- संवाद
- डोलोरेस हुएर्टा - चिकानो चळवळीतील झुंजार स्त्री.
- नातं
- नावं कशी ठेवावीत ?
- जर्मनीतही स्त्रीचा प्रतिष्ठेसाठी बळी
- नॅनॉ टेक्नॉलॉजी आपल्या घरात.
- झिना
- फ्री बर्थ्
- श्श्य ऽऽऽ कावळा शिवलाय दूऽऽऽर !
- कचर्यातील सॉनं
- शक्य आहे ! महिलांवर हॉणार्या अत्याचाराचा अंत
- खंत
- क्रेडिट काडधारकांसाठी महत्त्वाचे
- स्वयंपूण , विज्ञाननिष्ठ शिक्षणाची जीवनशाळा
- तिला स्पर्धेत बाद ठरवण्यात आले
- राजकारणातील तरुणाई.
- कॉटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा - 2005
संवाद
प्रिय वाचक,
सस्नेह नमस्कार!
कसे आहात? विद्याचा ऑगस्ट विशेषांकातला `संवाद ' वाचला ना? विद्याने कृतार्थ भावनेनं `संवादा'ची जागा आता माझ्या हातात सोपवली आहे. १९८९ ऑगस्टपासून माझ्यासकट आपल्या सर्वांना एखादा अपवाद वगळता नियमितपणे विद्या `संवाद'मधून भेटत होती. तिचा संवाद मनमोकळा, नवा विचार देणारा, ताजा अनुभव सांगणारा आणि आल्हाददायक असायचा. वाचकही भरभरून या संवादाला प्रतिसाद देत होते आणि म्हणून तो दोन्ही बाजूंनी रंगत होता, प्रवाही होता. गेली वीस वर्षं विद्यानं आपलं सर्व आयुष्य मिळून साऱ्याजणीसाठी वाहून घेतलं होतं. तिच्या या अमोल योगदानामुळे `मिळून साऱ्याजणी' आज नावारूपाला आलं आहे हे आपण सर्व जाणून आहोत. विद्याचा हा संवाद वाचून आपल्या अनेक मैत्रिणींच्या डोळयात आसवं दाटून आली. ती मला छान समजू शकतात कारण माझीही गत `एका डोळयात आसू आणि एका डोळयात हसू' अशी आहे.
सततची भ्रमंती करत अफाट जनसंपर्क आणि लोकसंग्रह करत, कठोर परिश्रम करणारं विद्या हे महाराष्ट्नचं लाडकं व्यक्तिमत्त्व आहे. अशा या विद्याच्या जागी हा `संवाद' लिहिताना माझ्या हाताला किंचित् कंप जाणवत होता. मनावर बराच ताण होता. आपल्याला हे जमेल? पेलवेल? निभावता येईल? असं प्रश्नांंचं मोहोळ माझ्याभोवती उठलं होतं. परंतु माझं एक तसं बरं आहे. मला थोर थोर माणसांच्या हिमालयाएवढ्या कामाविषयी नितांत आदर असला तरी दडपून जाऊन मिटायला होत नाही. कारण राजहंसाची चाल डौलदार असली म्हणून इतरांनी चालणंच सोडायचं का? याचं उत्तर नाही असावं. हा विचार त्यामागे असतो. शिवाय ङशीं ींर्हेीीरपव षश्रेुशीी लश्रेेा ही स्त्री चळवळीची शिकवणही माझ्या मदतीला धावून आली, मी शांतावले आणि आता निर्धास्तपणे लिहू शकते आहे.
डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी ही आदर्श कार्यकर्त्याची त्रिसूत्री विद्यामध्ये आहे. तिच्याइतकी मी कार्यकर्ता संपादक होऊ शकणार नाही ही माझी मर्यादा मला आपल्या कानावर घालायची आहे. स्वभावत: मी एकांतप्रिय आहे. मात्र मी सामाजिक बांधिलकी मानते. परिस्थितीनुरूप मी जमेल तसं सामाजिक कामात सहभागी होत असते. आपणहून स्वीकारलेली ही संपादकपदाची धुरा मी आनंदानं सांभाळण्याचा मन:पूर्वक प्रयत्न करीन हे प्रामाणिक आश्वासन मी आपल्याला देते आहे.
थोर विद्याताइंर्ना `ए विद्या' असं ही कशी म्हणू धजावते? ही उद्धट आहे का? असे प्रश्न आपल्या मनात आले का? तर मग वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचा एक किस्सा मी तुम्हाला सांगते. एकदा आम्ही नारी समता मंचच्या सर्व मित्र-मैत्रिणी बैठकीत काहीतरी चर्चा करत होतो. विद्यापेक्षा आम्ही सर्व वयाने लहान. तेव्हा विद्या चर्चा करताना म्हणाली, ``आपण समतेविषयी, बिन उतरंडीच्या व्यवस्थेविषयी बोलतो आहोत तर त्यासाठीचं एक पाऊल म्हणून मी वयानं तुम्हा सर्वांपेक्षा ज्येष्ठ असले तरी सर्वांनी मला `ए विद्या' म्हणावं. यामुळे निर्णय घेताना, बोलताना तुम्हाला माझ्या वयाचं दडपण येणार नाही, असं मला वाटतं.''
विद्याच्या या मनापासून केलेल्या विनंतीमुळे मी तिला लगेच `ए विद्या' म्हणायला सुरुवात केली. या संवादाच्या निमित्तानं माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांना आणि वाचकांनाही मला अशी विनंती करावीशी वाटते की मी साठ वर्षांची असले तरी त्यांनी मला `ए गीताली' म्हणावं.
`संवाद'मधून तुमचं विद्याबरोबर जुळलेलं मैत्र तुटू नये तर उलट त्याला जास्त अवकाश मिळावा या भावनेनं मी संवादची ही जागा घेतली आहे हे मला तुम्हांला मनापासून सांगायचं आहे. संवादची ही जागा घेणं म्हणजे दर महिन्याच्या अंकाची पूर्ण जबाबदारी घेणं असा आहे. दर अंकाची दैनंदिन जबाबदारी, ताण आणि त्यासाठी लागणारा विद्याचा वेळ आणि श्रम वाचावेत ही त्यामागची इच्छा आहे. मग आपला वाचलेला वेळ, शक्ती विद्या इतर विधायक कार्यासाठी वापरू शकेल. त्यातून साऱ्याजणीला काहीतरी छान, सकस लेखनही ती देऊ शकेल असाही हेतू त्यात आहे. अर्थात् याची जबाबदारी, ओझं मात्र तिच्यावर नसेल. स्वान्त सुखाय, रमत गमत, मस्त निरामय आयुष्य विद्याला जगता यावं अशी माझी फार इच्छा आहे. कारण आजवर तिनं खूप सोसलं आहे, श्रम केले आहेत. जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. संपादकपदाची ही जबाबदारी निभावताना मला भरपूर कष्ट करावे लागणार, ताण सोसावे लागणार, पण `वाढीच्या वेणा' असणार आणि त्या सुसह्य होण्यासाठी आपल्या स्नेहाचा मदतीचा हात हवा आहे.
७ ऑगस्टच्या प्रसन्न संध्याकाळी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात `साऱ्याजणी'चा विसावा वाढदिवस दिमाखात साजरा झाला. स्वाईन फ्ल्यूच्या भयाला न जुमानता आपले गावोगावचे प्रतिनिधी, वाचक, हितचिंतक, लेखक, जाहिरातदार आणि इतर रसिक मंडळींनी मृणालजींच्या ऋजू भाषणाचा आणि मल्लिका साराभाइंर्च्या अनोख्या नृत्याविष्काराचा रसिला आस्वाद घेतला. कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत आपल्याला दिवाळी अंकात वाचायला मिळेल. याच दिवशी सकाळी `आयबीएन लोकमत'वर `मिळून साऱ्याजणी'च्या वीस वर्षांच्या वाटचाली संदर्भात `जय महाराष्ट्न्'मध्ये माझी मुलाखत झाली होती. कार्यक्रमाच्या जागी कुणीतरी थोडंसं गमतीनं, थोडंसं हेटाळणीच्या स्वरानं म्हणालं, ``पहा, अगदी पहिल्या दिवसापासून हिनं माध्यमांशी संधान जोडलं.'' एक मिनिट मला गोंधळल्यासारखं झालं, वाईट वाटलं. पण नंतर मला माझा नेहमीचा विचार आठवला. आमच्या पूर्वीच्या आणि आमच्या पिढीतसुद्धा प्रसिद्धी पराङ्मुखतेचा खूप बडेजाव माजवला गेला होता. माणसाची प्रसिद्धी नको, कामाची हवी. तिला/त्याला जरासुद्धा प्रसिद्धीची हाव नाही. अगदी निरपेक्षपणे काम करत असते/असतो इ. इ. परंतु असं म्हटलं तरी कुठल्याही कामाला कर्ता/कर्ती असतोच ना! त्यामुळे जास्त काम करणाऱ्या प्रमुखाचं नाव झळकतच असतं. `अगं, अगं म्हशी, मला कुठे नेशी?' अशी काहीशी वृत्ती आपल्या अशा प्रकारच्या चुकीच्या संस्कारांमुळे आपल्यात निर्माण होऊ शकते, असं मला वाटतं. तुम्हांलाही तसं वाटतं का? अर्थात् प्रसिद्धीची झिंग, व्यसन, चटक केव्हा कशी लागेल याचा नेम नसतो हेही खरं आहे. काही बाबतीत दारूच्या व्यसनाशी याची तुलना होऊ शकते असं कधी कधी वाटतं.
एखादी व्यक्ती प्रसिद्धीसाठी काम करते, त्यासाठी पुढे पुढे करते इ. इ. अनेकदा बेजबाबदारपणे, बेधडकपणे म्हटलं जातं. असं म्हणणारे कधी खू%%प सामाजिक काम करणारे असतात, तर कधी अजिबातच सामाजिक काम करणारे नसतात. मला वाटतं, अतिशय सवंगपणे, भडक पद्धतीनं काम न करता श्रेय/प्रसिद्धी लाटणारी माणसं चुकीचंच वागतात. तसं कधी वागू नये. पण इतरांना आपण केलेल्या कष्टांचं/कामांचं कुणी कौतुक केलं, त्याला दाद दिली, प्रसिद्धी दिली तर बरं वाटतं. त्यांचा आत्मसन्मान वाढतो, आत्मविश्वास वाढायला मदत होते आणि मनातून सुखावायला होतं. हे `सुखावलेपण' कळू न देणं अथवा ते नाहीच आहे असं म्हणणं म्हणजे प्रसिद्धी पराङ्मुखता का? आणि मुख्य म्हणजे प्रसिद्धी पराङ्मुखता कशासाठी? याचाही खोलात जाऊन विचार व्हायला हवा.
दांभिकपणा आणि सुसंस्कृतता यामधली रेषा कधी कधी फार धूसर होताना दिसते. आपल्या एखाद्या भावनेनं, कृतीनं दुसरा माणूस दुखावला जाईल ही संवेदना जागी ठेवत ती भावना व्यक्त न करणं अथवा कृती न करणं म्हणजे सुसंस्कृतता. याउलट आपला अहंकार जपण्यासाठी आपली एखादी भावना लपवणं अथवा खोटारडेपणानं व्यक्त करणं म्हणजे दांभिकपणा असं मला वाटतं.
मला स्वत:ला मी केलेल्या कामाबद्दल कुणी कौतुक केलं, छान दाद दिली, त्यातून प्रसिद्धी मिळाली तर सुखावायला होतं. त्यातून अधिक काम करण्यासाठी हुरूपही येतो. ही माझी सुखावायची भावना वाजवी आहे की अवाजवी? प्रसिद्धी किती, कशी आणि केव्हा हवीशी वाटली तर बरोबर हे कुणी ठरवायचं आणि कसं ठरवायचं हा मोठा पेच आहे. कारण हे सर्व सापेक्ष आहे. आपण म्हणतो तेच खरं आणि बरोबर असं न मानता दुसऱ्याच्या भावनांचाही आदर ठेवला, त्या खऱ्या आहेत असं मानलं तर हा पेच सुटू शकतो. नाही का?
माझ्या या लिहिण्याला उगीच `बचावाचा पवित्रा' कशाला घेत आहे? समर्थनं कशाला करते आहे? असाही आक्षेपाचा सूर निघू शकतो. हा धोका पत्करूनही मी हे सर्व लिहिलं आहे; कारण सुरुवातीपासून आपलं नातं छान मोकळं-ढाकळं आणि आरस्पानी असावं अशी माझी इच्छा आहे.
विद्याच्या आणि माझ्या गेल्या २५-३० वर्षांच्या नात्यात एकमेकींविषयी पिचत हेव्याची भावना चमकून गेली असेल. परंतु तिथे मत्सराला अजिबात थारा नव्हता आणि नसेल. विद्याचं काम माझ्या कामाहून खू%%प मोठ्ठं असलं आणि त्याविषयी मला आदर असला तरी पिचत वेळ आली तर मी विद्या, हे तुझं चुकतं आहे असं म्हणू शकते. यात विद्याचा जसा मोठेपणा आहे तसा माझाही आंधळेपणाने ``बाबा वाक्यं प्रमाणम्' अशी वृत्ती न ठेवण्याचा भाग आहे हे मला आवर्जून सांगायचं आहे. कारण या वृत्तीनं दोन्ही व्यक्ती खुरटण्याचा धोका असतो हे ध्यानात ठेवायला हवं.
मिळून साऱ्याजणीसारख्या मासिकाच्या संपादकपदाचं हे शिवधनुष्य उचललं तर आहे पण ते पेलवणं माझ्या प्रयत्नांवर जसं अवलंबून आहे तसंच आपल्या सहकार्यावर, प्रतिसादावरही अवलंबून आहे असं मला अगदी मनापासून सांगायचं आहे. विद्याचा हात पाठीवर आहे याचा खू%%प दिलासा आहे.
या माझ्या पहिल्या-वहिल्या संवादावर चांगली-वाईट सर्व प्रकारची टिप्पणी अगदी मोकळेपणानं जरूर जरूर करा.
प्रतिसादाची वाट बघते आहे.


माझे थोडे मनोगत
"[विद्या बाळ]च्या या अमोल योगदानामुळे `मिळून साऱ्याजणी' आज नावारूपाला आलं आहे" असे गीतालींनी सप्टेंबरच्या ह्या "संवादा"त लिहिले आहे. त्या वाक्याच्या अनुषंगाने मी दोनतीन गोष्टी लिहिते.
"योगदान", आणि "योगदान"सारखे "दिग्गज", "वेध घेणारे लिखाण", "हे मी अधोरेखित करतो/करते" इत्यादी काही काही "जरा भारदस्त" भासणारे शब्द आणि शब्दसमुच्चय गेली काही वर्षे साहित्यसमीक्षकांच्या आणि इतर लेखकांच्या लिखाणात अधिकाधिक प्रमाणात रूढ होत असल्याचे दिसत आहे. वास्तविक त्यांपैकी जवळजवळ सगळ्या शब्दांना/शब्दसमुच्चयांना आपल्याभोवती "भारदस्तपणा"चे वलय नसणारे प्रतिशब्द रोजच्या मराठीत उपलब्ध आहेत.
"योगदान" ह्या शब्दाबाबतची गंमत म्हणजे त्या शब्दाचे संस्कृतमधले दोन (आणि दोनच) अर्थ आहेत ते असे: (१) "योगां"बाबतचे प्रवचन, आणि (२) फसवे दान. (ह्या विधानाबद्दल कोणा वाचकांना शंका वाटली तर त्यांनी वामन शिवराम आपटेंचा संस्कृत-इंगजी शब्दकोश पहावा.)
उलट "योगदाना"ऐवजी "काम", "भरीव काम", "हातभार", "महत्त्वाचा हातभार", "कार्य" हे शब्द रोजच्या मराठीत औचित्यानुसार वापरण्याकरता उपलब्ध आहेत.
...........................................................................
"[विद्या बाळ]च्या या अमोल योगदानामुळे `मिळून साऱ्याजणी' आज नावारूपाला आलं आहे" ह्या विधानाच्या अनुषंगानेच दुसरी एक गोष्टही मी इथे लिहिते:
गेल्या काही वर्षातल्या मराठी लिखाणात "आलं आहे", "झालं आहे", "आम्ही करायचो", "तो फळं विकतो", "त्यानं काम केलं" अशांसारखी बोली भाषेतली रूपे अधिकाधिक रूढ होत आहेत. "आले आहे", "झाले आहे", "आम्ही करत असू", "तो फळे विकतो", "त्याने काम केले" असे लिहिण्याऐवजी त्या शब्दसमुच्चयांची बोली रूपे लिखाणात वापरल्याने लिखाण जरा अधिक "प्रभावी" होते असा समज ह्या "नव्या" लिखाणाच्या पाठीशी दिसतो. (ना. सी. फडकेंनी लघुनिबंध लिहायला सुरवात केली तेव्हा प्रथम काही काळ ते "आले आहे", "झाले आहे" असे त्यांच्या लघुनिबंधांमधे लिहीत असत; नंतरच्या त्यांच्या लघुनिबंधांमधे त्यांनी "आलं आहे", "झालं आहे" वगैरे शब्दसमुच्चयांचा प्रकार सुरू केला. उलट अनंत काणेकरांनी तो बोलभाषाप्रकार त्यांच्या लघुनिबंधांमधे कधीही वापरला नाही. तसे त्यांनी न करण्याने त्यांचे लघुनिबंध कणभरही कमी सरस ठरलले नाहीत. उलट त्या बाबतीत त्यांचे लघुनिबंध फडकेंच्या लघुनिबंधांपेक्षा कमी कृत्रिम भासतात.)
................................................................................
कोणतेही बेगडी रूप नसलेले, व्याकरणशु्द्ध, सु्संगत, आणि सुवाच्य मराठी लेखन ही गोष्ट अतिशयोक्तीविना दिवसेंदिवस काहीशी दुर्मिळ दिसत आहे. आणखीच खेदाची आणि अगदी अविश्वसनीय बाब अशी की कितीतरी मराठी विषयाच्या प्राध्यापकांचे लिखाणही त्या चार बाबतींपैकी कोणत्यातरी एका, दोन, तीन, किंवा काही वेळा चारही बाबतीत सदोष दिसत असते. (ह्या परिस्थितीचे कारण मला अजिबात उमजत नाही.)
http://www.kodes.com/category
http://www.kodes.com/category/sansar-salvo/
http://www.kodes.com/category/emre-baransel/
http://www.kodes.com/category/kolera/
http://www.kodes.com/category/fuchs/
http://www.kodes.com/category/hiphop-videolari/
http://www.kodes.com/category/kadikoy-acil/
http://www.kodes.com/category/sagopa-kajmer/
http://www.kodes.com/category/ceza/
http://www.kodes.com/category/cartel/
http://www.kodes.com/category/gekko-g/
http://www.kodes.com/category/ayben/
http://www.kodes.com/category/hip-hop
http://www.kodes.com/category/turkce-rap/
http://www.kodes.com/category/rap/
http://www.kodes.com/category/nesternino/
http://www.kodes.com/category/fuat-ergin/
http://www.kodes.com/category/killa-hakan/
http://www.kodes.com/category/istanbul-attack/
http://www.kodes.com/category/pit10/
http://www.kodes.com/category/patron/
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/
http://www.gekkog.com/
http://www.maskanimasyon.com/
http://www.gekkog.com/category/gekko-g/
http://www.gekkog.com/category/patron
http://www.gekkog.com/category/pit10//
http://www.gekkog.com/category/fuchs/
http://www.gekkog.com/category/kolera/
http://www.gekkog.com/category/hiphop/
http://www.gekkog.com/category/ceza/
http://www.gekkog.com/category/sagopa-kajmer/
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
अलका जोशींचे उत्कृष्ट मनोगत
अलका जोशींचे हे ’मनोगत’ अगदी उत्कृष्ट आहे.