Skip to main content

बागींच्या पाठीराख्या

विद्याताईंचा व माझा परिचय खूप वर्षांपासूनचा. मी युक्रांदमध्ये काम करत असताना डॉ. अरुण लिमये यांच्याकडे नेहमी जाणे येणे असायचे. तिथे विद्याताईंची मैत्री दृढ झाली.
पुढे मुस्लिम सत्यशोधक मंडळात काम करत असताना आमच्या भेटीगाठी नियमितपणे होत असत. मु. स. मंडळ प्रामुख्याने स्त्रियांच्या प्रश्‍नांवर काम करायचे आणि विद्याताई आधी ‘स्त्री’ आणि नंतर ‘मिळून सार्‍याजणी’ या मासिकच्या संपादक म्हणून काम करायच्या व महिला आंदोलनामध्यही त्या सक्रिय होत्या. मंजुश्री सारडाच्या हत्येचे प्रकरण देशभर गाजत होते. पुण्यातल्या सर्व महिला आणि पुरोगामी संघटना यांनी एकत्र येऊन त्या प्रश्‍नावर निदर्शने केली. त्यावर काही पोस्टर्स तयार करून त्याची ठिकठिकाणी प्रदर्शने आयोजित केली होती. या सर्व कृती कार्यक्रमांमध्ये मु. स. मंडळानेही सहभागी व्हावे यासाठी विद्याताई आणि नीलम गोर्‍हे यांनी आम्हाला विनंती केली. यात मुस्लिम महिला सहभागी व्हाव्यात असेही त्यांनी सुचवले व त्याप्रमाणे आम्ही आमच्या काही महिला कार्यकर्त्यांसोबत त्यात सहभागी झालो. इतर समाजाबरोबर जाण्याचा आमच्यातल्या काही मुस्लिम महिलांचा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढायला मदत झाली.
शाहबानो प्रकरण देशभर गाजत होते. आम्ही त्यात कायदा बदलला जाऊ नये यासाठी प्रयत्नशील होतो. शाहबानोला घेऊन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना भेटून त्यांनी हा कायदा बदलू नये अशी विनंतीही केली होती. नंतर त्या प्रश्नावर हुसेन जमादार आणि मेहरुन्निसा दलवाई यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रात तलाक मुक्ती मोर्चाही काढला. पण सारे प्रयत्न फसले. कायदा बदलला गेला. ते विधेयक ज्यावेळी संसदेमध्ये मांडले गेले त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही सर्वजण (मी, सय्यदभाई, मेहरुन्निसा दलवाई, हुसेन जमादार, वजीर पटेल, बाबूमिया बँडवाले, मुमताज रहिमतपुरे, इत्यादी अनेक कार्यकर्ते व तलाक पीडित महिला) पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, नजमा हेपतुल्ला, कायदेमंत्री अशोक सेन व इतर नेत्यांना भेटलो. चर्चा केली, अयशस्वी प्रयत्न केले. ते सर्व प्रयत्न लोकांपर्यंत पोहचावे यासाठी आम्ही विद्याताईंना भेटलो. त्या स्त्री मासिकात होत्या. त्यांनी व संध्या टाकसाळे यांनी आम्हाला सहकार्य केले. तो सर्व वृत्तांत स्त्री मासिकात प्रकाशित केला.
नारी समता मंचातर्फे विविध कार्यक्रम होत असत. त्यात एकदा मला त्यांनी बुरखा या विषयी बोलायला सांगितले. त्यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. मुस्लिम समाजाविषयी अनेक गोष्टी लोकांना माहीत नसतात, गैरसमज असतात. असल्या चर्चेने ते कमी होण्यास मदत होते. मुस्लिम प्रश्न समजून घेण्यास विद्याताई नेहमीच उत्सुक असतात. पुरोगामी मुस्लिम कार्यकर्त्यांना त्या नेहमीच सहकार्य करत असतात. रजिया पटेल असो, यवतमाळमधील अर्णी या छोट्या गावची रेहान बेलिम सारखी कार्यकर्ती असो वा मुस्लिम सत्यशोधक मंडळ किंवा आवाज-ए-निसवांसारख्या चळवळी असोत, त्यांना व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांचे किंवा त्यांच्याविषयीचे लेख प्रकाशित करण्याचे महत्त्वाचे योगदान विद्याताईंनी केलेले आहे. कुलसुम पारेख यांच्या अडचणीच्या काळात विद्याताई ठामपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या.
चार-पाच वर्षांपूर्वी ‘मिळून सार्‍याजणी’मध्ये मुस्लिम समाजाबद्दल एक असहिष्णु लेख प्रकाशित झाला होता. एवढेच नाही तर त्यावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा करण्यात आली होती. त्या लेखामध्ये एरवी धर्मांध हिंदू मुस्लिम समाजाबद्दल जे बोलतात तेच मुद्दे ‘मिळून सार्‍याजणी’चे म्हणून मांडण्यात आले होते. नंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रिया प्रकाशित केल्या गेल्या, पण तो प्रकार टाळता आला असता तर बरे झाले असते.
आज संपूर्ण जगात अनेक सुधारणेच्या चळवळी सुरू आहेत. मुस्लिम देशामध्ये स्त्रिया त्यांच्या अधिकारासाठी लढत आहेत. सर्व देशात आणि सर्व धर्मात प्रतिगामी, सनातनी आणि दहशतवादीही आहेत त्याचप्रमाणे सर्व देशात वा सर्व धर्मात सुधारक आणि उदारमतवादी विचार मांडणारे गट व्यक्ती, संघटना आहेत. आपण आपली नाळ कुणाशी जुळवायची ते आपल्याला स्पष्ट असायला हवे. विद्याताई अभ्यासू आहेत, स्त्रीवादी आंदोलनात आहेत. मुस्लिम समाजामध्ये सुधारणा घडवू पाहणार्‍याच्या पाठीशी त्या नक्की उभ्या राहतील असा विश्वास आहे. त्यांना हार्दिक शुभेच्छा!
----
अन्वर राजन
ए २/१८, सरिता वैभव,
पर्वतीनगर, सिंहगड रोड,
पुणे - ३०

Walter is a little bit high

Walter is a little bit high heels, cheap louis vuitton tiger no trace of the elusive housed in many luxury department stores, it will only increase their cache. cheap louis vuitton bags Gianmarco's shoes at called the bright-coloured colour and ultra high platform. louis vuitton replica This site Minaj like her shoes to take risk, so she often in all kinds of red carpet to see. louis vuitton luggage Beyonce is also a client, los hebron and date of leisure shoes blockbuster film. cheap louis vuitton bags The French brand. They're the best of Pierre hardy colorblocks, also offer interesting deviation, louis vuitton replica such as sequins thrust deep into the high heels, and metal colour sandals. Though Hardy flow, be helpful for women louis vuitton bags (according to season), men remain in Pierre Hardy flies secretly the year. Ruth Davis of the neon lights, louis vuitton bags pointed, appearance by yellow roses have beyonce everyone wear high heels-ME. louis vuitton replica Davis style for the deconstruction of flash like high-heeled shoes, colorful blast, fun embellisments fun details. louis vuitton wallets Although some celebrity risk and try to her more daring style, believe us, when we say that still have a lot of love. discount louis vuitton Danish stylist card Skovgaard made her have and merari signature rugged, serrated rubber sole of shoes. louis vuitton replica Whether playing sandals or pump, the sole of shoes on regular fun, halfback, art works go. chanel bags Kimora lee, Kim Kardashian, brandy and halle berry, wear brands, catering, cheap chanel bags especially its legs stretched the openings sandals. Besides love several special shoes stylist, louis vuitton replica of course, we can't get enough of the accessories available fashion houses. Amazing, louis vuitton bags except with a ready-made wear, these brand also have a lock on the game of shoes. louis vuitton replica This season, they came to cut out the high-heeled shoes, laser cutting boots, cheap louis vuitton bright choosing heroine adornment pump. If you like the Lanvin dress, you will worship Lanvin's shoes. chanel bags Brand provides the highest and always seems to be the most elegant wedges and chanel purses high heels and sexy shoulders with details and ribbon relationship. Big sister Prada and sister wonderful chanel replica always provide unique and intriguing footwear. Each season, like rihanna, Kourtney card DaiShan and monica stylistas dot platform, cheap chanel bags FanMao, ankle with pump upwards.