताच घट्ट होत होतं. हाताला एक सुई टोचताच तिनं मला एक शिवी हासडली, म्हणजे संवेदनाही होती. मग मी निघून आलो.'
तेवढ्यात राधीनं चहा आणला. त्यांनी चहा घेतला. बिनदुधाचा गूळ घालून केलेला चहा चाटूनपुसून पीत तृप्तपणे ग्लास खाली ठेवत श्रीपद म्हणाला- `दुसऱ्या दिवशी सागर पुन्हा बोलवायला आला. जाऊन पाहतो तर ज्या दिवशी रात्री हाताला साप डसला त्याच दिवशी तिच्या पायात वेताचं कुसळ जाऊन दुखत होतं, तो पाय टम्म सुजला होता. छातीत थोडं दुखत होतं आणि पुन:पुन्हा बेशुद्ध होत होती. शुद्धीवर आली की म्हणायची श्वास गुदमरतो, छातीत दुकतं, लगेच इरफानपूरला नेलं; पण बरी झाली नाही.'
`डॉक्टर काय म्हणाले?'
`म्हणाले की तू सर्पदंशावरचे उपाय ठीकच केले, श्रीपद; पण तिच्या शरीरात काही जोर नव्हता. त्यामुळं त्या कुसळाचीच विषक्रिया झाली.' श्रीपद रागानं थुंकत म्हणाला, `डॉक्टरजवळ जे द्यायचं ते इंजिशन नव्हतंच. तरुण बाई, तीन पोरांची आई, धनुर्वातानं वाकून आकडून गेली आणि किती फेस तोंडात! पोरांना सांभाळण्यासाठी कोणी हवं म्हणून सागरनं त्याच दिवशी पुन्हा लग्न केलं. भूनी सात महिने तशीच जिवंत होतं, रडतरडतच गेली.'
`ही एकच केस?'
`आणखी आहेत. दाखवून देईन. इथेच आहात तर बघालच; पण बाबू, सापाचं विष उतरल्यावर विषक्रिया कशी झाली?'
`होते.'
`उपाय काय?'
`डॉक्टरशिवाय इलाज नाही होऊ शकत.'
`औषध नाही, इंजिशन नाही, तो डाक्तर काय करणार?'
`रोगी मरणार.'
`आमचं मरणच सगळीकडे!'
`आता माझं ऐका. इंजेक्शनची सुई, औषध वगैरे सगळं आणलंय मी. तुम्हांला शिकवतो.'
`मला?'
`हो तुम्हालाच.'
`मला येईल म्हणता?'
`येईल. आता एखादी केस आली तर काय करायचं ते नीट पहा.'
`मुलाला शिकवतोय, त्याला दाखवलं तर नाही का चालणार?'
`त्यालाही बघू दे, तुम्ही तरी काय नेहमी राहणार आहात का?'
`पण मला येईल?'
`येईल. मला शिरेत इंजेक्शन देता येतं; पण तुम्ही हातावर किंवा पायावर चामड्याखाली द्यायचं. किती द्यायचं, कसं मिसळायचं ते मी सांगेन. जे सिरम आहे त्यात बरेच दिवस निघून जातील.'
`खराब नाही होणार?'
`नाही.'
`मी खरंच इंजिशन देऊन माणसं वाचवू शकीन?'
`नक्कीच.'
श्रीपद दोन्ही हातांनी डोकं गच्च धरून बसून राहिला. मग कसाबसा चेहरा पुसत म्हणाला, `पितरांना राग तर नाही येणार? येऊ दे. देवाला सगळं दिसतं. काही होणार नाही. त्यांनी जी विद्या दिली ती आता नाहीतरी मोडीतच निघाली आहे. व्हायचं ते होईल. वाईट काम करत असेन तर नरकात जाईन; पण माणसं तर वाचतील नं बाबू?'
`वाचतील.'
`तर मग शिकवा.'
`शिकवीन, शिकवीन.'
श्रीपद इतक्या विलक्षण वेगानं सर्व शिकत होता की वसंत आश्चर्यचकितच झाला. त्यानं आधी त्याला आपल्याच खोलीत बसवून हाताच्या व पायाच्या पेशींमध्ये, चामड्याखाली डिस्टिल वॉटरचं इंजेक्शन द्यायला शिकवलं. त्यानंतर वसंतवरच श्रीपदनं बरेच प्रयोग करून प्रॅक्टिस केली. दोघांचेही हातपाय दुखत होते; पण श्रीपदला शिकायला फार वेळ लागला नाही. वसंतनं त्याला अॅमोनियम क्लोराइड व गरम पाणी वापरून शेक द्यायला शिकवलं. दोघंही खूप उत्साहात व आनंदात होते. श्रीपद म्हणायचा, ``तुम्ही मला जे शिकवता त्यानं जर माणसाचा जीव वाचत असेल, तर विषहरीचा कोप होणं शक्यच नाही.''
`कोणाचा कोप?'
`मी म्हणतोय की ज्याला जे येतं तोच त्याचा मंत्र! इथले लोक साले गर्भार बायकोला बाळंतपणासाठी इस्पितळात पाठवत नाहीत. टायफाइड झाला तरी जात नाहीत. साप चावला तर डाक्तरकडून इंजिशन घेत नाहीत.'
वसंतला हसू आलं. कलकत्त्याला लागूनच असलेल्या या बेहुला गावात त्याला कोणी मित्र नव्हते; पण श्रीपदमुळे इथलं वास्तव्य व अनुभव आवडू लागला होता. श्रीपद म्हणायचा- `मण्यारांच्या नर-मादीचं लग्न लागतं पौष-माघ महिन्यात. या वेळी साली मार्गेसरातच धानकापणी करून वर्गणी जमा करू, अन्- केरोसीन आणून त्या ढिगाऱ्याला आग लावून सापांचा वंशच नष्ट करून टाकू. बापरे बाप! काय सापांची पिलावळ झालीय तिथं, जणू मनसापुरीच!'
यानंतरच हेदो नस्करचा एक पहारेदार मुलगा शशी सापाचं भय विसरून ढिगाऱ्यातल्या दोनचार विटा सरकवायला गेला, तर चवताळलेल्या मण्यारनं त्याच्या मांडीला दंश केला. श्रीपदनं वसंतला बोलावणं पाठवलं. सांगितलं, `फार जोरात नाही डसला, फक्त दात घासून गेलाय.'
शशीला वाटलं की आता तो मरणारच, त्यामुळे मन खचल्यामुळे त्याच्या हावभावात जणू मण्यार कडकडून डसल्यासारखी लक्षणं दिसू लागली. श्रीपदनं त्याला जोरात एक शिवी हासडून धमकावलं. `नखरे नको करू बरं, शशी.'
वसंतनं येऊन पाहिलं तर बंधन-छेदन सगळं व्यवस्थित पार पडलं होतं; पाणी उकळत होतं. अमोनियम क्लोराईडही आणलेलं होतं. तो म्हणाला, `द्या इंजेक्शन, मी जसं शिकवलं तसं.'
`श्रीपद! इंजिशन देणार?' सगळे लोक घाबरूनच गेले. श्रीपद त्या मुलाला अँटिरेबिज इंजेक्शन देतादेता लुई पाश्चरसारखा आत्मविश्वासानं गरजला. `विषहरीच्या आज्ञेनं मी जे करतोय त्यावर विश्वास नसेल तर इथून चालते व्हा साल्यांनो!'
त्यानं इंजेक्शन दिलं नि तोंडानं ओरडत राहिला-
विषहारिणी तू मनसामाता
भुजंगजननी शंकरदुहिता
विष शोषुनि घे वरच्यावरती
शंकर ते विष प्राशुन घेती
शिवकंठी शोभे विषहार
दया करा शुभंकर शंकर
विज्ञान आणि विषहरिशंकर या दोघांचीही चतुराईनं सांगड घालून श्रीपद आराधना करत होता. त्यानं गरम पाण्यात घोंगडी भिजवून जखमेवर टाकली. शेक देऊ लागला. इंजेक्शन दिल्यावर आधी बांधलेली पट्टी सोडून दुसरीकडे बांधली. तोंडानं सुरूच-
मा मनसेचा जयजयकार
जयध्वनीनं विष हो पार
हाडीमासी जयध्वनि घुमता
विष थांबे हो चढता चढता...
शेवटी वसंत जेव्हा म्हणाला की, आता शशीच्या जिवाला काही धोका नाही, तेव्हा कुठे श्रीपद गप्प झाला व त्यानं त्याची झोळी आवरायला सुरुवात केली. शशीच्या मायला म्हणाला-
`त्या नस्करच्या घरी जाऊन डाळ-तांदूळ मागून आण. चांगली बोंब ठोक अन् म्हण की तुझ्या विटांच्या ढिगातला साप चावला. तुला द्यावंच लागेल.'
`ते काय सांगायला पायजे? ही दुर्गा कुणबीण काय हेदो नस्करला सोडेल काय? त्याच्याच ढिगाऱ्यामुळं सत्यानाश होताहोता वाचला; पण श्रीपद, तू देवीच्या आज्ञेनं इंजिशन दिलं?'
`नाहीतर काय बाई? बापरे बाप! त्यांची आज्ञा नसली तर कसं? पण इतका अविश्वास का गं? माझी जान देऊन तुमची जान वाचवतो मी; पण कधी कोणाकडून साधी केळं-फळं तरी घेतली का? तुम्ही साले सगळे हरामखोर, बोलावल्यावर आलो नसतो तरंच बरं झालं असतं.'
शशीच्या मायनं श्रीपदचे पाय धरले. सगळे लोक शशीच्या मायला शिव्या घालू लागले. श्रीपद चांगलाच कसलेला नट होता. आता आपण बाजी मारलीय तेव्हा व्यासपीठ आपलंच आहे हे पुरतं ओळखून म्हणाला- ``सगळे ऐका, आणखी काही सांगायचंय.''
`बोल बाबा, मेल्या पोराला जीवदान दिलं तू.'
`मी देवीचा सेवक, मातेचा पाईक, त्यांच्या आज्ञेशिवाय कसं काही करीन? त्यांनीच स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं की वसंतला पाठवून देते, तो तुला सगळं शिकवेल. बेहुला गावातल्या लोकांची दशा बघवत नाही.'
`बोल श्रीपद.'
`हेदो नस्कर सरकारनं दिलेलं केरोसीन घेऊन घरात अंडी उबवतोय. त्याच्या विटांच्या ढिगाऱ्यामुळं सर्वनाश होतोय तरी केरोसीन देत नाही. या वर्षी मार्गेसरातच धानकापणी करून आपण सगळे वर्गणी जमवून केरोसीन विकत आणू.'
`मग?'
`ढिगाऱ्याला आग लावून सापांचा निर्वंश करू. नाहीतर धडगत नाही.'
`हो, हो असंच करू, असंच करू.' लोक एकमुखानं ओरडले. मग बाहेर आल्यावर श्रीपद म्हणाला, ``आता नाचताहेत सगळे! पण पहा बाबू, वेळ आली की कोणी पैसे द्यायला तयार होणार नाही, सगळे डोळे चुकवतील. आपलंच भलं समजत नाही यांना. सगळे साले हरामखोर!'
थोड्या वेळानं म्हणाला, `पण आजचा काय दिवस बाबू, मी इंजिशन दिलं अन् शशी वाचला. आँ!'
`हो, पण ते स्वप्न वगैरे काय सांगत होता?'
श्रीपद वसंतचा हात हातात घेत म्हणाला, `खरंच बाबू, देवीची कृपा आहे माझ्यावर. तुम्हाला इंजिशनसाठी `हो' म्हटल्यापासून मनात सारखी घालमेल होत होती; पण त्याच रात्री मनसादेवी मण्याची माळ घालून स्वप्नात आली आणि म्हणाली की, लाग कामाला. मीच पाठवलंय त्याला.'
वसंतच्या लक्षात आलं की श्रीपदचं हे स्वप्नं म्हणजे ऑटोसजेशन. युगानुयुगांचा जो आदिम विश्वास त्याच्या मनात घर करून बसलाय त्यावर अविश्वास दाखवून वैज्ञानिक पद्धतीनं उपचार केल्याबद्दल तो परंपरेची क्षमा मागतोय. श्रीपदच्या मनातला हा अतिशय जटिल गुंता आपल्याला पूर्णपणे कधीच उलगडता येणार नाही, हेही वसंतला तीव्रपणे जाणवलं. श्रीपद सरळसरळ अंधाराकडून `ज्योतिर्गमय' म्हणून वाटचाल करू शकणार नाही. अंधार आणि उजेड एकत्रच नांदणार! कारण फक्त नावापुरताच विसाव्या शतकात जगतोय श्रीपद. देशातल्या सर्व नागरिकांना ज्या किमान सोयी मिळायला हव्यात, त्यापासून अजून खूप गतकाळातल्या अंधारात जगतोय तो. विषहरि शंकराला, मनसामातेला सोडण्याची हिंमत तो करूच शकणार नाही.
श्रीपद म्हणाला, `उद्या बाजारात जाईन. उद्या रात्री माझ्या घरी जेवायला यावंच लागेल, बाबू, तीच माझी गुरुदक्षिणा.'
`कशाला उगीच खर्च करता?'
`न करून कसं चालेल? मासे, बटाटे वगैरे आणीन. माझी बायको गोडाची धिरडी करेल, खूप खाऊ.'
वसंतनं सकाळीच इरफानपूरला जाऊन मिठाई आणली. संध्याकाळी तो बाहेर पडताच हेदो नस्करनं हटकलं, `शिरप्याच्या घरी जाता? या हलकट लोकांना इतकं डोक्यावर घेणं!' वसंत हसत म्हणाला, `तो मित्र आहे माझा.'
`मित्र?'
`हो, आणि मी काय इथं नेहमी राहणार आहे? माझ्यामुळे तो डोक्यावर चढणार नाही.'
`ते नक्षल पोर असं बोलायचं; पण तुम्ही तर त्यातले नाहीत.'
`मुळीच नाही.'
`लक्षात ठेवा की हे खेडं आहे, इथल्या सामाजिक चालीरीती आहेत.'
`येतो मी.'
`शिरप्यानं इंजिशन दिलं म्हणे!'
`हो.'
`विषहरींच्या आज्ञेनं?'
`तसंच तर म्हणतोय.'
`देवीनंही अनुमती दिली?'
`मी काय सागंू? तोच पूजा-अर्चा करतो, त्यालाच माहीत खरं-खोटं काय ते.'
`नाही, नाही, तसं नाही. तसं बोललो तर जीभच झडून पडेल माझी. देतो त देऊ दे, गावाचं भलं होवो म्हणजे झालं!'
`भलंच होईल.'
`मी तर ऐकताच शशीच्या मायला डाळ-तांदूळ-मसाला वगैरे सामान देऊन दिलं. पोरगा वाचला तिचा. देवीला नैवेद्य देऊ दे.'
`हं, तो तर वाचला; पण तुमच्या या विटांच्या ढिगाची काहीतरी व्यवस्था करायला हवी, नाहीतर लोकांचे प्राण धोक्यात येतील.'
`पाहतो, भाव बरा मिळाला की विकून टाकतो.'
श्रीपदच्या घरी चिमणीच्या उजेडात मुरगीचं मटण, अळकुड्याची भाजी आणि भात खाणं झाल्यावर एक रसगुल्ला तोंडात टाकत श्रीपद म्हणाला, `देवीमातेचं गाणं ऐकवू?'
`हो, जरूर.'
मनसामंगल स्तोत्र, चढत जाणारी रात्र, लांडग्यांचे आवाज, गीताची गाज, बाकी सर्व स्तब्ध, नि:शब्द. वसंतचं मन भरून, भारावून गेलं.
काही दिवसांनी श्रीपदला तामलीहून बोलावणं आलं. तिथल्या शाळेतल्या मास्तरांना साप चावला होता. श्रीपदनं जाऊन खूप प्रयत्न केले; पण तो पोहोचला तेव्हाच साप चावून आठ तास होऊन गेलेले असल्यामुळे खरं तर त्याला मृतदेहावरच उपचार करावे लागले; पण वसंतच्या लक्षात आलं की आसपासच्या खेड्यापाड्यात आता श्रीपदची एक नवीन प्रतिमा तयार होऊ लागली आहे. तामलीलाही एक ओझा आहेच भूषण नावाचा, पण भूषणनंच श्रीपदला बोलवायला सांगितलं म्हणे! हे तर खूपच उत्साहजनक! भूषण स्वत:च्या गावात श्रीपदला बोलवायला सांगतो म्हणजे श्रीपद इंजेक्शन देतो ही बातमी त्याला कळली असणार.
असेच काही दिवस गेले. श्रीपदच्या व हेल्थ-सेंटरमधल्या डॉक्टरच्या सहाय्यानं वसंत त्याचा थिसिस लिहीत होता. घोड्याच्या प्लाजमा-सिरमची अॅलर्जी नसलेले लोकही त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्तीच नसल्यामुळे सेकंडरी सिंप्टम्स् डेव्हलप होऊन मरतात. चांगला समतोल आहार न मिळाल्यामुळे जलोदर-प्लीहस्फीती- हागवण- दातातली कीड- खरूज,- फोड- जखमा वगैरे त्यांच्या पाचवीलाच पूजलेल्या असतात. त्यामुळे वेगवेगळी लक्षणं दिसून येतात.
मरतात, माणसं मरतात; पण जे जगतात त्यांच्याकडे पाहून डॉक्टरला व श्रीपदला धीर येतो. श्रीपद वसंतकडून पुन्हा नव्यानं सर्व शिकून घेतो. सर्पदंश झालेला माणूस केवळ भीतीमुळेही मरू शकतो असं वसंतनं वाचलं होतं. ही भीती कशी असते ते श्रीपदनं त्याला प्रत्यक्ष दाखवून दिलं. म्हणाला, `त्या राजीव धोब्याचं मरण पाहिलंत ना? मी बाजाराला गेलो होतो. इकडे त्याला चावला मण्यार! झालं. भीतीनं गारठून त्याचे छातीचे ठोके थांबून गेले. त्याची बायको रडतरडत मला म्हणत होती की कुठे गेला होता बाबा? तू असता तर त्याला काही झालं नसतं. मण्यार ओझरता डसला तरी त्यांना वाटतं यमानंच डंख मारला, बस्! तरी बरं आमच्या शास्त्रात सांगितलंय की सर्पदंश झालेल्या माणसाला एकटं सोडू नये, रागावून म्हणा, शिवी देऊन म्हणा, गरज पडली तर थोबाडीत मारूनही त्याला जागं ठेवावं, सारखा धीर देत राहावा.'
`भीतीनं हार्टफेल?'
`या भीतीचं निवारण कसं करावं सांगा.'
`मुलगा शिकतोय ना तुमचा?'
`हो, पण त्या बेट्याला मंत्र-तंत्र शिकायला नको असतं. इंजिशन देण्याचा खूप उत्साह! पण अजून लक्षणंच ओळखू शकत नाही नीट, त्याच्या हाती नाही सोपवलं अजून.'
`पट्ट्या बरोबर सरकवल्या नाहीत, तर गँगरीन होऊ शकतं. एकदम पट्टी सोडून टाकणंही योग्य नाही, हे सर्व सांगितलं नं?'
`सगळं, सगळं शिकवतोय. पैसे घेत नाही म्हणून त्या निशिकांतनं फणसाच्या झाडाच्या लाकडाची एक पेटी करून दिली. त्याच्या मायला वाचवलं होतं नं? तर म्हणे की या पेटीत इंजिशन ठेवत जा, मायची शपथ! बाबू, तुम्ही अन् तुमचं इंजिशन यावरच आता सगळी मदार आहे; पण तुमचं काम नीट होतंय नं?'
`निश्चितच! अहो इथं आलो नसतो तर समजलंच नसतं की दुबळया-उपाशी माणसांना इंजेक्शन दिल्यावरही किती निरनिराळे परिणाम दिसून येतात, माणसांना कायकाय त्रास होतात.'
`हेदोला तर चावणारच नाही! नाहीतर समजलं असतं की हत्तीसारखं खाणाऱ्या माणसावर काय परिणाम होतात ते! त्याला साप चावणार नाही आणि चुकून चावलाच तर सापच मरून जायचा! बापरे बाप, नस्कर म्हणजे एक प्रकरणंच!'
`आता माझे जायचे दिवस आले.'
`त्या विचारानं वाईट वाटतं.'
`पुन्हा येईनही कदाचित, काही सांगता येत नाही.'
`पहा, एकदा कामात गुंतल्यावर येणं तर होईल का? एकदा कोंडवाड्यातून बाहेर पडलेली गाय पुन्हा कधी तिथे परत येते का?'
`तुमच्या या मनसादेवीच्या अंगावर ते मण्यारच्या कातड्याचे अलंकार आहेत की काय? छान दिसताहेत.'
`मण्यार मारून त्याच्या कातड्याचे दागिने बनवावे लागतात, हीच आमची रीत आहे, बाबू. सगळे मांत्रिक नेमनियम पाळत नाहीत. आता तर बिनविषारी साप मारूनही कातडं विकतात, अस्सल नागाच्या कातड्याला तर दुप्पट दाम!'
वसंत परत जाणार हे ऐकून हेदो नस्कर खूपच खूष झाला. इरफारपूरच्या ठाण्यात बसून मनातलं बोलूनही आला की तो सायबांचा साला लागतो म्हणून गप बसलो इतके दिवस. नक्षलवाद्यांवर ताण आहे! त्या श्रीपदबरोबर उठणंबसणं. नीच जातीच्या लोकांना इंजिशन देणं, त्यांच्याबरोबर बसून जेवणं, काय हे? धानकापणीच्या वेळेला त्या लोकांना आटोक्यात ठेवणं कठीण जाईल; पण त्याला काय त्याचं? त्याचा दोन दिवसाचा खेळ आणि माझा मात्र काळ ओढवेल?
`का बा? काही कट-कारस्थान करतो की काय'
`नाही हो, तसं काहीच नाही; पण गावातली हवाच बदलून टाकली नं? तो शिरप्या मांत्रिक पायात जोडे घालून, हातात टॉर्च घेऊन फिरतो! नीच माणसांच्या पायात जोडे आले की घोर कलियुग! कशाला, तर म्हणे साप चावेल म्हणून! वा रे वा! जेव्हा चावेल तेव्हा काय जोड्यानं अडवशील का? आहे हिंमत एवढी?' त्या वेळी विषहरी शंकर बहुतेक हेदो नस्करचं बोलणं कान देऊन ऐकत असावेत-
रात्री गाढ झोपेत असताना वसंतच्या दारावर धक्के बसू लागले आणि कोणीतरी व्याकुळपणे हाक मारली. वसंत धडपडतच उठला आणि दार उघडलं. पाहतो तर समोर खुद्द हेदो नस्कर, आणखी काही मंडळी आणि श्रीपदचा मुलगा पतित.
पतित रडतरडत बोलला- `लवकर इंजिशन घेऊन चला, बाबू... बाबाला... बाबाला...!'
`श्रीपदला?'
`हो बाबू, झोपेतच बगलेत...'
अचानक झगझगीत उजेड पडला. शशी पेट्नेमॅक्स घेऊन आला होता. हेदो नस्करही चांगलाच घाबरलेला दिसत होता. श्रीपदला साप चावणं म्हणजे काय ते त्यालाही पुरतं जाणवलं होतं. म्हणाला, `चला, पेट्नेमॅक्स घेऊन जाऊ.'
`तुम्ही पण येणार?'
`श्रीपद...!'
वसंत टॉर्च घेऊन धावत सुटला. खांद्यावर पिशवी. श्रीपदला साप चावला? श्रीपदला? ओसरीवर नि घरात खूप गर्दी. सगळयांना धडक मारून ढकलत वसंत आत शिरला. सगळे रडू लागले- `आमच्या मांत्रिकाला वाचवा, बाबू नाहीतर आम्ही कसे जगणार?'
श्रीपद भिंतीला टेकून बसला होता. समोर एक मेलेला मण्यार. श्रीपदनं हात उचलून बायकोच्या खांद्यावर ठेवलेला. बायको हुमसून रडतेय. बगलेत चिरा दिलेल्या दिसत होत्या. श्रीपदच्या डोळयांवर गुंगीची झापड. डोळयांच्या पापण्या सारख्या मिटत होत्या आणि तो त्या ताणूनताणून उघडण्याचा प्रयत्न करत होता.
`श्रीपद!'
`बाबू. वसंतबाबू!'
`पाणी उकळायला ठेवा रे कोणी, चांगलं भरपूर पाणी. पेट्नेमॅक्स इथे जवळ ठेवा. श्रीपद, मी इंजेक्शन देतो.'
इंजेक्शन देताना वसंतचे हात कापत होते. श्रीपद म्लानपणे हसत, दुरून हवेवरून शब्द तरंगत यावेत तशा जड आवाजात म्हणाला, `पतित पट्टी बांधायचा प्रयत्न करत होता; पण बगलेत चावल्यावर बांधणार तरी कुठं?'
`खूप मोठा डोस देतोय, श्रीपद.'
`द्या.'
वसंत निर्दयपणे बगलेच्या आसपास चिरे देत होता. श्रीपद पुन्हा हसून म्हणाला, `काही लागतच नाही बाबू, काही फायदा होणार नाही, तुम्ही बसा.' कढत पाणी. अमोनियम क्लोराईड, सगळे प्रयत्न व्यर्थच जाणार हे जाणूनही वसंत झुंजत होता. श्रीपदचा पुन्हा खोलीतून आवाज, `तिथे कापून काय होणार बाबू? बगलेला लागूनच हार्ट. तुम्ही काहीही म्हणा, काही होणार नाही.'
`श्रीपद, डोळे उघडे ठेव.'
`डोळयांवर झापड आली, बाबू, खूप झोप! भयंकर गुंगी!'
`गरम पाणी आणा, ते कांबळयाचं आसन द्या.'
पूजा करताना बसायचं कांबळयाचं आसन श्रीपदच्या बगलेला गुंडाळून गरम पाण्याची वाफ. काही संवेदना नव्हती शरीरात, असणं शक्यही नव्हतं. वसंतनं श्रीपदची नाडी पाहिली, छातीवर कान ठेवला.
शेवटी सगळी उरलीसुरली शक्ती एकवटून डोळे उघडत श्रीपद जड जिभेनं बोलला, `विटा विकल्याच नाही नस्करनं!'
वसंत छातीवर कान दाबून बसला होता. थोड्या वेळानं हळूहळू उठला. श्रीपदला सावकाश आडवं झोपवून हुमसून हुमसून रडू लागला. चेहरा झाकून घेतला. बेहुला गावातले शेकडो लोक त्याच्याबरोबर रडू लागले. रात्र चमकून उठली. मण्यारच्या कातड्याचा सुंदर मुकुट धारण केलेली मनसादेवी प्रेमानं डोळे फाडून एकटक बघतच होती.
सकाळ झाली. काळरात्रीनंतरची सकाळ ती! बातमी कशी झरझर पसरते कोणास ठाऊक; पण तामलीहून, बकुलपूरहून, गांगटीहून, फुलगावहून मांत्रिक येऊन पोहोचले. आता वसंत फक्त प्रेक्षकच होता. त्याची भूमिका संपली होती. केळीच्या खांबांचा खोलगट होडीसारखा तराफा तयार करण्यात आला. त्यावर बिछाना आणि बिछान्यावर ठेवलेला श्रीपदचा फिकट मृतदेह. मांत्रिकांनी एकामागून एक येऊन तराफ्यावर एकेक वेताची काडी ठेवली, अक्षता व तुळशीपत्र वाहून नमस्कार केला.
प्रचंड, या लहानशा खेड्याच्या मानानं खूपच प्रचंड शवयात्रा निघाली. सगळे हरिनाम गजर करत डोळे पुसत होते. कोणी गळा फाडून जोरजोरानं आक्रोश करत होते. शेवटी तो तराफा बेहुला नदीत सोडण्यात आला. किनाऱ्याकिनाऱ्यानं माणसं चालतच होती. वेड लागलेली माणसं जणू! चालताचालता एकदम सगळे थबकले. डोह आला होता. तराफा डोहापर्यंत येऊन पोहोचला होता. वहिवाटेप्रमाणे याठिकाणी शवाची परडी गोलगोल फिरणार. सगळे बघत होते. समोर जे दृश्य दिसत होतं, ते बघून भर उन्हात जणू डोळयांवर अंधार पसरत होता.
कोणीतरी म्हणालं- `तराफ्याची परडी सातवेळा फिरते, मग बुडून तामलीच्या प्रवाहात जाते.'
पण हे काय होतंय आज! जे दृश्य दिसत होतं ते पाहून सगळेच भयभीत होऊन गेले. परडी संथपणे फिरत होती, डोहावर, फिरतच होती. बुडायचं नाव नाही, त्यातच वाऱ्यानं श्रीपदच्या चेहऱ्यावरचं पांघरूण उडून गेलं. अर्धमिटल्या डोळयांनी तो बघत आहे असं वाटत होतं आणि शव गरगर फिरतच होतं. वसंतला जाणवलं की श्रीपदचे अर्धमिटले डोळे जणू त्याच्याकडेच तिरस्कारानं टवकारून बघत होते! तक्रार करत होते! रोखून पाहत म्हणत होते की बाबा, सर्पदंशाचा धसका घेऊन घाबरून मरणारे लोक म्हणजे रिसर्च पेपर नव्हे आणि त्या कलकत्त्याच्या कचेऱ्यांमधल्या फाइलींमधली टक्केवारीही नव्हे! माणूस नश्वर प्राणी आहे म्हणूनच त्याला मदतीची गरज असते, त्याचं भयनिवारण करण्याची गरज असते, त्याला वाचवण्याची गरज असते.
शशीची आई हुंदके देत म्हणाली, `आम्हांला अनाथ करून चाललास बाबा; पण तरी जाता जात नाहीस! गोलगोल फिरत टवकारून बघतो आहेस!'
त्यानंतर जणू श्रीपदला जाणवलं की त्यानं वडिलोपार्जित जबाबदारी उचलली होती; पण आता मात्र त्याची जबाबदारी खांद्यावर घेणारं कोणीही उरलं नाही. पतित अजून काहीच शिकला नाही. वसंत निघून जाईल. पिंडदानाचा अधिकार पतितला मिळेल; पण फक्त पिंडदान करून त्याचा वारसाहक्क मिळू शकत नाही. कोण घेणार हा वारसा, हा वसा? हताशपणे श्रीपद जणू नदीशीच काहीतरी बोलला आणि मग बेहुलेच्या डोहानं परडी आत ओढून घेतली.
वसंत परतला. दिवसभर अंघोळ-जेवण वगैरे काहीही न करता तसाच पडून राहिला, रात्रभर टक्क जागा!
सकाळी उठून त्यानं हेदो नस्करला बोलावलं आणि म्हणाला- `केरोसीन बाहेर काढा, सरकारी केरोसीन!'
`काय करणार?'
`ते दिसेलच तुम्हांला, आधी केरोसीन काढा.'
`पण कशासाठी ते कळल्याशिवाय...' हेदोला आणखी काही बोलायचं होतं. श्रीपदच्या मृत्युमुळे तोही मनातून हबकला होता; पण काही झालं तरी केरोसीन म्हणजे अॅथोरिटी हातात ठेवणं! वसंत मात्र त्याला पुढे बोलू द्यायलाच तयार नव्हता. `हे पहा, गावातल्या लोकांना बोलावून सगळं केरोसीन बाहेर काढायला सांगेन मी. त्यानंतर एस. डी. ओ. साहेबांना कळवीन. त्यानंतर कलकत्त्याला जाऊन पुढे काय करायचं ते करीन. तुमचा तो विटांचा ढीग... एस. डी. ओ. फक्त माझे जीजाजीच नाहीत, फार वजनदार माणूस आहे तो! या गावकऱ्यांना परमिट असूनही तुम्ही त्यांना केरोसीन देत नाही, साठवून ठेवता, मला काय माहीत नाही? पंचायतप्रधान म्हणे! अहो, तुमचं हे माहात्म्य कळल्यानंतर प्रधानपद टिकेल होय?'
शांत स्वभावाच्या अजातशत्रू वसंतच्या डोळयांत हेदो नस्करला त्याचा पराजय स्पष्ट दिसत होता. त्याला वाटून गेलं की खरंच हे खेडं इरफानपूर ठाण्यापासून फारच तुटलेलं असल्यामुळेच त्याचं चालत होतं; पण आता मात्र मनात भीती दाटून आली. सत्तर-एकाहत्तर साली तो अशा भीतीमुळेच पळून गेला होता.
`घ्या, किती डबे पायजेत?' तो सुकलेल्या कंठानं बोलला.
`फक्त एक डबा ठेवून बाकी जितके असतील तितके सर्व डबे! शशी, तू जा आणि चरण-सागर-रावण- निशिकांत वगैरे सगळयांना बोलावून आण, निदान वीसजण हवेत.'
वसंतच्या आवाजातून हिंस्र आनंद प्रतिध्वनित होत होता. हेदो नस्करचं पांढरंफटक पडलेलं तोंड पाहून आपल्याला इतका आनंद होईल याची त्याची त्यालाच कल्पना नव्हती.
`होस-पाइपसुद्धा बाहेर काढून द्या. गावात कुठे आग लागली तर ती विझवण्यासाठी ते पाईप सरकारनं तुम्हांला दिलेत. त्यानं तुम्ही तुमच्या शेतांना पाणी घालता.' चरण वगैरे सर्वजण आले. वसंतनं सांगितलं ``हे सगळे डबे उचला, पाइप घ्या. त्यानंतर जितका आणता येईल तितका सुका कडबा, लाकडं आणा.'
ते सगळे त्याच्याकडे बघतच राहिले. श्रीपदच्या मृत्यूमुळे त्या माणसांना धक्का बसला होता, ते दिङ्मूढ झाले होते. वसंतला या गरीब, शोकदग्ध माणसांचा थिजलेला, थबकलेला जीवनप्रवाह पुन्हा नवचैतन्याकडे प्रवाहित करायचा होता. तो आवेशानं म्हणाला-
`मोठाले लांब बांबू आणा. बायका-मुलांना दूर सुरक्षित ठिकाणी ठेवा.'
लोक सरसावले,. कडब्यांचे दांडे मोडून मोठा ढीग करण्यात आला. तो सुका कडबा विटांच्या ढिगावर फेकण्यात आला. हळूहळू पुरता विटांचा ढीग कडब्यानं झाकून गेला. मग त्या ढिगाभोवती कडब्याची व लाकडाची भिंतच उभारली गेली. अग्नी देण्याचा खास अनुभव असलेला सागर डोंब ओरडला, `ए पोरांनो, जाऊन बोराच्या झाडांच्या काटेरी फांद्या घेऊन या, स्मशानापाशी पुष्कळ झाडं आहेत. त्या लाकडाला एकदा आग लागली की विझता विझत नाही.'
चरण म्हणाला,`घराघरातून कोंडा-भुसा वगैरे मागून आणा. थंडीत थोडा विस्तव करायला सगळयांनी जमवून ठेवलाय.'
कडब्याची, लाकडांची चौफेर भिंत आणि कडब्यानंच झाकलेल्या विटांच्या ढिगावर पाइपनं केरोसीन स्प्रे करण्यात आलं. वसंत म्हणाला, `एकदम एकाच वेळी सगळीकडून आग भडकली पाहिजे. चहूकडून पेटवलेल्या चिंध्या फेका. बाहेरची भिंत विझू द्यायची नाही. सारखी लाकडं नि कडबा घालत रहा. साप बाहेर पडतोय असं दिसताच काठीनं हाणा.'
`ते काही सांगायला नको, बाबू, श्रीपदला खाल्लं यांनी, आता धडगत नाही त्यांची.'
आग भडकली, धडाडून भडकली. सगळे बघत होते. सागर डोंब अनुभवी आणि सरावलेला होता. तो लांब बांबू हातात घेऊन ढोसून ढोसून विटांच्या ढिगाला ढोसण्या देत होता. विटा धडाधड कोसळत होत्या. तो म्हणाला `सगळे ढोसा रे. होई, होई, ते पहा, सारे उतरायला लागलेत! ढोसा, ढोसा!'
आगीचा डोंब उसळला. ती उष्णता असह्य होऊन मण्यार, घोणस, नाग, बिनविषारी साप सगळे तडफडून बाहेर पडत होते. सर्व लोक ओरडत होते, नवीन बळ संचारलं होतं त्यांच्या अंगात. बाहेरच्या भिंतीवर लाकडं पडत होती. त्यावर केरोसीनचे फवारे, साप सटासट बाहेर पडत होते आणि मरत होते. गावातल्या माणसांचा शोक, दु:ख, सापांचं भय, हेदो नस्करवरचा राग सगळं एकत्रित होऊन त्याचं ज्वलंत क्रोधाग्नीत रूपांतर होत होतं. त्यामुळेच असेल पण आग भडकली होती. भयंकर भडकली होती.
(समाप्त)
ह्नह्नह्न
- महाश्वेतादेवी
अनुवाद : वीणा आलासे,
कोलकता
(`बेहुला' ही दीर्घकथा सामाजिक वातावरणातील अन्यायाचे अतिशय विदारक दर्शन साकार करून दाखवणारी फारच प्रभावशाली कथा आहे; पण या कथेचा अन्वयार्थ पूर्णपणे समजण्यासाठी बंगालमध्ये प्रचलित असलेली एक पौराणिक कथा व तिचे लोककथेत झालेले रूपांतर माहीत असणे आवश्यक आहे.
१) मनसादेवी ही सर्पांची राणी. शिवाचे बीज कमलपत्रावर पडले आणि त्यापासून मनसा जन्मली म्हणून ती शिवकन्या. सर्प-गंधर्व वासुकी याच्या आईने या बालिकेचे पालनपोषण केले. ती सापांची राणी असल्यामुळे सापांच्या विषाचा साठा तिच्या देखरेखीखाली असे. समुद्रमंथनातून बाहेर आलेले विष शिवाने प्राशन केल्यावर ते विष फारच जहाल असल्यामुळे शिव बेशुद्ध होऊन पडला. त्यावेळी शिवाचे प्राण वाचवण्यासाठी मनसेला बोलावण्यात आले. तिने पित्याला जिवंत करून विश्वनाथ वाचवला. यासाठी बक्षीस म्हणून तिला देवसभेत स्थान मिळाले व ती देवी म्हणून प्रतिष्ठित झाली.
२) पण देवांचे देवपण हे शेवटी मानवाने त्यांना मान्यता देण्यावर अवलंबून असते. माणसाने पूजा केल्याशिवाय देवांचे देवपण सिद्ध होत नाही. मनसेलाही आपल्याला भक्त मिळावेत अशी इच्छा झाली आणि मानवरूपाने पृथ्वीवर येऊन तिने बरेच चमत्कार करून स्वत:ची अतिमानवी शक्ती दाखवून दिली. सुरुवातीला ती गुरे चरायला येणाऱ्या गुराख्यांना अडचणीत टाकून मग त्यांच्या अडचणी दूर करत असे. त्यामुळे गुराखी लोक दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध दशमीला तिची पूजा करण्यास तयार झाले. मनसेचे मूर्त प्रतीक म्हणून पाण्याने भरलेला एक घट नागफणीच्या पानांनी झाकून ठेवायचा व त्याची पूजा करायची असा प्रघात पडला.
३) आता उच्चवर्गीय समाजात, विशेषत: श्रीमंत व्यापारी समाजात पूजेचा मान मिळवणे हा मनसेचा पुढचा व अखेरचा हेतू होता. गरीब व निम्नवर्णीय समाजात तिची पूजा होत होती; पण उच्चवर्णीय समाजात प्रतिष्ठित होण्यासाठी तिने काय केले ती लोककथा अशी :
चाँद नावाचा एक सौदागर होता. तो खूप शक्तिशाली व श्रीमंत असून कट्टर शिवभक्तही होता. या चाँद सौदागराने आपली पूजा करावी अशी मनसेची इच्छा होती. चाँदच्या पत्नीने ही पूजा कशी करायची ते एका कोळिणीकडून शिकून घेतले होते व ती हे व्रत करतही असे. चाँदला ही गोष्ट माहीत नव्हती; पण एक दिवस त्याची पत्नी घटपूजा करत असताना त्याला दिसली. शिवाखेरीज दुसऱ्या कोणत्याही देवाची पूजा आपल्या घरात व्हायला नको असे मानणाऱ्या चाँदने क्रोधाने मनसेच्या पवित्र घटाला लाथ मारून पूजा उधळून टाकली. या अपमानाने मनसा चवताळली व तिने चाँदला छळण्यास सुरुवात केली. या सौदागराच्या चांगल्या वयात आलेल्या सहा पुत्रांना मनसेच्या नागांनी दंश करून मारून टाकले. तरीही चाँद मनसेला देवी मानायला तयार होईना. काही दिवसांनी त्याचा सर्वांत धाकटा पुत्र लखिंदर वयात आल्यावर चाँदने खूप शोध घेऊन त्याच्यासाठी एक रूपवती व कलावती वधू शोधली. ही वधू बेहुला. ती एका श्रीमंत व्यापाऱ्याची एकुलती एक मुलगी होती.
मनसा आपला निर्वंश करण्यास टपलेली आहे या गोष्टीची जाणीव असल्यामुळे तिच्या मरणांतिक आक्रमणापासून लखिंदरचे संरक्षण करण्यासाठी चाँदने नवविवाहित जोडप्याच्या पहिल्या रात्रीकरिता एक बंद लोहागार बनवले; पण मनसेने आधीच ते लोहागार बांधणाऱ्याला आमिष दाखवून त्यात एक लहानसे छिद्र ठेवायला सांगितले होते. त्या लहानशा छिद्रातून मनसेचा एक बारीकसा पण अत्यंत विषारी साप आत शिरला आणि लखिंदरला चावला. अशा रीतीने चाँदच्या वंशाचा शेवटचा दुवा तुटला तरीही चाँद अजूनही अभेद्य होता. तो मनसेला देवी मानायला तयार नव्हता.
सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या माणसांचा देह नागदेवतेला अर्पण करण्याची प्रथा होती. कारण नागपूजा (जल-संप्रदाय) ही अग्निपूजकांना वर्ज्य असल्यामुळे सर्पदंशाने मेलेल्या माणसाची उत्तरक्रियाही त्यांना वर्ज्य असे. असे प्रेत केळीच्या खांबांच्या तराफ्यावर ठेवून पाण्याच्या प्रवाहात सोडून देत. प्रेत वाहत जाताना वाटेत एखादा धर्मपरायण भिक्षु भेटला तर त्याच्या दैवी शक्तीने किंवा एखाद्या सिद्धहस्त मांत्रिकाच्या मंत्रबळाने मृतदेह कदाचित पुन्हा जिवंत होईल अशी आशाही कुटुंबीयांच्या मनात असे.
बेहुला ही महापतिव्रता होती. लखिंदरचा मृतदेह पाण्यात सोडण्यात आला तेव्हा तीही त्या शवापाशी बसली. वाहातवाहात त्रिवेणी संगमापर्यंत पोहोचली. तिथे तिला मनसेची मैत्रीण व देवांची धोबीण असलेली नेता नावाची स्त्री भेटली. बेहुलाने नेताशी मैत्री करून तिला विनंती केली की, तिने तिला देवसभेत घेऊन जावे व ती एक उत्तम नर्तकी आहे असा तिचा परिचय करून द्यावा. अशा रीतीने बेहुला देवसभेत पोहोचली. देवांनी तिला तिचे नृत्यकौशल्य दाखविण्यास सांगितले. तिचे अप्रतिम नृत्य बघून शिव व इतर देवदेवता प्रसन्न झाल्या. मग बेहुलेने देवसभेत आपल्या दुर्दैवाची कहाणी सांगितली व सासऱ्याकडून मनसादेवीची पूजा करवून घेण्याचे वचन दिल्यावर मनसेने संतुष्ट होऊन लखिंदरला व पूर्वीच मृत झालेल्या त्याच्या सहा भावांना जिवंत केले. बेहुलेसकट सातही पुत्र सुखरूप परतलेले पाहून मग चाँद सौदागराने विधिपूर्वक मनसेची पूजा केली.
मृत पतीचे प्राण परत आणणारी बेहुला बंगालच्या ग्रामीण जीवनात चिरस्थायी होऊन बसली आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकात बरीच `मनसामंगल' काव्ये रचली गेली. या काव्यांमध्ये चाँद, सौदागर व बेहुला- लखिंदर यांचे आख्यान असते.
महाश्वेतादेवींची `बेहुला' ही कथा या लोककथेच्या पार्श्वभूमीवर वास्तवाचे चित्रण करते. सामाजिक अन्याय व सरकारी हेळसांड या दुहेरी कैचीत सापडलेली माणसे एकीकडून विज्ञान व दुसरीकडून परंपरागत रूढी अशा ओढाताणीत जगत असतात. अंधविश्वास समूळ नष्ट करणे खरोखरच शक्य तरी आहे का, हा प्रश्न टोकदार होत जातो. जोपर्यंत माणसाच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे तोवर अंधविश्वास टिकणारच. माणसं जितकी जास्त गरीब आणि अशिक्षित तितकीच त्यांची असुरक्षिततेची भावनाही जास्त तीव्र असते. विज्ञानावर विश्वास ठेवायलासुद्धा मने सुदृढ व सशक्त असावी लागतात; पण ज्या ग्रामीण जनतेपर्यंत साध्या किमान सुखसोयी व औषधोपचार केवळ नोकरशहांच्या भ्रष्टाचारांमुळे पोहोचू शकत नाहीत त्या माणसांना ओझा-मांत्रिक-तांत्रिक यांचा आधार असतो.
श्रीपद हा मांत्रिक असला तरी तो स्वत:च्या मर्यादा जाणणारा व विज्ञानाचा आदर करणारा आहे. त्याच्याच मृत्यूने संपणारी ही कथा संपता संपता एक नवी सुरुवात सुचवून जाते. वसंत वैज्ञानिक आहे, संशोधक आहे; पण त्यालाही माणसांच्या दैन्याचे खरे कारण त्यांच्या अज्ञानापेक्षाही अन्यायकारक व स्वार्थी समाजव्यवस्थेत दडलेले आहे ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अॅकेडेमिक दृष्टिकोन व सामाजिक वास्तव यांची गुंफण या कथेत झालेली दिसते. त्यातच परंपरागत रूढींचा एक धागा ही गुंफण अधिकच जटिल करून टाकतो.
पुराणकथा- लोककथा- परंपरा यांच्या पार्श्वभूमीवर सर्पदंशाने मरणाऱ्या ग्रामीण व कुपोषणग्रस्त माणसांच्या जीवनाचे नवे आख्यान लावताना अखेर महाश्वेतादेवींनी या सामान्य माणसांच्या क्षोभाला वसंतच्या प्रोत्साहनाने महाभारतातील जनमेजयाच्या सर्पसत्राचे रूप दिले आहे. हा महान सर्पयज्ञ म्हणजेच `बेहुला' ही कथा. महाश्वेतादेवी म्हणतात : अडचणी आणि गुंतागुंत कितीही असली तरी जीवनाला थिजलेपण येता कामा नये. जीवन प्रवाहित करण्यासाठीच चालू ठेवावा लागतो संग्राम, अविरत संग्राम.)



xgBTYFrppvYGuxxuJ
klonopin buy mastercard - odor klonopin cheap
JIOWlmZOklfwmUFDakI
xanax online no prescription credit cards - buy generic xanax cheap
eaIAIaEjhKnxFVrwXNh
cheap ambien medication - buy ambien with no prescription medication
fxsWgdANGwhBpDAlRgp
buy klonopin uk - family klonopin overseas
RndyWqTRbBRkGAxJZJB
purchase xanax credit cards - buy cheap xanax online with no prescription
BDoylTDNNd
purchase ambien in calgary - purchase ambien generic insomnia
STnLCNVRHuI
T3bv2u dystlfrygykk, [url=http://fyjjovaigeij.com/]fyjjovaigeij[/url], [link=http://vvafmmcvpxfy.com/]vvafmmcvpxfy[/link], http://hnubpumjnmev.com/
xpUbeFRTVRfrmKylZA
order tramadol - buy tramadol 100mg
emHpSLxqWCzvT
Buy cheap valium usa - order cheap valium
cqrPubTtmqmYpQA
order tramadol online - tramadol online pharmacy
HLzcZsyiMNRzpjBWKVw
valium without prescription - valium online
rRsdgjtJBU
discount tramadol - tramadol online
BMYkghXonYyBFN
shop tramadol - tramadol addiction
sBVWTJfHgMn
shop tramadol - buy tramadol cod
SZzbCVTonLqfLoqKD
valium buy - Generic valium overnight
mJAdypCQJPhSvbCTg
Generic valium - valium online order
mUdnWHfrEf
order valium online - valium no prescriptions
XFoefyFebHztBqmMR
buy valium online - Cheap valium without a prescription
MbhBdUaeebkLEHQuZSV
buy tramadol no prescription - discount tramadol
clsUVcdqWwZuiXokNsD
tramadol medication - tramadol cheap
NgLGhmBtKRUSuCV
buy cheap valium - Cheap valium usa
eJImrRfyLlh
buy cheap valium - order valium online
JeZCfAdxOHWRbzK
buy tramadol no prescription - tramadol no prescription
jMqWLOJuqpLrMM
order valium - valium drug
htunTnbdiLf
tramadol online 100 mg - tramadol order
eRCVJIoXWzWqNlTCP
buy xanax online - xanax buy
ZRhgPsAbvxxSUsrs
Generic ambien - Cheap ambien pills
EustRcOzuKaLnwhJlj
ambien delivered overnight - ambien
IhBmJiUxqf
buy xanax - buy xanax no prescription
dlCrVsLGtSkLDlklQ
order xanax - xanax discount
NQMOXjPziqaXJMdB
Cheap xanax pills - xanax online canada
hBRDiCNuMaEXpbQ
Purchaseing xanax
DWoPfxZmVeBg
order xanax no prescription
IRuawJipZRvQ
xanax order - Cheap xanax without a prescription
fprWgLlUWtKyHIQS
Generic xanax - xanax buy online
ESrRIYDjuCwxBkOik
ambien online no prescription - ambien
xpvFocJjGmQpuY
klonopin price - Generic klonopin
YlAHUPOozsDop
xanax - Cheap canadian xanax
ffYoWffoXuQOCeOqyZz
buy discount ambien - cheap ambien
BkQCIKVqojq
klonopin online - Cheap klonopin without a prescription
jhXScBmrrccbaqob
Low price xanax - online xanax
MVctrEHbIwBY
xanax online order - Best xanax price
hYFCHarPwc
klonopin - klonopin online no prescription
eDsSevvbgZCUYoud
Buy cheap canadian ambien - Buy ambien online wthout prescription
zVNmoTeLxB
buy valium online - buy discount valium
KFVJLOKDlgfxWMpVH
ambien cheap - buy ambien no prescription
obTioPKcfc
ambien buy online - ambien online
NsHcOZjWQPvGrgA
Buy valium online canada - valium drug
eGfbQcJbVzKdOFSQ
xanax online no prescription - xanax no prescription
BJcZPaTBCRsyW
ambien online order - buy discount ambien