- संवाद
- डोलोरेस हुएर्टा - चिकानो चळवळीतील झुंजार स्त्री.
- नातं
- नावं कशी ठेवावीत ?
- जर्मनीतही स्त्रीचा प्रतिष्ठेसाठी बळी
- नॅनॉ टेक्नॉलॉजी आपल्या घरात.
- झिना
- फ्री बर्थ्
- श्श्य ऽऽऽ कावळा शिवलाय दूऽऽऽर !
- कचर्यातील सॉनं
- शक्य आहे ! महिलांवर हॉणार्या अत्याचाराचा अंत
- खंत
- क्रेडिट काडधारकांसाठी महत्त्वाचे
- स्वयंपूण , विज्ञाननिष्ठ शिक्षणाची जीवनशाळा
- तिला स्पर्धेत बाद ठरवण्यात आले
- राजकारणातील तरुणाई.
- कॉटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा - 2005
फ्री बर्थ्
`मिळून साऱ्याजणी'तील `सुमनचं बाळंतपण' हा लेख वाचला. दारिद्र्य, अपरिहार्यता यामुळं असं एकटीनं स्वत:चं बाळंतपण करणं यातलं दु:ख, वेदना आपण समजू शकतो. दलितांच्या आत्मकथनांमधेही अशा प्रकारच्या, शेतावरून येता येता बाळंतीण होऊन घरी बाळ घेऊन आलेल्या मातांच्या कथा आलेल्या आहेत. पण सुखसंपत्ती भरपूर असलेल्या देशात बायका आपलं बाळंतपण आपणच करू लागल्या आहेत असं सांगितलं तर विश्वास बसेल?
लंडनमधली ही बातमी आहे, त्या स्त्रिया म्हणतात,`आम्ही कोणी सुपरमॉम नाही, आमच्याकडे काही विशेष शक्ती आहे असंही नाही आणि आम्हांला काही यातना झाल्या नाहीत असंही नाही.' किंबहुना अशा स्त्रियांना बाईच्या आयुष्यातील जो प्रचंड वेदनामय अनुभव आहे, त्याला विनाऔषध, विनासुईण वा कोणत्याही मदतीविना सामोरं जावं लागतं.
घरच्याघरी कोणाच्या मदतीशिवाय बाळंतीण होणं -ज्याला `फ्री बर्थ' असं नाव दिलं गेलंय- म्हणजे डॉक्टर लोकांनी ज्याच्या भोवती भीतीचं वलय निर्माण केलंय, त्याला हद्दपार करणं आणि आत्मविश्वासानं आपल्या गर्भातून येणारं मूल आपण आपल्या हाती झेलणं ही कृती अनुभवणाऱ्या स्त्रियांना वाटतं, `प्रेम करणं ही जितकी खाजगी गोष्ट आहे, तितकीच मूल होणं ही खाजगी घटना आहे. प्रेम करताना निर्माण होणारे हार्मोन्स मूल जन्माला घालताना निर्माण होतात. मग एखाद्या तिऱ्हाइताला भगभगीत प्रकाशात तुमच्या आतमधे डोकावून पाहायला, बोटं खुपसायला तुम्ही कशी परवानगी देता? व्हेरोनिका रॉबिनसन नावाच्या ब्रिटनमधे स्थायिक झालेल्या अस्ट्न्ेिलॉयन बाईने `द मदर' या मासिकात हा जळजळीत प्रश्न साऱ्या स्त्रीजातीलाच विचारला आहे. हजारो स्त्रियांनी तिच्या मताला ऑन लाईन पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकेतून लॉरा फिल्डस् लिहिते,`जेव्हा माझ्या मुलीचा गर्भ राहिला, तेव्हा आम्ही दोघंच होतो आणि म्हणून ती जेव्हा या जगात बाहेर येईल, तेव्हा अगदी दोघंच तिथं असणं हे १००% बरोबर आहे.'
`ब्रिटनमधली आणि अन्य पाश्चात्त्य देशातली हॉस्पिटल्स आणि मॅटर्निटी होम्स या प्रक्रियेतील सारी नैसर्गिकताच काढून घेतात आणि याला एखाद्या आजाराचं स्वरूप देतात. फ्री बर्थमुळे स्त्रीत असलेल्या माझ्या नैसर्गिक शक्तीचा मला अनुभव आला.' असं रॉबिन्सननं पुढं म्हटलं आहे.
इसेक्समधील २४ वर्षीय सारानं या अनुभवाबद्दल लिहिलंय,`सेक्स इतकीच जन्म ही मला वैयक्तिक गोष्ट वाटते. ती कोणी आसपास उभं राहून पाहणं ही कल्पनाही मला सहन होत नाही. माझ्या पहिल्या बाळाच्या वेळी आणि आता दुसऱ्या बाळाच्या वेळी पण मी फ्री बर्थच पसंत केलं. माझ्याजवळ कोणी मित्रमैत्रीण, सहाय्यक, मिडवाईफ किंवा नवराही नव्हता. तो पलीकडच्या खोलीत होता. पण आपले स्नायू काम करत आहेत याची जोरदार जाणीव मात्र होती. मग बाळाचं डोकं दिसू लागलं. या तीन तासाच्या कळांच्या प्रवासासाठी या विषयावर जे हाताला लागेल ते ते मी आधी भरपूर वाचलेलं होतं. एखादी गोष्ट चुकू लागली असती तर ते मला अंत:प्रेरणेनं कळलं असतं. त्याचं डोकं बाहेर येऊ लागल्यावर, मला लक्षात आलं की त्याची नाळ त्याच्या मानेभोवती अडकली आहे. मी ती नाळ त्याच्या डोक्यावरून बाजूला केली आणि तो थाडदिशी बाहेर आला. मी त्याला पाहून आनंदाने हसू लागले.'
बोल्डर, कोलोरॅडो येथील ४९ वर्षीय लॉरा शॅनलेचे या विषयावरील पुस्तक `द प्रायमसी ऑफ ऑटॉनॉमस बर्थ' हे ग्रीनवूड प्रेसने प्रसिद्ध केले आहे. तिला स्वत:ला कोणाच्या मदतीविना पाच मुले झाली आणि तिला असं वाटतं की प्रत्येक बाई ही जन्म देण्यातली खरी तज्ज्ञ असते. तिच्याच शब्दात जन्म हा सेक्शुअल, स्पिरिच्युअल, मॅजिकल आणि मिरॅक्युलस आहे. पण जेव्हा तो डॉक्टरांकडून नियंत्रित केला जातो, त्यात काही अन्य कायद्यांसाठी फेरफार केले जातात, त्यावेळी या सर्व गोष्टी हरवून जातात. आपल्या वेबसाईटवर तिने आपले बोधवाक्य लिहिले आहे, `इफ यू वाँट द जॉब डन राईट, डू इट युवरसेल्फ' (काम बरोबर व्हायला हवे असेल तर ते स्वत: करा.)
अस्टे्निलॉयातील जनरल प्रॅक्टिशनर डॉ. सारा बकले हिने या विषयावर अनेक व्याख्याने दिली आहेत. तिला `नॅचरल बर्थ गुरू' मायकेल ऑडेन्ट यांनी `मुलाच्या नैसर्गिक जन्माला एक स्फूर्तिदायक नवी दिशा देणारी स्त्री' असे संबोधले आहे. तिचे स्वत:चे चौथे मूल तिने कोणाच्या मदतीविना असे घरात जन्माला घातले. `मी, ही मला दिलेली सर्वात मोठी भेट आहे. तज्ज्ञ डॉक्टर म्हणून मला असलेल्या ज्ञानातून आणि आत्तापर्यंतच्या बाळंतपणे करणाऱ्या अनुभवातून... या घटनेने मी मुक्त झाले.' असे एखाद्या डॉक्टरने म्हणणे या गोष्टीला विशेष अर्थ आहे.
या चळवळीची प्रणेती लॉरा शॅनले म्हणते,`मी मुलाच्या जन्माकडे एक सर्जक लैंगिक कृती म्हणून पाहते. त्यामुळे आपल्याला हव्या त्यावेळी, हव्या त्या पद्धतीने ती घडवली गेली पाहिजे. तुमच्याबरोबर मिडवाईफ असेल तर तिलासुद्धा काही नियम पाळावे लागतात आणि ठरलेल्या वेळेत शरीरानं जे काही करायला हवं ते करण्याचं शरीर नाकारतं.'
तिच्या स्वत:च्या पाचही गर्भारपणात शॅनलेने कोणत्याही तपासण्या व स्क्रॅनिंगही करून घेतले नाही. दुसरा मुलगा विली याच्या जन्माच्या वेळी तो पायाळू अवस्थेत असल्याचे तिच्या लक्षात आले, आणि खाली हात घातल्यावर त्याचे पाय प्रथम खाली येत आहेत हे कळले. निकोलस हा चौथा मुलगा दिवस भरण्याआधी घरी कोणाच्या मदतीविना जन्माला आला आणि उपजत हृदय विकारानं लगेच गेला.असता तरी देखील हेच घडले असते. डॉक्टरी औषधोपचारांचा तिथे काहीही उपयोग झाला नसता. तिच्या दृष्टीने तीन महत्त्वाच्या कारणांमुळे प्रसवप्रक्रियेत समस्या निर्माण होतात. दारिद्र्य, हस्तक्षेप आणि भीती. स्वच्छ पाणी आणि बऱ्यापैकी दर्जेदार जीवन मिळालं तर पहिल्या दोन्ही कारणांची समस्या येत नाही, आणि जितके सुरक्षित हवे तितके सुरक्षित नैसर्गिक बाळंतपण मिळू शकते. भीती आपल्याला का ग्रासून टाकते? जन्म देणं ही जात्या काही धोकादायक अशी प्रक्रिया नाही, पण आपण लढणं किंवा पळ काढणं असा प्रतिसाद द्यायला लागलो आणि कळा द्यायच्या थांबवल्या तर ही घटना धोकादायक बनू शकते. आपल्या स्वत:वर विश्वास ठेवणं हेच अगदी नैसर्गिक आहे.
फ्री बर्थ ही अजून एक काठावरची चळवळ आहे, त्यामुळे त्याच्यावर अजून सखोल अभ्यास झालेला नाही. `न्यू सायन्टिस्ट' या मासिकाने इंडियानातील धर्माधिष्ठित समाजाचे एक सर्वेक्षण नुकतेच प्रसिद्ध केलेले आहे. त्यानुसार १९८०मधे ३००पेक्षा अधिक बाळंतपणे स्वत:च्या हिमतीवर झाली. इंडियानामधे दर एक हजारी १९ एवढे जन्मत:च मरणाऱ्या बालकांचे प्रमाण आहे. तर ब्रिटनमधे अशा बाळंतपणाबाबत वाढती चिंता व्यक्त होते आहे. अनेक स्त्रियांना मुलांना जन्म कसा द्यावा याबाबत आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य फार कमी आहे असे वाटते. ब्रिटन आणि अमेरिकेतील अनेकांना अशी बाळंतपणे जोवर शिक्षण नसलेल्या लोकांकडून किंवा नवऱ्यांकडून होत नाहीत तोवर ती कायदेशीर आहेत असे वाटते. पॅि्निशटाआ हेविट या ब्रिटनमधील हेल्थ सेक्रेटरीने`२००९ सालापर्यंत बहुधा सर्व स्त्रिया शिक्षित मदतनीसासह घरीच बाळंत होणे निवडतील, आत्ताही आम्ही लॉटरी पद्धतीने ही सेवा देत आहोत, पण तो पर्यंत आम्ही प्रशिक्षित माणसे पुरवू शकू. सध्या ज्या मिडवाईफ अशा रीतीने खाजगी मदत करतात, त्यांच्यावर शासनाकडून कठोर कारवाई होईल' असे जाहीर केले आहे. हा कायदा आला तर आणखी बायका एकाकी बाळंतपणाकडे वळतील असे अनेक निरीक्षकांना वाटते आहे.
बॉर्न फ्री हा जगभर विशेषत: अमेरिका, क्रॅनडा, अस्ट्न्ेिलॉया, न्यूझिलंड या देशातले १००० सदस्य असलेला मोठा इंटरनेट फोरम आहे. अमेरिकेत गर्भारपणाच्या काळात होत असलेला औषधांचा आणि तांत्रिक तपासण्यांचा भडिमार पाहता अधिकाधिक स्त्रिया या चळवळीकडे आकृष्ट होतील असे वाटू लागले आहे. अमेरिकेतील वेबसाईट्वर स्लोगन्सचे युद्ध सुरू झाले आहे. `पिझ्झा बॉईज डिलिव्हर वुमेन बर्थ' असे छापलेले टी-शर्ट्स मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले आहेत. याला उत्तर म्हणून प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टर संघटनेने संदेश दिला आहे,`होम डिलिव्हरी इज फॉर पिझ्झा?'
`बर्थ: ए हिस्ट्नी' या पुस्तकाची लेखिका रिना क्रॅसिडी हिने साऱ्या मेडिकल जगताने जागे होण्याची सूचना केली आहे. बाळंतपणावर होणारा प्रचंड खर्च, पेशंटना मिळणारी वागणूक, आवश्यकता नसताना केली जाणारी शस्त्रक्रिया (तीनास एक हे प्रमाण) या सगळयांमुळे स्त्रियांच्या मनातला डॉक्टरांचा विश्वास आता कमी होऊ लागला आहे. या प्रक्रियेत आपण एक साधन आहोत, आपला सहभाग त्यात नाही अशी नैराश्याची भूमिका तयार होऊ लागली आहे. पूर्वीसुद्धा घरी बाळंतपणे व्हायची, पण बालमृत्यूचं प्रमाण तेव्हा अधिक होतं. म्हणून आपण प्रशिक्षित मिडवाईफ, डॉक्टर यांचं साहाय्य घेऊ लागलो. घरी बाळंतपण करायला कडकडून विरोध करणारे डॉक्टर म्हणतात की,`या मुलांमध्ये जर जन्मामुळे काही दोष राहिले तर उद्या ही मुले आयांवर दावे लावतील.' यावर क्रॅसिडी म्हणते,`हॉस्पिटलमधे बाळंतपणात मृत्यू पावलेल्या कित्येक आया आणि शस्त्रक्रिया करताना धारदार सुऱ्यांनी बाळांचे चेहरे कापले गेलेली कित्येक उदाहरणे मला ठाऊक आहेत.'
मुलाचा जन्म कसा व्हावा हे ठरविण्याचा अधिकार आईला आहे. बहुसंख्य जन्म हे निसर्गत: नॉर्मल पद्धतीने होत असतात. दवाखान्यातून हस्तक्षेप आणि गुंतागंुत वाढते. घरीसुद्धा मिडवाईफचा हस्तक्षेप नको. हा दृष्टिकोन स्वार्थी म्हणता येईल का? उलट दवाखान्यातच आपण स्वार्थ विकत घेतो. जगाच्या आरंभापासून बायका मुलांना जन्म देत आहेत आणि त्यात पिचतच गंुतागुंत निर्माण होते. क्रॅसिडीच्या या प्रतिपादनात तथ्य असले तरी ते मान्य करणे कठीण आहे.
एकूणच ही चळवळ मला खूप घातक प्रथा वाटते. कोणाच्या मदतीशिवाय घरात आपले आपण बाळंतपण करणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्याला भरपूर धैर्य, आत्मविश्वास आणि जबर इच्छाशक्तीच पाहिजे. पण हे सगळे असले तरी आयत्यावेळी काही डॉक्टरी मदत लागणार नाही याची काय खात्री? एरवी आपल्याला दु:खाच्या, आनंदाच्या प्रसंगी भोवती प्रतिसाद देणारी, सहभागी होणारी माणसे, आप्त लागतात, मग अशा कसोटीच्या क्षणी जवळ कोणी का नको? आपल्याकडे तर मुलींना अशावेळी आईच हवी असते, जिचं जवळ असणंही खूप आश्वासक असतं. परदेशात तर सर्रास नवरा सतत तुमच्या साथीला असतो आणि तुम्हांला मदतही करतो.
कशाचाच आधार नाही म्हणून एकटी बाळंतीण होणारी आपल्याकडची स्त्री आणि आपणहून निवडीनं एकाकी बाळंत होणारी पाश्चात्त्य स्त्री यात आपण एक वर्तुळ पूर्ण करून त्याच जागी येत आहोत का? बाळंतपण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण अशा अनेक नैसर्गिक गोष्टींना प्रगत समाजानं सुसह्य बनवलं आहे. एपिड्युराल घेऊन वेदना थांबवणं हे कृत्रिम असलं तरी बाईच्या सुखासाठीच आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्ती कोणत्या? आणि नेमकी गरज कोणती? याबाबत सामान्य माणूस नेहमीच संभ्रमात असतो. त्यामुळे त्यावेळच्या मन:स्थितीत डॉक्टर सांगतील ते प्रमाण मानण्याची प्रवृत्ती असते. त्याचा गैरफायदा घेतला जातोय का? एकूणच मूल होणं आता पैशाच्या दृष्टीनं सामान्य माणसाच्या आवाक्यात राहिलेलं नाही, त्यामुळे आपल्याकडेही पुन्हा अशी काही प्रथा सुरू होईल का? या प्रथेतील अनारोग्यदायी बाबींकडे पाश्चात्त्यांचे लक्ष नाही का? अक्षरश: अनेक प्रश्नांनी मला या घटना वाचताना भंडावून सोडलं. वाचकांना याबाबतीत काय वाटतं?


http://www.kodes.com/category
http://www.kodes.com/category/sansar-salvo/
http://www.kodes.com/category/emre-baransel/
http://www.kodes.com/category/kolera/
http://www.kodes.com/category/fuchs/
http://www.kodes.com/category/hiphop-videolari/
http://www.kodes.com/category/kadikoy-acil/
http://www.kodes.com/category/sagopa-kajmer/
http://www.kodes.com/category/ceza/
http://www.kodes.com/category/cartel/
http://www.kodes.com/category/gekko-g/
http://www.kodes.com/category/ayben/
http://www.kodes.com/category/hip-hop
http://www.kodes.com/category/turkce-rap/
http://www.kodes.com/category/rap/
http://www.kodes.com/category/nesternino/
http://www.kodes.com/category/fuat-ergin/
http://www.kodes.com/category/killa-hakan/
http://www.kodes.com/category/istanbul-attack/
http://www.kodes.com/category/pit10/
http://www.kodes.com/category/patron/
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/
http://www.gekkog.com/
http://www.maskanimasyon.com/
http://www.gekkog.com/category/gekko-g/
http://www.gekkog.com/category/patron
http://www.gekkog.com/category/pit10//
http://www.gekkog.com/category/fuchs/
http://www.gekkog.com/category/kolera/
http://www.gekkog.com/category/hiphop/
http://www.gekkog.com/category/ceza/
http://www.gekkog.com/category/sagopa-kajmer/
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015