रियाच्या शाळेतून अत्यावश्यक कामासाठी फोन आला आहे असा निरोप आला, तेव्हा रजूचं `पॉवर प्रेझेंटेशन' अगदी नुकतंच सुरू झालेलं होतं. मोबाईल `सायलेंट' मोडवर टाकून, लॅपटॉप पुढ्यात ठेवून रजू आपल्या दोन्ही बाजूला बसलेल्या अधिकाऱ्यांना तिचं नवं पॅकेज सादर करत होती. मोबाईलवरचा दिवा उघडमीट करून आपलं लक्ष वेधायला बघतोय हे तिला जाणवलं होतं पण तिनं त्याची दखल घेतली नव्हती. अजून ऑफिसच्या दिवसाचा पूर्वार्धसुद्धा संपला नव्हता. एवढ्यात कशाला कोणाचा फोन यायला बसलाय?
गोकर्ण तर गावातही नाही. सकाळीच लोणावळयाला गेलाय. दोन दिवसांच्या डीलर्स कॉन्फरन्ससाठी. रियाला रोजच्यासारखं शाळेच्या रिक्षामध्ये बसवून दिलंय. निघताना ती कुरकुरत होती. हे दुखतंय..ते दुखतंय.... वगैरे. पण शाळेची वेळ जवळ आली की पठ्ठीचं काही ना काही दुखायला लागतं, एक चॉकलेट हातावर जास्त ठेवलं की तेवढ्यापुरतं ते दुखणं थांबतं. हे रोजचंच. तसंच आजही. सकाळी ९ ते ४ शाळा. शाळा सुटली की सांभाळणाऱ्या बाई तिला घरी घेऊन जाणार. दूध देणार, खायला लावणार, होमवर्क करून घेणार आणि तिच्या रोजच्या खेळण्याच्या ग्राउण्डवर सोडून स्वत: घरी जाणार. मग ऑफिसमधून घरी जाताना रजूनं किंवा गोकर्णनं तिला तिथून घ्यायचं. अशी सगळी `सर्कल्स' शिस्तीत, जिथल्या तिथे बसवलेली असताना आपल्याला फोन करायची पाळी कशाला कोणावर येणारे?
रजू निग्रहाने आपल्या नियोजित बोलण्यावर लक्ष केंद्रित करत्येय, पडद्यावर येणारी चित्रं-आकडे ह्यांना चलाखीने गुंफत्येय तोवर शिपायानं अदबीनं जवळ येऊन हलकेच एक चिठ्ठी तिच्याकडे सरकवली. तेव्हा तिला थांबणं भाग पडलं.
``तुमच्या मुलीच्या शाळेतून फोन आहे. अर्जण्ट काम आहे म्हणतात, बोलायला आवडेल?''
प्रेझेंटेशन सुरू असताना आत कोणताही फोन द्यायचा नाही अशी सक्त ताकीद दिली असल्याने ऑपरेटर साळगावकरांनी चिठ्ठी धाडली होती. ती वाचली आणि रजूची चर्या बदलली. सभेची परवानगी घेऊन आणि पुढच्या काही मिनिटांसाठी आपल्या ज्युनियरकडे सूत्रं देऊन ती ओशाळवाण्या चेहऱ्यानं कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडली.
टेलिफोनवर रियाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सांगायला लागल्या, रियाला खूप ताप आलाय गेला तासभर वाढतोय. आम्ही तिला सुखरूप घरी नेऊन सोडतो. तुम्ही घरी या किंवा तिथली काहीतरी पर्यायी व्यवस्था करा. हॅव ए गुड डे, मॅम!
आता कसला गुड डे कर्माचा? रजूनं डोक्यालाच हात लावला. आता घरी कोणी असणार नव्हतं. तिला घरी जाणं शक्य नव्हतं. भरवशाचे शेजारी-पाजारी नव्हते. ऑफिसमधला आजचा दिवस खूपच महत्त्वाचा होता. गेले कित्येक दिवस राबून बनवलेलं तिचं नवं पॅकेज आज तिला दोनतीन महत्त्वाच्या गटांसमोर सादर करायचं होतं. सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात उद्योगधंद्यांनी कसं तगावं हे दाखवणारं सॉफ्टवेअर असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये इतक्या टक्क्यांनी कपात केली तर पुढच्या पाच वर्षांचं आर्थिक चित्र हे असेल. उलट कर्मचारी तेवढेच ठेवून त्यांच्या पगारात इतक्या टक्क्यांनी कपात केली तर त्याचे हे हे परिणाम होतील. तेव्हा ह्या गटातल्या उद्योगधंद्यांनी हा पर्याय स्वीकारावा, तर अमुक इतक्या आर्थिक उलाढालीच्या पुढच्या उद्योगधंद्यांनी ही वाट चोखाळावी वगैरे वगैरे.
ह्या सॉफ्टवेअर बनवण्याच्या आठ जणांच्या टीमची लीडर रजू होती. आज जास्तीत जास्त प्रभावी सादरीकरण होणं, त्यातून भावी ग्राहक मिळणं हे तिच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं होतं. नेमका आजच रियाला ताप यावा.... असं कोणतं बरं कर्णपिशाच्च वश असतं ह्या काटर््यांना की जे आईच्या दृष्टीने सर्वाधिक गैरसोयीची, अडचणीची, फरपटीची, कुचंबणेची वेळ त्यांच्या कानात सांगतं आणि तीही पठ्ठी हुकमी आजारपण काढतात? आईची परीक्षा घ्यायला निघाल्यासारखी?
रजूजवळ चरफडत बसण्याइतकाही वेळ नव्हता. लवकरात लवकर आत जाऊन प्रेझेंटेशनची सूत्रं हातात घेणं अगदी अपरिहार्य होतं. यंत्रवत तिनं आईचा टेलिफोन नंबर फिरवला. आई गावातच राहात होती. हक्काने बोलवलं तर सहज घरी जाऊन रियाच्या सोबत थांबण्याएवढी मोकळी होती. मुलीनं जाती-बाहेर-म्हणजे रजूनं गोकर्ण या कानडी माणसाशी लग्न केलं तेव्हापासून तिच्या संसाराला आपल्यालाच मदत करावी लागणार आहे हे मानणारी होती. तरीही पुरतं ऐकून घ्यायच्या अगोदर आईनं प्रश्नांचा भडिमार सुरू केला.
``काय झालं रियाला?''
``ताप आला आहे. चढत चाललाय म्हणे.''
``कधीपासून? कसा? साधाच ताप आहे का?''
``इथे बसून मला काय माहिती, आई?''
``आता नसेल माहिती. पण सकाळी जाणवलं असेलच ना... ती शाळेत जाताना... आधी झोपून उठली असताना..''
``फार काही नाही बाई जाणवलं''
``नाही कसं? तूच लक्ष दिलं नसशील. सदैव वाघ मागे लागलेला तुझ्या. नोकरीशिवाय दुसरं काही सुचतंच नाही जसं काही. नुसती खेळण्यांची आणि कपड्यांची खैरात करणं म्हणजे मुलं वाढवणं असतं का?''
``सकाळी शाळेत जायचं नाही म्हणाली होती खरी. पण तसं ती बया रोजच म्हणते. सवयीने!''
``सवय काय सवय? काहीतरी होत असेल बिचारीला. एवढासा जीव. गळून गेली असेल. कानशिलं तापली असतील. मुलांनी ह्या गोष्टी सांगाव्या लागतात का? अशा कशा ग तुम्ही हल्लीच्या आया?''
``अशाच! मला नाही कळलं. गुन्हा कबूल. पण आता आधी तू नीघ. पटकन घरी जा. मी शक्य तेवढी लवकर घरी पोचायचा प्रयत्न करते. राहिलेली झापाझापी तेव्हा कर.''
``तेव्हा रागवून काय उपयोग? तिकडे ती पोर हालातून गेल्यावर?तुला माहितीये, तुला किंवा संजूला जरा बरं नाहीसं वाटलं की मांडीवर घेऊन बसायची मी. रात्ररात्र. पोरपणात आई जवळ असणं हेच औषध लागू पडतं कित्येकदा. कधी कळणार या गोष्टी तुम्हांला?''
आई पुढेही बोलली असती, पण रजूनं फोन खाली ठेवून दिला. कारण एकतर, आई सगळं नेहमीचंच बोलणार होती आणि दुसरं तेच ते बोलण्यात वाया घालवावा एवढा वेळ आता तिच्यापाशीही नव्हता. तिनं वेळेवर घरी पोचून रियाचा ताबा घ्यायला हवा होता. हे ह्या क्षणी सर्वात महत्त्वाचं होतं. रजू ही किती वाईट आई आहे हे सिद्ध करण्याची ही वेळ नव्हती.
फोन ठेवल्यावर रजू क्षणभर तिथेच घुटमळली. तिनं समोरच्या ग्लासातलं पाणी घटाघटा प्यायलं. ओढणीची पिन चाचपली. केसावरून हात फिरवला आणि ती आत वळणार तेवढ्यात साळगावकर पुटपुटल्या..
``घरी काही प्रॉब्लेम झालाय का मॅडम? मुलीची तब्बेत वगैरे...''
``हं. हाय फीव्हर.''
``बघा! याच्यासाठीच मी डिसीजन घेतला.''
``काय?''
``धाकटं मूल निदान पाच वर्षांचं होईपर्यंत नोकरीच्या वाटेला जायचं नाही. उगाच पैशाच्या मागे लागून पोरांची आबाळ होऊ द्यायची नाही. बँकेत बक्कळ पैसा आहे पण आजारी पोराजवळ आई नाही. काय उपयोग?''
`पैशाच्या मागे लागून' हे शब्द उच्चारताना साळगावकर आपल्याकडे टोकदार कटाक्ष टाकताहेत असं रजूला वाटलं, पण तिनं त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. साळगावकरांचा तो `फेमस डिसीजन' आजवर कंपनीतल्या सगळयांना ऐकवून झालेला होता. हे साहजिकच होतं. कारण तो वीस वर्षांपूर्वीचा होता. शिवाय वीस वर्षांपूर्वी असो नाहीतर आज असो, एका जागी ठिय्या मारून टेलिफोनवरून बोलण्याव्यतिरिक्त फार काही करण्याची त्यांची कुवतही नव्हती आणि महत्त्वाकांक्षाही नव्हती. पूर्वी निदान बोर्डावर हातानं चार प्लग, वायरी खुपसाव्या तरी लागायच्या. आता इलेक्ट्नॅनिक एक्स्चेंज आल्यापासून तेवढंही काम नव्हतं साळगावकरांना. नवीन काही शिकावं, आव्हानं पेलावीत, जबाबदाऱ्या घ्याव्यात अशी आसच नव्हती त्यांच्यात. पैशाच्या मागे लागणं, पोरांची आबाळ ह्या गोष्टी त्यांनी काय कराव्यात?
आपल्या पांढऱ्याशुभ्र केसांमध्ये पेन खोचून त्या एकटक तिच्याकडे बघताहेत तोवर ती कॉन्फरन्स रूममध्ये पोचली रियाची काही आबाळ वगैरे होत नव्हती. ती अणि गोकर्ण, दोघं मिळून भरपूर पगार मिळवत होते. त्यातूनच रियासाठी उत्तमोत्तम खेळणी, सोयीसुविधा, गावातली सर्वात महागडी शाळा, झालंच तर, मदतनीस लोकांचा ताफा अशी सार्वत्रिक रेलचेल होती. एखादा दिवस आला ताप, त्याचं एवढं काय अवडंबर माजवायचं?
रजूनं आत्मविश्वासाने कॉन्फरन्समध्ये पाय टाकला. श्रोतृवर्ग बऱ्यापैकी प्रभावित झालेला दिसत होता. त्यांनी आपलं पॅकेज वाखाणावं, स्वीकारावं, त्याचा प्रसार करावा, कंपनीला मोठा धंदा मिळवून द्यावा यापेक्षा जास्त काय पाहिजे? रजू खुर्चीत बसणार तोच तिच्या ज्युनियरनं खाली वाकून हलकेच तिला विचारलं,
``१०० ना, मॅडम?''
``अंहं. १०२.''
``काय? आपला डेटाबेस १०० पासून सुरू झाला ना, मॅडम? म्हणजे पटावर किमान १०० कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांपासून..''
``हो.''
``मग तु्म्ही १०२ काय म्हणलात?''
``माझ्या मुलीचा ताप----काही नाही. गो अहेड. यु आर डुइंर्ग ए गुड जॉब.''
खरं म्हणजे असं कौतुक तिला स्वत:ला हवं होतं. हे सगळं प्रोग्रॅम पॅकेज तिनं डिझाईन केलं होतं. त्यामागे तिचा अभ्यास होता. मेहनत होती. नेतृत्व होतं. हे पॅकेज क्लिक झालं असतं तर तिच्या करियरमध्ये एकदम मोठी प्रगती होणार होती. तेवढं रियाच्या तब्येतीच्या काळजीचं एक पुसट गालबोट आजच्या दिवसाला नसतं तर---
रजूनं प्रेझेंटेशन रुबाबात पूर्ण केलं. तिचे अधिकारी खूष झाले. सहकारी प्रभावित झाले. टीममध्ये बाकीचे भिडू कृतकृत्य झाले. नंतरच्या प्रश्नोत्तरांमध्येही रजू कुठेही थोडीही कमी पडली नाही. त्यांच्या शक्यता गृहीत धरूनच तिने प्रोग्रॅम बेतला होता. त्यामुळे ती सर्वांच्या शंकांचं उत्तम निरसन करू शकली. मंडळींसाठी खानपान सेवा होती. ती घेण्यापूर्वी मात्र रजू लगबगीनं बाहेर येऊन आईशी फोनवर बोलायला लागली. रिया कधी आली, कशा अवस्थेत आली, आल्यावर काही खाल्लंप्यालं की नाही, औषधं कोणती दिली इ.इ. तसं आईनं सगळं नीट केलं होतं, करत होती, तरी तिच्या आवाजातली खोल नाराजी लपत नव्हती.
``आल्यापासून पोरीचा नाद चालू होता. ममाशी फोनवर बोलायचं. फोन करते. म्हणून''
``मग?''
``मीच नको म्हटलं, वाटलं तुला चालायचं नाही. ऑफिसच्या कामामध्ये असं घरच्यांचं घुसणं..ज्याच्या त्याच्या प्रायॉरिटीज असतात बाई!''
``तसं नाही. रियाची तब्येत हा काही दुर्लक्षिण्याचा विषय नाहीच आहे माझ्यादृष्टीने. पण आजचा दिवस जरा क्रिेटकल होता म्हणून...'' आईनं तिच्या ऑफिसच्या दिवसाचा, त्यातल्या व्यग्रतेचा मुद्दा पूर्णपणे कानाआड टाकला आणि बजावलं,
``सकाळचं झालं ते झालं. संध्याकाळी लवकर ये. उगाच अंत पाहू नकोस लेकीचा. समजलं?''
आईनं, थोडा अधिकारानं, थोडा सवयीनं चढा सूर लावला पण रजूचं खाण्यावरचं मन उडायला तो पुरेसा ठरला. तशी पोटात भूक होती. रियाही घरी, औषधामुळे असेल कदाचित, पण गाढ झोपलेली होती. आई घरी असल्याने तूर्त रियाची काळजी नव्हती. टीममध्ये बाकी सगळे मस्तपैकी ताव मारत होते. पुष्कळ उशिरा ज्युनियरला मॅडमची विमनस्कता जाणवली असावी. ती म्हणाली.
``आर यू ओ.के., मॅडम?''
``हो! परफेक्टली फाईन!''
``तुम्ही काहीच घेत नाही आहात म्हणून म्हटलं!''
``माझी मुलगी बरी नाही गं घरी. आता ताप आलाय खाली,पण अगोदर तरी एकदम इतका का चढला असेल? प्रश्नच आहे ना?''
``ओह...हा बालबच्चोंका झमेला...''
``झमेला कुठला? एकुलती एक पोरगी माझी...''
``तरी टेन्शन देतेच ना? म्हणूनच मी ठरवून ह्याच्यापासून दूर राहिले आहे. माझे पेरेंट्स सारखे सतावत असतात. कधी करणार? कधी करणार? लवकर कर. पण मी पक्कं ठरवलंय. अडकायचं नाही म्हणजे नाही. जी.एम.टू च्या पोस्टला पोचेपर्यंत नो मॅरेज. ....नो इश्यूज...नथिंग!''
जनरल मॅनेजर नं २ या पदावर पोचल्यानंतर तरी घरसंसाराचा, पोराबाळांचा काच कमी कसा होऊ शकतो हे रजूला समजलेलं नव्हतं. ती मनात त्याचा हिशोब लावतेय तोवर ज्युनियर पुन्हा म्हणाली, ``तुम्हांला फारच अडचण असेल तर संध्याकाळचं प्रेझेंटेशन मी देईन, मॅडम. आय थिंक आय क्रॅन...तुमच्याइतकं पॉवरफुल नसलं तरी...''
``संध्याकाळचं म्हणजे..''
``चेंबर ऑफ कॉमर्समध्ये नाही का ठेवलंय? संध्याकाळी ६ वाजता. म्हणजे ते आठपर्यंत नक्कीच चालणार. तिथले लोक तर प्रश्न, शंकांचा भडिमारच करतील--''
``करू देत ना. आपण एकदा त्यांना पटवून देऊ शकलो तर मग इतर कोणालाही पटवून देऊ शकू. म्हणून तर मी एवढी खटपट करून त्यांची डेट मिळवलीय. एकदा त्यांची मान्यता मिळवली की ठिकठिकाणी जाईल आपलं पॅकेज. मग तू बघच आपण कुठल्याकुठे पोचतो ते. मला वाटतं आजची चेंबर ऑफ कॉमर्सची मीटिंग मी चुकवू नये. वाटल्यास उद्या रजा घेईन. रिया बरोबर थांबेन. आईलाही शांत करेन.''
``कोणाची आई, मॅडम?''
``माझी. गोकर्णचे अम्मा-अप्पा हुबळीजवळ एका खेड्यात राहातात. म्हणजे माय इनलॉज. त्यांना आधीच शहरात काही सुधरत नाही. त्यात मी दिवसभर बाहेर असणार. रियाच्या तान्हेपणी वर्षभरासाठी राहायला आले होते आमच्याकडे. ते तीन महिन्यातच परत गेले. आपल्या वर्किंग विमेनची लाईफस्टाईल त्यांना जमत नाही ना.''
बोलण्याच्या नादात आपण फारच घरगुती गप्पांमध्ये शिरलोय हे लक्षात येताच रजू स्वत:च थांबली. आई एवढी शहरी असून आणि `आई' असून उठसूट नाराजी दर्शवत्ये म्हटल्यावर सासू सासऱ्यांकडून फार काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही हे रजूनं पूर्वीच ओळखलं होतं. बघताबघता रियाही दुसरीत जाण्याइतकी मोठी झाली होती. अजून तीनचार वर्षं गेली की पुढचं सगळं सोपंच होतं. निदान तसं मानायला रजूला आवडत होतं. आईला ह्या भ्रमाला टाचणी लावणंही तितकंच आवडत होतं.
``पाचवी-सहावीतच मोठ्या होतात आताच्या मुली. म्हणजे वेगळया प्रकारे त्यांच्यावर लक्ष ठेवणं आलं. पेपरात इतक्या वेड्याविद्र्या गोष्टी वाचतो आपण. तसली विषाची परीक्षा घ्यायला कोण जाईल? ती मधली अडनेडी वर्ष तर फार वाईट! त्या दिवसात आईलाच बघावं लागतं मुलीचं सगळं.'' हे यावर आईचं भाष्य. वरती नेहमीचीच फोडणी!``आता तुम्ही एवढ्या शिकलेल्या, कमावत्या बाया. तुम्हाला या असल्या पुष्कळ गोष्टी का शिकवायच्या आम्ही? तुमचं तुम्हांला कळायला नको?'' वगैरे वगैरे.
लग्न केलं तेव्हा रजू आणि गोकर्ण वयानं, शिक्षणानं, नोकरीतल्या पदानं साधारण सारखेच होते. पगारही आगेमागेच असायचा दोघांचा. पण रजूला दिवस गेले नसताना कंपनीची एक डिव्हिजन एका परदेशी कंपनीशी जोडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आणि पहिल्या संधीला त्या नव्या व्यवस्थापनात गोकर्ण सामावून गेला. कामानिमित्त देशपरदेश फिरू लागला. स्वत:ला सिद्ध करू लागला. चांगल्या बढत्या मिळवू लागला. सुरुवातीला काही काळ रजू सगळया अर्थांनी रियामय झाली. गोकर्णनं सर्वार्थाने करियरला वाहून घेतलं. बाप म्हणून त्याला `हे कळत कसं नाही?' `ते सांगायला हवं का?' वगैरे प्रश्न कोणी उपस्थित केले नाहीत. अगदी आईनंसुद्धा नाहीत. उलट `आई असून एवढंही कळत नाही का?' हा प्रश्न रजूसाठी सदैव दबा धरून बसू लागला. रियाची चाहूल लागल्यापासून तिनं किती गोष्टी, संधी, शक्यता वाऱ्यावर सोडून दिल्या होत्या हे लोकांना कळणं शक्य नव्हतं. आणि आता करियरवर स्वार झालं नाही तर पुढे कधीच होता येणार नाही हे अजून कळल्यावर तिनं चालवलेला आटापिटाही कोणाला कळण्यातला नव्हता. कोणाकोणाला काय काय सांगत बसणार? कशासाठी?
तरी जरा निवांतता मिळाल्यावर तिनं गोकर्णला फोन केला. इथला वृत्तांत सांगायला. त्याला त्याचं काहीच फारसं वाटलेलं दिसलं नाही. उलट म्हणाला,
``साधा ताप असेल ग. जास्त विचार करू नकोस. यू कॉन्संट्न्ेट ऑन युवर प्रोजेक्ट. ओ.के?''
``मी तसाच प्रयत्न करत्येय रे. पण...''
``पण काय? युअर चाईल्ड इज सफरिंग. ठीक आहे. एखाद्या वेळेला होतं असं. वाटेल बरं. तू माझ्यासारखी आऊट ऑफ स्टेशन असतीस तर?''
``नाहीये ना पण. इथेच गावात आहे. अर्ध्याअर्ध्या तासानी फोनवर सगळं ऐकत्येय. पण जाऊ शकत नाही. त्याचा जास्त त्रास होतोय.''
``करून घेणं, न घेणं तुझ्याच हातात आहे रजू. आता तू ऑफिसमध्ये आहेस ना? मग शंभर टक्के तिथलीच राहा. मी बघ. आता लोणावळयात आहे. तर बाकी कशाचा विचार करतोय का? मी दिलेल्या दोन तीन प्रमोशनल स्कीम्स इतक्या आवडल्या आहेत ना आमच्या डीलर्सना....''
आणि नंतर खूप वेळ, आपण दूरदृष्टीने आखलेल्या नव्या योजनांचं कौतुक! रजूच्या नव्या सॉफ्टवेअरचा कुठे विषयसुद्धा नाही. रजूला ही गोष्ट नवीन नव्हती तरीही वाटायची तेवढी ओझरती खंत वाटून गेलीच. आपल्याला नाही जमत हे. आईसारखं नुसतं ``मूल...मूल..'' करत गोंजारत बसणं जमत नाही. गोकर्णसारखं एका मर्यादेनंतर,`कुठलं मूल...कोणाचं मूल...' करत बेफिकीर राहाणंही जमत नाही. आपल्याला काहीच जमत नाही. अगदी कुचकामी आहोत आपण. रजू स्वत:ला दोष देत राहिली. अलीकडे खूपदा असं व्हायचं. ऑफिसमध्ये कामाचा ताण फार झाला, रियाला कोणी नावं ठेवली, तिनं एखाद्या चाचणीत अगदी कमी मार्क मिळवले की रजू एकदम हताश व्हायची. सगळयाचा ठपका स्वत:वर घेऊन स्वत:ला बोल लावत बसायची. त्या वाटेत असताना तिच्या हातून नेहमीइतकंही काम व्हायचं नाही. मग सगळं आणखीच निरर्थक वाटायला लागायचं. कुठे जाऊ नये, काही करू नये, नुसतं बसून राहावं असं व्हायचं.
तशीच ती बसून राहिली. पुढ्यात खूप कामं असून ठप्प बसून राहिली. तेवढ्यात बॉसचा फोन आला,
``अभिनंदन, मॅम''
``कशाबद्दल?''
``तुमच्या पॅकेजसाठी पहिला प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर आलासुद्धा!''
``एवढ्यात?''
``हो. म्हणजे आता ईमेलवर एन्क्वायरी आहे पण सूचना स्पष्ट आहे. त्यांना हवे आहेत तसे चारपाच जादा फीचर्स आपण प्रोव्हाईड करू शकलो तर त्यांची ऑर्डर पक्की आहे.''
``दॅट्स ग्रेट, सर. आय डोण्ट बिलीव्ह धिस!''
``आता तुमच्याच हातात आहे ते. अगदी तातडीने काम करून तेवढे फीचर्स अॅडिशनल देणं..''
``नक्कीच सर. खरं तर पहिल्या निवेदनात मी हेच म्हटलंय ना? आम्ही आता अगदी प्राथमिक-बेसिक-पॅकेज देऊ केलंय. त्यात खूप व्हॅल्यू अॅडिशन होऊ शकते. क्लायंटच्या गरजेनुसार हवं तसं कस्टमबिल्ट मोड्यूल बनवता येतं. आम्ही तयार आहोत त्यासाठी इतकंच नाही तर आम्हांला आवडेल, प्रयोग करायला, भर घालायला''
``ओ.के देन. मी त्यांना दोन दिवसांचा वायदा करतो, त्यात तुम्ही सगळं री-वर्किंग करून ठेवायचं. चालेल?''
हा प्रश्न नव्हता. आज्ञाही नव्हती. गृहीत होतं. दुसरा कोणी स्पर्धक आत घुसण्यापूर्वी आपण क्लायंटला पुरतं समाधानी करायचं. दोन दिवसांचा वायदा केला तरी दीड दिवसातच उद्दिष्ट गाठायचं. त्या साठी हातातली सगळी कामं बाजूला ठेवायची. सबब सांगायची नाही. स्वत:ची! घराची! मुलाबाळांची...
एकदम रजूला स्मरलं. आता उद्या सुट्टी घेणं शक्य नाही. संध्याकाळी उशीर होणार. आजही. उद्याही. गोकर्ण नसणार. रियाची चिडचिड होणार. तिची, म्हणजे आईचीही. रजूनं तिरीमिरीनिशी पर्स खांद्याला लटकावली आणि ज्युनियरला सांगितलं; ``मी जरा तासभर बाहेर जाऊन येत्येय. तुम्ही लोक संध्याकाळच्या प्रेझेंटेशनची सगळी तयारी नीट करून ठेवा. निघायच्या वेळी मी इथे पोचेनच''
घर ते ऑफिस हा बिनगर्दीच्या वेळी अर्ध्या तासाचा रस्ता होता. घरी जायला अर्धा तास. रियाबरोबर अर्धा तास. परत यायला अर्धा तास. किमान दीड तासाची निश्चिंती. ट्न्ॅिफक असेल तर जास्त! रजूचं स्वत:चं वाहन होतंच, तरी आता एकूण मानसिक तणावात आणखी वाहन हाकण्याची जोखीम नको म्हणून तिनं सरळ एका रिक्षाला हात दाखवला. आईला मुद्दामच कळवलं नाही. अचानक भेटल्यावर रियाच्या आजारी चेहऱ्यावर कशी प्रभा फाकत्येय हे तिला बघायचं होतं.
पण एखाद्या दिवशी गोष्टी जमायच्या नसतात तेव्हा जमत नाहीत त्या नाहीतच. निम्मा रस्ता गेल्यावर वाटेतल्या एका मोठ्या शाळेसमोर मुलखाची वाहनांची कोंडी. ट्न्ॅिफक जॅम. पुढे सरकता येत नाही. मागे जाणं शक्य नाही. ह्या निम्म्या रस्त्यावरून घरी जायला दुसरी कोणती वाट नाही. समोर वाहनांचा समुद्र. त्यांच्या आवाजाचा कल्लोळ. माणसांची एकमेकांवर आगपाखड. मध्येच घोषणा. पोलीसच्या शिट्ट्या. असा प्रकार समोर आला. चौकशी केल्यावर कळलं, शाळेमध्ये मुलाला स्कूटरवरून सोडायला येणारी एक आई म्युनिसिपालटीच्या बसखाली गेली. भीषण अपघात. त्यामुळे पोलीस. त्यामुळे जमाव. त्यातले कोणी संतप्त. म्हणून बसवर दगडफेक, सार्वत्रिक अनागोंदी. बाजूबाजूने लोकांचे शेरे...
``ह्या एवढ्या गर्दीत टू व्हीलरवर पोरं नेणंच चूक आहे!''
स्कूलरिक्षाचे पैसे वाचवायला गेल्या असतील त्या बाई. प्रत्यक्षात केवढ्यात पडलं? कळायला नको?'' ``सगळं रक्त सांडलंय डिव्हायडरवर''
``बाई जागीच गेली म्हणतात. मुलगा वाचला असला तरी खूप!''
``स्कूटरची तर पार वळकटी झालीये!''
``इन्शुअर्ड असेल!''
``सो व्हॉट?''
``एका पोराच्या आयुष्याचं मातेरं. शाळेतली बरीच पोरं हादरलेली, आपल्याकडली वाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत्येय!''
``म्हणून तर पोरांना जास्त जपायला पाहिजे ना?---आता आईच्या हातूनच झालं म्हटल्यावर---''
रजूच्या मनगटावरचं घड्याळ भराभर पुढे धावत होतं. आणि मन त्याच्याही पुढे. ह्या वाहतूककोंडीमुळे सेकंदमिनिटाचा हिशोब पुरताच कोलमडला होता. त्यात त्या दु:खद घटनेच्या चर्चेचं सावट...आता ठरल्याप्रमाणे घरी जाऊन परत वेळेत ऑफिसला पोचणं शक्य नव्हतं. न पोचणं चालणार नव्हतं. कारण सहकाऱ्यांना तशा नीट सूचना नव्हत्या. ह्या घटनेमुळे घरी गेल्यावर रियापासून पाय निघणार नव्हता. कधीकधी आपणही तिला दुचाकीवरून कुठेकुठे सोडायला जातोच की!
ट्न्ॅिफकमधून मागे फिरण्याच्या दृष्टीने सोयीचं पाहिलं वळण लागलं तिथे रजूने रिक्षावाल्याला ऑफिसकडे परतायला लावलं. जवळपास तासभर उगाचच रखडून ती परत स्वत:च्या जागेवर जाऊन बसली तेव्हा तिचा मोबाईल बरेच मिस्ड कॉल्स दाखवत होता. काही नवऱ्याचे, काही आईचे. वाहतुकीच्या गोंगाटात ऐकू न आलेले. आता अधिक थकायला नको म्हणून. दोघांशीही ती अगदीच गरजेपुरतं बोलली. रियाशी मात्र खूप वेळ समजुतीचं- अजीजीचं-आर्जवाचं बोलत राहिली. ``बरं वाटतंय का बच्चा?'' ``हुं'' ``रिया, तू काय करत्येस?'' ``ममा, तू लवकर ये ना'' ``आलेच आता. हे एक काम संपवलं की घरीच येणारे मी. आजी आता डॉक्टरांना बोलावतेेय ना घरी? त्यांनी दिलेली औषधं नीट घेतली की बच्चा लग्गेच बरा होणार. ममाशी खेळायला तयार होणार.''
``पण तू कधी% येणार? लवकर ये.''
रियाचं एकच पालुपद होतं. रजूच्या कोणत्याही प्रश्नावर, मुद्द्यावर, आल्यावर तिला तेवढंच म्हणायचं होतं.``ममा, तू लवक्कर ये.''...शाळेसमोरच्या अपघातून वाचलेलं ते मूल आता असा हट्ट कोणापाशी धरू शकेल हा विचार मनात आला तसा हा संवाद रजूला निरर्थक वाटायला लागला. `लवकर येतेच' अशा अर्थाचं सुमारे नव्वद-शंभरावं वाक्य बोलून तिनं फोन बंद केला. आणि रियाची प्रकृती हा विषयही काही वेळापुरता बंद केला. आता चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रेझेंटेशनला तिला स्वत:मधलं उरलंसुरलं सगळं द्यायचं होतं, हीच वेळ होती. मग भलेही ती कितीही अडचणीची का असेना! चेंबरमधलं काम आवरतं घेईपर्यंत चांगलीच रात्र झाली. सादरीकरण नीट झालं. पुढली प्रश्नोत्तरं समाधानकारक झाली. भावी व्यवसायाच्या अनेक सुखद शक्यता दिसायला लागल्या. वाटलं नव्हतं तरी मधला काही काळ रियाचा `ताप' मनाआड गेला. मग रीतसर त्याबद्दल अपराधी वाटणं वगैरे...घरी गेल्यावर आई त्यावरून आणखी रीतसर सुनवेल या अपेक्षेसह ती घराच्या रस्त्याला लागली. एक खूप धकाधकीचा दिवस संपवून. बाहेर सामसूम होती.
कुलूप उघडून रजू घरात आली. तर घरातही सामसूम होती. रजूनं काळजीनं रियाच्या खोलीकडे जाऊन नजर टाकली. पलंगावर रिया ग्लानीत असावी. आणि नातीच्या अंगावर हात टाकून जमिनीवर अंग पसरून दिलेली तिची वृद्ध आई....खोलीतला पसारा...औषधांचा वास.... रजूला भडभडून आलं.
``आई %, मी आलेय गं.'' ती दबल्या आवाजात म्हणाली.
``जा. सगळं आवरून निजायला ये. टेबलावर आहे काहीबाही हवे तर दोन घास खाऊन घे!'' आई पडल्यापडल्या पुटपुटली.
``नको. मला भूक नाहीये.''
``मग फ्रीजमध्ये टाक. हिच्यासाठी एकदा पेज केली. एकदा खीर केली. दोन चमचेही घेतले नाहीत कशाचे!''
``रडत होती?''
``च्यक््. तेवढंही भान नाहीये तिला संध्याकाळी पाचनंतर पुन्हा ताप चढायला लागला. मी डॉक्टरांना घरीच बोलवलं. त्यांनी इंजेक्शन दिलं तेव्हा आराम पडला.''
``इंजेक्शन? म्हणजे विचारायलाच नको. हिची रडारड...गोंधळ!''....रजूचा आवाज पडत चालला. आईनं हातानंच तिला `शांत रहा. आवाज नको.' वगैरे खाणाखुणा केल्या. रजूनं पुढे ओणवून रियाच्या गालाल, कपाळाला हात लावला. तिनं `हु का चूं' केलं नाही. एरवी रजू ऑफिसमधून घरी आल्यावर रिया काही वेळ घर डोक्यावर घ्यायची. उड्या मारणं... बडबड...गाणी, गप्पा...लक्ष वेधून घेण्याचे एक हजार एक प्रकार...त्या तुलनेतली ही निश्चेष्टता रजूला बघवेनाशी झाली. ती शांत पावलं टाकत स्वयंपाकघरात जाऊन बसली. आवरण्याजोगं बरंच दिसत होतं आणि काही करू नये असंही वाटत होतं. काही वेळ भिंतीला डोकं टेकून ती बसून राहिली आणि नंतर यंत्रवत उठून एकेक वस्तू जागेवर ठेवायला लागली. दरवाजाजवळचे चपलाबूट... सकाळची वर्तमानपत्रं... दाराजवळ पडलेलं टपाल... ओट्यावर ठेवलेली घासलेली भांडी... शेजारी सिंकमध्ये पडलेले पेले-कप...औषधाचे चमचे...रियाचा युनिफॉम...दप्तर...
दप्तर दिसण्याबरोबर तिनं चटकन ते उघडलं. त्यातल्या रियाचा डबा काढला. सिंकजवळ नेला. उघडला. आतल्या जिनसांचा कुबट दर्प तिच्या नाकात शिरला. पण त्यातूनही आघात करून गेलं त्या डब्यातलं चिवडलेलं अन्न. पोळी कुरतडून टाकलेली. भाजीला बहुधा हातही लावलेला नाही. छोट्या पिशवीत सफरचंदाच्या चार फोडी दिल्या होत्या. त्यातल्या दोनच खाल्लेल्या. आणि सर्वात आश्चर्य म्हणजे तूप साखरेची छोटी वाटी जशीच्या तशी. दररोज डब्यातली भाजी खाण्यावरून कटकट असायचीच रियाची पण मोरंबा तूप, गूळतूप, तूपसाखर, जॅम वगैरेंच्या वाटीतला कणही शिल्लक ठेवत नाही पठ्ठी. चाटूनपुसून साफ असायची ती वाटी. आज तिकडे लक्षही गेलेलं नाही. एवढी बेजार झाली होती बिचारी? दुखण्यानं? आणि अशा हैराण जीवाला आपण सक्तीनं शाळेत पाठवलं...निष्ठुरपणानं? डब्यातलं सगळं खरकटं बाहेर काढून, नळ पूर्ण सोडून धो..धो..पाण्याखाली डबा धरून रजू नुसतीच उभी राहिली. पाण्याची धार..पाण्याखाली डब्यावर आदळून चौफेर उधळू लागली. रिकाम्या डब्यावर, झाकणावर पाण्याचा तडतड आवाज येऊ लागला. रात्रीच्या शांत वेळात तो जास्तच मोठा वाटला असावा कदाचित, कारण आई आतून धडपडत, पदर-साडी सावरत बाहेर आली आणि म्हणाली,
``किती आवाज होतोय...करत्येस काय एवढं?''
``रियाचा डबा धुत्येय. शाळेत दिलेला.''
``का? मोलकरणीनं नाही धुतला? एकजात कामचुकार सगळया...''
``तिचं काही नाही, आईर्. माझीच तशी सूचना आहे तिला''
``काय?''
``रियाचा शाळेचा डबा माझ्याखेरीज कोणी उघडायचा नाही. धुवायचा नाही. रोज दिवस अखेर केव्हाही, कितीही उशिरा घरी आले तरी रियाचा डबा स्वत: धुवून पालथा घालते मी. ज्या दिवशी तिनं सगळं शिस्तीनं खाल्लेलं दिसतं त्यादिवशी मला खूप बरं वाटतं आई. दिवस चांगला गेला असं वाटतं. ज्यादिवशी ती धड खात नाही त्यादिवशी मला हुरहुर लागते. का खाल्लं नसेल? काय बिनसलं असेल? आपण ह्या ऐवजी ते दिलं असतं तर? असा विचार येत राहातो मनात आपण आईपणात कमी तर पडत नाही ना, या विचाराने ती रात्र बेकार जाते. कळतंय ना आई तुला, मी काय म्हणत्येय ते? तू आम्हांला लहानपणी करून वाढायचीस तशी तव्यावरची गरम पोळी मुलीच्या पानात टाकणं...आपल्याला जमेल तेवढं आग्रहानं खाऊ घालणं मला शक्य नाहीये. म्हणून मग...त्यातल्या त्यात...बरोबर आहे ना, आई?'' रजूनं क्षणभर वळून आईकडे पाहात म्हटलं आणि पुन्हा गर्रकन मान फिरवून नळ मोठा केला. त्याच्या पाण्यापेक्षा मोठा लोंढा आपल्या डोळयांतून येईल, तो आईला दिसायला नको म्हणून सगळी धडपड होती. आई एकटक तिच्याकडे बघत राहिली. तिनं काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. दिवसभराचा थकवा, कंटाळा, अनिश्चितता ह्यांच्यासकट आपलं वृद्ध शरीर खोलीकडे ढकलतांना नंतर मात्र म्हणाली,``आता मला कळून, न कळून काय फरक पडणार आहे? तुम्ही आवरा आणि व्हा आडव्या.... अगबाई, हुंदके कोण देतंय? रिया की काय?''
``तीच असेल. तू समजाव तिला. तोवर मी कपडे बदलून आलेच.'' हुंदका दाबत रजूनं कसंबसं म्हटलं आणि चांगला धुतलेला डबा उगाचच नळाखाली धरला. पाणी वाहात राहिलं. डब्यावरून. तिच्या गालांवरूनही. त्या दोन्हींचे आवाज कानाआड करून आई रियाला समजावायला लागली, ``असं रडू नये बरं का. उगाच ताप वाढतो त्यानं. आता आपली ममा घरी आलीये ना...आपल्या ममाला सगळं कळतं-...हो की नाही?...''



cialis tadalafil
muogzb cialis tadalafil CepkGS generic cialis 3560 viagra 5515 viagra ToBHCC cialis 1412 tadalafil price PORXGl
viagra
qarzut viagra %-[[[ cialis >:-[ cialis 8]]] how does cialis work WNEMQd viagra jWmQG viagra SzAEw
viagra
xivztxd http://ejxbtt.com/ ipdcgjs [url=http://ecaoyc.com/]ipdcgjs[/url]
viagra
zsffcts http://qwauwx.com/ ryzfya [url=http://jthhkp.com/]ryzfya[/url]
viagra
eflora http://jotetn.com/ vorgcold [url=http://esydwg.com/]vorgcold[/url]
diqawdft
ysqxqitu
tgjxqc
rdtaivk
bcc
Oakland Mayor Office 2010 Jean Quan and Microsoft Office 2010 other city officials microsoft 2010 were hoping there would Office Professional 2010 be no reprise of MS Office 2010 the violence that Microsoft Office 2010 Download erupted last week Microsoft Office 2007 when police moved Office 2007 in to raze the MS Office 2007 Occupy Oakland Office 2007 encampment.
boxsetszone
A three part golden girls dvd storyline features golden girls dvds the time traveling hex dvd dictator Kang hex dvds the Conqueror hex dvd set and is reminiscent hogan's heroes dvd of the great hogan's heroes series Kang storylines house md dvd from the Avengers house md dvds comics. And little house on the prairie dvd in Widows Sting, Hawkeye little house on the prairie dvds and Mockingbird little house on the prairie series are on the little house on the prairie complete series trail of the lie to me dvd apparent double lie to me dvds agent the the l word dvd Black Widow. There's the l word dvds some anime lost dvd influence, but lost dvds Earths Mightiest mash dvd Heroes animation mash dvds style is probably monk dvd somewhere between monk season Marvel's more monk seasons traditional superhero monk series style and a full ncis dvd on anime production. Its ncis dvds similar in look one tree hill dvd to the recent one tree hill dvd season Wolverine and one tree hill seasons the as far as one tree hill series art style is seinfeld dvd concerned. Former seinfeld dvds Force comics seinfeld dvd set writer is sopranos dvd the series sopranos seasons head writer sopranos series and story the sopranos dvd editor, and wrote the Masters http://boxsetszone.com included in this collection.
We at panache shoes make the
We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!
We at panache shoes make the
We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!
Michael Vick Authentic
Michael Vick Authentic Jersey
DeSean Jackson Authentic Jersey
Nnamdi Asomugha Authentic Jersey
Brent Celek Authentic Jersey
LeSean McCoy Authentic Jersey
DeSean Jackson Jersey
Michael Vick Jersey
Nnamdi Asomugha Jersey
Brent Celek Jersey
LeSean McCoy Jersey
Asante Samuel Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Nathaniel Allen Jersey
Randall Cunningham Jersey
Reggie White Jersey
Stewart Bradley Jersey
Wes Hopkins Jersey
Dominique Rodgers-Cromartie Jersey
Customized
LaDainian Tomlinson Authentic Jersey
Darrelle Revis Authentic Jersey
Nick Mangold Authentic Jersey
Mark Sanchez Authentic Jersey
Dustin Keller Authentic Jersey
Jets Jersey
New York Jets Jersey
Cheap Jets Jersey
Antonio Cromartie Jersey
Bart Scott Jersey
Brett Favre Jersey
D'Brickashaw Ferguson Jersey
Darrelle Revis Jersey
Dennis Byrd Jersey
Dustin Keller Jersey
Dwight Lowery Jersey
Joe Klecko Jersey
Joe Namath Jersey
Kyle Wilson Jersey
LaDainian Tomlinson Jersey
Laveranues Coles Jersey
Leon Washington Jersey
Mark Gastineau Jersey
Mark Sanchez Jersey
Muhammad Wilkerson Jersey
Nick Mangold Jersey
Plaxico Burress Jersey
Santonio Holmes Jersey
Shonn Greene Jersey
Thomas Jones Jersey
Vernon Gholston Jersey
Wesley Walker Jersey
खुप छान .
खुप छान .
कहनि
मन्गला गोड्बोले यान्ची कथा आव्ड्लिएए.