Skip to main content

दोन जिने चढून मी आणि सब-इन्स्पेक्टर मानिनी त्या मोठ्या दरवाज्यातून आत शिरलो तर वाटलं की दुसऱ्याच जगात आलो आहोत. मानिनीसाठी हे जग नवीन नव्हतं. माझ्यासाठी मात्र नक्कीच नवं होतं. बाहेरून साधंसं दिसणारं हे घर आतून एवढं आलिशान असेल असं मला मुळीच वाटलं नव्हतं.
गेले कित्येक दिवस मानिनी मला सांगत होती. तरीही मी एवढी कल्पना केली नव्हती, करूच शकत नव्हते. ओळीने अंथरलेले इराणी गालिचे, हंड्या-झुंबरं, चारी बाजूंना सुंदर सुंदर पेंटिंग्ज. मी चकित होऊन बघत होते. डोळे मिटायला लागले. वाटलं, इथे झगझगीत उजेड आहे, रसिकांनी हॉल भरला आहे - फिल्मी मुजऱ्यात असतो तसा. मला वाटायचं, ``मुजरे आता इतिहासजमा झाले आहेत. त्यांची शान आणि रंगत फक्त सिनेमापुरतीच राहिली आहे.'' पण इथे तर घुंगरांचा आवाजही ऐकू येऊ लागला होता. तबल्याची थाप... `इन्ही लोगोंने, इन्हीं लोगोंने'... गुलाबी गरारा-खमीस-दुपट्टावाल्या लचकणाऱ्या-मुरकणाऱ्या मीनाकुमारी, मधुबाला आणि देव जाणे आणखीही कितीतरी हिरॉइन्स माझ्या मिटल्या डोळयांसमोर साकार झाल्या.
अचानक मायाजाल विरलं. आतून बोलावणं आलं होतं. वेळ दिवसाची होती. सूर्यप्रकाशच पुरेसा होता त्या हॉलमध्ये उजेडासाठी. त्या हॉलला लागूनच एक छोटीशी खोली होती. हॉलचाच आतला भाग असावा अशी. इथून पुरा हॉल दिसू शकत होता. पण हॉलमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यातही आलं नसतं की आडून कोणी तिला बघत असेल. बाहेर बसले होते तेव्हा मलाही कळलं नव्हतं की माझ्यावर कोणाचं लक्ष आहे.

काश्मिरी नक्षीच्या एका सुंदर, पुरातन कोचावर एक बाई अर्धवट पहुडली होती. आम्हांला बघून तिने जरासं उठल्यासारखं केलं, पण तिची सवय म्हणा किंवा अहंकार, ती उठली मात्र नाही. आल्यागेल्यासमोर उठायची सवय नसावी तिला. तिने अंगात जे काय घातलं होतं, त्याला मी आजपर्यंत काही नाव देऊ शकले नाही. पण ज्या तऱ्हेने आमच्यासमोरही ती अशीच आडवीच होती, त्यावरून वाटत होतं की अनोळखी व्यक्तीसमोर, निदान बायकांसमोर या कपड्यात असायला तिला गैर वाटत नसावं. सोयीसाठी, दंडाच्या खालपर्यंत सैलसर असलेल्या त्या वस्त्राला गाऊन म्हणता येईल.

``ये मानिनी,'' म्हणत तिने बाजूच्याच कोचाकडे हात केला. ती बाई मानिनीला चांगलं ओळखत होती, हे उघडच होतं.

अजून त्या हॉलच्या आलिशानतेच्या धक्क्यातून सावरले नव्हते, तोच माझं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे वेधलं गेलं. तिचं वय कमीत कमी साठच्या आसपास तरी होतंच. कदाचित जास्तही असेल, पण चेहऱ्यावर काय चमक होती! काय रंगत होती! एकदम गुलाबी, सुगंधित. या वयातही चांगल्या चांगल्या रूपवतींना पाणी पाजलं असतं तिनं. या सौंदर्याचं रहस्य तरी काय आहे, या विचाराने मी बुचकळयात पडले होते.

त्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित फुललं. ``ह्या कोण आहेत तुझ्याबरोबर, मानिनी?'' असं म्हणत तिने मला खुणेनेच जवळ बोलावलं. मी पुढे गेले तर अलगद माझा हात धरला. कापसाची लड हाताला गुंडाळल्यासारखं वाटलं. बस, एक मंद हास्य. नि:शब्द.

`देवा, कुठे येऊन पडलेय मी? कुठल्या मायानगरीत आल्येय? ज्या कामासाठी आलेय, ते खाक करणार!' मी विचार करत होते. मानिनी तिला माझ्याविषयी सांगत होती आणि माझ्या मनात येत होतं - `वेश्या आणि असं पवित्र सौंदर्य! स्मित असं वाटावं की स्मितहास्य म्हणजे काय ते अख्ख्या जगात फक्त हिलाच ठाऊक आहे.'

या होत्या नैनादेवी.

आधीच्या आठवड्यात कामाच्या संदर्भात या कोठ्यांवरच माझे दिवस जात होते. दिवस म्हणजे दिवसच. त्या काळात मी एका एन.जी.ओ. साठी काम करत होते. वेश्यांविषयी माहिती गोळा करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. त्यांची परिस्थिती, त्यांच्या समस्या वगैरे माहिती.
आणि या बदनाम वस्तीत या बायकांकडे सुरक्षितपणे येण्याजाण्यासाठी मला पोलिसांचा आधार घ्यावा लागला होता. सब-इन्स्पेक्टर मानिनी आणि दोन हवालदार रोज माझ्याबरोबर यायचे. ऑफिसरांनी दोनतीन दिवस म्हटलं होतं, पण आठवडा उलटून गेला होता. तरीही मला सोबत करण्याची ड्युटी ते तत्परतेने करत होते. त्यांनाही इकडची हवा मानवत असावी. रोज एकदोन तास असं दोनतीन दिवस जावं लागेल असं वाटलं होतं. पण वेळ वाढतच गेला. असं असूनही त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या नाहीतच, उलट ते जास्तच खूष झाल्यासारखे वाटले. मानिनी माझ्याएवढीच होती. आमची मैत्री झाली. खरं तर ती माझी गाईडच झाली.

नैनादेवींविषयी ती सुरुवातीपासूनच सांगायची. पण ती म्हणायची, ``आणी दुसऱ्या कोठ्या बघू या. एकदा तिकडे गेल्यानंतर इतर ठिकाणी जाणं कठीण पडेल. आपल्या परंपरा खऱ्या अर्थाने जपणाऱ्या कलावंतिणींच्या फक्त दोनतीनच कोठ्या या बाजारात तग धरून आहेत. बाकीच्या या बाजाराच्या आणि नव्या वातावरणाच्या उदरात गडप झाल्या.''

खरंच असावं मानिनी बोलली ते. काही ठिकाणी घुसमटीमुळे मला चक्कर यायची तेव्हा वाटायचं - कशा राहत असतील या मुली अशा अमानुष वातावरणात! कुठे कुठे तर आठ बाय आठ नाहीतर सहा बाय सहाच्या खोल्या. खोल्या कसल्या, त्यांची थडगीच ती. हवा येण्याजाण्यासाठीही जागा नाही. सिगरेट, दारू आणि घुसमटीचा सरमिसळ भपकारा हवेत असा काही मिसळलेला होता की दिवस असूनही वाटायचं - आणखी किती वेळ या नरकात उभं राहावं लागणार आहे मला? पण त्या मात्र खिलखिलत असायच्या, हसायच्या, पण मला मात्र घाबरल्यासारखं व्हायचं. काहीजणी रडायच्या आपल्या आयुष्याच्या कथा संागताना. त्यावर मानिनी तोंड वळवून हळूच हसत असायची.

नंतर मानिनी संागायची, ``यांच्या अर्ध्या बाता असतात. हे लक्षात घेऊन ऐका.''

दिवसा सर्वसामान्य घरासारखं चालणारं आयुष्य. कुठे कपडे धुताहेत, कुठे कालवण रटरटतंय, मुलांची पिरपिर. बाहेर वाळणाऱ्या कपड्यांच्या मध्येच सज्ज्यावर झुलणाऱ्या मुली. काहीतरी शोधणारे डोळे. एखादे वेळेस दिवसाच गिऱ्हाईक यायचं. इशारे, डोळे मोडणं बाहेरूनही आरामात नजरेला पडायचं. काही ठिकाणी गच्च्यांवरून डोळयांनीच हाणामारी- तुझं गिऱ्हाईक, माझं गिऱ्हाईक.

इथे अत्तराचा सुगंध येत होता. थोड्याच वेळात बासमतीचा सुवास येऊ लागला. शुद्ध डेहराडुनी बासमतीचा. भाताचा असा वास कित्येक वर्षांत आला नव्हता. आता मिळतात तरी कुठे दिल्लीत असे बासमती? हरियाणा, पंजाबच्या गोण्यांवर डेहराडूनचा शिक्का मारतात. झाला बासमती. तीन वाजून गेले होते. यावेळी स्वयंपाक चालू आहे. सुरुवातीला या भागात मला विचित्रच वाटायचं, यावेळी जेवण म्हणजे. मानिनीला विचारलं तर हसायला लागली. माझ्याकडे हळूच बघितलं आणि म्हणाली, ``या लोकांची सकाळ होते बारा वाजून गेल्यानंतर. ही त्यांची जेवणाची वेळ. खूप ठिकाणी तर रात्री़च्या जेवणाला फाटाच दिला जातो.''

``का?''

माझी उत्सुकता बघून तिला हसूच आलं. ``अहो, त्यांची धंद्याची वेळ असते ती. रात्री उरलं सुरलं खाल्लं तर खाल्लं, नाहीतर तसंच झोपलं. नैनादेवींसारख्या मोठ्या कोठ्यांची गोष्ट वेगळी.''

नैनादेवींचे डोळे माझ्यावरच लागले असावेत. आपल्या कोठीवर येणाऱ्या प्रत्येक माणसाला अगदी आतपर्यंत वाचणं, हे त्यांच्या रक्तातच असावं. त्यांनी मला काही विचारलं नाही, पण हळूच हसत म्हणाल्या, ``हा हॉल यावेळी बघून काय करणार? उजाड बागेसारखा आहे तो यावेळी. त्याची खरी शोभा बघायची असेल तर कधीतरी रात्री या.'' मग हळूच बोलल्या, ``मानिनीबरोबरच या. तसा माझ्यावरही विश्वास ठेऊ शकता.''
तेवढ्यात आतून कुठूनतरी कांजिवरम् नेसलेली एक मुलगी आली. दागिने तसे जास्त नव्हते. पण जे होते ते, ते तिच्या सौंदर्यात भरच घालत होते. पाहता क्षणी तर ती स्मिता पाटील वाटली.तीच `भूमिका' वगैरे सिनेमांची गतकाळातली हिरॉईन. माझी आवडती होती. मी मानिनीकडे बघितलं, मानिनीने माझ्याकडे. ती तरुणी नैनादेवींच्या पाया पडली. आमच्याकडे नाजूकपणे बघितलं आणि डोळयांनीच हसली. ओठ किंचित हलले - `आदाब' म्हटल्यासारखे. नैनादेवींनी आशीर्वाद दिला, ``नीट राहा, बेटी, जप स्वत:ला.'' ती गेली. मी हळूच मानिनीकडे बघितलं. तिने नजरेनेच उत्तर दिलं, ``मग सांगते.''
तेवढ्यात जिन्स घातलेली एक आधुनिक मुलगी नैनादेवींशेजारी येऊन बसली. ही पूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा जिन्स वगैरे एवढ्या कॉमन झाल्या नव्हत्या. काळा टॉप घातला होता तिने. गोरीपान होती पण नैनादेवींची चमक नव्हती तिच्यात.

त्या मुलीला शेजारी बसवून तिला जवळ घेत म्हणाल्या. ``ती मुजऱ्यासाठी चाललीय.'' त्यांनी आमच्या डोळयांतले प्रश्न वाचले असावेत. ``दिल्लीबाहेर जायचंय. एका बड्या ऑफिसरकडे फंक्शन आहे.''

हळूहळू नैनादेवी मोकळया होत गेल्या. तसं तर मानिनी म्हणाली होती की त्या कमीच बोलतात.

चहा आला. बोनचायनाच्या दुर्मिळ डिझाइनच्या पेल्यात. बरोबर तळलेले काजू. ती मुलगी चहा सर्व्ह करायला लागली. गेला आठवडाभर या कोठ्यांवर चहा पिणं म्हणजे संकटच वाटायचं मला. मघाशी म्हटल्यासारख्या भपकाऱ्यात, हातात जबरदस्ती चहाचा ग्लास ठेवला की मला धडकीच भरायची. घाणीपासून ते आणखी कशाकशापर्यंत, काय काय डोक्यात यायचं. मी का कू करायला लागले की मुली अपराधी भावनेने म्हणायच्या, ``बाहेरच्या चायवाल्याकडून मागवलीय, खास तुम्हा लोकांसाठी.''

मानिनी कोपरखळी मारायची, ``हाही रिपोर्टचा भाग समजा.'' ती पटकन चहा पिऊन टाकायची आणि पेला कोपऱ्यात सरकवायची.
मी कशी त्या चहाचे घोट गिळायचे, माझं मलाच माहीत. उलटी होईल असं वाटायचं. मानिनी बाहेर येऊन चिडवायची, ``करा, करा आता उलटी. ताज्या हवेत श्वास घ्या आणि आता तुमच्या संस्थेला रिपोर्ट द्या - कशा जगतात या मुली अशा नरकात. अहो बाई, त्या बिचाऱ्यांना हे ठाऊक आहे म्हणून तर आपल्यासारख्या पवित्र, स्वच्छ लोकांसाठी त्या नेहमी बाहेरून चहा मागवतात. बाहेरच्या दुकानदारांच्या चहावाल्याकडून.'
'
``तुम्हाला साखर किती घालू? एक चमचा की दोन?'' ती मुलगी विचारत होती.

``एक''. मी बोलले. नाही कसं म्हणणार? तिथे गेले होते, तर चहा प्याल्याशिवाय गत्यंतर नव्हतं.

साखर घालून तिने माझ्या हातात पेला दिला.

चहाच्या जोडीला नैनादेवींचे किस्सेही होतेच. ठुमरी, दादरा आणि गझलांच्या जमान्यापासून ते आजच्या बाजारू फिल्मी गाण्यांचा जमान्यापर्यंतचे.
उठलो तर मानिनी म्हणाली, ``नैनादेवी, तुमच्याशी जरा बोलायचंय.''

``हा, हा'' म्हणून अचानक त्या गप्प झाल्या आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं. मानिनी मला म्हणाली, ``मी एका मिनिटात आलेच.'' हा मला बाहेरच्या हॉलमध्ये जाण्याचा इशारा असावा.

मी पुन्हा एकदा त्या हॉलमध्ये एकटी होते. त्या सजावटीने भारावलेली. पाचदहा मिनिटातच मानिनी आणि नैनादेवी बाहेर येताना दिसल्या. त्यांचा आवाज येत होता, ``काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल.''

मी गोंधळले होते. एक वेश्या, नाही कलावंतीण - मानिनीने हेच सांगितलं होतं आणि नैनादेवीही तेच म्हणाल्या होत्या, ``आम्ही कलावंतिणी आहोत, वेश्या नाही. मुजरा हा आमचा धर्म आहे. वेश्यावृत्तीची आम्हांला घृणा आहे. आम्ही शरीर विकत नाही.'' हं. मी अस्वस्थ झाले होते ते, एका लेडी पोलीस सबइन्स्पेक्टरचं एका कलावंतिणीकडे काय काम असू शकतं, या विचाराने. मानिनीशी या बाबतीत बोलणं झालं नाही. तिने सांगितलं नाही तर मी कशी विचारणार? मला काय अधिकार होता? येऊन जाऊन दोन दिवसांची ओळख.

त्यानंतर नैनादेवींशी आणखीही भेटी झाल्या. ती बाई एका बदनाम वस्तीत राहून एक बदनाम पेशा करत होती. असं असूनही ती मला दरवेळी जास्त जास्तच आवडू लागली होती. वाटायचं, त्या जे बोलतात, अगदी खरं बोलतात.

हे आयुष्य नैनादेवींना जन्मत: मिळालं होतं. याचा त्यांना अभिमानही होता. त्या सांगायच्या, ``एके काळी आम्ही हिरॉईन बनणं लाथाडलं होतं. तेव्हा आग््रयाला राहायचो आम्ही. अफसानाबाईचे सिनेमा बघितले असतील तुम्ही.''

धक्काच बसला मला. कोण बाई? मग एकदम आठवलं. नावापुढचं `बाई' काढलं तेव्हा ब्लॅक अॅन्ड व्हाईट जमान्यातली प्रसिद्ध अभिनेत्री डोळयांसमोर आली. रंगीत सिनेमाच्या काळातही काही चांगले सिनेमे आले होते तिचे. त्या प्रसिद्ध अभिनेत्रीला या अजूनही `बाई' म्हणून संबोधत होत्या.
त्या सांगत होत्या, ``माझी बालमैत्रीण. ती गेली सिनेमात. आम्ही सिनेमात काम करणं कमीपणाचं मानायचो तेव्हा. राजकपूरसाहेबांनी मलाही खूपदा बोलावलं होतं सिनेमात काम करायला. पण मला वाटायचं, सिनेमाला प्रतिष्ठा नाही. आजही मला तसंच वाटतं. काळ बदलतोय. पण मी नाही बदलले.''
नैनादेवींच्या आयुष्याचे पदर उलगडायला सुरुवात झाली होती या दरम्यान. काही नैनादेवींनी स्वत:च उलगडले. काही दुवे मानिनीने जोडले.
त्यांना एक मुलगीही आहे. ती त्यांच्या या बदनाम वस्तीत कधीच नाही राहिली. शहराच्या एका पॉश भागात त्यांचा बंगला आहे. एक बंगला सिमल्याला आहे. या शहरातल्या एका नामांकित धनिकाने त्यांना `ठेवलंय'. मुलगी त्यांच्यापासून झाली आहे. शेठजींना इथे यायला आवडायचं नाही, म्हणून त्यांनी हे दोन बंगले आणि गाडी दिली होती. भेटायचं असलं की फोन यायचा. तशा नैनादेवींच्या या मैफली चालू असायच्या. शेटजींनी कधी हरकत घेतली नाही.
नैनादेवींनी अट घातली होती, ``मी मुजरा कधीच सोडणार नाही.''

त्यांनीही अट घातली होती, ``माझ्या मुलीला कलावंतीण बनवायचं नाहीस.''

मुलगी नेहमी त्याच बंगल्यात राहिली. मोठी झाल्यावर सिमल्याला बोर्डिंगमध्ये ठेवलं. सुटीत तिला भेटायला त्या स्वत:च सिमल्याला जायच्या. सिमल्याहून मुलगी स्वित्झर्लंडला गेली मेडिकलला. तिथे बरोबर शिकणाऱ्या एका डॉक्टरच्या प्रेमात पडली. तो मुलगाही याच शहरातला होता.
नैनादेवींना कळलं तेव्हा त्यांनी मुलीला सर्वात पहिला प्रश्न विचारला, ``तुझी आई कोण आहे, हे तू त्याला सांगितलंयस?''
नंतर आपल्या भावी जावयाला `बघायला' या स्वत: स्वित्झर्लंडला गेल्या. त्याला एकच विचारलं, ``आता जवानीचा जोश आहे. पण तुझ्या बायकोच्या अंगात एका कलावंतिणीचं रक्त आहे, ही गोष्ट आयुष्यभर सहन करू शकशील? मला या गोष्टीची अजिबात लाज वाटत नाही. शेठजींची मुलगी आहे. म्हणून त्यांच्या स्टेटसप्रमाणे तिला शिकवलं आहे. त्यांची इच्छा होती, त्यांच्या मुलीला कलावंतीण बनवायचं नाही. तरीही... आयुष्यात कुठे, कधी, कुठच्या वळणावर कोणी तिला टोमणा मारला तर?... तुझ्या घरच्यांना कसं समजावशील?''

पण तो हट्टालाच पेटला. प्रेमाचा मामला. लग्न झालं. सिमल्यालाच. त्या नवजवान डॉक्टरने त्याच्या घरच्यांना कसं राजी केलं कोणास ठाऊक. पण जावयाने त्याचा शब्द सदैव पाळला. त्यांना वाटलं होतं तशी पाळी त्यांच्या मुलीवर त्या घरी कधीच आली नाही. आताही याच शहरात प्रॅक्टिस करणाऱ्या आपल्या मुलीला, जावयाला, नातवांना भेटायचं असेल तर नैनादेवी त्या बंगल्यावर किंवा सिमल्याला जातात.

``सोडून का नाही देत हे सारं? आयुष्याच्या या टप्प्यावर.''

त्या हसल्या. मी पोरकट प्रश्न विचारला असल्यासारख्या.

``अहो बाई, जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहां? मुलगी आणि जावईही हेच सांगून सांगून थकले. पण माझं तर हेच आयुष्य आहे. या सगळया मुली आहेत माझ्या,'' आपल्या कोठीवरच्या मुलींकडे हात करून त्या म्हणाल्या.
मानिनी म्हणाली होती, ``त्यांच्याकडे कोणत्याही मुलीला अनुचित प्रकारे आणलं जात नाही. एखादी वेश्या मेली तर तिच्या छोट्या मुलीला कोण बघणार? यांचा लौकिक ठाऊक असणारे गुपचूप तिला यांच्या पायरीवर सोडून जातात. मग त्या तिला घरात आणतात. म्हणतात, ``माझ्याकडे राहून कलावंतीण होईल. वेश्या होण्यापेक्षा बरं.''

नैनादेवी सांगत होत्या, ``ती त्यांची, शेठजींची मुलगी होती. त्यांच्या समाजात निघून गेली.'' त्यांचा आवाज लांबून कुठूनतरी आल्यासारखा वाटत होता. ``आमचं तर मनच लागत नाही त्या बंगल्यात. जंगलात असल्यासारखं वाटतं. याच वातावरणात मी डोळे उघडले होते. याच वातावरणात मिटतील. हं. आता ते दिवस राहिले नाहीत. तरीही हंड्याझुंबरांचा उजेड, घुंगरांचा आवाज एखाद्या रात्री ऐकू आला नाही तर झोप नाही येत. या मुली आजूबाजूला नसतील तर आयुष्य किती एकाकी होईल कोण जाणे! या वातावरणासाठीच आम्ही सिनेमाला लाथ मारली. अफसानाबाईसुद्धा भेटायची तेव्हा संागायची, ``नाव आहे, प्रसिद्धी आहे सिनेमात. पण खूप एकटेपणा आहे. खूप एकाकी आहे मी, दीदी.'' अचानक वर्तमानात आल्यासारख्या बोलल्या, ``ती मला दीदी म्हणते. आजही. आज आमच्या कलेची कदर करणारे कमी आहेत. पण जे कोणी आहेत ते आजही आहेत. माझा जनाजा थाटातच निघेल.'' डोळयांत अचानक चमक आली होती.

`कोण येत असेल आजच्या काळात इथे मुजरा बघायला? या बदनाम वस्तीत?' माझ्या मनात आलं. मानिनीने माझ्या हैराणीत भरच घातली होती. ``पहिल्यासारखी शान नाही राहिली आता इथे. पण यांच्या मुजऱ्यात बेअदबी झाल्याचं कधी ऐकलं नाही. खूप दिवसांपासून माझं याच भागात पोस्टिंग आहे. म्हणून मी सांगू शकते. आता तर मोठमोठे लोक जास्त करून आपल्या फार्महाऊसवरच मुजरा ठेवतात. इथे येण्याच्या फंदात पडत नाहीत. तसं तर आजकाल नवनव्या बँड पाटर््यांमुळे यांच्या कामावर गदा यायला सुरुवात झालीय. तरीही आजही यांचे हात इतक्या वरपर्यंत पोहोचलेत की मोठमोठे नेते, ऑफिसर्स यांनाच सलाम करतात.''

आतापर्यंत मानिनीशी चांगली मैत्री झाली होती. पहिल्या दिवशीच आणखी एक रहस्य उलगडू लागलं. मानिनीचा नवरा मेजर होता. पोस्टिंग काश्मीरला होतं. बऱ्याच वर्षांपासून दिल्लीपासून लांबच पोस्टिंग होत होतं. तिच्या आयुष्याचे दोन तुकडे झाले होते. नोकरीबरोबरच ती मुलांनाही सांभाळत होती. एकटीने सगळया जबाबदाऱ्या निभावता निभावता थकून गेली होती. नोकरी सोडूनही चालण्यासारखं नव्हतं. मेजरनी खूप हातपाय मारले. पण दिल्लीला बदली मिळतच नव्हती. तिनेही सगळीकडे प्रयत्न केले. अगदी इथेच नसली तरी जवळपासच्या शहरातही चालली असती. मानिनीने नंतर संागितलं की पहिल्या दिवशी नैनादेवींना हेच सांगण्यासाठी ती थांबली होती. नैनादेवींनी आश्वासन दिलं होतं की लवकरच होईल ट्नन्सफर.
``एवढ्या सिनियर लेव्हलच्या लोकांनाही ओळखतात नैनादेवी?''

मानिनी हसली. ``हे त्यांनाच ठाऊक. मी ऐकलं होतं. आमच्या ऑफिसरांकडून. अडचणींच्या वेळी बऱ्याच जणांच्या उपयोगी पडल्यात. बऱ्याच दिवसांपासून विचार करत होते. यांना सांगू की नको. पण सगळीकडून निराशाच पदरी पडल्यावर यांना सांगावंच लागलं.''

ती उदास झाली होती. एका कलावंतिणीची मदत घ्यावी लागतेय. त्याचं वाईट वाटत असावं तिला.

तो आमचा म्हणजे माझा शेवटचा दिवस होता, तिकडे जायचा. नैनादेवींशी शेवटची भेट. मानिनीसाठीही खूषखबर होती. आम्ही तिकडे गेल्याबरोबरच त्या बोलल्या, ``चल मानिनी, तुझं काम झालं. अभिनंदन! पुढच्या आठवड्यात ट्नन्सफर ऑर्डर मिळेल.''

बाहेर पडताना विचारावंसं वाटलं, ``ही बाई तुला कधी एक्स्प्लॉइट नाही करणार?'' मग वाटलं, वेड्यासाखा प्रश्न आहे हा. अशाने मी मानिनीलाही खुजी करतेय.

मानिनीने माझ्याकडे पाहिलं. तिने माझा प्रश्न वाचला असावा. मला वाटलं, ती मला विचारतेय, `नैनादेवींना एवढं ओळखूनही हा प्रश्न पडला तुम्हाला?'
ती हळूच म्हणाली, ``खरे शार्क तर आपल्यासारख्या सभ्य लोकांतच असतात.''
आम्ही जिना उतरत होतो. मानिनीचे डोळे पाणावले होते. मी तिच्याकडे पाहिलं. ``अगं, हे काय मानिनी? आनंदाश्रू? मेजरसाहेबांच्या येण्याच्या खुशीचे?'' तिला हसवायला म्हणून मी म्हटलं. तिने डोळे पुसले. आम्ही दोघींनी मागे वळून बघितलं. नैनादेवी दिसल्या. सहसा त्या उठायच्या नाहीत कोचावरून. मी आधीच सांगितलं होतं ना? पण त्या दिवशी त्या उठल्या होत्या. आम्हांला दारापर्यंत सोडायला आल्या होत्या. आम्हांला जिना उतरताना पाहत होत्या. त्यांच्या डोळयांत काय दिसलं मला? कोण जाणे. नक्की सांगू शकणार नाही मी. आम्ही खालच्या पायरीवर होतो. तिथून त्या खूप उंचावर असल्यासारख्या वाटत होत्या.

In this modern and

In this modern and fashionable society, people are pursuing for moncler cool, unique, stylish and innovative. Whether it is
moncler jackets or fashion accessories all means a lot for modern society of today. Same is the case with trendy looking
moncler outlet. When these are moncler online, the excitement just gets doubled. Most chic looking moncler coats are in fashion now. These are one of the favorite fashion accessories for men and women long time ago. If you have not yet tried
Nike tn, it's time to own one and feel the difference it can make to your personality. These are just brilliant and fabulous
Nike shox. They are most iconic and can provide you with a new feeling and enhance confidence. The quality of
ugg boots sale is just superior to what you have dreamt of. Today owning a new and trendy looking discount uggs are not only meant for the wealthy people. These are now made luxurious and affordable cheap boots to reach out to every budget and range. You can just enjoy them by ordering chaussures nike online where you get the complete satisfaction and genuine quality at best possible rates. The finish, quality and designs you get from air max are really astonishing and you will love them all. Different styles and designs of
Nike air max are now available to make your wrist beautiful.

bcc

Oakland Mayor Office 2010 Jean Quan and Microsoft Office 2010 other city officials microsoft 2010 were hoping there would Office Professional 2010 be no reprise of MS Office 2010 the violence that Microsoft Office 2010 Download erupted last week Microsoft Office 2007 when police moved Office 2007 in to raze the MS Office 2007 Occupy Oakland Office 2007 encampment.

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!