आरोग्याचा मुख्य आधार म्हणजे आहार. आपण काय खातो, काय खात नाही, खातो ते कसं खातो, याचा विचार म्हणजेच आहाराचा विचार. यावर माणसाला होणारे रोग किंवा त्याचं निरोगीपण अवलंबून आहे. म्हणूनच आहारतज्ज्ञ डॉ. विजया साठे यांची ही महत्त्वपूर्ण लेखमाला आपण देत आहोत.
आनुवंशिकता, आहार आणि आरोग्य
'र्कीारप ऋशपेाश झीेक्षशलीं' शास्त्रज्ञांनी पुरा केला आहे. त्यामुळे मानवी शरीरातल्या जीन्सचा नकाशा आता उपलब्ध होऊ शकतो आणि त्यातून त्या व्यक्तीला होऊ शकतील अशा आजारांची कल्पना येऊ शकते; पण म्हणून हे विकार होणं अपरिहार्य आहे असं मात्र मुळीच नाही. कारण जीन्स बदलणं हे आपल्या हातात नसलं तरी त्यांच्या कार्यवाहीत (सशपश शुिशीीीळेप) बदल करणं शक्य असतं. आपला आहार आणि जीवनशैली यांचा मोठा प्रभाव जीन्सच्या कार्यवाहीवर असल्याकारणानं आहारात आणि जीवनशैलीत योग्य ते बदल करून हे शक्य होतं.
आपल्या शरीरातील सर्वच जीन्स नेहमी कार्यरत नसतात. प्रत्येक जीनचासुद्धा काही भागच एका वेळी कार्यरत असतो. विशिष्ट आहाराच्या साहाय्यानं कार्यरत नसलेले जीन्स कार्यरत करणं, जीन्सचा सध्या वापरात नसलेला भाग कार्यरत करणं तसंच सध्या कार्यरत असलेला भाग निष्प्रभ करणं शक्य होत असल्याचं संशोधनात आढळलं आहे आणि यातून 'ऋशपशींळल र्छीींीळींळेपशशीळपस किंवा 'र्छीींीळसशपेाळली' हे शास्त्र वेगानं विकसित होत आहे.
'उशर्पींीीू चळीरलश्रश चशवळलळपश' या पुस्तकात डॉ. अॅलेक्झांडर वाईक यांनी म्हटलं आहे की, 'हे नवीन संशोधन पुढील काळात आनुवंशिकतेनं येणाऱ्या अनेक गोष्टींवर प्रभावीपणे मात करून माणसाला तंदुरुस्त जगायला निश्चितपणे मदत करील. वाढत्या वयातील विकार आणि त्या अनुषंगानं येणारी असहाय्यता, परावलंबन, अपंगत्व यावरही मात करायचा मार्ग मोकळा करील.'
फक्त जीन्सच सर्व काही ठरवू शकत असते तर काही गोष्टींचा उलगडा होत नाही. उदा. जपानी स्त्रीपुरुषांची सरासरी उंची दुसऱ्या महायुद्धानंतर जवळपास सहा इंचांनी वाढली असल्याचं दिसून येतं. जीन्स तर तेच आहेत; पण जीन्स आणि या काळात त्यांच्या आहारात झालेले बदल या दोन्हींचा एकत्र परिणाम म्हणून हे शक्य झालं असं शास्त्रज्ञ म्हणतात.
'डाऊन्स सिंड्नेम' हा जीन्समधील दोषातून निर्माण झालेला विकार असलेल्या मुलांमध्ये विशिष्ट आहार आणि प्रशिक्षणाचे कार्यक्रम यांच्या सहाय्यानं 'खपीींर्ळींीींश षेी ींहश अलहळर्शींशाशपीं ेष र्कीारप झेींशपींळरश्र' या फिलाडेल्फियातील संस्थेत विलक्षण सुधारणा दिसून आली. अजिबात बोलता-चालता न येणारी अशी मुलं वेगवेगळे खेळ खेळू लागली. वाद्यं वाजवू लागली. नाटकात कामं करताना आपापली वाक्य पाठ म्हणू लागली. 'ऋशपेाश' या पुस्तकात जेरी बिशप आणि मायकेल वाल्ड होल्झ यांनी म्हटलं आहे, केवळ जीन्समुळे विकार होत नाहीत तर त्याबरोबरच त्या व्यक्तीची जीवनशैली, आहार आणि पर्यावरण या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून विकार होतो.'
माणसातील सर्व जीन्सचा आविष्कार (शुिशीीीळेप) म्हणजेच त्याचं रूप, वागणं आणि प्रकृती. आणि हे सगळं जीन्स इतकंच त्याचा आहार, जीवनशैली, शारीरिक परिश्रम, ताणतणाव, पर्यावरण प्रदूषण, धूम्रपान, मद्यपान, तापमानाकडे विशेष बदल यावर अवलंबून असतं. वेगळया शब्दांत सांगायचं तर 'सशपशी, ाशरपी आणि लशरपी किंवा छर्रींीीश, र्र्छीीींीीश आणि र्छीींीळींळेप हे एकत्रितपणे परिणाम देत असतात.
सन १९०० मध्ये डॉ. जोसेफ आणि मेरी गोल्डबर्गर यांनी आनुवंशिकता आणि शरीरातील पोषकद्रव्यांच्या कमतरतांचा जीन्सच्या कार्यवाहीवरील परिणाम यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. पेलाग्रा नावाचा विकार आनुवंशिक तरी किंवा जंतुजन्य तरी असावा अशी तेव्हा समजूत होती; पण तसं नसून तो जीवनसत्त्व 'इ'३ च्या आनुवंशिकतेनं आलेल्या मोठ्या गरजा आहारातून पुऱ्या न झाल्यामुळे होतो असं त्यांनी दाखवून दिलं.
यानंतर सुमारे ४० वर्षांनी डॉ. रॉजर विल्यम्स यांनी इळेलहशाळलरश्र खपवर्ळींळर्वीरश्रळींू ची संकल्पना मांडली आणि वरील संशोधनावर शिक्कामोर्तब केलं. तसंच आनुवंशिक समजल्या जाणाऱ्या काही विकारांच्या मुळाशी काही पोषकद्रव्यांच्या इतरांच्या तुलनेने खूप मोठ्या गरजा असून त्या पुऱ्या केल्या गेल्या तर ते विकार टाळता येणं शक्य असतं, असं त्यांनी दाखवून दिलं. अशा तऱ्हेनं सशपशींळल र्पीींीळींळेपशशीळपस च्या तत्त्वाचा वापर करणं हा अनेक तथाकथित 'आनुवंशिक' विकारांवर ताबा मिळवण्याचा सोपा उपाय आहे, असं शास्त्रज्ञ म्हणतात.
मनोविकारांमध्ये जीवनसत्त्व 'इ'३ च्या, अॅलर्जीमध्ये 'इ'५ च्या तर मधुमेहामध्ये 'इ'६ च्या अशा आनुवंशिक वाढलेल्या गरजा असतात असं आढळत आलं आहे.
जीन्स हे जगण्यासाठी आवश्यक शेकडो जीवरसायनं तयार करण्याच्या सूचना पेशींना वेगवेगळया परिस्थितीत वेगवेगळया प्रकारे देत असतात आणि आपला आहार, जीवनशैली आणि पर्यावरणातील घडामोडी या सूचनांमध्ये आणि पर्यायानं आपण कसे जगणार यामध्ये बदल घडवू शकतात.
यामुळेच जीन्स बदलत नसले तरी कुपोषण, उपासमार, धूम्रपान, मानसिक ताण यामुळे माणसाच्या दृश्य रूपात आणि तंदुरुस्तीत फरक घडून येतो. तसंच चुकीचं खाणं, आवश्यकतेपेक्षा जास्त खाणं यामुळे होणारी वजनवाढ, बांध्याचा बेडौलपणा हेही आपल्या परिचयाचं आहेच. म्हणजेच आनुवंशिकता तीच असली तरी आपली प्रत्यक्ष जडणघडण कशी होणार, आपण कसे जगणार यावर आपण समजतो त्यापेक्षा पुष्कळच जास्त नियंत्रण आपलं असतं.
'सिकल सेल अॅनिमिया' हा एक आनुवंशिक गंभीर विकार. यामध्ये हिमोग्लोबिनचे रेणू एकमेकाला चिकटतात. त्यामुळे तांबड्या पेशींचा आकार बदलून त्या चंद्रकोरीप्रमाणे होतात आणि त्यातून अनेक गुंतागुंती निर्माण होतात. १९९४ मध्ये डॉ. पॉलिंग यांनी दाखवून दिलं, की कूर्वीेुूीीशी आणि र्इीींूीरींश ही रसायनं या विकाराच्या रुग्णांचं आयुष्य बऱ्यापैकी सुसह्य करतात. कारण त्या औषधांमुळे जीन्समधली गर्भावस्थेतली हिमोग्लोबिन तयार करण्याची सुप्तशक्ती जागृत होते. या तऱ्हेचे हिमोग्लोबिन जन्मानंतर तयार होणाऱ्या हिमोग्लोबिनपेक्षा वेगळे असल्यामुळे त्याचे रेणू चिकटत नाहीत.
'पीटर पॅन' या पुस्तकाचे लेखक जे. एम. बेरी यांच्या आत्मकथनात आपलं पर्यावरण, आयुष्यातल्या घडामोडी यांचाही किती मोठा सहभाग आपल्या जडणघडणीत असतो हे स्पष्ट दिसून येतं.
बालपणी त्यांच्या भावाचा अत्यंत भीषण अपघातात मृत्यू झाला. त्या धक्क्यामुळे त्यांची आई पूर्णपणे त्या भावाच्या आठवणींच्या कोषात राहू लागली. वडिलांचंही त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं. ते पूर्णपणे एकाकी झाले. मग त्यांची वाढ एकदम खुंटली. त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षी त्यांची उंची फक्त ४ फूट १० इंच होती. वयात तर ते कधी आलेच नाहीत. तपासणीमध्ये जीन्समध्ये कोणताही दोष आढळून आला नाही. तीव्र मानसिक धक्क्यामुळे आणि भोवतालच्या परिस्थितीमुळे जीन्सची कार्यवाही बदलून वाढीसाठीच्या हॉर्मोन्सची निर्मितीच थांबली असं निदान करण्यात आलं.
लिव्हरच्या जास्त कोलेस्टेरॉल तयार करण्याच्या आनुवंशिक प्रवृत्तीला हातसडीचा तांदुळ, बार्ली, गव्हाचा मोड, गव्हाच्या गवताचा रस यामुळे विरोध होतो असं आढळलं आहे.
तसंच लसूण, सोयाबीन, कोबी, फ्लॉवर, मुळा, ज्येष्ठमध, गाजर, कांदा, जवस, हळद, टोमॅटो, मिरे, वांगी, हातसडीचा तांदूळ, गहू, बार्ली, काकडी, तुळस, पुदिना यातील रासायनिक घटक प्रभावीपणे जीन्सची कार्यवाही बदलू शकतात आणि कर्करोगासकट अनेक आधुनिकतेच्या विकारांना प्रतिबंध करू शकतात असं संशोधनात आढळलं आहे. हृदयविकार, मधुमेह, मनोविकार वगैरे.
एकंदरीत जीन्सची कार्यवाही नियंत्रित करण्यात आपल्या आहाराचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे योग्य आहार, आरोग्य चांगलं राहायला मदत करतो तर चुकीचा आहार अनारोग्याला कारणीभूत होतो. आजच्या काळात 'ऋशपशींळली' हे शास्त्रसुद्धा वेगानं घोडदौड करीत आहे. 'जीन थेरपी' अनेक असाध्य समजल्या जाणाऱ्या आणि आनुवंशिक विकारांसाठी वापरली जात आहे; पण आहार आणि पोषकद्रव्यसुद्धा जीन्सच्या कार्यवाहीवर परिणाम करून बिनधोकपणे त्यांना विशिष्ट प्रकारे वागायला भाग पाडत असतात याची विशेष दखल घेतली जाताना दिसत नाही.
प्रत्यक्षात मात्र आपल्या घराण्यात विशिष्ट प्रकारची आनुवंशिकता असली तरी आपण ती अपरिहार्य म्हणून स्वीकारलीच पाहिजे हे बरोबर नाही असं आढळतं. योग्य आहार, व्यायाम यांच्या सहाय्यानं लठ्ठपणावर यशस्वी मात करता येते, हृदयविकाराची शक्यता कमी होऊ शकते हे आपण अनुभवतो; पण हा परिणाम होण्याचं एक कारण जीन्सची कार्यवाही बदलणं हे असतं असं संशोधनात आढळत आहे आणि आपण काय खायचं हे आपल्या हाती असल्यामुळे आपल्या सशपशी वर नियंत्रण ठेवण्याचा सोपा उपाय आपल्या हाती आला आहे. प्रश्न आहे तो अन्नपदार्थांच्या योग्य निवडीचा. केवळ जिभेच्या सुखासाठी खायचं की जाणीवपूर्वक नैसर्गिक, ताजे, सेंद्रिय पद्धतीनं पैदा केलेले पदार्थ खायचे हा!
- डॉ. विजया साठे, पुणे


