Skip to main content

दाखवण्याचा कार्यक्रम होता. उषा तयार होत होती. मुक्ता तिच्याकडे कौतुकाने बघत राहिली. ठसठशीत नाकडोळे. चेहऱ्यावर गोडवा. किती कामसू आणि चटपटीत आहे पोर. बाहेर पडायच्या आधी स्वयंपाकपाणी, नाश्ता सगळं आटपायचं होतं तर बरोबरीनं मदत केली पोरीनं.

मुक्ताला वाटलं खरं तर हिला आपली सून करून घेता आलं असतं तर किती बरं झालं असतं! पण आपलं नाणं खोटं. पूर्ण बद्द वाजणारं. शिशिरचा उनाडपणा आणि ऐतखाऊपणा नलिनीला ठाऊक नाही. नलिनीकडे शब्द टाकला शिशिरसाठी तर मैत्रीखातर ती एका पायावर तयार होईल उषाला आपल्या घरात द्यायला. पण शिशिरशी लग्न म्हणजे या मुलीच्या आयुष्याची कुतरओढ. आपली झाली तशी. जे आपण भोगलं ते उघड्या डोळयानं या गुणी मुलीला भोगायला लावण्याचं पाप कशाला माथी घ्या?...

``एक उसासा सोडून तिनं उषावरची नजर दूर केली.
``तुम्हाला त्या स्थळाच्या पत्त्यावर सोडते आणि मग तशीच परस्पर दुकानात जाते माझ्या.'' ती नलिनीला म्हणाली.
``खरं तर तूही येतेस आमच्याबरोबर...?'' नलिनी आग्रहानं म्हणाली.

``नको ग नले, दुकानावर जायलाच हवं मला. लग्नसराई आहे ना? कामाचा फार लोड असतो. माझा मदतनीस एकनाथ.. तोही आज त्याच्या आईला घेऊन दवाखान्यात जाणार आहे... तो असला की मी निर्धास्त असते. बाकी चार बायका-मुली ठेवल्यात मदतीला. पण त्या सांगकाम्या आहेत ग... तो किंवा मी...दुकानात हवंच.'' कुलूप घालताना तिनं नलिनीची समजूत घातली.

``उषा'', रिक्षात बसता बसता नलिनी मुलीला म्हणाली, ``खाणाखुणा लक्षात ठेव मावशीच्या घराच्या. परतताना सापडलं पाहिजे घर नीट...''
``पण तुम्ही काम झाल्यावर दुकानावर या थेट. जाता जाता दुकान दाखवून ठेवतेच. परतताना ते नक्की सापडेल. मेनरोडवर आहे आणि `मुक्ता फॅशन वर्क्स' म्हटलं की कुणीही लगेच सांगेल. घर जरा गल्लीबोळात असल्यानं गोंधळाल तुम्ही. पाहिल्यांदाच आला आहात ना पुण्यात. आणि घराला कुलूप असणार. दुकानातून आपण तिघी येऊ बरोबर जेवायच्या वेळेपर्यत. हे आणि शिशिर नेमके गेलेत संगमनेरला मुलगी बघायला.''
``केव्हा येतील? आम्ही उद्या जाणार...भेट तरी झाली असती...''

``येतीलच आज... कोणती गाडी मिळेल त्यावर अवलंबून...''

मुक्ता म्हणाली पण मनात आलं ही उषा इथं असताना शिशिर न आला घरात तर बरं. नाहीतरी त्याची ती लावसट नजर या बिचाऱ्या सोज्वळ साध्या मुलीला हैराण करणार..

***
मुक्ता त्या दोघींना सोडून दुकानाशी आली तर पद्मा, नंदा, रागिणी, रंजना सगळया बाहेर वाट बघत थांबलेल्या. तिनं घाईघाईनं दुकान उघडून सगळयांना कामला जुंपलं. स्वत: ब्लाऊजपीसेसचा गठ्ठा पुढं ओढून रजिस्टर घेऊन बसली. कटिंगचं काम तिलाच करावं लागतं. या मुली तेवढ्या रुळलेल्या नाहीत. एकनाथवाचून जिथं तिथं काम खोळंबतंच.

हातासरशी तिनं दोनचार ब्लाऊज आणि कुडते-सलवार मापून त्याची कटिंग्ज मुलींना शिवायला दिली. एवढ्यात दुकानापुढं एक अलिशान गाडी थांबली. बडं गिऱ्हाईक तिनं नजरेनंच हेरलं. मग मधाळपणे बोलत तिनं तिची अर्जंट ऑर्डर दुप्पट शिलाईच्या दरात नोंदवून घेतली. मुलीच्या ब्लाऊजची मापं घ्यायला तिनं टेप उचलला आणि समोरून तिला शिशिर येताना दिसला. त्यासरशी नाइलाजानं तिनं टेप रंजनाकडे टाकला आणि म्हटलं, ``रंजू, यांची सगळी मापं नीट रजिस्टरमध्ये लिहून घे...अर्जंट ऑर्डर आहे. परवाची डिलीव्हरी... फॅशनबुक दाखव त्यांना... आणि फॅशन नंबर लिही नीट..'' आणि घाईघाईनं ती दुकानाच्या दारातच जाऊन उभी राहिली.

शिशिरला आत येऊ न देताच परतवायला हवं. आत आला की या मशिनवरच्या सगळया मुलींकडे लावसटासारखा बघत राहतो आणि ही अर्जंट ऑर्डरची मुलगी...तोकड्या कपड्यातली! याची नजर बायकांच्या नको तिथं खिळून राहणारी. दुकानात येत जाऊ नकोस म्हणून शंभरदा बजावलं आहे याला. बापलेकांचा स्वयंपाकही घरात तयार होता. गावाला जाताना दुसरी किल्ली दिली होती की! मुकाट्यानं जेवायचं आणि ताणून देणं तर सांगायलाच नको. ते बापलेकाच्या रक्तातच भिनलेलं आहे. ते सोडून हा इथं कशाला?...
``काय रे?...कधी आलात?..'' आपला संताप लपवत तिनं विचारलं.

``हे काय...आत्ताच..'' म्हणत शिशिरची नजर आत दुकानात टेहळणी करण्यात गंुतली.
``जेवण झालं?''

``कुठलं? घराची किल्ली बॅगेत आणि बॅगेची किल्ली हरवली. कुठंतरी पडली वाटतं माझ्या खिशातून. तुझी किल्ली मागायला आलो.''
ती चडफडतच आत आली. तो तिच्या मागोमाग ऐटीत येऊन मालकासारखा तिच्याच खुर्चीत. नजर त्या माप देणाऱ्या मुलीवर...
मग पर्समधून किल्ली काढून तिनं ती त्याच्या पुढ्यात आदळली. त्या मुलीच्या अन् त्याच्यामध्ये येईल अशा रीतीने कंबरेवर हात ठेऊन ती उभीच राहिली.
``नीघ लवकर. ते वाट बघत असतील.'' त्याला घालवून द्यायला ती करड्या सुरात म्हणाली.

``जरा पाणी तरी दे गं... केवढं ऊन!'' म्हणत मान वाकडी करून त्याची नजर परत त्या मुलीकडे.
नाइलाजानं पाण्याचा ग्लास आणून तिनं त्याच्यापुढं आदळला. चिडून म्हणाली, ``लग्न ठरवायला गेला होता ना रे?... साधी किल्ली नाही तुला सांभाळता येत...बायको कशी सांभाळणार?..''

मशीन चालवता चालवता पद्मा, नंदा, रोहिणी सगळया फिसकन हसल्या. नवीन गिऱ्हाइकाशी बोलता बोलता रंजनासुद्धा ओठ दाबून हसली. गाडीवालींनं विचित्र नजरेनं त्याच्याकडे पाहिलं.
मग मात्र तो उठलाच.

``बाबांनी घरी बोलावलंय तुला. फोटो आणलाय तिचा... शिवाय तिथं झालेली बोलणी...बरंच बोलायचंय... चलतेस ना?..''
याला पुढं घालून नेल्याखेरीज हा इथून हलणार नाही हे तिनं ओळखलं. अनिच्छेनं पर्स उचलीत ती रंजनाला म्हणाली, ``यांची सगळी ऑर्डर नीट नोंदवून घे. सगळी फॅशनबुक्स दाखव त्यांना..''
``परवा साखरपुडा आहे. हे एकतरी ब्लाऊज हवंच उद्याला.''गाडीवाली म्हणाली.
``काळजी करू नका. डबलशिलाई घेतली आहे ना तुमच्याकडून? अर्जंट काम होणार. सांगितलेली वेळ पाळणं आमच्या दुकानाची ख्याती आहे. हेलपाटा पडणार नाही. आणि मनपसंत काम. बघाच तुम्ही. खुषी खुषी लग्नाची सुद्धा सगळी ऑर्डर आम्हांलाच द्याल तुम्ही.''

``चल रे...'' म्हणत ती दुकानाबाहेर पडलीही आणि अचानक तिला नलिनी-उषाची आठवण झाली. त्या दोघी इथं येतील. त्यांच्यासाठी थांबायला पाहिजे होतं पण तोवर हा शिशिर हलणार नाही इथून.
चार पायऱ्या उतरलेली ती परत वर आली. ``हे बघ रंजना, माझ्या दोन पाहुण्या इथं येतील. अर्जंट जावं लागलं म्हणावं घरी. त्यांना तू रिक्षात घालून घरी आणून पोचव. आजारी आहे माझी मैत्रीण...क्रॅन्सर पेशंट...आणि घराचं अंतर कमी असलं तरी तिला चालणं नाहीच झेपायचं. शिवाय इथं शहरात नवखी...घर पटकन नाही सापडलं तर उन्हात भटकतील दोघी. रिक्षानं आण...''

`बडं गिऱ्हाईक मिळालेलं दिसतंय...आणि रंजना...रंजना चाललं होतं तुझं...तुझा तो एक्क्या नाही आला वाटतं आज...'' चालता चालता शिशिर म्हणाला. ``बाकी त्या एक्क्याची मजा असते हां...आजूबाजूला तरण्यापोरी मशीन चालवायला दिवसभर... आणि मापं घ्यायलाही रोज वेगवेगळया बायका!''
``हो. पण हा कधी मान वर करून नाही बघत कुणाकडे. शरीराला स्पर्शही न करता मापं घेण्याचं सौजन्य आणि कसब आहे त्या पोरामध्ये त्यामुळे गिऱ्हाइकंही सगळी खूष असतात त्याच्यावर. म्हणाल ती फॅशन उतरते सफाईनं त्याच्या हातातून.''
``पायातली कमी देवानं हातात भरून काढली म्हणायची त्या लंगड्या एक्क्याच्या!'' शिशिर फिदीफिदी हसला.

``मूर्खासारखं बरळू नकोस. लंगडाबिंगडा काही नाहीय तो. लहानपणी झाडावरून पडून पाय मोडला. अशिक्षित आईबापांनी नीट औषधपाणी केलं नाही. कुणा वैदूनं हाड जोडलं तो एक पायतोकडा राहिला बिचाऱ्याचा. तो काही अपंग नाही. आणि एखाद्याच्या वैगुण्यावर असं हेटाळणीनं हसणं बरं नव्हे हं शिशिर...! आणि नीट बोलत जा त्याच्याबद्दल. सारखं एक्क्या एक्क्या काय रे? तो तुला शिश्या म्हणतो का कधी?.. `शिशिरराव'शिवाय कधी बोलणं नसतं त्याचं.''

``हु:!'' तिरस्कारानं मुक्ता म्हणाली. ``मशीनचं पाऊल तरी मारता येतं का? मालक म्हणे भावी! माझ्या माघारी तू दुकानावर बसशील तर एकतर मशीन चालवणाऱ्या मुली-बायका नोकरीच सोडून देतील किंवा तुला चपलेनं बडवतील तरी. गिऱ्हाइकं तर येणारच नाहीत तुझ्या या लावसट नजरेला वैतागून!''
``जरा कुठं मुलींकडे बघितलं मी तर एवढी उखडतेस का पण तू?...पोटच्या मुलापेक्षा तुला त्या मुलींचा कैवार बाकी जास्त हा..!''
``अरे वा! कैवार म्हणे! मुलगा असलास म्हणून काय झालं? कसंही वागलास तरी खपवून घेऊ का काय मी?...दुसऱ्याच्या मुली असल्या तरी त्यांना सभ्यतेनं वागवायला हवंच ना?... असं वागणं बघणं म्हणजे त्यांच्या स्त्रीत्वाचा अपमान आहे आणि मला नाही आवडत तो. अरे, आई असले तरी बाईही आहे मी एक. आणि पूर्वीही हजारदा सांगितलं, परत सांगते; जरा नीट वागत-बघत जा मुलींकडे. आणि आता तर लग्न करायला निघाला आहेस तू!''
``लग्नाचा आणि पोरी निरखण्याचा संबंध काय बुवा!'' निर्लज्जपणे शिशिर म्हणाला तेव्हा तर तिचं डोकंच तडकलं. भर रस्त्यात त्याच्या मुस्काटात मारावीशी वाटली; पण तिनं मन आवरलं. वारंवार फिट्स येणारा मुलगा हा...रस्त्यात पडला तोडाला फेस येऊन तर उगाच तमाशा.

``तुझं बाईपण इतकं उफाळून येऊन त्या मुलींना जिथं तिथं पाठीशी घालायला बघतेस तर मग त्या तरुण एकनाथला कशाला लावून घेतलंस गं दुकानात तू?''
``त्याच्याच तर भरवशावर दुकान चालतं माझं. रात्रंदिवस राबायची तयारी असते त्याची सीझनमध्ये. ठरलेल्या पगाराशिवाय २० टक्के कमिशनदेखील देते मी त्याला सीझनमध्ये.''
``गेलाय कुठे हा तुझा २० टक़्केवाला आज कामाची गर्दी असताना?''
``आईला घेऊन डॉक्टरकडे गेलाय मंथली चेकअपसाठी. आईची काळजी घेतो तो. कष्ट करून पोसतो तिला. आईला नाही पोसावं लागत त्याला तुझ्यासारखं...!'' चिडून तिनं टोमणा मारलाच पण शिशिर ढिम्मपणानं म्हणाला- ``आता तू काही काळजी करू नकोस. तुला-मला सगळयांना पोसणारी सूनच येतीय घरात आता. रेल्वेत नोकरी...सरकारी...पेन्शनेबल...रेल्वेचे पास भटकायला..काय?...मजा आहे ना?...
चालता चालता ती एकदम रस्त्यातच थबकली.

``तुझं इन्कम नाही का विचारलं तिनं?''
``ती कसली विचारते! अडलेली घोडनवरी ती. वडील मेल्यावर त्यांच्या जागी रेल्वेत चिकटली. आई कधीच मेलेली. धाकट्या दोन भावांचं शिक्षण करे करेपर्यंत हिची तिशी ओलांडलेली...अडलेली कुमारिका!..आणि माझ्यासारख्या इलेएटि्निशउायनचं इन्कम काय? स्वतंत्र धंदा. कधी कमी कधी जास्त..
``जास्त कधी?...महिनो न् महिने नाहीच. आळसात लोळत कोण पडणार?...आई आहेच पोसायला. तो इन्व्हर्टर घरी येऊन पडलाय महिनाभर...ते शेवाळे चार चकरा मारून गेलेत. इस्त्र्या आणि इमर्जन्सी लँप्स तर किती पडलेत घरात...! लोकांनी आशाच सोडून दिली आहे ते दुरुस्त होऊन मिळण्याची.
``अगं, माझ्या तब्येतीमुळे ते...''
``तेच ते. तुला वारंवार फीट्स येतात ते बोलला आहेस ना?...कुणा मुलीला अंधारात नाही ठेवायचं..! काय?''
``आई, तुझं हे अतीच हं..! ते कशाला सांगायला हवं? औषधं सुरू आहेतच ना?...हे सगळं सांगत बसलो तर मला मुलगी कशी मिळणार?...आता मी पण पस्तीशी गाठत आलो..''
``म्हणजे नाहीच काही बोललेला तुम्ही दोघे- तर...'' तिने उसासा सोडत घराचं फाटक उघडलं.

त्यांना बघून बॅगेशी बागेतल्या एका तारेनं काहीतरी खटपट करत बसलेला माधव म्हणाला,
``चालत कशाला आलात उन्हाचं?... रिक्षा नाही का करायची?''
रिक्षाला पैसे पडतात आणि ते ना कधी तुम्ही दिलेत ना कधी तुमच्या मुलानं मला! रात्रंदिवस कष्ट करावे लागतात मला ते कमवायला.'' ती पोटतिडिकीनं म्हणाली.
``सोड आता काळजी पैशाची! तुझ्या मुलानं सोन्याची अंडी देणारी कांेबडी गाठली आहे! आहेस कुठं?..''

``तुमचाच मुलगा ना! अशा कोंबड्या हुडकत फिरण्याचा वारसा चालवणारच!'' कुलूप उघडून तिनं संतापानं दार ढकलून दिलं.
आत शिरल्या शिरल्या माधवला तिच्या खोलीत ठेवलेलं सामान दिसलं. ``कोण आलंय?'' त्यानं थोड्या तुटकपणेच विचारलं.
``नलिनी आणि तिची मुलगी उषा...दाखवण्याचे कार्यक्रम होते आज दोन. सकाळ संध्याकाळ..''
``ती इगतपुरीला तुझ्या शेजारी राहणारी तुझी बालमैत्रीण ना? ब्रेस्ट क्रॅन्सर झाला होता ना तिला?...नवरा तर पाचसहा वर्षांपूर्वीच गेलेला. हीही काही नोकरीधंदा न करणारी. मग या आजारपणात अगदी कफल्लकच झाली असणार ती! ऑपरेशन...केमोथेरपी...आता मुलीच्या लग्नाला पैसा कुठून आणणार ती?...मुलगी काही करते का?...''
माधवच्या वकिली पेशानं उलटतपासणी सुरू केली होती.
``आईच्या आजारपणात उषाला पुढं शिकणं जमलंच नाही. फक्त एस.एस.सी. झालीय. नोकरी कुठली मिळणार तिला? आणि तिच्या लग्नाच्या खर्चाची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही जन्मभर वकिली केलीच नाही; बायकोच्या भरवशावर आरामात आयुष्य काढलंत हे ठाऊक आहे तिला...तुमच्यापुढं नाही हात पसरणार. तुम्ही निर्धास्त रहा.''

दोघांची पानं वाढता वाढता मुक्ताला आठवलं. वकील नवरा मिळाला म्हणून किती हुरळली होती ती अन् तिचे आईवडील. पण त्याची वकिली चालतच नाही म्हणून त्यानं शिवणाची शिक्षिका हेरली- कायम नियमानं पगार आणणारी घरात! हे तिला लवकरच कळून चुकलं. आणि पोटापाण्याची निवांत सोय करून माधवनं मग लोळत आणि मित्रमंडळींबरोबर क्लबात पत्ते खेळण्यातच घालवलं आयुष्य. शिशिरला मॅनिंजायटिस झाला. वाचला पण त्यावेळेपासून वेळोवेळी फिट्स येतात. शिक्षणाचा नाद सोडून त्याला इलेएटि्निशउायनचा कोर्स दिला. पोटापुरतं तरी कमावू शकलाच असता पण आजाराच्या बागुलबुवाच्या आश्रयानं तोही ऐतखाऊच बनत गेला. त्याच्या आजारीपणात नोकरीची बांधिलकी जमेना तेव्हा माधवच्या ऑफिसच्या जागेत सरळ चार मशिनं टाकली. मुली कामाला ठेवल्या. माधवच्या नावाची पाटी काढून टाकून `मुक्ता फॅशन वर्क्स' सुरू झाले. एकनाथसारखा कसबी कलाकार मिळाला. दुकान भरभराटीला आले. बापलेकांना कष्ट न करताच जीवन जगण्याची सवय जडली.

किल्ल्यांच्या डब्यातून डुप्लिकेट चावी हुडकून काढून एव्हाना शिशिरनं बॅग उघडली होती. मुलीचा फोटो बाहेर काढून तिच्यापुढे टाकत तो म्हणाला, ``मुलीचे भाऊ विचारीत होते. कधी करायचा साखरपुडा?...''
मुक्ताला तो फोटोही बघावासा वाटला नाही. ती कशी होती यापेक्षाही ती एक मुलगी होती आणि फसवली जाणारी मुलगी होती...तिच्या दृष्टीने तेच महत्त्वाचे होते.
``तिला शिशिरच्या कमाईबद्दल आणि फिट्सबद्दल नीट कल्पना दिलेली नसेलच तुम्ही दोघांनी..? ती तुच्छतेनं महणाली.
``तू चूप बसायला काय घेशील?..चार लग्नं जमता जमता फिसकटली त्याची. जन्मभर असाच का ठेवणार आहेस त्याला?...आई म्हणून विचार कर की त्याचा जरा!''

काहीतरी खरमरीत बोलावंसं वाटता वाटता ती थबकली. दरवाजात रिक्षाचा आवाज आला. नलिनी आणि उषा आल्या असणार. त्यांच्यासमोर उगाच वादावादी नको म्हणून आवरतं घेत ती म्हणाली.
``ठीक आहे. मुलामुलींची पसंती झालीच आहे. या आठवड्यात अर्जंट कामं आटोपली की दुकान एकनाथवर सोपवून मी मुलीला भेटून येते. दिवस ठरवून टाकते. तिचा फोन नंबर देऊन ठेव शिशिर..'' शिशिरनं लगेच पुढं केलेला कागद तिनं पर्समध्ये टाकला. ``तुम्ही जेवून घ्या दोघं; त्यांचे हातपाय धुऊन झाले की नंतर आम्ही बसू तिघी.''

नलिनी, उषाला घेऊन रंजना आली होती.
``बाई, मी निघते. एकनाथ आला आहे दुकानात. त्याच्या आईपण आल्यात. बसल्याबसल्या हूक, बटणं लावते म्हणाल्यात.''
``त्यांना कशाला कामाला लावलं?''
``ऐकेचनात. म्हणाल्या लोड फार आहे ना कामाचा? थोडी मदत... घरात तरी एकटी बसून काय करू? आणि एकनाथनं निरोप दिलाय. आरामात जेवण वगैरे करून पाहुण्यांबरोबर थोडा आराम करून मग या. तो सांभाळतोय सगळं तिकडे.''
एकनाथबद्दलच्या मायेनं तिचा ऊर अगदी भरून आला.ती न राहवून नलिनीला म्हणाली...``फार चांगला मुलगा मिळाला आहे मला. हाडाचा कलाकार आहे. म्हणाल ती फॅशन उतरवतो कापडावर. शिवाय मितभाषी. सभ्य. चार मुली-बायका आहेत दुकानात कामाला; पण कधी कुणाशी नजर उचलून टारगट बोलणं नाही. त्याला चांगली बायको मिळायला हवी बाई. आई अगदी डोळयांत प्राण आणून वाट बघतेय पण पायामुळे आणि काम हे असं, शिंप्याचं...हल्लीच्या मुलींना नाक मुरडायला निमित्तच!''
``पायाला त्याच्या काय..''
``काही नाही गं. अडाणीपणामुळे वैदूकडून हाड बसवून घेतलं ते नीट बसलं नाही. त्यामुळे पाय थोडा अपरा इतकंच. डॉक्टरचं सर्टिफिकेटही घेऊन ठेवलंय- मी सांगितल्यापासून. मुलात कसलाही दोष नाही. निर्व्यंग आहे. परत कमाईही उत्तम. आता लग्नसराईत पगाराशिवाय कमिशन देते मी त्याला. चांगला पैसा मिळवतो मेहनतीनं. पुढं मागं माझं दुकान तोच सांभाळणार बघ.''
``होय ना?..त्याच्या आईशीपण ओळख झाली दुकानात थांबलो तेव्हा. चहाला या म्हणाल्या आज. नाही म्हटलं तरी आग्रह सुरूच होता त्यांचा. मुक्ताबाइंर्च्या पाहुण्या त्या आमच्याही पाहुण्याच..''

हातपाय धुता धुता नलिनी म्हणाली. एवढ्यात दोनचारदा शिशिर गेलाच डोकावून. मग मुक्ताच म्हणाली, ``उषा, हा शिशिर. माझा मुलगा. इगतपुरीला माहेरी यायची तेव्हा लहान होतात तुम्ही दोघं. आता आठवणारही नाही.'' आणि मग एकेका शब्दावर जोर देत तिनं सांगूनच टाकलं. ``लग्न ठरतंय आता त्याचं; आणि बरं का रे शिशिर, तुझ्या लग्नात ही करवली म्हणून मिरवणार.''
कसनुसं हसून मग शिशिरनं आपली नजर दुसरीकडेच वळवली.

जेवताना नलिनी म्हणाली, ``मुक्ते, या सकाळच्या स्थळाचं काही खरं नाही दिसत मला. त्यांना कमावणारी मुलगी हवी असावी. खोदखोदून विचारीत होते- कुठला कोर्स वगैरे झालाय का?..नोकरी करण्याच्या दृष्टीने काही शिकली आहेस का?..केव्हा आणि काय शिकेल गं ही मुलगी?...माझ्या आजारपणानं हॉस्पिटल आणि औषधपाणी..माझी सेवा या पलीकडे हिला आयुष्य तरी उरलं होतं का सांग?...केमोथेरपीनंतर मी थोडी सावरले आहे. हातपाय हलवते आहे तोवर हिला उजवली पाहिजे. माझा आता काय भरवसा?..माझ्या माघारी एकटी कशी राहणार ही?... लवकरात लवकर हिचं लग्न करायचंय, मुक्ते..! इगतपुरीसारख्या ठिकाणी फार मर्यादा पडतात गं...परगावी धावपळ करण्याएवढी माझी तब्येतही आता राहिली नाही. इथं तू होतीस म्हणून या दोन स्थळांसाठी येण्याचं धाडस केलं..''
``अजून संध्याकाळी जायचंय ना तुम्हाला?...निराश होऊ नको नलू..अगं, गुणी, देखणी पोर आहे. जमेल तिचं.''
``तुझ्या तोंडात साखर पडो बाई.'' नलिनी म्हणाली.

***
चार वाजता दोघींना मुलाच्या पत्त्यावर सोडून मुक्ता दुकानात आली. आली तर एकनाथनं ते अर्जंट ब्लाऊज शिवून पुरंही केलं होतं. त्याची आई हूकच लावीत होती.
``तुम्ही कशाला मान मोडून कामाला जुंपून घेतलंत, विमलाबाई? नुकतंच तुमचं जिवावरचं दुखणं झालंय...विश्रांती घ्यायचीत घरी.''
``एकटीला घर खायला उठतं बघा, मुक्ताबाई. आणि आता तब्येतीचं म्हणाल तर इथं चार जणीत गप्पागोष्टीत वेळ चांगला जातो. तुम्हाला जरा मदतही होते.''
ब्लाऊज खूपच छान झालं होतं. एकनाथवर खूष होत ती म्हणाली, ``विमलाबाई, लेकाच्या हातात खरंच फार कला आहे. गिऱ्हाईक खूष होणार बघा. लग्नाची सगळी ऑर्डर आपल्यालाच मिळणार. एकनाथमुळे दुकानात लक्ष्मी चालत येते...''
``आता माझ्या घरात लक्ष्मी केव्हा येणार ते सांगा..! या पायांमुळे दोनचार ठिकाणाहून नकार आला तसा हा आता लग्नच करायचं नाही म्हणून बसलाय बघा. तुम्हीच समजवा याला.''
मुक्तानं कणवेनं एकनाथकडे पाहिलं-खाली मान घालून एकाग्रतेनं त्याचं मशीन सुरू होतं.
समजावीन मी त्याला. तुम्ही काळजी करू नका विमलाबाई. खरं तर एकनाथसारखा नवरा मिळायला भाग्य हवं.''

***
नलिनी आणि उषा रिक्षातून उतरल्या तशा विमलाबाई म्हणाल्या, ``मुक्ताबाई, पुढे होऊन मी चहा ठेवते. पाहुण्यांना घेऊन या घरी. मी तुमचं काहीएक ऐकणार नाही. अहो, त्या कशाला येतात वारंवार इकडं पुण्याला?...ओळख झालीय..आणि दोन घरं सोडून तर माझं घर. कितीसं लांब जायचंय?..याच.''

पाच मिनिटासाठी म्हणून गेल्यावर नाही नाही म्हणत तासदीड तास गप्पा रंगल्याच. विमलाबाई आणि नलिनी दोघीही बडबड्या. निघताना मुक्तानं पाच हजार विमलाबाइंर्च्या हाती ठेवत म्हटलं - ``एकनाथचा पगार आणि या महिन्यातलं कमिशन. मेहनती आणि गुणी मुलगा आहे. जी मुलगी या घरात येईल ती भाग्यवानच म्हणायला हवी..''

***
रिक्षात नलिनी म्हणाली, ``मुक्ते, याही स्थळाकडून होकार येईलसं वाटत नाही. मुलगा एक छोटंसं डेलीनीड कॉर्नर चालवतो. जरा मोठी जागा घ्यायचीय म्हणत होते वकील. डिपॉझिट भरावं लागेल बरंच. चाचपून बघत होते-आम्ही काय देऊ शकतो ते! कुठून पैसे आणायचे गं? आजारपणात कफल्लकच झालेय मी. मुलांना एकतर शिकलेली, नोकरी करणारी मुलगी हवी नाहीतर धंद्याअडक्याला पैसा पुरवणारी सासुरवाडी हवी. आम्ही दोन्हीतून वजाच की गं...! कसं होणार पोरीचं माझ्या माघारी, मुक्ते?..''
``दोन्हीकडून नकारच येईल असं का गृहीत धरतेस? उद्या कळवणार आहेत ना निकाल?..वाट तर बघू या.''

***
पण सकाळीच दोन्हीकडेच फोन आले. दोन्हीकडचे नकार आले होते. नलिनीचे तर डोळेच गळायला लागले.
``अगं, याच स्थळांना काय सोनं लागलं होते का?..आपण वधूवरसूचक मंडळात नाव घालू या उषाचं... पुण्यात सतराशे साठ मंडळं आहेत अशी...''
``कालच मी येताना एकदोन ठिकाणी चौकशी केली होती, मुक्ते. फिया फार असतात गं यांच्या. एवढाले पैसे द्यायचे...शिवाय गावी परगावी हिडायचं?...इथं तू होतीस हक्काची म्हणून निभावलं. या मुलीला घेऊन मी कुठं हिंडू?...प्रवास, हॉटेल...सगळंच न परवडणारं झालंय बघ. पैशानं आणि तब्येतीनंही. सध्या जीवघेणी तंगी चालली आहे... आणि न जाणो उद्या रेडिएशन थेरपी वगैरेची वेळ आली तर?...शक्यच नाही. सरळ मरणाला सामोरी जाणार मी...मग उषाचं काय?..असं वाटतं मुक्ते..एखादा मुलगा सरळ समोर येऊन उभा राहावा...म्हणावं त्यानं करतो मी लग्न हिच्याशी...काहीही न मागता..!''

त्यांचं बोलणं ऐकत माधव तिथंच बसला होता. तो काही बोलणार एवढ्यात फोन वाजला. ``बघा बरं जरा..''म्हणत मुक्तानं त्याला बाहेर घालवलं. मग नलिनीला समजावत ती म्हणाली, ``काळजी करून काय होणार, नले? तू शांत रहा. सगळं व्यवस्थित होईल. कधी कधी काखेत कळसा नि गावाला वळसा असंही होतं बघ. योग आला की मुलगा भेटेल तसा...''
डोळे पुसत नलिनी म्हणाली, ``तू म्हणतेस ते खरं मुक्ते, खरं तर विचारू नये पण राहवत नाही...मी इथं आल्यापासून त्या एकनाथला बघते आहे...विचारावं का गं?''
``माझ्या अगदी मनातलं बोललीस बघ नलू तू. माझा दुसरा मुलगाच म्हणेनास तो. अगदी डोळे झाकून उषाला तिथे दे. सुखात राहील बघ.''

मग तिनं स्वयंपाक आटोपता घेत दुकानच गाठलं. एकनाथशी बोलली. घरी जाऊन विमलाबाइंर्शी बोलली आणि मोठ्या उत्साहानं तिनं घर गाठलं.
अंगणात फाटकाशीच माधव तिची वाट बघत उभा होता. ती आल्या आल्या तिला म्हणाला,
``तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. दुकानातच येणार होतो पण फोन केला तर तू घरी यायला निघाली होतीस. अगं, मगाशी फोन आला तेव्हा तुझ्याशी नलिनी बोलत होती ते ऐकलं मी. बिचारी फारच अगतिक झाली आहे गं. मी काय म्हणतो? आपल्या शिशिरच्याही मनात भरली आहे ती मुलगी. उषा खरंच देखणी आहे गं. आपणच तिला सून करून घेतली तर?...''
मुक्ताला धक्काच बसला. ``अहो, शिशिरचं लग्न ठरवून आला आहात ना?..शब्द दिला आहात ना मुलीकडच्यांना पसंतीचा?...इकडं साखरपुडा ठरवण्यासाठी शिशिर मला फोन नंबर देतोय आणि इकडं तुम्ही दुसऱ्या मुलीचा विचार करता आहात?..अहो, वकील असलात म्हणून काय झालं?..इतकं शब्द फिरवणं?''

``हळू बोल. तिला दटावत माधव म्हणाला. ``तेच तर महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी.चल तरा इथं बाहेर ओट्यावर बसूनच बोलतो. घरात नको. कुणी ऐकेल.''
मग नाइलाजानं ती तिथंच ओट्यावर बसली. अगदी हळू आवाजात तिच्या कानाशी लागून माधव म्हणाला, ``अगं, मगाशी मी उठून आलो ना फोन घ्यायला. तर तो त्या मुलीच्या भावाचाच होता. त्याला माहिती कळली म्हणे शिशिरच्या फिट्स वगैरेची...ही गोष्ट लपवली म्हणून शिव्या घालत होता मला फोनवर. गेलं ते स्थळ हातचं. कुणीतरी खोडसाळपणा केला असणार. अगं, विघ्नसंतोषीच असतात लोक. म्हणाला आम्हांला कळलंय, मुलगा कमावत नाही नीट... वारंवार फिट्स येऊन पडतो..''
``पण खोटं थोडंच आहे ते?''
``खरं आणि खोटं! वकील खरा तर मी पण तूच नेहमी वकिलाच्या थाटात बोलत असतेस. अगं, पोटचं पोर आहे आपलं. त्याला संसार थाटून देणं...मार्गी लावणं हे आपलंच कर्तव्य नाही का?...जरा आईच्या भूमिकेतून विचार करीत जा की...''

``खरंच हो...'' मानभावीपणानं मुक्ता म्हणाली. ``अहो. मग या उषापेक्षा ती सरकारी नोकरीवाली मुलगी अधिक चांगली ठरेल बघा आपल्या शिशिरला. असं करा... उद्या परत जा संगमनेरला. त्या मुलीला, तिच्या भावाला वकिली थाटात पटवून द्या, माहिती खोटी आहे म्हणून. अहो, अडलेल्या मुली लवकर लागतात गळाला!''
``मग तसं बघायला गेलं तर त्या मुलीपेक्षा उषा जास्त अडलेली आहे. तिलाच पदरात पाडून घेऊ या की. हातचं सोडून आता उगा पळत्याच्या मागे लागण्यात काय शहाणपण आलंय?...नलिनी तुझीच मैत्रीण. शिवाय परिस्थितीनं अगदीच चिणली नडली आहे. शिशिरच्या मनातही उषा भरली आहे. शिवाय दोन्हीकडून नकार आल्यानं निराशही झाली आहे. अशा अडलेल्या परिस्थितीत होच म्हणेल बघ ती आपल्या शिशिरला.''

``अहो, पण ही...ही तर अगदीच लंकेची पार्वती..! सोन्याची अंडी न देणारी कोंबडी..''
``साधी अंडी देणारी तरी आहे ना?''...निर्लज्जपणे फिसकन् हसत माधव म्हणाला.
मुक्ताला अगदी चीड..चीड आली! बायकांच्या बाबतीत हे असले विचार अन् असलं बोलणं?..

``कशीही असली ना तरी तिला पोसावं लागतंच. दाणे घालावे लागतात तिच्या पोटाला. शिशिरमध्ये आहे का कुवत तेवढी?''
``अगं, तू आहेस ना?..''
``म्हणजे?.. इतके दिवस तुमचा संसार ओढला. आता त्याचाही ओढू?''
``तिला शिकव शिवणकाम..! शिकेल...चालवेल दुकान पुढे ती!''
``आणि हा बसून आयता खाईल. म्हणजे जे माझ्या नशिबी आलं तेच करायला मी एका मुलीला भरीला पाडू? माझ्यावर जो अन्याय झाला तो डोळे उघडे ठेवून मी दुसऱ्या एका स्त्रीवर करू?...हे बघा- स्त्रीला एक नवरा नावाचा पाळीव प्राणी नको असतो. तिची कमावण्याची, कष्ट करण्याची, संसाराला हातभार लावण्याची तयारी जरूर असते; पण तिच्याबरोबरीनं खांद्याला खांदा लावून संसाराचा भार उचलू पाहणारा एक जोडीदार हवा असतो तिला. ज्या गोष्टीसाठी मी आयुष्यभर रडले तीच गोष्ट दुसऱ्या स्त्रीच्या माथी थोपवण्याचं पाप नाही करायचं मला...आणि उषाचा विचार तर नाहीच करता येणार तुम्हाला..! तिचं लग्न ठरलंय..!''

``आँ? कुणाशी?.. दोन्हीकडून नकार आलेत म्हणून नलिनी तर रडत होती ना मगाशी..! मी तिथं होतोच की..''
``तुम्ही फोन घ्यायला गेलात ना?..तेव्हा एक स्थळ सापडलं...आणि आत्ता तिकडूनच येतेय मी होकार घेऊन. आजच साखरपुडा करणार आहेत.''
``काय सांगतेस? कोण मुलगा?..''
``आपला एकनाथ!''
``आपला!'' कुत्सितपणे माधव म्हणाला. ``तुझा! तुझा एकनाथ. म्हणजे तूच पुढाकार घेऊन हे लग्न ठरवलंस म्हण की! पोटचा मुलगा सोडून त्या एकनाथचा विचार! छान! उत्तम! आपल्या मुलाच्या सुखाची यत्किंचितही पर्वा नाही तुला गं!''

मग एकाएकी बोलणं थांबवून त्यानं तिचा हात धरला. तिच्याकडे एकटक बघत त्यानं विचारलं-
``खरं खरं सांग...त्या मुलीच्या भावाला तूच तर केला नव्हतास ना फोन?''

झटक्यात आपला हात सोडवून घेत ती म्हणाली, ``वायफळ चर्चा नकोय आता. मला एकनाथच्या साखरपुड्याची तयारी करायची आहे..!''
``अरेरे! आईपणाच्या नात्याला जागली नाहीस तू!''
``पण बाईपणाच्या नात्याला तर जागले ना!'' त्याच्याकडे एक तिरस्काराचा कटाक्ष टाकीत ती म्हणाली अन् त्याच्याकडे पाठ करून उत्साहानं ती घरात शिरली.

cheap cialis

fgyvyb cheap cialis 6127 buying viagra online MryXem buy cialis cheap %-[[[ viagra :-O cialis >:-[ viagra PIEFkK

viagra

fghuhsu http://pkblky.com/ fvzyfepm [url=http://urachv.com/]fvzyfepm[/url]

viagra

qsigeaxg http://phgwgo.com/ hqdtfhp [url=http://jawner.com/]hqdtfhp[/url]

lbtgtxqn

dvvhhp

Microsoft Office 2007 The

Microsoft Office 2007 The content has Download Office 2010 towards be trustworth Office 2007 Enterprise too Convincing sure Office Professional 2010 however not within buy office 2007 the obvious mechanisms microsoft office 2010 key o tackling towards microsoft office 2007 product key promot the one Office Professional Plus 2010 thin trustworth within office professional 2007 plus the feel within microsoft office 2010 professional plus which straight trut Microsoft Office 2007 Ultimate .

bcc

Oakland Mayor Office 2010 Jean Quan and Microsoft Office 2010 other city officials microsoft 2010 were hoping there would Office Professional 2010 be no reprise of MS Office 2010 the violence that Microsoft Office 2010 Download erupted last week Microsoft Office 2007 when police moved Office 2007 in to raze the MS Office 2007 Occupy Oakland Office 2007 encampment.

moncler soldes, est toujours

moncler soldes, est toujours une marque populaire de moncler pas cher les personnes dans le temps glacial. Notre boutique moncler bulgarie doudoune femme moncler en ligne permet de acheter les vêtements, moncler veste n’importe moncler homme ou veste moncler, sur internet sans en déplaçant en hiver!
Once you find a pair of cheap ugg bottes that you are ready to buy, be sure to read the fine print. ugg pas cher une paire de UGG Classic Tall bon marché que vous êtes prêt à acheter, UGG Classic Cardy assurez-vous de lire les petits caractères.
These replica handbags are every inch as good as the original. The quality and the desigh of the replica handbags cheap, louis vuitton neverfull you would not believe yourself, The most amazing thing is the price,which is servel times lower than the original. sincerely wecome you check this out in our online store.
There are many christian louboutin cheap at christian1louboutine.com. And the louboutin incloud christian louboutin outlet online, christian louboutin outlet, and so on.

boxsetszone

A three part golden girls dvd storyline features golden girls dvds the time traveling hex dvd dictator Kang hex dvds the Conqueror hex dvd set and is reminiscent hogan's heroes dvd of the great hogan's heroes series Kang storylines house md dvd from the Avengers house md dvds comics. And little house on the prairie dvd in Widows Sting, Hawkeye little house on the prairie dvds and Mockingbird little house on the prairie series are on the little house on the prairie complete series trail of the lie to me dvd apparent double lie to me dvds agent the the l word dvd Black Widow. There's the l word dvds some anime lost dvd influence, but lost dvds Earths Mightiest mash dvd Heroes animation mash dvds style is probably monk dvd somewhere between monk season Marvel's more monk seasons traditional superhero monk series style and a full ncis dvd on anime production. Its ncis dvds similar in look one tree hill dvd to the recent one tree hill dvd season Wolverine and one tree hill seasons the as far as one tree hill series art style is seinfeld dvd concerned. Former seinfeld dvds Force comics seinfeld dvd set writer is sopranos dvd the series sopranos seasons head writer sopranos series and story the sopranos dvd editor, and wrote the Masters http://boxsetszone.com included in this collection.

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!

कथासूत्र

हा प्रतिसाद लिहिताना मला मुळीच बरे वाटत नाही. पण ’मिळून’च्या संपादिका गीतालींनी ’मिळून’मधे छापण्याकरता त्यांच्या कार्यालयात आलेल्या होतकरू लेखकलेखिकांच्या कथा ’मिळून’मधे छापण्याकरता निवडण्यात काहीतरी एक किमान दर्जा राखला पाहिजे असा माझ्या मनात आलेला विचार मी इथे खेदपूर्वक नमूद करते. सुनीति आफळेंच्या ह्या कथेची मांडणी बर्‍यापैकी आहे, पण कथासूत्र निकृष्ट दर्जाचे आहे.

ह्या प्रतिसादाने निराश न होता सुनीति आफळेंनी ह्यापुढे कथासूत्रे मनात तयार करताना चांगली कल्पकता जोपासावी. तसे त्यांनी केल्याने त्यांना चांगल्या कथानिर्मितीचा छान आनंद लाभेल, आणि वाचकांनाही चांगली कथा वाचल्याचा आनंद लाभेल.