- संवाद
- मातीचं आणि माणसांचं वेड जपणारे: राजेश कुलकर्णी
- वाटचाल 'मिळून सार्याजणी'ची
- मल्लिका साराभाई : नैतिकतेचं सौंदर्य
- आज 'सार्याजणी'त नसूनही......
- माझी समलैंगिकता, उमज... समज... सहज...
- कविता
- नकोसा
- स्त्री शक्तीची गावरान ठिणगी
- आरोग्यदायी
- निर्मितीच्या नव्या वाटेवर अमृता सुभाष
- गया आणि मी
- सबको सन्मति दे भगवान
- सातासमुद्रापलीकडच्या सख्या
- भातुकलीच्या खेळातलं वास्तव
- राजकारण्यांचे विनोद
- कळत कसं नाही!
- अथांगतेच्या पलीकडे
वाटचाल 'मिळून सार्याजणी'ची
`मिळून साऱ्याजणी' असे शीर्षकातूनच सर्व स्त्रियांना (शहरी-ग्रामीण, तसेच विविध समाजगटातीलही) - बरोबर घेऊन जायची ग्वाही देणारे हे मासिक वीस वर्षे पूर्ण करीत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. स्त्रियांसाठीचे पहिले मराठी मासिक `सुमित्र' (१८५५), मराठी स्त्रियांना आधुनिकतेच्या वळणापाशी आणणारे `स्त्री'(१९३०), आणि मराठी स्त्रियांना आत्मभान व समाजभान देणारे `मिळून साऱ्याजणी' (१९८९) या तीनही मासिकांची सुरुवात ऑगस्टमध्येच व्हावी, हा योगायोग आहे.
`स्वत:च्या विकासासाठी जाणीवपूर्वक जगणाऱ्या, बाईपणाला सहज ओलांडू बघणाऱ्या' साऱ्याजणींसाठी हे मासिक आहे. या संपादकांच्या भूमिकेमुळे हे मासिक प्रबोधनाचे काम करते. एखाद्या चळवळीचे मुखपत्र किंवा 'निखळ वैचारिक नियतकालिक' अशा स्वरूपाचे ते मासिक नाही. त्यामुळे कलात्मक बाज कायम राखून ते जाणीवजागृतीचा `वसा' सांभाळते. संस्थापक-संपादक विद्या बाळ, गेली दहा वर्षे त्यांच्या बरोबर संपादक मंडळात असणाऱ्या डॉ.गीताली वि.मं., आजवरच्या इतर सहकारी संपादक, `निरामय' ट्न्स्टची विश्वस्त मंडळी आणि हितचिंतक यांच्या एकत्रित परिश्रमाचे हे फळ आहे.
आपल्या भूमिकेचा पाठपुरावा करताना या मासिकाने ललितेतर वाङ्मयाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. मुलाखती, व्यक्तिपरिचय, विचारप्रवण लेख, पुस्तकपरिचय, संशोधनावर आधारित अभ्यासलेख, परिषदवृत्तांत अशा माध्यमांतून लिंगभावावर आधारित विषमतेला छेद देणारे स्त्रीकेंद्री लेखन यात सातत्याने प्रसिद्ध होत आले आहे. भारतीय संदर्भात `स्त्री-अभ्यास' या ज्ञानशाखेची पायाभरणी करणारे डॉ. विद्युत भागवत यांचे लेख, एकोणिसाव्या शतकातील `सुधारकांची साहसे' सांगून ऐतिहासिक परंपरेचे भान देणारी डॉ. अरूणा ढेरे यांची लेखमाला, जीवशास्त्राची साक्ष काढत उत्क्रांती आणि सामाजिक वास्तव यांचे संबंध लक्षात आणून देणारी डॉ. मिलिंद वाटवे यांची `नर-मादी ते स्त्री-पुरूष' ही लेखमाला, जागतिक पार्श्वभूमी सांगत स्त्रीप्रश्नाचा उलगडा करणारी `स्त्रीमुक्तीकडून मानवमुक्तीकडे' ही डॉ.यशवंत सुमंत यांची लेखमाला-ही याची काही ठळक उदाहरणे आहेत.
१९७५ च्या आंतरराष्ट्नीय स्त्रीवर्षामध्ये जगभर स्त्री चळवळीने मूळ धरले. अशावेळी स्त्रीला एकाचवेळी अंतर्मुख आणि समाजाभिमुख करण्याची गरज होती. या मासिकाने हे काम जाणीवपूर्वक केले. `स्त्री : असलेली, घडवलेली आणि दाखवलेली' (शर्मिला रेगे) , `निमित्त : अमेरिकन पुरुषांची नि:शब्द चळवळ' (गीताली वि. मं.), `पुरुषसत्ताकतेचं दमन हत्यार- बलात्कार' (मुक्ता मनोहर), `होय! मी स्त्रीवादीच आहे' (शशी देशपांडे), `सिंड्न्ेलाची गोष्ट उर्फ स्त्रीच्या मनात दडलेले स्वातंत्र्याविषयीचे भय' (प्रतिभा कणेकर), `स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास' (मिलिंद बोकील), `गजाआडच्या स्त्रिया' (सनोबर शेखर),`ख्रिस्ती स्त्रियांचे प्रश्न' (सिसिलिया कार्व्हालो), `आदिवासी परंपरेतील स्त्रीचे स्थान (रंजना कान्हेरे) अशा कितीतरी लेखांची येथे आठवण होते. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे ते आजच्या दलित लेखिका, रूथ मनोरमा, सामाजिक कार्यकर्त्या, मेधा पाटकर आदी अनेक कर्तृत्ववान स्त्रियांच्या जीवनगाथा यात समाविष्ट झाल्या आहेत. स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाचे-शारीरिक, मानसिक, सामाजिक, धार्मिक अशा सर्व प्रकारच्या अन्यायाचे-सर्वंकष दर्शन यातील अनेक लेखांमधून घडते. मेनोपॉज, स्त्री-सुंता, कुटुंबनियोजनाचे `लक्ष्य', `स्त्री भ्रूण हत्या, सरोगेट मदरहूड, स्त्रीची एड्सग्रस्तता, महिला आरक्षण अशा विषयांवरील लेख स्त्रीप्रश्नाचे विविध पैलू लक्षात आणून देतात. त्यातही जागतिकीकरणामागील राजकारण, अर्थकारण, विज्ञान-तंत्रज्ञान, सौंदर्यस्पर्धा, माध्यमसत्ता यांचा दूरदृष्टीने विचार करणारे यातील रा. प. नेने, मनीषा गुप्ते, संजय संगवई, पुष्पा भावे, डॉ. संजीवनी कुलकर्णी आदींचे लेख परखड चिकित्सेमुळे लक्षात राहतात.
वास्तवाचे यथातथ्य चित्रण करून न थांबता यातील लेख स्त्रीच्या भविष्यकालीन स्थितीत विधायक बदल होण्याची शक्यताही वर्तवतात. विविध स्त्रीपरिषदांमध्ये घडणारे विचारमंथन सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे - `विचारदूताचे' - कामही यातील लेख करतात. (पाहा: ब्रायटनची परिषद, (विद्या बाळ), मुस्लिम महिला परिषद- (रझिया पटेल)) समता, मानवता, न्याय, स्वातंत्र्य या मूल्यांचे बीजारोपण करण्यासाठी समाजमनाची मशागत करावी लागते. त्यासाठी या मासिकाने चर्चा/परिसंवाद योजून विचारांचे विविध पैलू समोर आणले आहेत. `लग्न: काही प्रश्नं, काही उत्तरं,' `स्त्री-मुक्ती चळवळ आणि राजकारण', `बापलेकीच्या नात्या, तुझा रंग आहे कसा?' असे चर्चाविषय सहज आठवतात. मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीसाठी पर्यायी विकासाची संकल्पना, पर्यावरण-रक्षण अण्वस्त्रबंदी जागतिक शांतता, विस्थापितांचे प्रश्न, ऊर्जाप्रश्न, न्यायसंस्था, इत्यादी विषयांचा वेध घेणारे यातील लेख त्यातील पुरोगामी दृष्टिकोनाचा ठसा वाचकाच्या मनावर उमटवण्यात यशस्वी ठरतात.
आपल्या वाचकांना मध्यमवर्गीय प्रवृत्तीच्या कोशातून बाहेर काढायचे आणि त्यांना राजकीयदृष्ट्या सजग करायचे प्रयत्नही संपादकांनी केलेले दिसतात. `पर्सनल इज पोलिटिकल' या स्त्रीचळवळीच्या घोषणेतूनच स्त्रियांना राजकीयदृष्ट्या सज्ञान करण्याची गरज निर्माण होते. वेगवेगळया स्त्रीप्रश्नांमागे अदृश्य रूपात असणारा राजकारणाचा वावर सहजासहजी लक्षात येत नाही. त्यासाठी `राजकारणाच्या अंगणात' हे सदर लिहून पुष्पा भावे यांनी केवळ प्रादेशिकच नव्हे, तर आंतरराष्ट्नीय राजकारणातील घटनांवरही प्रकाश टाकला आहे. विशेषत: `स्त्रियांचे जागरण २०००' (फेब्रु.२०००) या त्यांच्या लेखात त्यांनी युनोच्या सरचिटणीसांना पत्र लिहिण्याचे आवाहन महिलांना केले आहे. जगभरच्या स्त्रियांना भेडसावणाऱ्या गरिबी आणि हिंसा या समस्यांचे निर्मूलन करण्याची मागणी त्यात केली आहे. तसेच `राजकारण गेलं चुलीत?' (दिवाळी १९९९) हा गीताली वि. मं. यांनी मुलाखती व प्रश्नावली यांवर आधारित सादर केलेला परिसंवाद राजकीय पक्षांमधील स्त्रियांच्या स्थितीचे चित्र रेखाटतो. महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३% आरक्षण ठेवल्यामुळे बदललेल्या वास्तवाचे दर्शनही त्यातून घडते.
`मिळून साऱ्याजणी'ने स्थल आणि काल या दोन्ही संदर्भात जवळचे आणि दूरचे वास्तव एकाच वेळी सामावून घेतले आहे. त्यामुळे इ.स. पूर्व काळातील `थेरीगाथां'मधील बौद्धस्त्रीदर्शन आणि आताची नोबेल पुरस्कार विजेती शिरीन इबादी, तसेच पंचायत राज संवादयात्रा, भवरीदेवीचा लढा आणि ऑलिंपिंकमधील महिलांची झेप- असा स्त्रीच्या स्थितीमागचा मोठा पट वाचकांना जाणवू लागतो. त्याचवेळी कायदा, आहार, राजकारण, बचतगट, असांकेतिक सौंदर्यदृष्टी अशा बाबतीत स्त्रियांना यातून मार्गदर्शन मिळते.`गर्ल्स स्पीक आऊट`, `द होल वुमन', `द अदर फेस ऑफ दि मून', `एक्झिट हाऊस' अशा वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांचा सविस्तर परिचय करून त्यायोगे वाचकांच्या जाणिवांचे अवकाश व्यापक करण्यावर यात भर दिसतो. लोककला, नाटक, चित्रपट, संगीत, साहित्य या कलाक्षेत्रातील दिग्गजांच्या अनुभवाची बूज मासिकाने कायम राखली आहे. सावली मित्र, दीपा श्रीराम, सत्यजित राय, वसुंधरा कोमकली, कमल देसाई - आदी कलावंतांचा यातील सहवास वाचकांना संपन्न करतो. पत्रकारिता, विज्ञान, विनोद (व्यंगचित्रे) या क्षेत्रांनाही मासिकात योग्य ते स्थान असते. `अंधारातील तारका'सारखा लेख शास्त्रज्ञ स्त्रियांवर प्रकाशझोत टाकतो. एकंदरीत प्रबोधन आणि कलात्मता यांचा मेळ जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न यात दिसतो.
स्वत:च्या भूमिकेशी सुसंगत अशा आशयाच्या कथा-कविता `मिळून साऱ्याजणी'ने आवर्जून प्रकाशित केल्या आहेत. `निमंत्रित कथा' या सदरातून नामवंतांच्या कथांना स्थान दिले आहे. सानिया, गौरी देशपांडे, आशा बगे, प्रिया तेंडुलकर, नीता गद्रे, प्रमोदिनी वडके-कवळे, विद्युल्लेखा अकलूजकर, प्रकाश संत, प्रदीप पाटकर आदी कथा लेखकांची नावे वानगीदाखल देता येतील. त्याचबरोबर `अनुवादित कथामाला'ही यात सादर केली गेली आहे. चित्रा मुद्गल यांच्या नीला शर्मा कृत अनुवादित कथा (`देहद्वार') लक्षणीय आहेत. महाश्वेतादेवींच्या वीणा आलासे यांनी अनुवादित केलेल्या कथाही सरस आहेत. एम. के. इंदिरा या कन्नड लेखिकेची `फेणअम्मा' ही गाजलेली कलाकृती आपल्या मासिकातून अनुवादित करून संपादकांनी मराठी वाचकांची मोठीच सोय केली आहे. या अशा अनुवादामुळे मराठी कथेला नवीन परिमाणे मिळणे शक्य आहे. `रेऊ कथास्पर्धा' आयोजित करून संपादकांनी नवीन लेखकांना उत्तेजन देण्याचे धोरणही अंगीकारले आहे. लेखनविषयक ऊर्जेचे नवेनवे पाट वाहते ठेवणे आणि ते मासिकाकडे वळवणे, हे काम साहित्यनिर्मितीच्या संदर्भात नक्कीच मोलाचे आहे.
वैचारिक जागरण घडवणाऱ्या प्रथितयश कवींच्या कवितांमुळे `मिळून साऱ्याजणी'चा काव्यविभाग उठून दिसतो. ना. धो. महानोर, इंद्रजित भालेराव, आसावरी काकडे, अश्विनी धोंगडे, हेमंत जोगळेकर, प्रज्ञा पवार यांच्यासारख्या मान्यवर कवींबरोबरच एखाद्या आडगावच्या कलाक्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या कलावंताच्या पहिल्यावहिल्या उद्गारांनाही यात स्थान मिळाले आहे. मनात विचारभावनांचे स्फुलिंग पेटवण्याची ताकद ही बाब कवितानिवडीसाठी निकष मानल्यामुळे संपादकांनी कलात्मक अंगांना काहीसे गौण लेखले आहे. मात्र ही कसर भरून काढण्यासाठी की काय, प्रवासिनी महाकुंड, तसलीमा नासरीन, चंद्रप्रकाश देवल आदी भारतीय भाषांतील कवींच्या कविता, एवढेच नव्हे; तर जगभरच्या उत्तमोत्तम कविता यात वेळोवेळी समाविष्ट ाल्या आहेत. अॅडि्न्यन रिचच्या या अनुवादित ओळी संवेदनशील वाचक विसरू शकणार नाही. त्या अशा :
``मी एकटी आहे, हे खरंच आहे
पण सगळयांच्या आधी जागी झालेय
म्हणून मी एकटी आहे'' (अनुवाद :विद्युत भागवत)
असं आत्मभान आलेल्या स्त्रीचे स्वयंप्रकाशित एकटेपण (दुबळे एकाकीपण नव्हे!) व्यक्त करणाऱ्या या ओळी मनाला नवी उभारी देतात.
`मिळून साऱ्याजणी'ने अनुभवकथनाला खूपच महत्त्व दिले आहे. त्यातही शहरी आणि ग्रामीण दोन्ही स्तरातील लेखन समाविष्ट केले आहे. `झुंजूमुंजू' या विभागातील कष्टकरी महिलांनी विपरीत परिस्थितीला टक्कर देत स्वत:च्या पायांवर उभं राहण्यासाठी केलेल्या धडपडीचे अनुभव' सामाजिक दस्तऐवज म्हणूनही महत्त्वाचे आहेत. `सवितराच्या डायरीतील पाने' (दिवाळी, ९९), `मी अशी घडले' (जून ०८) अशी अनेक मनोगते सामाजिक स्थित्यंतराच्या प्रक्रियेचा प्रत्यय देतात.
व्यक्तीच्या आंतरिक भावविश्वाची स्पंदने टिपण्याची गरज ओळखून `स्वत:शी नव्याने सतत संवाद साधणारे मासिक' म्हटल्यावर या मासिकाने अनेकांना स्वत:च्या मनाचा कानोसा घ्यायला प्रवृत्त न केले तरच नवल! त्यासाठी `माझ्या जाणिवेचा प्रवास', `माझ्या भूमिकेने मला काय दिले?', `माझी स्वातंत्र्याची लढाई' असे विविध विषय यात सुचवलेले दिसतात. `पंख छाटून उडायला सांगता काय?' असा मनस्विनी लता रवींद्र (वय वर्षे बारा) हिचा उत्कट अनुभव असो, किंवा अनिल अवचटांचे स्वयंपाकघरातले खमंग अनुभव असोत, त्यांतून नवे वारे वाहू शकतात; हा दिलासा मिळतो. `मिळवतीची पोतडी' (नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे अनुभव), `लिहिणाऱ्या बोलतात तेव्हा.....' (मंगला गोडबोले यांनी लिहिलेली विविध भारतीय भाषांतील लेखिकांचे अंतरंग उलगडून दाखवणारी मालिका) ही सदरे यादृष्टीने महत्त्वाची आहेत. `व्हजायना मोनोलॉग्ज' (परिचय - मीनाक्षी दादरावाला)विषयी वाचताना यात स्त्रीची आजवर अव्यक्त राहिलेली स्वगतेही व्यक्त झाली आहेत; हे आवर्जून नोंदवावेसे वाटते. स्त्रियांचे ओठाच्या उंबऱ्यात अडखळून थांबलेले शब्द आणि विचार फार महत्त्वाचे ठरतात. पुरातन वस्तुसंशोधनात मातीखाली गाडल्या गेलेल्या अवशेषांचे जे महत्त्व आहे; ते त्यांना आहे' हे संपादक विद्या बाळ यांचे पहिल्या अंकातील म्हणणे रास्त आहे. यातील अनुभवकथनांचे एखाद्या स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या अभ्यास प्रकल्पाच्या माध्यमातून विश्लेषण होणे गरजेचे आहे.
`मिळून साऱ्याजणी'चे दर्शनी रूपही दर्जेदार राहिले आहे. `हटके' अशा कलात्मक मुखपृष्ठांची येथे आठवण होते. तसेच समकालीन प्रश्नांविषयी संवेदनशीलता व्यक्त करणारी मुखपृष्ठे - मे २००८ चे दगडखाण महिला कामगारांचे दर्शन घडवणारे मुखपृष्ठ व कर्त्या पुरुषांची आत्महत्या केलेल्या घरातील स्त्रियांची आठवण करून देणारे मार्च २००८ चे मुखपृष्ठ लक्षात राहतात. या मासिकाला सर्वसामान्य वाचकांबरोबरच चोखंदळ वाचकांकडूनही पसंती मिळाली आहे. आज संकेतस्थळामुळे त्याचे प्रतिसादक्षेत्र व्यापक झाले आहे. वाचकचर्चांसाठी वेगळे विषय सुचवल्यामुळेही वाचकांना हे मासिक आपले वाटते. `माणूसपणाच्या प्रवासातले टाकीचे घाव', `मी सासरी जातो', `आम्ही मुलींकडे राहतो', `आई वडिलांचा पुनर्विवाह', `आम्ही दोघे संसार करतो' हे विषय वाचकांना विचारप्रवृत्त करणारेही आहेत. जागरुक वाचकांकडून मासिकाला `फीडबॅक' मिळताना दिसतो. त्यात खुषीपत्रांबरोबरच सूचना, टीकाही दिसते. डॉ. मंगला नारळीकरांनी एका पत्रातून विवाहित स्त्रियांच्या मुलाखतीत माहेरची माहिती नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. (डिसेंबर, ०८) `संवाद` म्हटला की त्यात `वाद' ही आलाच. असे वादही यात झडले आहेत. त्या त्या वेळी आपल्या ध्येयधोरणांशी ठाम राहून संपादकांनी विरोधी मते प्रकाशित करण्याचा मोठेपणाही दाखवला आहे.
`मिळून साऱ्याजणी'तील सदरांची शीर्षके मासिकाचा ताजेपणा टिकवून ठेवतात. `तरुण डॉट कॉम', `पाणबुडी', `आरसा', `मैतरिणी ग मैतरिणी', 'वेड्यांच्या गोष्टी', `बोलकं पत्र' ही शीर्षके वेगळी आहेत. अंकाचे `वर्षारंभ विशेषांक', `महिलादिन विशेषांक', `दिवाळी विशेषांक', `कथा विशेषांक', `दशकपूर्ती विशेषांक', `गौरी देशपांडे विशेषांक' संग्राह्य आहेत.
`मिळून साऱ्याजणी'ने वाचकांच्या मनात मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत. मात्र काही वेळा वाचकवर्ग सांभाळताना मासिकाला कसरत करावी लागते आहे. अन्यथा माध्यमांनी वलय निर्माण केलेल्या `व्हॅलेंटाईन डे'साठी `मिळून साऱ्याजणी'ला पुरवणी काढावीशी का वाटावी? एकंदरित वाचकांचा अनुनय न करता नव्या जाणिवेची पाठराखण करणे सोेपे नाही. तसेच नवलेखकांच्या लेखनावर कलात्मक संस्कार होण्यासाठी मासिकाने कथालेखनासाठी कार्यशाळा आयोजित करण्याचा उपक्रम सतत करायला हवा. प्रबोधनासाठी केवळ जाणीवजागृतीवर भर न देता नेणिवेला आवाहन करणाऱ्या अभिजात साहित्याचे महत्त्व शेवटी अनन्यसाधारण आहे.
`मिळून साऱ्याजणी'ने आजवर वर्तमानाचे भान ठेवून `जागल्या'ची भूमिका बजावली आहे. त्याचवेळी वाचकाला अभिव्यक्तीसाठी हक्काचे व्यासपीठही उपलब्ध करून दिले आहे. (अधूनमधून शोधपत्रकारितेचे दर्शनही यातून घडायला हरकत नाही!) स्त्रियांसाठी असलेल्या या मासिकाला सुजाण पुरुषवाचकांची साथ आहेच. (`स्त्रीवादी पुरुष' ही संकल्पना मांडणारा डॉ. विलास साळुंके यांचा लेख येथे आठवतो.) जानेवारी ०९ पासून मासिकाने आपले घोषवाक्य बदलले असून `स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वत:शी आणि परस्परांशी संवाद साधावा यासाठी' अशी व्यापक भूमिका घेतली आहे. यातून इष्ट अशा सामाजिक अभिसरणाला चालना मिळेल, असा विश्वास वाटतो. `मिळून साऱ्याजणी'च्या आजवरच्या वाटचालीबद्दल त्यांच्या संपूर्ण टीमचे मी वाचकांतर्फे मन:पूर्वक अभिनंदन करते व पुढच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देते.


http://www.kodes.com/category
http://www.kodes.com/category/sansar-salvo/
http://www.kodes.com/category/emre-baransel/
http://www.kodes.com/category/kolera/
http://www.kodes.com/category/fuchs/
http://www.kodes.com/category/hiphop-videolari/
http://www.kodes.com/category/kadikoy-acil/
http://www.kodes.com/category/sagopa-kajmer/
http://www.kodes.com/category/ceza/
http://www.kodes.com/category/cartel/
http://www.kodes.com/category/gekko-g/
http://www.kodes.com/category/ayben/
http://www.kodes.com/category/hip-hop
http://www.kodes.com/category/turkce-rap/
http://www.kodes.com/category/rap/
http://www.kodes.com/category/nesternino/
http://www.kodes.com/category/fuat-ergin/
http://www.kodes.com/category/killa-hakan/
http://www.kodes.com/category/istanbul-attack/
http://www.kodes.com/category/pit10/
http://www.kodes.com/category/patron/
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/
http://www.gekkog.com/
http://www.maskanimasyon.com/
http://www.gekkog.com/category/gekko-g/
http://www.gekkog.com/category/patron
http://www.gekkog.com/category/pit10//
http://www.gekkog.com/category/fuchs/
http://www.gekkog.com/category/kolera/
http://www.gekkog.com/category/hiphop/
http://www.gekkog.com/category/ceza/
http://www.gekkog.com/category/sagopa-kajmer/
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015