- संवाद
- मातीचं आणि माणसांचं वेड जपणारे: राजेश कुलकर्णी
- वाटचाल 'मिळून सार्याजणी'ची
- मल्लिका साराभाई : नैतिकतेचं सौंदर्य
- आज 'सार्याजणी'त नसूनही......
- माझी समलैंगिकता, उमज... समज... सहज...
- कविता
- नकोसा
- स्त्री शक्तीची गावरान ठिणगी
- आरोग्यदायी
- निर्मितीच्या नव्या वाटेवर अमृता सुभाष
- गया आणि मी
- सबको सन्मति दे भगवान
- सातासमुद्रापलीकडच्या सख्या
- भातुकलीच्या खेळातलं वास्तव
- राजकारण्यांचे विनोद
- कळत कसं नाही!
- अथांगतेच्या पलीकडे
सबको सन्मति दे भगवान
``यावर्षी काय नवीन रिसर्च केले गणपती विसर्जनावर?'' महापालिकेतील संबंधित अधिकारी विचारणा करीत होते. मी भानावर आलो. माझ्या लक्षात आले की गणपतीचा सीझन आला. आता अनेकांकडून अशीच विचारणा होत राहणार. त्यांना नवे काय सांगावे? गणपतीविसर्जन आणि त्या संबंधीचे पर्यावरणीय प्रश्न यावर माझ्या ग्रुपने गेली १२-१४ वर्षे वेगवेगळया संस्था, संघटना आणि पालिकांबरोबर काम केले आहे. जेवढे जास्त काम करावे तेवढे माझे मत पक्के होत चालले आहे की गौरी-गणपती आणि दुर्गा मूर्तींच्या विसर्जनामुळे पर्यावरणावर (शर्पींळीेपाशपीं) आणि परिसंस्थेवर (शले-ीूीींशा) विपरीत परिणाम होणे अटळ आहे. या सर्व बाबींवर आम्ही खल करत आहोत. आमची निरीक्षणे, मतं आणि कृतीमध्ये उतरवता येतील असे काही उपाय इथे प्रथम सारांशाने मांडतो.
`इको फ्रेंडली' गणेशमूर्ती बनवणे फार कठीण आहे. पी.ओ.पी. लवकर विघटित हात नाही. शिवाय त्यातील सल्फेट नैसर्गिक जल-परिसंस्थेसाठी फार हानिकारक आहे. शाडू माती अथवा इतर कोणतीही माती चटकन विघटित होेते पण ती माशांच्या कल्ल्यांमध्ये जाऊन बसते व ते मरतात. शिवाय नैसर्गिक जलाशयात मूर्ती विसर्जन करून गाळ वाढवणे अजिबात शहाणपणाचे नाही. कागदाचा लगदा मूर्ती बनवायला वापरला तर तोही कुजतो व मासे मरतात. रासायनिक रंगांमधले हेवी मेटल्स जीव-जंतूंसाठी व माणसांसाठी विषारी आहेत म्हणून कृत्रिम कार्बनिक रंग वापरावे म्हटले तर तेसुद्धा विषारीच असतात. पर्याय म्हणून नैसर्गिक व हर्बल रंग वापरले तर ते पाण्यात कुजून मासे मरतात. पर्यावरणाचे नुकसान न करणारी मूर्ती कशी बनवणार? तेव्हा मूर्ती विसर्जनाचे नियोजनच काय तेवढे आपल्या हातात राहाते. खाली दिलेल्या सात उपायांपलीकडे मला तरी इतर काही सुचत नाही.
१) एक गाव-एक गणपती हे सूत्र उत्तम आहे. त्याच चालीवर एक कॉलनी-एक गणपती, एक सोसायटींचा समूह-एक गणपती, शक्य झाले तर एक उपनगर-एक गणपती स्वीकारला पाहिजे. गणपतीच्या मूर्तीची उंची कमी ठेवावी. गणेश उत्सवातील कला, धार्मिक भाव, समाज प्रबोधनाचा व करमणुकीचा आशय मुळीच कमी करण्याची इथे मी चर्चा करीत नाही. मात्र सामूहिक कार्यक्रम व मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषण व आग, स्फोट, अपघात कमी होतील याची काळजी घेतली पाहिजे. जो न्याय सामाजिक संस्था, मंडळांना तोच घरगुती गणपतीला लागू करावा. शक्य तेवढी लहान मूर्ती ठेवावी. रोषणाई संयमाने करावी.
२) घरगुती असो किंवा मंडळाचा सार्वजनिक गणपती असो; विसर्जन टाळता येईल का याचा प्रयत्न करावा. शास्त्राने अनिवार्य आहे असे म्हटल्यास कोरड्या परातीत, घंगाळयात अथवा ताम्हणात मूर्ती ठेवून पाणी शिंपावे, पूजा करावी, मूर्ती पुसून पुन्हा मखरात मांडावी. मूर्तीचे रंग विटेपर्यंत वा ती भंगण्याइतकी जीर्ण होईपर्यंत पाच-सात-दहा वर्षं तीच मूर्ती वापरावी. अशाचप्रकारे माझी आई वर्षभर गणपती ठेवते. आठ-दहा वर्षं एकच मूर्ती चालवते व शेवटी शेतात मातीत विसर्जनाला धाडते किंवा बागेत, कुंडीत वा आळयात विसर्जन करणे ती पसंत करते. गोकुळअष्टमीचा चिकणमातीने बनवलेला बाळकृष्ण, बळी, पुतना मावशी, गोकुळातले गोप-गोपिका ह्या डझनावारी मूर्तींचा सीन आई मांडत असे. चार-आठ दिवसांनी आमचे मन भरल्यावर ती ते सर्व असेच कुणाच्या शेतात नाहीतर आमच्या बागेत वा कुंड्यांमध्ये विसर्जित करीत असे. तिच्या मंगळागौरी, शंकराच्या पिंडी, पोळयाचे बैल आणि गाय-गोऱ्ह्याची मूर्तीकला अशीच विसर्जित होत आली- वर्षानुवर्षे. आजोबा नेहमी सांगत की ``चिकणमातीची गणपतीची मूर्ती पूजेला पुरेशी आहे. रंगरंगोटी हे तुम्ही हल्ली आणलेले फॅड आहे.''
३) शहरांमधून मोठ्या संख्येने गणपती मूर्ती विसर्जनाला येतच राहणार. पडताळून पाहावे की लोकांना कोरड्या हौदात विसर्जन केलेले आवडेल का? असले तर प्रश्न फार सहजतेने सोडवता येईल. त्या सर्व मूर्तींचा भुगा करून त्याचा उपयोग पर्यायी विटा, टाईल्स व बांधकामाचे साहित्य बनवण्यासाठी करावा. हल्ली बांधकामाचे रबल व डेब्री भुगा करून त्यांचा विटा-टाईल्स बनवण्यात पुनर्वापर करणारे कारखानेच निघत आहेत. त्यांना गणेश मूर्तींचा भुगा द्यावा. समाजात हा विचार प्रयत्नाने रुजवता येईल. असा प्रयोग यशस्वीपणे करणारे समूह उदाहरणादाखल डॉक्युमेंटरी फिल्म्स, टी.व्ही. व वृत्तपत्रांमधून लोकांपुढे आणले पाहिजेत. बारकाईने बघून समजेल की ही कोरड्या विसर्जनाची संकल्पना बऱ्यापैकी शून्य प्रदूषण करणारी आहे!
४) पाण्यात गणेशविसर्जन करण्याचा हट्ट माणसे सहजी सोडणार नाहीत. तेव्हा जे समाज `कोरडे विसर्जन' शास्त्रसंमत मानणार नाहीत, त्यांनी मोकळी मैदाने, तलाव-नदी-समुद्र किनाऱ्यांवर किंवा शाळा-कॉलेज-सभांची मैदाने वापरून जमीन खोदून कृत्रिम हौद बनवावे. त्या तात्पुरत्या हौद-तळयांमध्ये पॉलिमरच्या मेणकापडाचे दोन थर अंथरावे (१ ते २ मिलिमीटर जाड एच्.डी.पी.ई. पॉलिमरची मेमब्रेन वापरून) व हौद-तळयाला लीक-प्रुफ बनवावे. त्यात पावसाचे अथवा जवळच्या नदी-तलाव-समुद्रातले पाणी साचवावे (तीन फूट खोल) व त्यात गणेशमूर्ती विसर्जित कराव्या. अनंत चतुर्दशीनंतर कृत्रिम हौदातले पाणी टँकरमध्ये पंप करावे व जवळच्या रंग-केमिकल कारखान्यांच्या पाणी प्रदूषण नियंत्रण संयंत्राला (वेस्टवॉटर ट्नीटमेंट प्लँटला पाठवावे. खालचा गाळ भुगा करून विटा-टाईल्सच्या कारखान्यांना पाठवावा. गणेश उत्सवानंतर तात्पुरती तयार केलेली तळी-हौद परत माती लोटून भुईसपाट करावी. पॉलिमेरिक लायनरचे थर स्वच्छ पुसून, गुंडाळून पुढल्या वर्षी वापरण्यासाठी ठेऊन द्यावे.
५) लहान गावांमध्येसुद्धा वर सांगितल्याप्रमाणे नियोजन करणे शक्य होईल. बऱ्याच ठिकाणी हौदातले पाणी प्रक्रिया करायला पाठवणे शक्य होणारही नाही. तेव्हा हौदातले पाणी बाष्प झाल्यावर हौदात खाली राहिलेल्या चिखल (गाळ) चुना भुकटी मिसळून गावाच्या कचरापट्टीत पाठवावा. चुना मिसळल्यामुळे हेवी मेटल्स पावसाच्या पाण्यात विरघळणे बऱ्याच प्रमाणात कमी होते व ते पाण्यात वाहून जात नाहीत.
६) निर्माल्य, पूजा-साहित्य, इतर परंपरेने चालत आलेल्या सर्व बायोडिग्रेडेबल धार्मिक वस्तू नैसर्गिक पाण्यात फेकणे गुन्हा ठरवले पाहिजे. त्यांचे कॉम्पोस्टिंग करून बागेत खत म्हणून त्याचा उपयोग झाला पाहिजे. मंदिराबाहेर, विसर्जन घाटांवर, पूजा साहित्य विकण्याच्या ठिकाणांवर, भाजी व फुलबाजारात अशी संकलनकेंद्रे निर्माण करून कुठेतरी एका ठिकाणी कॉम्पोस्टिंग करण्याची व्यवस्था निर्माण केली पाहिजे तरच लोक निर्माल्य पाण्यात विसर्जन करणे थांबवतील. नदी, तलाव, हौद, नाले, खाड्या, समुद्रकिनारे व धरणांचे जलाशय स्वच्छ ठेवणे व त्यासाठी कायदे, नियम, संस्थापातळीवर प्रयत्न ही एक बाब झाली. त्याचप्रमाणे स्वच्छ असण्याइतकेच स्वच्छ दिसण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व प्रबोधनही करावे लागणार आहे. ह्या दोन्ही पातळयांवर प्रयत्न करणे सारखेच महत्त्वाचे आहे.
७) गणेशमूर्ती विसर्जन करताना त्या घाटावर नेऊन पाण्यात सोडून जबाबदारी संपली, असे नव्हे, हे जनमानसावर प्रचार व प्रबोधनातून बिंबवले पाहिजे. जगभर आणि भारतातसुद्धा `प्रदूषण करील तो भरील!' (झेश्रर्श्रीींशी रिूी) हे गृहीत तत्त्व आहे. आपली पर्यावरण संरक्षणाची कायदेशीर चौकट वर सांगितलेल्या गृहीततत्त्वाचा पुरेपूर उपयोग करते. त्याआधारे विचारले पाहिजे की नैसर्गिक जलसंपत्तीचा नाश करण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? तेव्हा गणेशमूर्ती विसर्जन-कर किंवा फी गोळा करावी. ती आकारण्याची रॅशनल पद्धत विकसित करता येईल. मूर्तींचा आकार, रंग, घडणीत वापरलेला पदार्थ, वगैरे गोष्टींच्या आधारे विसर्जन-शुल्क ठरवावे. त्या पैशांचा वापर करून निसर्ग आणि पर्यावरणाची हानी थांबवता येईल. `इको फ्रेंडली मूर्तींसाठी' अर्थातच कर किंवा शुल्क नाममात्र ठेवावे! या जमा झालेल्या करातून मूर्ती कलाकार व चित्रशाळांना अनुदान देऊन कलाकारांचे प्रशिक्षण व पुनर्वसन करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. नवे इको-फे्रेंडली पदार्थ, रंग, सजावट व एकूणच इको-फ्रेंडली गणपती उत्सवासाठी लागू करणारे तंत्रज्ञान, पदार्थ व यंत्रसामग्री निर्माण करण्यासाठी उपयोजित कार्यक्रम राबवून दरी भरून काढता येईल.
दु:खात सुख एवढेच की महाराष्ट्नत गणेश मूर्ती विसर्जनाचा पर्यावरणावर वाईट परिणाम होतो हे आता सर्वांनी मान्य केले आहे. मात्र त्यावर कृती करण्याची हिंमत आणि जागरूकपणा नगरसेवक, राजकारणी, सनदी अधिकारी आणि महापालिकेतील अधिकारी व इंजिनिअर्स यांनी खऱ्या अर्थाने दाखवल्याची उदाहरणे शोधावी लागतील. जिथे जिथे तडफदारपणा दिसतो तिथे तिथे अर्धवट ज्ञान आडवे आलेले दिसते. म्हणजे आपण पाहतो तसे खड्डे करतात आणि मेणकापडाचे थर न टाकताच पाणी भरतात. जिथे खड्ड्यात मेणकापडाचे थर टाकले जातात, तिथे पाणी रातोरात गटारांमध्ये पंप करून टाकतात आणि हौदातला खालचा गाळ कचरापट्टीवर पाठवून देतात! एकूण काय सगळे मुसळ केरात. थोड्याफार फरकाने बहुतांश ठिकाणी संबंधित राजकीय व्यक्तींना किंवा अधिकाऱ्यांना स्वत:चे पुरोगामित्व सिद्ध करण्याची इतकी घाई झालेली असते की अर्धवट समज आणि तयारी असताना गणेशउत्सव व गणेशविसर्जन इकोफ्रेंडली करण्याचे प्रयत्न केले जातात. गणपती उत्सवाला पर्यावरण संरक्षणाच्या आखाड्यात किंवा स्पर्धेत उतरवणे बरे नव्हे. येत्या गणपती उत्सवात १४ विद्या आणि ६४ कलांमध्ये निपुण असणाऱ्या या देवाला नव्या चौकटीत बसवूया. ती चौकट असेल पर्यावरण, परिसंस्था, जैविक विविधता आणि चिरस्थायी विकासाची!


http://www.kodes.com/category
http://www.kodes.com/category/sansar-salvo/
http://www.kodes.com/category/emre-baransel/
http://www.kodes.com/category/kolera/
http://www.kodes.com/category/fuchs/
http://www.kodes.com/category/hiphop-videolari/
http://www.kodes.com/category/kadikoy-acil/
http://www.kodes.com/category/sagopa-kajmer/
http://www.kodes.com/category/ceza/
http://www.kodes.com/category/cartel/
http://www.kodes.com/category/gekko-g/
http://www.kodes.com/category/ayben/
http://www.kodes.com/category/hip-hop
http://www.kodes.com/category/turkce-rap/
http://www.kodes.com/category/rap/
http://www.kodes.com/category/nesternino/
http://www.kodes.com/category/fuat-ergin/
http://www.kodes.com/category/killa-hakan/
http://www.kodes.com/category/istanbul-attack/
http://www.kodes.com/category/pit10/
http://www.kodes.com/category/patron/
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/
http://www.gekkog.com/
http://www.maskanimasyon.com/
http://www.gekkog.com/category/gekko-g/
http://www.gekkog.com/category/patron
http://www.gekkog.com/category/pit10//
http://www.gekkog.com/category/fuchs/
http://www.gekkog.com/category/kolera/
http://www.gekkog.com/category/hiphop/
http://www.gekkog.com/category/ceza/
http://www.gekkog.com/category/sagopa-kajmer/
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015