- संवाद
- मातीचं आणि माणसांचं वेड जपणारे: राजेश कुलकर्णी
- वाटचाल 'मिळून सार्याजणी'ची
- मल्लिका साराभाई : नैतिकतेचं सौंदर्य
- आज 'सार्याजणी'त नसूनही......
- माझी समलैंगिकता, उमज... समज... सहज...
- कविता
- नकोसा
- स्त्री शक्तीची गावरान ठिणगी
- आरोग्यदायी
- निर्मितीच्या नव्या वाटेवर अमृता सुभाष
- गया आणि मी
- सबको सन्मति दे भगवान
- सातासमुद्रापलीकडच्या सख्या
- भातुकलीच्या खेळातलं वास्तव
- राजकारण्यांचे विनोद
- कळत कसं नाही!
- अथांगतेच्या पलीकडे
गया आणि मी
माझ्यासारख्या मठावर सोडलेल्या माणसाचं लग्न होण्याची शक्यता नव्हती. नंतर मठातून परत आणल्यावर मी ज्या पद्धतीनं वागत होतो त्यावरून मी नक्कीच लग्न करणार नाही याची सर्वांना खात्री वाटत होती. याला मठातून परत आणण्याऐवजी तिथंच राहू द्यायला पाहिजे होतं. असंच सर्वांना वाटत होतं. लग्न झालं तरी माझ्या सारख्या कशातच लक्ष नसलेल्या माणसाला संसार नीट जमेल की नाही याचीही सर्वांना शंका वाटत होती. वयाची पंचवीस वर्ष झाली तरी याचं शिक्षण संपेना! हा आता काय लग्न करणार? असं लेकुरवाळया माझ्या समवयस्क गावकऱ्यांना वाटत होतं. तिकडं दूर औरंगाबादला शिकताना त्यानं जातीच्या ना पातीच्या पोरीशी सूत जुळवलंंय अशाही अफवा पसरवण्यात आल्या.
या पार्श्वभूमीवर ७ डिसेंबर १९८८ रोजी मी माझ्या पक्क्या नोकरीवर रूजू झालो आणि १ जानेवारी १९८९ रोजी मी लग्न केलं. तेव्हा माझं वय होतं. सत्तावीस वर्ष. बायको जुनीच परिचयातली, नात्यातली होती. माझी सर्वात लहानी बहिण लता हिची नणंद गया हिच्याशी मी लग्न केलं. बहिणीची तशी इच्छा होती. मुलगी नेहमीची पाहण्यातली होती. वडीलही म्हणाले काही हरकत नाही. मला मुली पाहण्याचा घोळ घालायचा नव्हता. मुली पाहण्याचा एकही कार्यक्रम मी माझ्या आयुष्यात येऊ दिला नाही. मला तो प्रकार म्हणजे स्त्रीजातीची क्रूर थट्टा वाटते.
अनेकांना वाटलं होतं की मी प्रेमविवाह करीन. पण तसं होण्याचं काही कारणच नव्हतं. धार्मिक संस्काराच्या मठातल्या वागण्याच्या पगड्यामुळे डोळा उंचावून मुलीकडं पाहणेही मी पाप समजत होतो. सहज नजरेला पडलेली एखादी मुलगी आवडली तर आपल्या मनात हे काय पाप आलं असं वाटायचं!
माझं गयाशी लग्न झाल्यानंतरही मला काही जणांनी, तुला काय दुसरी मुलगी मिळाली नसती काय? असा प्रश्न विचारला. त्यांच्याशी मी संबंध ठेवले नाहीत(एकदा लग्न झाल्यावर असा प्रश्न त्यांनी विचारायला नको होता, असंच मला वाटत राहिलं.) आमच्या लग्नाला वीस वर्षं झाली. आत्तापर्यंत एकदाही मला गयाशी लग्न केल्याचा पश्चात्ताप झालेला नाही. आमचे टोकाचे मतभेद झाले पण पश्चाताप कधीच झाला नाही. माझ्या संन्यस्त वृत्तीमुळे मला लग्न केल्याचा पश्चाताप होतो. पण त्याचा गयाशी काहीही संबंध नसतो. तिच्या ठिकाणी आणखी कुणी स्त्री असती तरी मला हा पश्चात्ताप झालाच असता.
माझ्या अवतीभोवतीच्या कुणाहीपेक्षा माझा संसार मला जास्त यशस्वी वाटतो. आम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेण्यामुळेच हे घडलं, याची मला खात्री आहे. माझ्यापेक्षाही गया जास्त समजूतदार आहे याचीही मला खात्री आहे! मी माझ्या कवितेत आणि भावविश्वात मश्गुल असतो. तिच्यासाठी हे भावविश्व सुरुवातीला नवं असणार. त्याच्याशी जुळवून घेताना तिला पुष्कळ तडजोडी कराव्या लागल्या असणार. त्या करत असताना तिला यातनाही झाल्या असणार. मला त्या कळतही होत्या. प्रयत्न करूनही माझ्या स्वभावाला मुरड घालणं मला जमलं नाही. माझा प्रामाणिक प्रयत्न तिच्याही लक्षात आला असणार! मग तिनंच हळूहळू माझ्या भावविश्वात रमायला सुरूवात केली.
आज तर माझ्यासह आख्खा संसार तिच्या ताब्यात आहे. आमच्या घराचा दुसरा मजला बांधताना सगळं व्यवस्थापन गयानंच केलं. किराणा, भाजीपाला, कपडा हे सगळे बाजार आज तीच करते. मुलं हाताशी आल्यामुळे तिला मदत करतात. मी फक्त पैसा उपलब्ध करून देतो. त्याचं सगळं व्यवस्थापन मग गयाच करते. तिचं व्यवस्थापन इतकं नीट असतं की त्याविषयी तक्रार करण्यासाठी मला जागाच शिल्लक नसते मी माझ्या विश्वात रमायला मोकळा.
खेड्यातून शहरात नवरी होऊन आलेल्या नोकरदार नवऱ्यांच्या बायकांच्या काही सामान्य अपेक्षा असतात. त्या मला कधीच पुऱ्या करता आल्या नाहीत. गावाकडच्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी टाकणेही शक्य नव्हते. काही नातेवाईक मुलांना शिकायला ठेवणे, आईला कायमचं माझ्याकडे ठेवून घेणे असे प्रकार मी माझ्या स्वभावानुसार करत होतो आणि गया विनातक्रार ते स्वीकारीत होती. शिकायला ठेवलेल्या एका नातेवाईक मुलानं असा झटका दिला की मी तो आयुष्यभर विसरणे शक्य नाही. त्यानंतर मात्र आम्ही कुणा नातेवाईक मुलाला शिकायला ठेवायचं नाही असा पक्का निर्णय केला. तरीही गयानं स्वत: होऊन माझ्या एका भाच्याला पुन्हा शिक्षणासाठी आणलं. याचा अनुभव इतका चांगला आला की त्यामुळे झालेल्या मागच्या जखमा बुजायला मदत झाली. आपण एक पुण्यकर्म केल्याचा आनंद मिळाला. घरावर संकट आलं की मी गोंधळून जातो. माझा विवेक डळमळतो. पण गया खंबीरपणे त्या संकटाचा सामना करते. अशा प्रसंगी मी कसं वागावं तेही तीच ठरवते. आणि तिचं ठरवणं योग्य असतं हे नंतर माझ्या लक्षात येतं. त्यामुळे अशा प्रसंगी मी विनातक्रार तिच्या स्वाधीन होतो.
गेल्या वीस वर्षांपासून आई सतत माझ्यासोबत आहे. माझ्या इतर तीन भावापेक्षा तिला माझ्यासोबत राहणे जास्त आवडते. आम्हा भावांची माया तर तिच्यावर सारखीच असणार पण माझीच निवड करण्यामागे कदाचित गयाच्या स्वभावाचा वाटा जास्त असणार. मधल्या काळात दोन वर्षं आई अंथरूणाला खिळून होती. तिचे सर्व विधी, उपचार हाताला धरूनच करावे लागत. अशावेळी वैतागली तरी गरजेच्यावेळी रात्री बेरात्री माझ्याआधी गयाच आईच्या जवळ असायची. आईचा स्वभाव अत्यंत हट्टी. त्यामुळं कधी-कधी आईनं जागा बदलून पाहिली. पण गयाचीच आठवण तिला पुन्हा पुन्हा आली आणि आई सर्वाधिक माझ्याकडंच रमली. चार दिवसासाठी आलेल्या माझ्या बहिणी आईला वैतागतात पण वर्षानुवर्षं गया मात्र तिला सर्वार्थानं पुरून उरली आहे.
माझ्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे मानधन बऱ्यापैकी येते पगारही बरा आहे. त्यामुळे माझ्या इतर खर्चासाठी मी पगाराला हात लावायचा नाही असा आमचा एक नियम ठरला आहे. त्याबरोबरच दुसराही एक नियम ठरला की मी माझ्या मानधनातला एकही पैसा घरात वापरायचा नाही. वरच्या मजल्याचं बांधकाम सुरू झालं तेव्हा वर्षभरासाठी गयानं मला हा नियम मोडायला सांगितला. त्या वर्षीचं मानधन मी बांधकामाला द्यावं अशी मागणी तिनं केली. मीही होकार दिला. त्यावर्षी गोळा झालेलं काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचं सत्तर एेंशी हजार रुपये मानधन आणि पुस्तकांची प्रतिभास प्रकाशनाने दिलेली एक रकमी लाख सव्वालाखाची रॉयल्टी असं दोन लाखाचं देणं मी तिला दिलं.
पगार झाला की तो सगळा मी तिच्या हाती देतो. त्या खर्चाचं नियोजन तिनं करायचं. मला भविष्यातलं नियोजन जमत नाही. माझ्या खिशात लाख रुपये असले तरी ते मी एका दिवसात खर्चतो आणि खिशात एक पैसा नसला तरी माझी काही अडचण होत नाही. त्यामुळं लागेल तसा पैसा मी तिला मागतो. शक्यतो माझे मानधनच मला पुरते. माझा तसा फारसा काही खर्च नाहीच. मराठीतल्या तीस मासिकांच्या वर्गण्या, आणि बाजारात आलेले, आवडलेलं प्रत्येक पुस्तक विकत घेणं, ऑक्टोंबर महिन्यात चारपाच हजाराची खादी विकत घेणं. हा सगळा मिळून तीस चाळीस हजाराचा खर्च होऊन तेवढीच रक्कम हातात शिल्लक राहील एवढं मानधन सहज मिळतं. एकदा जमा झालेली पंच्याएेंशी हजार रुपयांची रक्कम मी मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्था आणि नियतकालिकांना वाटून टाकली. गयानं त्याविषयी काहीही तक्रार केली नाही.
नंतर तिनं एक नवा पर्याय सुचवला आणि मला तो भयंकरच आवडला. मला चार बहिणी आहेत. त्या साधारण शेतकरी कुटुंबातच दिलेल्या आहेत. फार काही श्रीमंती त्यांच्याकडं नाही. गया मला म्हणाली, तुमच्या चारही बहिणिंना आपण सोनं घेऊन देऊ. मलाही कल्पना भावल्यामुळे लगेच होकार दिला. काही दिवसांपूर्वी दोन बहिणींना आणि यावर्षीच्या दिवाळीत दोन बहिणींना आम्ही दीड-दीड तोळा सोनं घेऊन दिलं. त्यासाठी सत्तर-एेंशी हजार रुपये लागले. आई माझ्याकडं असल्यामुळं सणावाराला आणि एरवीही सगळया बहिणी माझ्याकडं येतात. त्यांचा पाहुणचार आणि साडीचोळी करण्यात तिला फार रस वाटतो. बहिणींच्या अपेक्षेपेक्षा जास्त भारीच्या साड्या घेण्यात तिला फार आनंद वाटतो.
लग्नाचा वाढदिवस, बायकोला साडी, काही भेटवस्तू हा प्रकार मी कधी केला नाही. मला माझा, बायकोचा, लग्नाचा, मुलांचा वाढदिवस मुळीच लक्षात राहात नाही. ही सगळी उठाठेव गयाच आनंदानं करते. मी घरी असलो तर त्यात सहभागी होतो. मी घरी नसेल तर प्रश्नच मिटला. एकदा परमेश्वर उमरदंड या पुण्याच्या माझ्या कविमित्रानं त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला पाहुणा म्हणून बोलावलं. परतताना त्यानं गयासाठी एक सुंदर साडी दिली. ती पाहिल्यावर गयाला इतका आनंद झाला की मलाच लाज वाटली. आपण आतापर्यंत इतकी साधी पण इतकी आनंददायी गोष्ट करू शकलो नाही याचे वाईटही वाटले. ही चूक सावरण्याचा मला झटकाच आला. नाशिक परिसरात सलग चार महाविद्यालयाच्या स्न्ेहसंमेलनाला पाहुणा म्हणून गेलो होतो. दहा-बारा हजार रुपये मानधन जमा झालं होतं. परतताना येवला गाव लागलं. सर्वत्र पैठणीच्या दुकानाच्या जाहिराती दिसू लागल्या. डोक्यात आलं गयाला एक छान पैठणी घेऊयात. पण आपणाला त्यातलं काय कळणार? गयाला फोन करावा तर रहस्याचा उलगडा होईल! मला तिला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. येवल्याला `अनुष्टुभ'चे व्यवस्थापकीय संपादक. गो.तु.पाटील राहतात याची आठवण झाली. त्यांच्याकडं गेल्यावर त्यांनी पाटीलवहिनींना सोबत पाठवलं. सोन्याहून पिवळं झालं.
पाटीलवहिनींच्या पसंतीनं मी गयासाठी चार पैठण्या घेतल्या. पैठणी निवडण्यात बराच वेळ गेला. उशीर झाला. मला घरी पोचायला पहाटेचे तीन वाजले. गयानं उत्सुकतेने विचारलं हे बॉक्स कशाचे? तिला म्हटलं तूच उकलून पहा. प्रवासात थकलेला मी गाढ झोपून गेलो. गयाला काही हर्षवायूमुळं झोप आली नाही. आता गयाच्या मैत्रिणी विचारतात, सरांचा येवल्याकडं दौरा असला की आम्हांला सांगा. प्रत्येक दौऱ्यात मला दोनतीन पैठण्या आणाव्या लागतात. चार पैठण्या आणूनही गयानं मला आणखी एक पैठणी आणायला सांगितली. माझ्याहून तरुण असलेल्या सगळयात लहान बहिणीला मी एखादी पैठणी आणावी अशी तिची ईच्छा! मी तिचं म्हणनं मनावर घेत नाही म्हटल्यावर नुकतीच तिनं परभणीतच पैठणीच्या किमतीची साडी बहिणीला घेऊन दिली.
मुलांच्या भवितव्याची रात्रंदिवस चिंता करणारे आजूबाजूचे पालक पाहून ती माझ्यावर चिडते. मी मुलांचा अभ्यास घेत नाही. मी मुलांकडं लक्ष देत नाही. मी मुलांना धाकात ठेवत नाही.अशा तक्रारी करते. मलाही ते बरोबर वाटतं. पण मला जी गोष्ट जमत नाही ती मी कशी करू? मग तिला आपल्या मुलांचं कसं होईल याची चिंता वाटते. ती मुलांवर चिडते. मुलं वैतागतात. निसर्ग नियमानं मुलांना कळू लागल्यावर ते आपली चिंता करतील. भवितव्याची जबाबदारी स्वीकारतील. नीट मार्गाला लागतील याची मला खात्री वाटते. इंजिनियर आणि डॉक्टर न होता खूप चांगलं जगता येतं यावर माझा विश्वास आहे. तसं ती जगतील याची मला खात्री वाटते. पण गयाच्या मनावर मात्र सतत ताण असतो. तो ताण घरावरही ओरखडे उमटवतो. पण मी संयमानं घेतो. मला सांगून काही उपयोग नाही असे लक्षात आल्यावर ती देवाला नवस करते आणि फेडते. तिच्या समाधानासाठी मी तिला हे सगळे करू देतो.
माझी दोनही मुलं अत्यंत गुणी आणि संवेदनशील आहेत. एवढ्या कमी वयात बऱ्यापैकी वाचन करतात. चांगलं संगीत ऐकतात. घरात आणि बाहेरही त्यांचं वागणं सुसंक्कृत असतं. माझी मुलं माझ्यापेक्षा चांगली आहेत आणि ती माझ्यापेक्षा मोठी होतील याची मला खात्री वाटते.
माझ्या रक्ताच्या नात्याइतकेच माझे साहित्यातले जवळचे नातेवाईक गयाला आपलेच नातेवाईक वाटतात. कुणी आले गेले तर न कंटाळता, न वैतागता त्यांच्यासाठी राबण्यात तिला आनंद वाटतो. चहापानापासून जेवणखानापर्यंत सर्व गोष्टी ती मन लावून करते. वासंती मुजूमदार, सुमती लांडे, विद्या बाळ असोत की य.दि.फडके, सयाजी शिंदे, आर.आर. पाटील असोत. आपल्या घरी कुणी साहित्यातला पाहुणा येणार म्हटलं की तिच्या आनंदाला उधाण येतं. काय करू आणि किती करू असं तिला वाटत असतं.
मी माझं साहित्य स्वत:हून तिला कधी वाचायला देत नाही. पण प्रकाशित झाल्यावर ती आवर्जून वाचते. पुन्हा पुन्हा वाचते. माझी जुनी पुस्तकं काढून वाचत बसते. मी सांगितलेली आणि आवर्जून वाचायला लावलेल्या पुस्तकांची संख्या पुष्कळ आहे. अगदी स्मृतिचित्रे, आहे मनोहर तरी, झोंबी, पाचोळा पासून गँगमन, इडापिडा पर्यंत पुस्तकं तिनं वाचलेली आहे. त्या त्या लेखकांना प्रत्यक्ष भेटीत किंवा फोनवर आवर्जून बोललीदेखील आहे. माझ्या काही समकालीन मित्रांना असं वाचन करणारी बायको मला भेटली याचा हेवा वाटतो. तेव्हा माझा आनंद द्विगुणित होतो.
नवोदित लेखकांची हस्तलिखितं माझ्याकडं येतात. मी बऱ्याचदा घाईत असतो. तोपर्यंत गया ते हस्तलिखित वाचून त्या लेखकाला आपला अभिप्राय देऊन मोकळी होते. नंतर मग मीच तिच्यासमोर फिका पडतो. भारत काळे या लेखकाच्या संदर्भात असेच घडले. त्याचे पाचशे पानांचे हस्तलिखित आले तेव्हा मी असाच वाईत होतो. गयानं ते वाचून काढलं. भारतचा जेव्हा फोन आला तेव्हा मी घरी नव्हतो. पण गया त्याला भरभरून बोलली. त्याच्या `ऐसे कुणबी भुपाळ' या कादंबरीची ती पहिली भविष्यसूचक वाचक होती याचा आवर्जून उल्लेख नंतर भारत काळे याने आपल्या एका लेखात केला.
आपण कधी काळी काही लिहू याचं स्वप्न्ही तिला पडलं नसणार. पण यशवंत पाटणे यांच्या कौतुकानं आणि प्रेरणेनं गयाला लिहितं केलं. आबा घरी येऊन गेल्यावर गया पाटणे सरांना भरभरून बोलत होती. पाटणे सर म्हणाले, हे सगळं लिहून काढा. गयानं ते लिहिलं. सुनीता राजे पवार यांनी त्यांच्या संस्कृती या नावाच्या दिवाळी अंकात तो लेख आवर्जून छापला. त्या अंकात माझाही लेख होता. पण प्रतिक्रिया जास्त आल्या त्या मात्र गयाच्या लेखावर. तो जास्त उत्कट आणि भावनिक झालेला आहे असं प्रत्येक वाचकांचं म्हणणं होतं. गयानं आयुष्यात लिहिलेल्या पहिल्याच लेखाला घसघशीत असं एक हजार रुपयाचं मानधनही मिळालं. मला `स्मृतीचित्रे' या पुस्तकातलं ना.वा. टिळकांनी लक्ष्मीबाइंर्ना उद्देशून उच्चारलेलं वाक्य आठवलं,`तू तर माझ्याही पुढे गेलीस.'
सुरूवातीच्या काळात माझ्याकडे विद्यार्थ्यांचा राबताही पुष्कळ होता. खूप विद्यार्थी प्रेमानं घरी यायचे. भारावलेले वाचक यायचे. त्यांचे फोन यायचे. माझ्या अनुपस्थितीत या सर्वांना योग्य त्या सन्मानानं वागवण्याचं काम गयाच करायची. मुलं लहान होती तेव्हा माझ्या घरात बऱ्याचदा विद्यार्थी हाताशी असत. माझ्या आईला, बहिणीला गावाकडं नेण्याआणण्याचं काम विद्यार्थीच करीत. अशोक जेधे, भगवान काळे, राजाभाऊ, राठोड, भिसे, कीर्तीकुमार मोरे, बालाजी जोगदंड असे कितीतरी विद्यार्थी माझ्या घरात घरच्यासारखे वावरून गेले. सर्वांचीच नावं आता आठवत नाहीत. पण अशा असंख्य विद्यार्थ्यांशी गयानं मातृत्वाचं नातं जोडलेलं आहे. इथून पुढच्या शिक्षणाला गेल्यावर त्या विद्यार्थ्यांनी भरभरून लिहिलेली पत्रं वाचताना गयाच्या डोळयांत पाणी येतं. बालाजी जोगदंड हा माझा विद्यार्थी वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक झाल्यावर प्रत्येक पगार झाला की पेढ्यांचा पुडा घेऊन यायचा. मातंग समाजाच्या या विद्यार्थ्याला तीन वर्षांनंतर आम्ही आग्रहानं हा प्रकार बंद करायला लावला.
आपल्याकडं स्त्री-पुरुषांचे संबंध कसे आहेत आणि ते कसे असावेत असं मला वाटतं त्याविषयी माझी एक कविता कार्यक्रमात सादर करीत असे. सुजाण रसिकांकडून तिला चांगला प्रतिसादही मिळत असे. ती कविता अशी,
तुला मारली मी लाथ
जरा कळवळलीस
माझा दुखावला पाय
कित्ती हळहळलीस
जरा उचलला डोळा
किती लवलवलीस
माझ्या पुरूषी मनाला
अशी सवे लावलीस
नको होऊस वाघीण
हरिणही नको राहू
पहा टाकला मी बाण
तुझी भिती टाक पाहू
नवरा म्हणजे सत्ता गाजवणारा शिकारी आणि बायको म्हणजे त्याची शिकार ठरलेली बळी हा प्रकार मला क्रूर वाटतो. कुणीच कुणावर सत्ता गाजवू नये आणि कुणीच कुणाची शिकार होऊ नये असं मला नेहमी वाटतं. ते कौटुंबिक जीवनातही वाटतं आणि तेच सामाजिक जीवनातही वाटतं. मी तसं वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. बायको किंवा मुलांना मारण्याचं क्रौर्य माझ्यात कधीच आलं नाही. एक दोनदा नुसता हात उगारला तर त्याचं मला अजूनही भयंकर वाईट वाटतं.
बायकोला जसा मी त्रास दिला नाही तसे तिचे कधी लाडही केले नाही. प्राध्यापकाची बायको म्हटल्यावर सोबत मिरवणे, कार्यक्रमाला सोबत नेणे, मोटार सायकरलवर पाठीमागं बसवून ऐटीत चक्कर मारणे ह्या तिच्या स्वाभाविक अपेक्षा होत्या. पण त्या आपल्या नवऱ्याकडून पूर्ण होणार नाहीत हे तिनं लवकर समजून घेतलं. नातेवाइकांच्या कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहणं मला कधीच जमलं नाही. सार्वजनिक ठिकाणी मिरवून घेणंही मला आवडत नाही. सुरूवातीला नातेवाइकांच्या समारंभात मी येणार नाही म्हटल्यावर तीही जाणार नाही म्हणायची. पण हळूहळू मी जाऊन येते असं म्हणायला तिनं सुरुवात केली. (मी तिला आनंदानं संमती दिली.) दोघांनी कायम एकमेकांत गुरफटून राहणं हा माझा स्वभाव नाही (तिला कुठंही जायचं असेल तर माझी पूर्ण परवानगी तिला कायमची दिलेली आहे.) बायकोला गाडीवर घेऊन मिरवणारे नंतर संशयाने बायकोला कोंडून बाहेर जातात हे लक्षात आल्यावर तिला माझं वेगळेपणही आपोआपच कळलं.
आता कुण्याही कार्यक्रमाला ती जाते म्हणाली की मी तिला टॅक्सी बोलावून आनंदानं पाठवतो. तिच्या माहेरी किंवा माझ्या गावाकडं वडिलांना भेटायला जाते म्हणाली तरी मी तिला एस्टीनं पाठवत नाही. भाड्याची गाडी करून देतो. दुचाकीवर बसायची तिची हौस अशी चारचाकीमध्ये बसवून मी भागवली. माझा मुलगा मोठा झाला. मामाच्या गाडीवर चालवायला शिकला. गयानं मोटारसायकल घेण्याचा आग्रह केला. तोही मी थोड्या नाराजीनं पण पूर्ण केला. आता ती मुलांच्या पाठीमागे मोटारसायकलवर बसून बाजारहाट करते. मी मात्र कोणतंच वाहन चालवायला शिकलो नाही. सतत पायीच फिरत राहातो. मुलं मोटारसायकलवर कॉलेजवर जातात, मी मात्र अजूनही पायीच जातो.
नातेवाइकांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला सर्वांना पाठवून देवून मी म्हाताऱ्या, अंथरूणाला खिळलेल्या आईला आणि घराला सांभाळण्याचं काम आनंदानं स्वीकारतो. त्यात कर्तव्याचा आणि स्वार्थाचाही भाग असतो. प्रवासाचा कंटाळा असलेल्या मला दगदग टळल्याचा आनंद होतो. आणि रिकाम्या घरात निवांत आणि निरव वाचन होतं. अशावेळी मी वाचण्यासाठी बाजूला काढून ठेवलेलं एखादं पुस्तक समोर घेतो आणि मोठ्या चवीन त्याचा आस्वाद घेत दिवस घालवतो.
अत्यंत देखण्या मुलीशी लग्न करावं असं मला कधीच वाटलं नाही. कारण आपण अत्यंत देखणे नाही आहोत याची मला भीती वाटत आलेली आहे. त्यामुळे बायको एकदम मॉडर्न असावी अशी माझी कधीच कल्पना नव्हती. कपाळावर मोठं कुंकू आणि लुगडं-चोळी घालणारी बायको मिळाली असती तरी माझी हरकत नव्हती. परवा कोल्हापुरला चंद्रकुमार नलगे यांच्याकडं गेलो तेव्हा नलगेबाइंर्ना भेटलो. लुगडं चोळीतल्या, मोठ्ठं कुंकू लावणाऱ्या या बाई समृद्ध लोकवाङ्मयाचा वारसा अंगी मुरवलेल्या आहेत. नलगे सर म्हणाले, माझी सर्वात मोठी प्रेरणा हीच आहे. हे ऐकून मला फार समृद्ध वाटलं.
गया दहावीपर्यंत शिकलेली आहे. शेतकऱ्याची मुलगी असली तरी शेतात कधी राबलेली नाही. आम्ही सगळी बहीणभावंडं शेतात राबलेली आहोत. नरहर कुरूंदकर यांचं कुरूंदा हे गाव गयाचं माहेर. संस्कार नीटपणे रुजलेलं हे गाव. कुरूंदकर नांदेडला राहात असले तरी त्यांचे नातेवाईक गावातच होते. त्यांच्याशी गयाच्या वडिलांचे अतिशय चांगले संबंध होते. गयाचे वडील पुरभाजी इंगोले त्यामुळे सुरूवातीच्या काळात वाचन करीत असावेत. त्यांच्या बैठकीत मराठवाडा साहित्यपरिषदेच्या ज्या वाचनाच्या परीक्षा होत त्याची प्रमाणपत्रे फ्रेम करून लावलेली आहेत.
स्वयंपाक करण्यात गयाचा हात चांगला आहे. आधी मला आईच्या हातचा स्वयंपाक फार आवडायचा. आता मला घराबाहेर राहून बाहेरचं जेवावं लागलं की कधी एकदा घरी जाईन आणि गयाच्या हातचं जेवेन असं वाटतं. बुंदीचे लाडू आणि पुरणाच्या पोळया तर ती इतक्या चांगल्या करते की गल्लीतल्या अनेक घरी जाऊन तिला हा स्वयंपाक करून द्यावा लागतो. बुंदीच्या लाडूसाठी तर तिला खासच निमंत्रण असते.
एकेकाळी इतका धार्मिक असलेला मी पण आज देवपूजा, देवाच्या पाया पडणे, उपास-तापास, स्मरण-आरती या सगळया गोष्टी विसरून गेलो. मध्यंतरी गयानं आग्रह केला म्हणून तिला आणि दोन्ही मुलांना मी गीता शिकवली. तेवढ्यापुरता मी पुन्हा जुना झालो. पण आता गयाचा मात्र देवधर्म वाढला आहे. तास-तास ती देवाला अंघोळ घालत बसते. आईने तर दीक्षाच घेतलेली असल्यामुळे ती चोवीस तास देवधर्मातच असते. तिने गुरूही केलेला आहे. एकेकाळी मीही गुरू केला होता पण आता माझा गुरु कोण तेच मी विसरून गेलेलो आहे.
गया दिसायला सुंदर आहे. तिचे मोठे-मोठे डोळे अत्यंत बोलके आहेत. ती नीटनेटकं आणि स्वच्छ राहते. एवढं मोठं घर पण नीटनेटकं ठेवते. इतर बायांना त्याचं आश्चर्य वाटतं. गयाकडं पाहिलं की मला हिंदी चित्रपटातलं एक गाणं नेहमी आठवतं,
चांदसी मेहबुबा हो मेरी
ऐसा मैने चाहा था
हां तुम बिलकुल वैसी हो
जैसा के मंैने सोचा था


http://www.kodes.com/category
http://www.kodes.com/category/sansar-salvo/
http://www.kodes.com/category/emre-baransel/
http://www.kodes.com/category/kolera/
http://www.kodes.com/category/fuchs/
http://www.kodes.com/category/hiphop-videolari/
http://www.kodes.com/category/kadikoy-acil/
http://www.kodes.com/category/sagopa-kajmer/
http://www.kodes.com/category/ceza/
http://www.kodes.com/category/cartel/
http://www.kodes.com/category/gekko-g/
http://www.kodes.com/category/ayben/
http://www.kodes.com/category/hip-hop
http://www.kodes.com/category/turkce-rap/
http://www.kodes.com/category/rap/
http://www.kodes.com/category/nesternino/
http://www.kodes.com/category/fuat-ergin/
http://www.kodes.com/category/killa-hakan/
http://www.kodes.com/category/istanbul-attack/
http://www.kodes.com/category/pit10/
http://www.kodes.com/category/patron/
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/
http://www.gekkog.com/
http://www.maskanimasyon.com/
http://www.gekkog.com/category/gekko-g/
http://www.gekkog.com/category/patron
http://www.gekkog.com/category/pit10//
http://www.gekkog.com/category/fuchs/
http://www.gekkog.com/category/kolera/
http://www.gekkog.com/category/hiphop/
http://www.gekkog.com/category/ceza/
http://www.gekkog.com/category/sagopa-kajmer/
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015