Skip to main content

अथांगतेच्या पलीकडे

- लाटांचं गाणं चालूच होतं- दूरवर लांब निळसर पांढरी किनाररेष - मध्येच गडप होत होती अदृष्टात, म्हणजे समुद्र आणि आकाश एकच वाटत होतं. समुद्र कुठं संपतोय न् आकाश कुठं सुरू होतंय हे कळतच नव्हतं - दोन्ही एकमेकांत मिसळून एकजीव झाल्यागत- ती दोघं एकमेकांसाठीच असल्यागत की ती दोघंही फक्त माझ्यासाठीच होती?

निरभ्र निळयाभोर तृप्त रंगानं डोळे तृप्तावले. नीरव शांतता डोळयांतून आतवर गेली न् पंखांवरपण एक सुखाची शांत लहर संवेदना थरथरली- खूप लांबचा प्रवास - न् एकट्यानं उडायचं एवढं! मी चोच खुपसली पंखात- पिसं हल्लकपणे पसरली, जणू उडायला तत्परच... लाटा न् अवकाश माझी वाट बघत होत्या.
मी मागं वळून पाहिलं -

मागं बरंच जग पसरलेलं - पांढऱ्या शुभ्र पुळणीत मध्ये मऊ खोल खड्ड्यात कासवाची अंडी चमकत होती-
- तर दूर खडकाळ रांगेत माझे सोबती एकमेकांशी जगभरातल्या गप्पा मारत कलकलाट करत भांडत, प्रेम करत न् पिलांना भरवत होते- माणसांप्रमाणे त्यांना पण या गोष्टी करायला खूप मजा वाटत होती.
माणसांची त्यांना भीती वाटत होती पण आता त्यांचं या जगातलं असणं अनिवार्य आहे. ही अपरिहार्यता आम्ही साऱ्यांनीच स्वीकारली होती. पिलं होणं, त्यांना सांभाळणं-उडणं-चारापाणी, घरटं, मोठाल्या पक्ष्यांपासून स्वत:ला वाचवत संघर्ष करणं हे जसं अनिवार्य होतं- जगण्याचा एक भाग तसंच त्या दोन पायांच्या विद्रूप, विकृत मानव प्राण्यांना सहन करणं अपरिहार्य होतं.

मला मात्र पलीकडे जायचं होतं- अथांगतेच्याही पलीकडे - काय बरं असेल तिथे?

स्थलांतर करण्याचा पहिला नियम होता गटप्रमुखानं आदेश देताच सगळयांनी एकत्रित टोेळयांनी एकसाथ उडायला सुरुवात करायची- हवेचा वेग- वाऱ्याची दिशा- दिशांचं भान- न् पंखांची बळकटी हे सगळं भान आम्हाला उपजत होतंच, पण गटाबरोबर उडायचा नियम मात्र उपजत नव्हता. कदाचित स्वत:च्या सुरक्षेसाठी नंतर तो नियम प्रत्येक प्राणिमात्रानं बनवला असेल, पण मला मात्र त्या रांगेतला अकरावा पक्षी व्हायचं नव्हतं, ना मी स्थलांतरित होण्याच्या काळाचा बांधील होऊ इच्छित होतो.

थंड वाऱ्याचे प्रवाह ओसरू जरा जरी लागले तरी लागलीच ते कळायचं- पिसांवरचा ओशट, थंड तवंग सुकायचा- पिसं टोकाला कुरतडल्यासारखी कोरडी होऊ लागायची. पिचत कुणाच्या पिसांचा रंगही पालटायचा. त्याबरोबर घाईघाईनं वर्दळ, कलकलाट, लगबग सुरू व्हायची- साऱ्यांना परतायची प्रचंड घाई- चोची पंखांमध्ये पुन्हा पुन्हा परजून पंखांना साफ केलं जायचं-

पंख फडफडत नुसतं चालतच जायचं- बिचाऱ्या ढगांना बोलता येत नव्हतं हे बरंच म्हणायचं. नाहीतर दिवसभर त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडलं असतं आमच्या टोळक्यानं- पण एक बरं होतं, सगळी जबाबदारी गटप्रमुखावर टाकून मोकळं व्हायचं. कधी उडायचं- कसं - ते सारंच वाऱ्याच्या गतीनुसार, त्रिकोणी-लांब-कोनात राहून उडायचं कधी हे सारं तोच ठरवायचा.

एकटं उडायचं म्हणजेच मोठी जबाबदारी. पंख भारी होऊ लागले- वाटेत पाण्यात किती वेळ तरंगायचं हे सगळेच निर्णय एकट्यावर अवलंबून. जगायचं, उडायचं, पलीकडे जायचं की खचून थकून माघारी यायचं- पंख भिजले की जडशीळ होऊन खाली पडायचं जिथं मारण्यासाठी शार्क- माणसं-न् वर मोठे पक्षी आपल्या थकण्याची न् येण्याची वाट पाहात बसलेले, असं मरण पत्करायचं-सारं आपल्या एकट्यावर आपलं आयुष्य अवलंबून.

जणू स्वतंत्रता माझ्यासारखाच एक पक्षी होता ज्याचा एक पंख जगण्याचा एक पंख मरण्याच्या भयाचा-
मला वाट बघायची नव्हती हवेच्या बदलाची-स्थलांतरित होण्याच्या निसर्गवेळेची -गटाच्या नियमाची- मला पलीकडे जायचं होतं-माझ्याबरोबर कुणी आलं तर माझी ना नव्हती- पण मी मात्र त्यांच्या उडण्याच्या वेळेची वाट पाहात थांबून राहू शकत नव्हतो.

पण पलीकडे जाऊनही मी तिथंच थांबलो असतो का? हा एक प्रश्नच होता. पाखरं काय, आयुष्य काय थांबणं म्हणजे संपणं.

एक माणसांची जात सोडली तर बाकी सगळेच आयुष्य थांबली की मरून संपून जातात. पण माणसं नाहीत. थांबलेली आयुष्यं घेऊनही ती चिवटपणे जगतात.

मध्ये एकदा मी लाटांच्या फेनिल तुऱ्यांवर तरंगत असताना पाहिलं तर थेट माझ्या पिसांसारखेच तलम, हलके, पांढरेशुभ्र कपडे घालून एक तरुणी हसत पुळणीवरून तरंगत चाललेली- खरं तर ती अगदी प्रचंड आनंदात हसत, पळत, उड्या मारत चाललेली - पण तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर, देहात सामावत नव्हता. न् तीही जणू काही तरंगतच चाललेली माझ्यासारखी.

तिच्यामागोमाग कदाचित तिचा प्रियकरही पळत चाललेला. हा खेळ तर आमच्यातही खेळला जातो. खूप दिवस चाललेला हा खेळ. मधूनच ती दोघं खडकावर बसायची. चोची नसल्यामुळे तो सहजच तिचं चुंुबन घेऊ शकायचा. न् ती दोघं आली न् एकमेकांवर प्रेम करू लागली, की आम्हांला सर्वांना आनंदी न् सुरक्षित वाटायचं.

आता प्रेम ते करायचे यात आम्हांला सुरक्षित न् आनंदी वाटायचं काय कारण? असं कुणाला पण वाटेल. पण प्रेमामुळेच हे जग सुरक्षित राहणार आहे हे आम्हाला पक्कं माहीत होतं. आम्हांला ते यामुळे आमच्यातले वाटायचे. निसर्गाचा अधिनियम ते तत्परतेनं पाळत होते हे फारच चांगलं होतं.

पण हे फार दिवस चाललं नाही. का कोण जाणे एकटीच ती त्यादिवशी- तिच्या कोमल मऊ गालांवरून अश्रू वाहत होते. ती वारंवार डोळे पुसत होती.

आज तो तिच्याबरोबर नव्हता. मलाच नव्हे माझ्या सोबत्यांनाही त्याचा राग आलेला. प्रणयाराधनाच्या काळात आपल्या सखीला एकटं सोडायचं नसतं- भांडायचं नसतं ह्या साध्या गोष्टी त्याला कळत नव्हत्या. किती विनवण्या, किती प्रयत्न करावे लागतात आणि हे लोक-

खडकावर उभं राहून ती माझ्या पंखांसारखे शुभ्र, तलम कागद वाऱ्यावर उडवून देऊ लागली. एकेक तिचे केस भुरभुर उडत होते- डोळे जखमी पाखराप्रमाणे होते- कागदच उडत नव्हते तर त्याबरोबर शब्द, त्या दोघांमधले- नातंही त्या दोघांमधलं उडून चाललेलं आणि तीव्रतेनं माझ्या मनात इच्छा निर्माण झाली, आपणही एकटं उडत पलीकडं जावं- पूर्वी बगळे, करकोचे असे पक्षी बाळं आणून एकेका घरात देत म्हणत. मला वाटलं हे उडून चाललेले शब्द -हे उडून चाललेलं लोभस सुंदर नातं चोचीत पकडून पुन्हा तिला आणून द्यावं. पण ते शक्य नव्हतं. तिला कदाचित तो अख्खा माणूसच हवा असेल. तो कुठून उचलून आणणार होतो मी? आणि पकडून आणलेली- उचलून आणलेली नाती टिकत नाहीत. पिकलेलं फळ जसं हळूहळू सडत जातं तशी ती नातीही खराब होऊन सडून, किडून, गळून जातात.

मी एकवार नि:श्वास टाकून सोबत्यांकडे पाहिलं. ते आपापल्या कामात मग्न. वाऱ्याच्या झुळका प्रसन्न न् गार होत्या. किरमिजी, सावळया आभाळात शेंदरी, अबोली ढगांचा फुलकेदार ताटवा फुललेला- न् भरपूर श्वास छातीभर घेऊन मी जोरजोरात पंख फडफडवून वर झेप घेतली.

-ओळखीचं जग-जमीन कधीच मागं पडलेली- सूर्याचा गोल गरगरीत शेंदरी गोळा कोवळा मऊ- एखाद्या पिकलेल्या तेजस्वी रसरशीत फळासारखा- चोच खुपसून आतला मऊ तेजाळ गर खावासा वाटावा असा-
खाली लाटांचा धीरगंभीर रौद्र आवाज चाललेला- एक लहानशी होडी हेलकावे घेत चाललेली- न् त्याच्या नाजूक डोलकाठीवर एक चिमणं पाखरू गात बसलेलं- होडीतला माणूसही गात असावा एखादं गाणं-
पण ही माणसं फार विचित्र, विक्षिप्त. भीती वाटली एकाकीपणाची की ती गाणं म्हणतात. किंवा भाकरी, पैसे असलं काहीतरी मिळावं यासाठी ती गाणी म्हणतात. फारच विचित्र. मजेत आहोत- आनंदात आहोत म्हणून गाणं म्हणायचं. समुद्राच्या लाटा दाद देतात म्हणून तान छेडायची असते असे काही आमचे संकेत त्यांच्या गावीही नाही.

भरगच्च मोठा ढगांचा कळप समोर दिसला की भय वाटायचं - कारण अशा भटक्या ढगांच्या कळपात शिरलं की काहीच दिसत नाही. मग एक तीव्र साद घालायची - प्रतिध्वनीचा नाद संपायच्या आत तो ढगांचा कळप ओलांडून पलीकडे जायचं असतं.

मी पुढंपुढंच चाललेलो -

ना अवकाश संपत होतं ना क्षितिज जवळ येत होतं- `आलं आपलं ठिकाण' असा नि:श्वास टाकून थांबता येेत नव्हतं- सखे, सोबती घरटं काहीही नव्हतं मिळणार, दिसणार- आकाशात घरटी फक्त स्वप्नांची बांधता येतात न् किर्रर्र काळया चांदण रात्री आठवणींची घरटी- दोन्ही घरट्यात म्हटलं तर सारंच असतंय म्हटलं तर काहीच नसतंय.

दूरवर निसर्गानं लिहिलेल्या रेषेसारखा एक हिरवा डोंगराचा सुळका - पूर्ण अथांग समुद्रात तो हिरवागार सुळका फार सुंदर दिसत होता. ते ठिकाण दिसताच पंख जड झाले, दुखू लागले. नेटानं शरीराला इच्छा न् हवा पुढं लोटत होती तरी आता विश्रांतिस्थळ दिसताच थकल्याची जाणीव तीव्र झाली न् मी खाली झेपावलो.

पंख फडफडवत मी मिटून घेतले न् शोधक नजरेनं सभोवार सर्वत्र पाहून घेतलं. आजूबाजूला निळंशार पाणी- हिरव्या झाडांवर शेवाळलेल्या अजस्रअथांगतेच्या पलीकडे खडकावर आपटणाऱ्या लाटा मी बसलेल्या सुळक्याची जागा उंच, निमुळती, हिरव्यागार झुडपात लपलेल्या खडकांची होती-

हेच का अथांगतेचं शेवटचं टोक? गंतव्य ठिकाण इतकं सरळ सोपं न् जवळच-नाही-कारण क्षितिज तर अजून दूरच दिसत होतं- हे क्षितिज, ही रेषा पार केल्यावर मला नेमकं काय दिसणार आहे? ते आकाशच असेल? की पुन्हा मानवप्राण्यांनीच गजबजलेली नगरी असेल?

घरटं बांधणं एवढाच या प्रवासाचा हेतू नक्कीच नव्हता.

एक प्रचंड फडफडाट न् तीव्र कर्कश शीळ ऐकू आली. मी सावधपणे पंख सावरले. तिखट, पिंगट, लालसर डोळयांचा एक प्रचंड पक्षी आपले लांब पंख फडफडवत माझ्यासमोर बसून मला न्याहाळत होता. त्याची नजर स्पष्ट, तीक्ष्ण, कठोर न् क्रूर होती- कदाचित नुकती पिलं दिलेली आक्रमक मादी असावी. माझा अंदाज खराच होता. पलीकडून एक कलकलाट ऐकू आला न् पटकन् तिनं मान वळवली.

तिची पिलं खाली खबदाडीत असावी- आणि एवढा कलकलाट ज्याअर्थी ते करताहेत त्या अर्थी नक्कीच एखादा साप-अजगर कोणीतरी तिथं आला असणार - तत्काळ त्या पक्षिणीनं माझ्यावरून तुच्छतेनं नजर काढून घेतली. पंख पसरून झपाट्यानं ती सुळक्याच्या खालच्या टोकाला झेपावत गेली. तिचे ते प्रचंड पंख - तो आवाज - त्या फडफडण्यानं न् उडण्यानं हवेचे झोत आणखी वेगानं हललेले की मी बसलेल्या झाडाची फांदीही हलू लागलेली-

खरं तर कुठल्याही माझ्या आकाराच्या पक्ष्यानं तिथून तत्काळ उडून दूर जाण्याचाच निर्णय घेतला असता.
पण ती हिरवीगार जमीन-तो स्पर्श प्रचंड आश्वासक, उबदार होता- जीवनदायी पातळ पांढरट पापुद््र्याच्या अंड्यात- गर्भावस्थेत जेवढं सुरक्षित वाटतं तेवढाच सुरक्षित स्पर्श होता त्या जमिनीचा.
पुन्हा एकवार मला मी जन्म घेतला असं वाटलेलं. कारण त्या पक्षिणीच्या भयाऐवजी कुतूहल न् उत्सुकताच वाटलेली मला-तिची. समजा पिलांचं खाद्य म्हणून तिनं मला उचललं तर अथांगतेच्या शेवटाचा अर्थ मला कसा कळणार होता?

मग मला फक्त स्वत:च्या मऊ मांसल शरीराचे लचके तोडले जातायत-न् गरम रक्त शोषणाऱ्या - मऊ मांस निवांतपणेच तोडून खाणाऱ्या छोट्या तीक्ष्ण चोची- न् विझत चाललेल्या डोळयांमध्ये त्या क्रूर, कठोर पिंगट डोळयांचं प्रतिबिंब पडलेलं ह्याच तीव्र वेदनादायी अनुभवाचं ज्ञान मिळेल फक्त. म्हणजे मरणाचं साक्षात् ज्ञान होईल. न् जगलो तर अथांगतेच्या पलीकडच्या अर्थाचं ज्ञान होईल. दोन्हीपैकी एक नक्कीच मिळेल. कुठलं महत्त्वाचं हे मात्र मी ठरवू शकणार नव्हतो. म्हणजे त्या अजस्र पक्षिणीच्या पिलांची भूक मिटवणं हे महत्त्वाचं की निराकार विधात्याच्या न दिसणाऱ्या अथांगतेचं मर्म शोधणं जास्त महत्त्वाचं? आणि ही प्राथमिकता न् महत्त्व कोण ठरवतं? कोण ठरवणार? पक्षिणीच्या दृष्टीनं मी खाद्य होतो. माझ्या अस्तित्वाचा तेवढाच अर्थ होता तिच्या न् पिलांच्या दृष्टीनं, तर माझ्या दृष्टीनं क्षितिजरेषेच्या पलीकडे स्थलांतर करून शोधून काढायचं अथांगतेचं शेवटचं टोक- पलीकडचा दुसरा किनारा- दुसरं अवकाश- आकाशाचं हे प्रचंड अंडं- त्याचे पापुद्रे तोडत पुन्हा नवीन विश्वात जन्म घ्यायचा हे मला महत्त्वाचं होतं.

की पलीकडचं काहीच नसेल. एक निरर्थक पोकळी असेल न् या किनाऱ्यावर जसे शब्द हवेत उडवणारी मुलगी होती तसंच त्याही किनाऱ्यावर एखादा छोटा मानवाचा पोर शब्दांचे रंगीत फुगे तोंडातून फुंकर मारत हवेत उडवून फोडत असेल?

मग काय निरर्थकच ठरणार होता एवढा प्रवास.

आपण किमान एका अंड्याचं कवच फोडलं- आपण किमान उडलो अवकाशात शोध घेत एवढंच का शेवटी अर्थवाही? आणि मग या इच्छांचं काय करायचं? प्रश्नांचं काय करायचं? या क्षितिजाच्या पलीकडे जाण्याच्या वेड्या आंधळया पिपासेचं काय करायचं?

स्थलांतर करून का होईना जगायचंय् ही एकच सुरक्षेची गोष्ट माझे सोबती करत होते.
मी जरा वेगळं पाहिलं - आता या वेगळेपणाचा शेवट काय होईल तो होईल. उत्तर काय येईल माहीत नाही. एक वेड- झपाटलेपण-फक्त माणसातच असतं असं नव्हेच.

मी पुढल्या हिरव्यागार झुडपात चोच खुपसली- एक निरुपद्रवी छोटा किडा माझ्या चोचीत होता. तर काही अंतरावर खालच्या ढोलीत चिमण्या चोची वासल्या जात होत्या न् त्या पक्षिणीच्या पिंगट तीक्ष्ण डोळयांत माझं छोटंसं मऊ शरीर होतं.

क्षितिजरेषा दिसेनाशी झालेली त्या पक्षिणीहून प्रचंड मोठ्या भुकेनं त्या किड्याला मग मला गिळून टाकलं.
आम्ही एकमेकांना खाऊन टाकत होतो न् भूक आम्हांला खात होती- आता मला अथांगतेचा थांग काहीसा लागलेला- क्षितिजाच्या पलीकडे न जाता मला नवीन विश्वाची सुरुवात सापडली - जे सत्य, जे ज्ञान भुकेपासून सुरू होतं न् भुकेपर्यंत संपतं हेच नवं जग होतं ज्ञानाचं. एकदा तुम्हाला सत्य दिसलं- कळून चुकलं की मग तुम्ही कुठंही पोचलात तरी तो अथांगतेचाच शेवट असतो.

आणि सगळयात महत्त्वाचं म्हणजे शेवटाकडे पोचल्यावर परत तुम्ही केलेला प्रवास- पार करून आलेलं जग नवं दिसायला लागतं- अनोळखी वाटायला लागतं- पुन्हा परत सुरुवातीकडे जावंसं वाटतं- परत सगळं तपासायला हवं असं वाटतं- आणि मला तो प्रवास, येणं जाणं-सगळं निरर्थ वाटेनासं झालं. अथांगतेच्या पलीकडे न जाताही मी सर्वत्र गेलो आणि माझ्या आत परतलो तिथंही एक अथांग क्षितिजरेषा पसरलेली जिवंत अस्तित्वाची!

In this modern and

In this modern and fashionable society, people are pursuing for moncler cool, unique, stylish and innovative. Whether it is
moncler jackets or fashion accessories all means a lot for modern society of today. Same is the case with trendy looking
moncler outlet. When these are moncler online, the excitement just gets doubled. Most chic looking moncler coats are in fashion now. These are one of the favorite fashion accessories for men and women long time ago. If you have not yet tried
Nike tn, it's time to own one and feel the difference it can make to your personality. These are just brilliant and fabulous
Nike shox. They are most iconic and can provide you with a new feeling and enhance confidence. The quality of
ugg boots sale is just superior to what you have dreamt of. Today owning a new and trendy looking discount uggs are not only meant for the wealthy people. These are now made luxurious and affordable cheap boots to reach out to every budget and range. You can just enjoy them by ordering chaussures nike online where you get the complete satisfaction and genuine quality at best possible rates. The finish, quality and designs you get from air max are really astonishing and you will love them all. Different styles and designs of
Nike air max are now available to make your wrist beautiful.

bcc

Oakland Mayor Office 2010 Jean Quan and Microsoft Office 2010 other city officials microsoft 2010 were hoping there would Office Professional 2010 be no reprise of MS Office 2010 the violence that Microsoft Office 2010 Download erupted last week Microsoft Office 2007 when police moved Office 2007 in to raze the MS Office 2007 Occupy Oakland Office 2007 encampment.

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!