शक्य आहे ! महिलांवर हॉणार्‍या अत्याचाराचा अंत

माधवी सुर्वे
गाव-गोंधळे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
मी एक आरोग्यसखी -जेव्हा या कामात आले तेव्हा आमचा स्वत:चा दारूचा धंदा होता. या धंद्यावरच घर चालायचं. शिबिरात या विषयावर चर्चा झाली, तेव्हा माझ्या सगळयाच मैत्रिणी, सख्या `संवाद'चे कार्यकर्ते खूप नाराज दिसले. ते माझ्यावर चिडले नाहीत पण मला त्यांनी समजावलं. याचा कधीतरी तुम्हालाच त्रास होईल हे लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला. मलाही मनातून खूप अपराधी वाटायला लागलं.
याच दरम्यान `शक्य आहे-महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा अंत' अभियानाची माहिती सुनीताताइंर्नी दिली. दिवसभराच्या चर्चेत आरोग्यसख्यांनी आजूबाजूचे अनुभव मांडले, त्यात दारू पिऊन बायकांना त्रास देण्याच्या खूप केसेस होत्या. या अनुभव कथनात दारूचे धंदेच बंद व्हायला पाहिजेत असंही त्यासारखं आग्रहानं मांडत होत्या. ह्या मांडणीच्या वेळी सतत असं वाटत होतं की सगळयाच्या नजरा माझ्याचकडे लागल्यात. माझ्या मनातली अपराधीपणाची भावना आणखीनच वाढली.
त्यानंतर महिनाभरातच अखेर आमच्या दारूच्या धंद्यावर धाड पडली. नवऱ्यावर केस टाकली गेली. या सगळया प्रकारातून सुटायला आमचं छोटसं शेत गहाण टाकावं लागलं. आमची चूक असल्याने पोलिसांशी बोलण्यासाठी मी संस्थेकडेही शब्द टाकू शकत नव्हते. या सगळया गोष्टींचा खूप मनस्ताप झाला. पुढच्या शिबिरात माझ्या या घटनेवर चर्चा झाली. अभियानाच्या चर्चेेत दारूमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराची, झालेल्या चर्चेची झळ आज मलाच पोहोचली होती. पण वेगळया पद्धतीने.
घरात पुन्हा धंदा सुरू करून एवढं कमवू की शेतही सोडवू शकू, यासाठीची चर्चा सुरू होती. पण माझं मन अभियानाच्या चर्चेच्या वेळी पुढे आलेले मुद्दे -झालेली चर्चा- यामुळे दुखावलं होतं शिवाय तेच विचार मनात येत होते. अखेर मी घरात बोलायचं ठरवलं. नवऱ्याशी बोलले. दोघांनी कष्ट करुन मीठ-भाकरी खाऊ, पण या वाटेला पुन्हा जायचं नाही. यासाठी त्यांच्या मनाची तयारी केली.शेवटी वाडीतील चार लोकांना बोलावूून आमचा निर्णय ऐकवला. या सगळयातून उभं राहायला आम्हांला मानसिक आधार द्या अशी विनंती केली. वाडीलाही कौतुक वाटलं, त्यांनीही आमच्या निर्णयाचं स्वागत केलं.
आज आम्ही गहाण टाकलेल्या शेताव्यतिरिक्त राहिलेल्या शेतीच्या तुकड्यात जमीन नदीकिनारी असल्यानं दुबार पीक भातानंतर पावटा-कडवा कडधान्य घेतो. पूर्वीसारखा भरपूर पैसा येत नाही. पण आमच्या घरातला ताण- भांडणं कमी झाली. वाडीतली दारूमुळे होणारी भांडणं संपली. आज एक वेगळंच समाधान मला-माझ्या घरच्यांना मिळतंय हे, मानसिक समाधान मला मिळालंय त्याचं खरं श्रेय आहे `शक्य आहे- महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराचा अंत' या अभियानाला.
या अभियानात आता वाडीतल्या मैत्रिणींना आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

माधुरी मधुकर गमरे
गाव -करंबवणे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
मी माधुरी`संवाद' संस्थेची आरोग्यसखी. मी स्वत: अन्याय- अत्याचारामुळे सासर सोडावी लागलेली महिला. पहिलंच मूल जन्माला येऊन लगेच वारल्याने सासरकडून झालेल्या मानसिक छळाला कंटाळून मी माहेरी आले. माझ्या दोन भावांपैकी मुंबईच्या भावाचा पाठिंबा आहे. गावातल्या भावाचा माझ्या कामाला विरोध आहे. म्हणजे अजून संघर्ष सुरूच आहे. कारण मी गावातच राहते आहे. `आरोग्यसखी'साठी निवड झाल्यावर मला सतत संघर्ष करावा लागतोय. पण आज जाणवतंय मी `शक्य आहे- महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराचा अंत' अभियानातून माझ्याच केलेल्या संघर्षातून एक मानसिक समाधानही मिळवू शकते.
आमच्या `आरोग्यसखी'च्या शिबिरात `शक्य आहे' अभियानाबद्दलचे सत्र झाले. लिंगसमभावाबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहिती मिळाली. या सत्रातून मला जाणीव झाली की माझ्या घरातील चुलत भावाची मुलगी माझी चुलत भाची केवळ ४ वर्षांची आहे. छोटीशी गोड पण याच गोड मुलीला गोडाचाच आजार आहे. मधुमेह(डायबिटीस) तिला जन्मत:च मिळालाय. पण जे सगळया घरात होतं मुलगी म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष या भाचीच्या वाट्याला आलं. मीही त्याबद्दल कधी फार गंभीरपणे विचार केलाच नव्हता. या माझ्या भाचीचा डायबिटीस तिच्या आहाराकडे दुर्लक्ष झाल्याने खूप वाढतो. तिला रोज यासाठी इंजक्शन द्यावं लागतं.
या अभियानाने मला एक समज आली. गावात वाडीत अभियानाबद्दल बोलण्यापूर्वी घरातच याविषयी काम करायला पाहिजे हे जाणवलं. मी स्वत: ठरवून या भाचीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तिचा आहार, औषधांचा डोस नीट समजावून घेतलं, एवढंच नाही तर इंजक्शन द्यायचं कसं? हेही शिकून घेतलं. सगळी काळजी घेतली तरी तिची तब्येत कधी कधी खूप बिघडते, अशा वेळी सगळी कामं बाजूला ठेवून मी तिला चिपळूणला घेऊन जाते.
माझ्या भाऊ-भावजयीशी मी या भाचीबद्दल सतत बोलते. मुलगी म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष का नको, हेही समजून द्यायचा प्रयत्न करते आहे.
शक्य आहे-अभियानाने मला माझ्याच घरात माझ्याच भाचीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. एक वेगळं समाधान यातून मला निश्चित मिळतंय.

अश्विनी अनिल धामापूरकर
गाव-गुढे-लिंगाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
मी `संवाद' संस्थेची `आरोग्यसखी'. घरात दीर-जाऊ, सासू-सासरे आणि माझे पती. घरातलं वातावरण खूप चांगलं, सगळी माणसं जीवला जीव देणारी. माझ्या लग्नाला १३वर्षे झाली. मला मूल नाही. पण घरातल्या माणसांनी कधी मला त्याबद्दल कधीही त्रास दिला नाही. माझा स्वभाव खूप शांत- तशी मी अबोलपण आहे. घरातलं कुणी काही बोललं नाही म्हणून आजूबाजूचे लोक थोडंच बोलायचं थांबतात? विशेषम: भावकीतले लोक तर सतत मला मुलं नसल्याबद्दल बोलायची, टोमणे मारायची संधी सोडत नाहीत. या सगळयाचा मला सतत खूप त्रास व्हायचा. पण मनाला त्रास करून घेण्याशिवाय दुसरं काय करणार?
पण `संवाद'च्या आरोग्यसखीमध्ये यायला लागले. शिबिर सुरू झाल्यावर `शक्य आहे' अभियानाबद्दल आम्हाला संपूर्ण एक दिवस वेगवेगळया उदाहरणातून माहिती मिळाली. आजवर मारहाण, हुंडाबळी म्हणजेच अन्याय असं मी समजत होते. पण भावकीतून मला मूल नाही म्हणून मिळणारे टोमणे म्हणजेसुद्धा अन्यायच आहे. याची जाणीव मला झाली. या शिबिराबद्दल मी घरातल्यांशीही बोलले.
एक दिवस परसबागेतल्या भाज्या खाताना चुलत दिराचा बैल पाहिला. तो बैल हाकलून दिला तर चुलत दीर भांडायला आले. निमित्त परसबागेत बैल शिरल्याचं होतं. मात्र ते कारण काढून त्या दिरांनी माझ्या वांझपणाबद्दल बोलायला सुरुवात केली. याचसोबत दर महिन्याला शिबिराला म्हणजे कुठे कुणाकडे जाते माहीत नाही काय? असं म्हणून माझ्या चारित्र्याबद्दल बोलायला सुरुवात केली.
जर मी पूर्वीची अभियानीची माहिती समजण्यापूर्वीची अश्विनी असते तर फक्त मनाला त्रास करून घेतला असता. फार तर रडले असते, पण अभियानामध्ये हिंसेचे किती प्रकार आहेत. मानसिक त्रास देणं हे वाईट बोलणं हीसुद्धा हिंसा असल्याची जाण आली होती.
मी ठरवलं आता गप्प बसायचं नाही. या विरोधात आवाज उठवायचा तरच अभियानाबद्दल समजल्याचा फायदा.
घरातल्यांशी बोलून सरळ संपूर्ण हकिगत लिहून पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. घरातल्यांनी आणि `संवाद'संस्थेनेही साथ दिली. अखेर चुलत दिराने गुन्हा कबूल केला आणि त्याला पोलीस यंत्रणेसमोर अशी चूक पुन्हा होणार नाही असं लिहून द्यावं लागलं.
त्या दिवशी माझ्या धाडसाचं मलाच आश्चर्य वाटलं. भावकीतही चर्चा झाली. हे धाडस ही समज माझ्यात आली कुठून अर्थातच- याचं श्रेय जातं `शक्य आहे, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा अंत' अभियानाला.
आता मी आजूबाजूला होणाऱ्या छोट्या छोट्या लिंग भेद, मानसिक छळ होणाऱ्या महिलांच्या मदतीसाठी शक्य होईल तेवढे प्रयत्न करते आहेच.

चंद्रकांत शिगवण
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय
ता. महाड, जि. रायगड
महाड तालुक्यातील एक छोटंसं गाव चांभारखिंड. एन.एस.एस.च्या कँपमध्ये `शक्य आहे' अभियानाची मिळालेली माहिती आणि त्यानंतर पथनाट्य बसवणं. पथनाट्याचा दौरा -प्रवासातले अनुभव यामुळे माझ्या आयुष्याला वेगळेच वळण लागले.
कधीही ज्या मुद्द्यांसंदर्भात विचारही केला नव्हता. त्यासंदर्भात फक्त विचारच नाही तर काही चांगल्या कृतीही करू शकलो. घरकामात पुरुषांनी मदत करायची ही कल्पनाच फारशी मान्य नव्हती. मला स्वत:ला असं काही करायचं म्हणजे लाज वाटायची, पण अभियानामध्ये मला या गोष्टीची स्पष्ट जाणीव झाली. मग मी स्वत: सुरुवात केली. ठरवलं मी कॉलेजवरून गेल्यावर आई-बहिणीनेच जेवायला वाढायला पाहिजे हा आग्रह सोडायचा. स्वत: जेवण वाढून घ्यायचं, स्वत:चं ताट उचलायचं आणि घासायचंही. घरच्या साफसफाई- अंगण घर झाडणं यात मदत करायची. त्याप्रमाणे वागायला सुरुवात केल्यावर घरातल्यांना आश्चर्य वाटलं आणि आई-बहिणीला आनंदही झाला.
अभियानाच्या रॅलीत पाच दिवसांचा प्रवास पथनाट्याच्या सादरीकरणानंतर लोक येऊन भेटायचे. बाया आम्हांला त्यांचे अनुभव सांगायच्या. आम्हीही त्यांच्याशी गप्पा मारायचो. त्यातून छोट्या छोट्या गोष्टीतली विषमता समोर आली.
पाठोपाठ ५ मुली झाल्या म्हणून मारहाण करणारा नवरा. नवरा गेला म्हणून सासर आणि तिची सुरू झालेली वणवण.
`सातच्या आत घरात' नियम फक्त मुलींनाच लावणारी घरं. गावाबाहेर हायस्कूल म्हणून शाळा सोडाव्या लागणाऱ्या मुली. अशी एक ना अनेक उदा.समोर आल्यावर खूपच अस्वस्थ झालो.
तर असं हे पथनाट्य आणि १० दिवस पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष ५ दिवसाचा पथनाट्य रॅलीचा प्रवास, याने आमच्या पूर्ण ग्रुपच्याच आयुष्यात बदल घडवून आणला.
लिंगसमभावाच्या संकल्पनेवर आधारित अभियान तळागाळात रुजायलाच हवं याची जाणीव होत असताना मूठभर निर्ढावलेल्या पांढरपेशा वर्गापर्यंत पोहोचायची गरज या अभियानाने-प्रवासाने जाणवली. या पथनाट्यादरम्यान झालेल्या चर्चा-वादविवाद `सुनीता गांधी' यांनी समजावलेली स्पष्टीकरणं याआधारे आम्हांला खूप काही शिकता आलं.
तोपर्यंत आपण स्वत:पासूनच याचा विचार केला पाहिजे. ही जाणीव झाली. पथनाट्य प्रवास संपला तरी विचारांचा प्रवास सुरूच राहावा यासाठी आमचे बोऱ्हाळे सर, क्षीरसागर सर यांनी सतत या विषयावर चर्चा सुरूच ठेवली होती. त्यामुळेही प्रेरणा मिळत गेली.
स्वत:मध्ये बदल करायचा ठरवतानाही थोडा वेळ गेला. नेमकं काय करायचं? मग घरात निरीक्षण केलं, विचार केला तेव्हा असं वाटायचं, आपल्या घरात समानता आहेच आपण सगळेच जण काम करतो, पण मग घरातल्या कामाचा विचार केला तेव्हा जाणवलं नाही. आईवर कामाचा खूपच बोझा पडतो. छोट्या-छोट्या कामात तिला मदत करायला हवी. शक्य होतील ती स्वत:ची काम स्वत: करायची.
त्यामुळे आता पाणी भरण्यात-घरकामात आईला मदत करतोच पण माझं स्वत:चे कपडे धुणं, स्वत:चं ताट जेवणानंतर उचलणे-घासणे अशी कामंही करायला लागलो.
मग जाणवलं- हे समजून उमजून करण्यातही एक वेगळं समाधान आहे. हा बदल व्हायला थोडा वेळ लागला पण आता मला पक्क समजलंय, त्यामुळे आता मी माझ्या मित्र-मैत्रिणींनाही या विषयावर सतत अनुभव सांगत असतो.
`शक्य आहे' अभियान खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यात मैलाचा दगड ठरले आहे.

http://www.kodes.com/category

http://www.kodes.com/category/sansar-salvo/
http://www.kodes.com/category/emre-baransel/
http://www.kodes.com/category/kolera/
http://www.kodes.com/category/fuchs/
http://www.kodes.com/category/hiphop-videolari/
http://www.kodes.com/category/kadikoy-acil/
http://www.kodes.com/category/sagopa-kajmer/
http://www.kodes.com/category/ceza/
http://www.kodes.com/category/cartel/
http://www.kodes.com/category/gekko-g/
http://www.kodes.com/category/ayben/
http://www.kodes.com/category/hip-hop
http://www.kodes.com/category/turkce-rap/
http://www.kodes.com/category/rap/
http://www.kodes.com/category/nesternino/
http://www.kodes.com/category/fuat-ergin/
http://www.kodes.com/category/killa-hakan/
http://www.kodes.com/category/istanbul-attack/
http://www.kodes.com/category/pit10/
http://www.kodes.com/category/patron/
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/
http://www.gekkog.com/
http://www.maskanimasyon.com/
http://www.gekkog.com/category/gekko-g/
http://www.gekkog.com/category/patron
http://www.gekkog.com/category/pit10//
http://www.gekkog.com/category/fuchs/
http://www.gekkog.com/category/kolera/
http://www.gekkog.com/category/hiphop/
http://www.gekkog.com/category/ceza/
http://www.gekkog.com/category/sagopa-kajmer/
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015