- संवाद
- मातीचं आणि माणसांचं वेड जपणारे: राजेश कुलकर्णी
- वाटचाल 'मिळून सार्याजणी'ची
- मल्लिका साराभाई : नैतिकतेचं सौंदर्य
- आज 'सार्याजणी'त नसूनही......
- माझी समलैंगिकता, उमज... समज... सहज...
- कविता
- नकोसा
- स्त्री शक्तीची गावरान ठिणगी
- आरोग्यदायी
- निर्मितीच्या नव्या वाटेवर अमृता सुभाष
- गया आणि मी
- सबको सन्मति दे भगवान
- सातासमुद्रापलीकडच्या सख्या
- भातुकलीच्या खेळातलं वास्तव
- राजकारण्यांचे विनोद
- कळत कसं नाही!
- अथांगतेच्या पलीकडे
नकोसा
`कुणाला माझी गरजच नाही. नोबडी नीड्स मी.''
``का? असं काय झालंय?''
``तुझी पण कुणाला गरज नाहीये.''
``हं... पण मी बरेच काही करू शकतो.'' त्याच्यात हो स्वत:बद्दल विश्वास होता.
``पण कोणीतरी काही करायला सांगितलं पाहिजे तरच ना...''
``आता तू झोप, का उगीच त्रास करून घेतेस? बघू या पुढे.''
``आता ते वय राहिलं नाही की काहीही असो झोप येत असे, आणि काही चिंता आहेत हेही विसरायला होत असे.''
``हुुं, तुला झोप येत नाहीये.'' त्याने कूस बदलली.
``म्हणजे? तू ऐकलंच नाहीस. मी म्हणतेय ते वय गेले...''
``हो, ठीक आहे, आता झोप.''
``तू मला लहान मुलासारखा ट्नीट करतोयस्.''
``मग काय तुला म्हातारी समजू? काय बोलतेस तू. चल उद्या लवकर उठायचे आहे ना?''
``उठायचे म्हणजे काय? उठायचे म्हणून उठायचे. करायचे काय? कपडे बदलून वर्तमानपत्र आणायचे. वॉन्टेडचा कॉलम पाहायचा. याला काय तू काम म्हणतोस? त्यासाठी इतकी तयारी की लवकर झोपा. उठायचेय ना लवकर ! जणू काही कामावरच जायचेय.''
``अंहं.. लवकर उठून काम नाही. पण प्लॅनिंग तर करता येईल ना?''
``फक्त प्लॅनिंग? तुला कंटाळा नाही आला या प्लॅनिंगचा?''
``प्लॅनिंगचा कधीच कंटाळा करू नये.''
``करू नये म्हणजे काय? कंटाळा आला की आलाच, करू नये वगैरे बाताच.''
``ऐक, तुला आता चर्चा करायचा मूड दिसतोय. तू पांघरूण इतके ओढून घेतलेस की मला थंडी...''
``मी काय करू? सारखा कूस बदलत राहतोस व पांघरूण सरकतेय.''
थोडा वेळ असाच जातो. ती त्याच्याजवळ सरकते.
``नोबडी नीडस यू.''
``पुन्हा तेच.''
``नोबडी नीडस् मी.''
``काय बोलतेस? अगं मला तुझी गरज आहे. मला तू हवीशी आहेस.''
``तुला हवीच आहे रे, पण देशाला मी नकोय. किती ठिकाणी मी अर्ज केलेत माहीत आहे?... तीस ठिकाणी, कळलं तीस! पण कुणाला माझी गरज नाही. काम काय? तर सरळ साधे, इतिहास शिकवायचे. काय वाईट काम आहे का?''
``कधी विचार केला, का शिकवायचे म्हणून?''
``हो, हो, विचार का नाही केला? आवडते म्हणून. मी हे करू शकते तेवढी लायकी आहे... अखेर एम. ए. केलेय, फालतू नाही मी!''
``दुसऱ्या वर्गात''
``हो पण ५९.७% मिळवलेत आणि पूर्ण राज्यात फक्त दोघांनाच फर्स्ट क्लास मिळालाय.''
``पण इतिहास शिकवून काय करणार?''
``ऐक, तू ऐकायच्याच मूडमध्ये नाहीस. तू सायन्स शिकवून काय करणार? या विज्ञानाने जीवन किती जटील केलेय?''
``मी विज्ञान केवळ शिकवू इच्छित नाही. आपल्या हाताने त्यापासून मला काहीतरी बनवायचे आहे. मी खूप उपयोगी पडू शकतो. अजून देशाने मला ओळखले नाही.''
``देशाला तुझी गरजच नाहीये. मग ओळखीचा, न ओळखण्याचा प्रश्नच कुठे ? सर्व आपल्या ओळखीतल्यांनाच नोकऱ्या देतात. आपल्याला ना कुणी ओळखतेय, ना कोणाला आपली गरज..''
``आणि आपल्याला जाणून घेण्याचाही कुणी प्रयत्न करीत नाही.''
``प्रयत्न -ओह्... मला या शब्दाचाच राग येतो. कधी न संपणारा हा उपक्रम. फळाची आशा करू नका, प्रयत्न करत रहा. जणू घाण्याचा बैल.''
``तू झोपण्याचा प्रयत्न कर बरं.''
``बघ, बघ तू मला चिडवतो आहेस.''
``मग झोप ना आता. रात्रीचे अडीच वाजलेत.''
``उद्या काय करायचेश माहीत नसताना अडीच वाजले काय की सहा वाजले, कशाला अर्थच नाही. घड्याळाच्या दोन काट्यांमुळे वेळ कळते पण त्याचा अर्थ संदर्भात असतो. संदर्भच नसला तर वेळेला काय अर्थ?''
``काळ पळतो आहे.'' त्याने पुन्हा कूस बदलली.
``कधी धावत नव्हता? जो धावतो तो काळ. जो पळत नाहीये ती मी. वाटले होते मी पण पळत जाईन. पण... पण आहे तिथेच आहे. बी.ए. करण्याआधी जिथे होते तिथेच. एखाद्या नादुरुस्त घड्याळासारखी माझी स्थिती आहे. चावी भरलेय पण चालू होत नाही. आणि माझ्याबरोबर सर्व काही थांबलेय. सर्व! तू सुद्धा. तू सुद्धा आहेस तिथेच आहेस.''
``धंदा-बिझनेस करणाऱ्याला निदान ही तरी चिंता नाही. तो कुठे अर्ज करत नाही. उलट तो गरजा निर्माण करतो आणि आम्ही गरजा शोधतोय.''
``बस! एवढाच फरक, मग आपण एक फॅक्टरी सुरु करूया.''
``हं.'' मौन.
``कशाची?''
``इतिहास, फिेजक्स, रसायनशास्त्राच्या नोट्सची.'' तिला वाटले, हे ऐकून तो हसेल. पण तो गंभीर झाला. गप्प झाला.
``माहीत आहे, माझा खरे म्हणजे हा देश खूप उपयोग करून घेऊ शकतो. मी या देशाचे राजकारण करू शकतो.''
``हं, बदलू शकतो. जो पहावा तो समाजाला बदलायला तयार बसलाय. माझे वडील पण हेच बोलायचे, `मी समाज बदलेन'. पण काय झाले? ते होते तिथेच आणि समाज? तो थोडासा सरकलाय, पण माझ्या वडिलांची इच्छा होती त्या दिशेकडे नाही. प्रत्येक बदलायला निघालेला अखेर हेच वास्तव पाहतो. बदलता बदलता तो स्वत: मेला आणि समाज?... समाज थोडा त्याच्या शेजारीही काळया बाजारात डॉलर खरेदी करतोय.''
``मी खरेच बदल आणू शकतो माझ्याजवळ. खूप युक्त्या आहेत.''
``नोबडी नीडस् यू. तू खूप काही करू शकतोस पण तुझी गरजच नाहीये.''
``कधीही संस्थेला व्यक्तीची गरज नसते. नेहमी व्यक्तीला संस्थेची गरज आहे.''
``हं, तू म्हणतोस ते खरे आहे, मला नोकरीची गरज आहे.''
``तुला नोकरी हवीय, पण देशभरातल्या संस्था तुला ती देत नसतील तर काय इलाज आहे?''
``क्रांती. रिव्होल्यूशन.''
``क्रांती, रिव्होल्यूशन! झोप... तीन वाजून गेलेत.''
एक दीर्घ श्वास व घनदाट नि:शब्दता. पांघरूणात थोडी हालचाल...
``माझी पावलं थंड पडली आहेत, बघू तुझी पण पडलीत का? थंडी पडलेय.'' तो तिच्या पायावर पाय ठेवत म्हणाला.
``एक पांघरूण अजून आणू का?''
``नको, ठीक आहे. थोडी अजून जवळ सरक.''
``सब्स्टिट्यूट चांगला शोधलास!''
``बरं, आता झोप.''
``झोप तुलाही येत नाहीये, पण झोप झोप म्हणून तू स्वत:लाही झोपवण्याचा प्रयत्न करतोयस.''
``मला झोप येत होती पण तू घालवलीस.''
``आता मला दोष देऊ नकोस.''
``तुला दोष देत नाहीये, खरं तेच बोलतोय.''
``हो, तू नेहमी योग्यच बोलतोस...''
``तुला आता शब्दावरून वाद वाढवायचाय.''
``तू झोप.''
``हं, आता झालं ना, केव्हाचा तेच सांगतोय.''
दीर्घ मौन आणि परत ``आपल्याला जगण्याचा काही हक्क नाही. नोबडी नीडस अस.''
``आपल्याला एकमेकांची गरज आहे आणि ते पुरेसे नाही का?''
``पुरेसे नाही, पण काम चालेल.''
``कामचलाऊ नाही, तर त्याचमुळे आपण जगतोय. हे एवढे नसते तर आपण केव्हाच उन्मळून पडलो असतो.''
``झोप येतेय.''
``झोप ना.'' तो तिला थोपटू लागला.
``ऐक, माझी आज पण नाही आली.''
``अजून वाट पहा. तू लवकर घाबरतेस, त्रास करून घेतेस.''
``नाही. आता दहा दिवस वर गेले. अशा तऱ्हेने आपण टाळाटाळ करू शकत नाही. मी आजच डॉक्टरकडे जाते.''
``ठीक, जितके लवकर समजेल ते चांगले. निदान या अस्थिर स्थितीमधून मुक्ती मिळेल.'' आणि ज्याची शंका होती तेच झाले.
``बघ, मी म्हणत नव्हते, मला काहीतरी वाटतच होते.'' तिचा आवाज भरून आला होता.
``तू घाबरते आहेस, सर्व ठीक होईल.''
``पण तुला माहीत आहे की आपण असा प्लॅन केला नव्हता.''
``जगात काय सर्व प्लॅनिंगप्रमाणे चालतेय? किंवा होतेय? प्लॅन आपणही केले होते त्यानुसार दोन वर्षांपूर्वी मला नोकरी मिळायला हवी होती. आणि तुला...''
``पण हे वेगळं आहे. आपल्याला हे परवडणार नाही. स्वत:चेच काही ठीक नाही, येणाऱ्याचे काय होणार? बोल.''
``काही न काही होईल.''
``मग त्याचं स्वागत तू `काही न काही'ने करणार? आणि त्याचे येणेच सर्वार्थाने अवेळी आहे हे माहीत असूनही!''
``तोपर्यंत वेळ आपली आपण ठीक होईल.''
``हे असल्याच तत्त्वज्ञानाच्या जाळयात जनता आहे आणि तूही त्यातच अडकतो आहेस.''
``मी अडकत नाहीये पण चुकीला दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात आहे.''
``पण एकदा चूक म्हटल्यावर, ती चूक स्वीकारली म्हणजे सर्व बरोबर झाले असे नसते.''
``मग आता काय हवंय?''
``स्वीकारूच नकोस, रिजेक्ट कर.''
``म्हणजे त्याच्या `असण्याला' `न असण्यात' बदलू.
``हो, जोपर्यंत त्याचे असणे आपल्याला योग्य वाटत नाही किंवा जोपर्यंत तो अवांछित आहे.''
तो खूपच काळजीत पडला. ``पूर्णतया तो अवांछित पण नाही. कधी ना कधी आपल्याला हवेच होते मग थोडे आधी एवढेच!''
``कधी ना कधी घटना घडतच असतात. पण आपल्याला हवे असताना घडण्याला एक वेगळेच महत्त्व आहे.''
``बरोबर, ते महत्त्व मलाही कळतेय. पण हे जरा अवघड काम आहे.''
आता ती काळजीत पडली.
``कळत नाही मला, पण आपल्यालाच का हे सहन करावे लागतेय? इतकी माणसे आहेत या जगात?'' ती रडवेली झाली.
``आपण खास आहोत. स्पेशल.''
आता तिच्या चेहऱ्यावर उदासवाणे हसू उमटले.
``चल, थोडे फिरून येऊया, मागून विचार करू.''
``मागून नाही, तेवढा वेळ नाही. डॉक्टर म्हणाले, मिसेस वर्मा, जर ठेवायचे नाही ठरले तर लवकर सांगा. त्यानंतर...''
``चल, उठ तर, रस्त्यात बोलू.''
``अवांछित, प्रत्येक बाब अवांछित होतेय. कुणाला कुणाची गरजच नसली तर असायचे तरी का? त्याला पूर्ण अधिकार आहे एक स्वतंत्र, हवाहवासा वाटणारा म्हणून जीवन जगण्याचा.
त्याला हे सांगण्याचा अधिकार आहे ज्यांनी मला जन्म दिला त्यांना मी हवा होतो. त्याला कुत्र्याचे जिणे नाही द्यायचे. जेेव्हा आपणा दोघांना तो `हवा' आहे तेव्हा तो होईल. जेव्हा तू त्याची वाट पाहशील आणि घडवणारी आई पुलकित असेन.''
``मी तुझ्याशी पूर्ण सहमत आहे, पण मुष्किल ही आहे की सहमती दाखवली तर...''
``डेफिनेट अॅक्शन घ्यावी लागेल व तू घाबरतोस.''
``बरोबर बोलतेस तू.''
``मला भीती वाटायच्या ऐवजी तुलाच वाटतेय.''
``हो, कारण तुला सहन करावे लागेल सर्व दु:ख आणि तुझे दु:ख मला सहन नाही होणार.''
``आज तू लहान मुलासारखे बोलतो आहेस.''
``हेच भाग्य म्हणायचे की निदान आपण अशा देशात आहोत जिथे हे स्वातंत्र्य आहे. नाही तर...''
``आहे त्यालाच भाग्य म्हटले असते.''
तो तिला जवळ घेत म्हणाला, ``सहन करवेल ना? खरं म्हणजे आपण जरा काळजी घ्यायला हवी होती.''
``काळजी ढीग घेतली. पण सगळेच बिनसते आहे तर हेही.''
``यालाच भाग्य म्हणतात.''
``याला भाग्य म्हणून तू मला कमजोर करतो आहेस.''
``मी तुला कसे काय दुबळे करू? मीच स्वत:ला दुर्बल मानतोय.''
आणि फिरायला जाण्याऐवजी ते खिडकीत उभे राहून उडणारा पाचोळा पहात राहिले. झाडे नुसती खोडं, फांद्या उरली होती.
``ही आता दुसरी पानगळ आपण पाहतोय आणि आपण जिथे आहोत तिथेच.''
``विथ लिटल अॅडिशन.''
``आणि ती अॅडिशनही निरूपयोगी.''
एकदा त्याने तिच्याकडे पाहिले व चपला अडकवून तो दरवाजाकडे निघाला.
``कुठे चाललायस?'' ती घाबरली.
``डॉक्टरना फोन करायला.'' तो गेटबाहेर पडला.
तिला वॉर्डबाहेर येताना पाहून त्याच्या जीवात जीव आला. नाहीतर तासभर तो केवळ भिंतीवरचे घड्याळच पहात होता. दोन आकड्यांमधले अंतर त्याला मैलाप्रमाणे भासत होते. आज प्रथम त्याला आयुष्यात, वेळ थांबल्यासारखी वाटली जसा काळ नेहमी धावतो. आज तसे नव्हते.आता तो गतिमान झालाय हे त्याला तिचा थकलेला, पिवळट चेहरा पाहून कळले. ती त्याच्या कुशीत शिरली.
``खूप दुखले का?'' न राहवून त्याने विचारले.
``खूप.'' तिचा आवाज खोल गेला होता. थकली होती. तिला आधार देत तो व्हरांड्यात आला.
``मला चालवायचे नाही.''
``नको, तू इथे बस, मी टॅक्सी आणतो.''
``टॅक्सीसाठी पैसा का घालवायचा...''
``बोलू नकोस, स्वत:चा विचार कर.''
घरात गेल्या गेल्या त्याने तिला झोपायला सांगितले.
``खूप थकलेय. झोप येतेय, जणू कित्येक दिवसात झोपलेच नाही.''
``मग झोप ना.''
``नोबडी नीडेड हिम.''
``आता झोप! आपण विचारपूर्वकच निर्णय घेतला. आता त्याविषयी विचार करू नको.''
``नाही, आता आपल्याविषयी विचार करतेय. नोबडी नीडस अस. कोणाला आपली गरज नाही. त्याचीही आपल्याला गरज नव्हती आणि तसा कुणीच नसतो. पण त्यांचा गळा दाबून टाकला जातो. त्यांचे अस्तित्वही नसते जणू!''


Hiphop = "
Hiphop a> = " http://www.kodes.com "title Rap a >, Türkçe rap a> Gekko G a> = " http://www.maskanimasyon.com Mask Animasyon a> href="http://www.kodes.com/category/ceza/" title="ceza" target="_blank"> Ceza a> href="http://www.kodes.com/category/sagopa-kajmer/" title="sagopa kajmer" target="_blank"> Sagopa Kajmer a>
http://www.kodes.com/category/da-poet/
http://www.kodes.com/category/sansar-salvo/
http://www.kodes.com/category/emre-baransel/
http://www.kodes.com/category/kolera/
http://www.kodes.com/category/fuchs/
http://www.kodes.com/category/hiphop-videolari/
http://www.kodes.com/category/kadikoy-acil/
http://www.kodes.com/category/bitirim/
http://www.kodes.com/category/alaturka-mavzer/
http://www.kodes.com/category/sagopa-kajmer/
http://www.kodes.com/category/ceza/
http://www.kodes.com/category/cartel/
http://www.kodes.com/category/gekko-g/
http://www.kodes.com/category/ayben/
http://www.kodes.com/category/hip-hop
http://www.kodes.com/category/turkce-rap/
http://www.kodes.com/category/rap/
http://www.kodes.com/category/nesternino/
http://www.kodes.com/category/fuat-ergin/
http://www.kodes.com/category/killa-hakan/
http://www.kodes.com/category/istanbul-attack/
http://www.kodes.com/category/pit10/
http://www.kodes.com/category/patron/
http://www.kodes.com/
http://www.gekkog.com/
http://www.maskanimasyon.com/
http://www.gekkog.com/category/gekko-g/
http://www.gekkog.com/category/patron
http://www.gekkog.com/category/pit10//
http://www.gekkog.com/category/fuchs/
http://www.gekkog.com/category/kolera/
http://www.gekkog.com/category/hiphop/
http://www.gekkog.com/category/ceza/
http://www.gekkog.com/category/sagopa-kajmer/