मानसिक आरोग्यासाठी स्त्य्त्य उपक्रम

इस्पितळ, रुग्णालय हे शब्द उच्चारल्यावर जे चित्र आपल्या मन:चक्षूवर उमटते तेच मनोरुग्णालय म्हटल्यावर उमटत नाही. मनोरुग्णालयांच्या वास्तू म्हणजे मानसिक आजारांकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनाचे जणू प्रतीक चिन्हच आहे. मोठाल्या बराकी, उंच भिंती, गजांमागे विशिष्ट पेहरावातले लोक, त्यांच्यावर करडे नियंत्रण ठेवणारे वॉर्डर ही तुरुंग आणि मनोरुग्णालयातील साम्यस्थळं. मानसिक आजाऱ्यांच्या व्यवहारांना गूढ, वायफळ, इतरांना धोकादायक व समाजात निरुपयोगी या चौकटीतून पाहिल्याने मानसिक आजाऱ्यांची भलती फरपट होते. इतर कुठल्याही आजारी व्यक्तीप्रमाणे मानसिक आजारी व्यक्तींनाही आप्तांच्या मदतीची, सहानुभूतीची गरज असते. पण बऱ्याचदा उपचारांच्या नावाने केवळ औषधे, शॉकट्नीटमेंट यावर भर दिला जातो. काही गंभीर मानसिक आजार कायमचे चिकटतात. अशा गंभीर मानसिक आजारी व्यक्तींचे समाजात सन्मानाने पुनर्वसन व्हावे, त्यांच्या कुटुंबीयांचे, समाजाचे सहकार्य त्यांना मिळावे यासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत. परंतु येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय व स्किझोफ्रेनिया असोसिएशन (डअअ)- `सा' या संस्थेच्या विद्यमाने रुग्णालयाच्या आवारातच मानसिक आजारी व्यक्तींच्या नातेवाइकांचा मेळावा घेण्यात आला. मनोरुग्णालयात आलेले रुग्ण, नातेवाईक यांच्यासाठी हा मेळावा `न भूतो' असा अत्यंत महत्त्वाचा योग होता.

बऱ्याचदा केवळ विकारपीडित अवस्थेमुळे मानसिक आजारी व्यक्तींवर समाज-बहिष्कृत होण्याची वेळ येते. या व्यक्ती पूर्णत: परावलंबी होतात. आर्थिक सुस्थिरतेसाठी चाललेल्या रेटारेटीत तर अशा व्यक्तींच्या समस्यांना महत्त्वच मिळत नाही. `केमिकल लोचा होणे' याला कुणीच व्यक्तिगत पातळीवर जबाबदार नसते. परंतु अशा व्यक्तींना मात्र या समस्येमुळे रस्त्यावर बेवारस मृत्यूला सामोरं जावं लागतं. अन्यथा वर्षानुवर्षे रुग्णालयात खितपत पडावं लागतं. मानसिक आजारांबद्दलचे अज्ञान, मानसिक आजारांना कलंक म्हणून पाहण्याची वृत्ती व त्यामुळे नातेवाइकांमध्ये निर्माण झालेली लज्जेची, भीतीची भावना यामुळे आजारी व्यक्तींच्या कुटुंबीयांची अवस्थाही बिकट असते. काही वेळा व्यक्तीला झटकून टाकण्यासाठीही मनोरुग्णालयात कायमचे सोडून दिले जाते. मालमत्तेतील दावेदार कटवणे, दुसऱ्या लग्नासाठी आधीच्या बायकोला आजाराची सबब दाखवून सोडणे असे हितसंबंधही मानसिक आजारांशी निगडित समस्येमध्ये गुंतलेले आहेत. या समस्यांवर मनोरुग्णालयाने उचललेले प्रतिबंधात्मक पाऊल म्हणूनही या मेळाव्याकडे पाहाता येईल.

संयुक्त राष्ट्न्संघ परिषदेने मानसिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीच्या हक्क संरक्षणार्थ `कन्व्हेन्शन ऑन दि राईट्स ऑफ पर्संन्स विथ डिसॅबिलिटीज' ही आंतरराष्ट्नीय सनद प्रसारित केली आहे. या सनदेतील कलम-८, १९ व २३ प्रमाणे मानसिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना इतर कोणाही व्यक्तीप्रमाणे समाजात राहण्याचा हक्क आहे. यामध्ये अशा व्यक्तींचा समाजात सन्मानाने स्वीकार व्हावा, त्यांना इतरांप्रमाणेच सर्वार्थाने सुयोग्य जीवनमान राखता यावे यासाठी जागृती करण्याची जबाबदारी त्या त्या देशातील सरकारवर असल्याचे नमूद केले आहे. या दृष्टीने विचार करताही या `नातेवाईक' मेळाव्याचे विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्नत चार रुग्णालयांच्या मार्फत निवासी मानसिक औषधोपचाराच्या सेवा दिल्या जातात. परंतु मानसिक आजारी व्यक्तींचे पुनर्वसन व्हावे, विकेंद्रित पद्धतीने प्रभावी मानसिक आरोग्य सेवा द्याव्यात अशी यंत्रणा इतर आरोग्य यंत्रणेप्रमाणे कार्यरत नाही. समाजाचा मनोविकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, गावस्तरावरील प्रतिबंधात्मक व संदर्भ सेवा देणाऱ्या यंत्रणेचा अभाव अशा अनेकविध कारणांमुळे मानसिक आरोग्य सेवा म्हणजे `मेंटल हॉस्पिटल' असे समीकरण बनले आहे. त्यामुळेच अनेक रुग्णांचे नातेवाईक रुग्णांना वर्षानुवर्षे दवाखान्यातच सोडून जातात. यासाठी केवळ औषधोपचार सेवांपुरते मर्यादित न राहता समाजाभिमुख मानसिक आरोग्य सेवांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर `सा' च्या पुढाकाराने भरविण्यात आलेला हा पहिलावहिला मेळावा अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेची सुरुवात आहे.

`जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया.. जे शक्य आहे, निर्धार दे कराया... माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया'... या प्रार्थनेने मेळावा सुरू झाला. गंभीर मानसिक आजार हे एक वास्तव आहे. त्याचा स्वीकार मानवी भूमिकेतून व्हायलाच हवा. किंबहुना आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील कटू वास्तवाचा सामना करण्याचं बळ आपणच मिळवायचं असतं. मनोरुग्णांना तर इतर कोणाही रुग्णासारखीच (अधिकच) आप्तांच्या मदतीची गरज असते. ही सहभावना आपल्यात विकसित व्हावी यासाठीची ही प्रार्थना. ती आपल्या समाजानं स्वीकारल्यास आपण खराखुरा सहृदय, प्रगल्भ समाज पाहू शकू. मेळाव्यापुरते बोलायचे झाल्यास नातेवाइकांनी मनोरुग्णास समजून घेतल्यास अर्धी लढाई जिंकल्यासारखे होते. यासाठी मेळाव्याचे प्रयोजन असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पहिलाच मेळावा असूनदेखील पन्नासहून अधिक नातेवाइकांनी या मेळाव्यात हभाग घेतला. `सा'च्या मानसशास्त्रज्ञ-कार्यकर्त्या चित्रा खरे यांच्या प्रयत्नातून हा मेळावा शक्य झाला.

येरवडा मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. यादव मार्गदर्शन करताना म्हणाले, मनोविकाराचे लवकर निदान व उपचार शक्य झाल्यास ते आटोक्यात येऊ शकतात. परंतु मनोविकारतज्ज्ञाकडे आणण्यापूर्वी रुग्णाच्या नातेवाइकांनी हजारो रुपये कर्मकांडावर खर्च केलेले असतात. यासाठी मनोविकाराशी निगडित लोकशिक्षणाची अत्यंत गरज आहे. शारीरिक आजारांप्रमाणे मानसिक आजारांचे सहज निदान व उपचार शक्य होत नाही. व्यक्तीचे शिक्षण, आर्थिक स्तर, आप्त, वाढीची प्रक्रिया या सर्वांचा विचार मनोविकारांच्या उपचारात केला जातो. नियमित औषधोपचार व इतरांच्या मदतीतून गंभीर मानसिक आजारांची लक्षणे आटोक्यात आणता येतात. काहींना आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. तर काहींचा आजार आटोक्यात आल्यास ती थांबवली जातात. सोबत मानसोपचारांचीही गरज असते. तसेच व्यवसायोपचारातून व्यक्तीला आवडणाऱ्या व्यवसायाचे कौशल्य हस्तगत करण्यास मदत केल्यास अशी व्यक्ती स्वावलंबी जीवनही जगू शकते. जिल्हा माहिती उद्योग कंेद्र व आयटीआयच्या सहकार्याने असे उपक्रम मनोरुग्णालयात राबविले जाणार आहेत. महाराष्ट्नतील दूरदूरच्या भागातून रुग्णाच्या नातेवाइकांना नेहमी येणे शक्य होत नाही. गाडीभाडे परवडत नाही. त्यामुळे औषधोपचारात खंड पडून आजार बळावतो. म्हणून गाडीभाड्यात सवलत मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या अशी सवलत केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळते; परंतु ती सर्वांना मिळावी यासाठी समाजकल्याण मंत्र्यांना शिफारस करण्यात आली आहे. मनोरुग्णांच्या नातेवाइकांनी संघटित प्रयत्न केल्यास हे प्रयत्न लवकर फलद्रूप होतील.

मनोसामाजिक कार्यकर्त्या श्रीमती देशपांडे म्हणाल्या, कोणत्याही इस्पितळातून रुग्णाने बरे होऊन पुन्हा आपल्या आप्तांसोबत जावे अशी अपेक्षा असते. परंतु मनोरुग्णांबाबत परिस्थिती बदलते. दवाखान्यात रुग्ण तज्ज्ञांच्या देखरेखीखाली असतात. परंतु घरी ते शक्य होत नाही. कुुटुंबातील मुलांच्या परीक्षा, इतर कार्यव्यवधाने तसेच आजूबाजूच्या लोकांचा दबाव यामुळे रुग्णाला घरी नेण्यात दिरंगाई होते. रुग्णालय हे आश्रम नसून उपचार केंद्र आहे. रुग्णाला घरची आठवण येत असते. अनेक रुग्ण घरी जाण्यासाठी विनवण्या करतात. अनेकविध कारणांनी रुग्णाला सांभाळणे कठीण, क्लेशदायक असले तरी, नातेवाइकांनी व समाजाने सहानुभूतीने विचार केल्यास या व्यक्ती समाजात ताठ मानेने जगू शकतील.

स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना `सा'च्या स्वमदत गटाकडून `शुभार्थी' हे संबोधन वापरले जाते. शुभार्थी म्हणजे जी व्यक्ती आपल्या जीवनातील शुभ-अर्थ शोधू पाहात आहे, अशा व्यक्तीप्रती समाजाने व नातेवाइकांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा. शुभार्थींना होणारे भास त्यांच्यासाठी वास्तव असते. अशा शुभार्थींसाठी झटणारे पालक श्री. अरविंद पेठकर हे आपले अनुभव सांगताना म्हणाले, `ज्याचं जळतं, त्याला कळतं' याची अनुभूती घेऊन रुग्णाचे त्रास कमी कसे होतील यावर आपले लक्ष केंद्रित करायला हवे. रुग्णात बदल करण्यासाठी आपल्याला स्वत:मध्येच खूप बदल करावे लागतात. पालकांनी एकमेकांचे अनुभव वाटून घेतल्यास परस्पर प्रात्यक्षिक मिळते. गटामध्ये आल्याने रुग्ण व नातेवाइकांच्या वेदना, दु:ख, त्रास कमी होत नाहीत मात्र त्यांचा स्वीकार स्वमदत गटाच्या मदतीने करता येतो. रुग्णाबद्दलची चिडचिड कमी होते. कुटुंबात कोणा एकावरच ही कठीण जबाबदारी पडते. ती घेण्याने आपल्याच जीवनाला नवा अर्थ मिळतो. असे उदात्त उद्दिष्ट मिळणे हे का कमी आहे? अशा सुज्ञ नातेवाइकांना शुभंकर हे संबोधन `सा'मध्ये वापरले जाते.
चित्रा खरे यांनी नातेवाइकांची भूमिका स्पष्ट केली. आजारी व्यक्तींंना इतरांच्या मदतीची सातत्याने गरज असते. आजाराला ना ती व्यक्ती जबाबदार असते ना कुटुंबीय. नातेवाइकांशिवाय रुग्णाला समजून घेणारं कुणी नसतं. डॉक्टरांना माहिती पुरवणे, रुग्णाला लांबलचक सूचना न देणे, संकटप्रसंगी मदत करू शकणाऱ्यांना विश्वासात घेऊन ठेवणे. ही खबरदारी नातेवाइकांनी घ्यायला हवी. तसेच आजाऱ्यांना धमकावणे, टीका करणे, दडपण आणणे, त्यांच्याशी वाद घालणे हे टाळावे. पण केवळ उपदेशात्मक भाषणबाजीही करू नये. इ. महत्त्वाच्या सूचना सविस्तर समजावल्या गेल्या. आैंषधे ही प्राथमिक उपचाराचे कार्य करतात, मात्र रुग्णाची केवळ नि:शब्द सोबत केल्यानेही त्यांना आधार मिळू शकतो.

मेळाव्यात काही नातेवाइकांनीही आपले मनोगत प्रकट केले. रुग्णांना दाखल करण्याची न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत किचकट असून त्यात बदलाची गरज नातेवाइकांच्या प्रतिनिधींनी संागितली. काही नातेवाइकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. मानसिक आजारी व्यक्तींचे समाजात सन्मानाने पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनेे हा मेळावा एक महत्त्वाचे पाऊल आहे. असे मेळावे दर तीन महिन्यांतून एकदा येरवडा मनोरुग्णालयात आयोजित केले जाणार आहेत. तसेच आठवड्यातून दोनदा गटचर्चांच्या माध्यमातून शंकानिरसन, समुपदेशनाचा उपक्रमही राबवला जात आहे.
केवळ उपचारात्मक सेवा दिल्याने मनोविकारासंबंधी प्रश्न सुटत नाहीत. मेंटल हॉस्पिटल ही केवळ उपचारात्मक सेवा देणारी संस्था न राहता, तीमधून समाजात लोकशिक्षण करणे, केवळ औषधांवर अवलंबून न राहता समाजात श्रेयस्कर पार्श्वभूमी तयार करणे इ. प्रयत्न होणे ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. एकूणच मानसिक आरोग्याकडे विशाल नजरेने पाहण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे.

http://www.kodes.com/category

http://www.kodes.com/category/sansar-salvo/
http://www.kodes.com/category/emre-baransel/
http://www.kodes.com/category/kolera/
http://www.kodes.com/category/fuchs/
http://www.kodes.com/category/hiphop-videolari/
http://www.kodes.com/category/kadikoy-acil/
http://www.kodes.com/category/sagopa-kajmer/
http://www.kodes.com/category/ceza/
http://www.kodes.com/category/cartel/
http://www.kodes.com/category/gekko-g/
http://www.kodes.com/category/ayben/
http://www.kodes.com/category/hip-hop
http://www.kodes.com/category/turkce-rap/
http://www.kodes.com/category/rap/
http://www.kodes.com/category/nesternino/
http://www.kodes.com/category/fuat-ergin/
http://www.kodes.com/category/killa-hakan/
http://www.kodes.com/category/istanbul-attack/
http://www.kodes.com/category/pit10/
http://www.kodes.com/category/patron/
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/
http://www.gekkog.com/
http://www.maskanimasyon.com/
http://www.gekkog.com/category/gekko-g/
http://www.gekkog.com/category/patron
http://www.gekkog.com/category/pit10//
http://www.gekkog.com/category/fuchs/
http://www.gekkog.com/category/kolera/
http://www.gekkog.com/category/hiphop/
http://www.gekkog.com/category/ceza/
http://www.gekkog.com/category/sagopa-kajmer/
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015