दिव्यांच्या त्या असंख्य रांगा, त्यांचे लाटांवरील वरखाली होत चाललेले प्रवास न्याहाळत बसलेल्या डॉक्टर आज अस्वस्थच होत्या. काटा फुलविणारी नाही पण हवी-नकोच्या रेषेवर घुटमळणारी थंडी होती. मधूनच येणारी झुळूक शाल आणण्याची आठवण करून देत होती. पलीकडील घाटावर संध्याकाळच्या आरतीची गर्दी वाढत होती. डॉक्टरांच्या अस्वस्थतेला मात्र एकटेपणाची भावना घेरून बसली होती.
या वेळी डॉक्टर दीनानाथ दोन दिवस उशिरा येणार होते. एका परिसंवादाला हजर राहून ते परस्परच हरिद्वारला येणार होते. डॉक्टर एकट्याच पुढे आल्या होत्या. दोनच दिवसाचा तर प्रश्न होता. इतक्या वर्षांच्या येथे येण्यामुळे एकट्याने येण्यात काही अडचणही नव्हती. हॉटेलमधील रूम राखून ठेवलेली असायची. हॉटेल मालक, प्रकाश अग्निहोत्री घरदारासह परिचयाचा झाला होता. इतर सेवकवर्गही मदतीला तत्पर असाच होता.
दिवाळीनंतरचे आठ दिवस, त्रिपुरी पौर्णिमेच्या आधीचे आठ दिवस, हरिद्वारला भागिरथीच्या पात्रातील दीपोत्सव पाहून परत पुणे, हा गेल्या कित्येक वर्षांतील दोघांचा वर्षक्रम झाला होता.
वर्षभर हॉस्पिटलच्या कामाचा रगाडा पार पाडण्यासाठी, या आठ दिवसाचा खूपच फायदा होतो, हे लक्षात आल्यानंतर सुटी म्हणजे हरिद्वार हे ठरून गेले होते. त्रिपुरी पौर्णिमेदिवशीची, लाख-लाख दिव्यांची ओटी भरली भागिरथी पाहिल्याने समाधानाची उबदार शाल घेतल्याची भावना वर्षभर पुरते, हा अनुभव होता.भागिरथीच्या पलीकडील काठावर, हरी की पौडीच्या बरोबर विरुद्ध दिशेला असणाऱ्या त्या हॉटेलच्या खोलीतून खूप लांबपर्यंतची भागिरथी नजरेत घेता येते. दीपोत्सव नजरेत साठवता येतो. पंचमहाभूतांपैकी जल अन् अग्नी या दोन घटकांचे सौम्य, मोहक रूप समाधान देते. मन स्थिरावते. कधी विध्वंसक, एकमेकांचे शत्रू असलेल्या या दोन तत्त्वांचे स्नेहरूप दर्शन, हातात हात घालून केला जाणारा प्रवास पाहणे मनाला सुखावते. एकाच वेळी हवासा वाटणारा गारवा अन् उबेचा अनुभव नि:शब्दपणाने स्वीकारताना, आजूबाजूच्या गोंधळाचे, गजबजाटाचे भान येत नाही, या सुंदर अनुभूतीच्या ओढीनेच डॉक्टर येथे येत राहिल्या. थोडीशी गैरसोय स्वीकारूनही इतक्या लांब असणारे हॉटेल त्यांनी निवडले होते. इतक्या वर्षात त्यात बदल केला नव्हता. पलीकडील काठावरील दीपोत्सव दूरवरूनही, किंबहुना दूरवरूनच जास्त सुखावतो हे इतक्या वर्षांच्या अनुभवाने ठळक झाले होते.
यात थोडासा भाग प्रकाश अग्निहोत्रीच्या-हॉटेल मालकाच्या स्नेहाचादेखील होताच. इतकी वर्षे येत असल्याने हॉटेल मालक अन् उतारू प्रवासी नात्यापलीकडील स्नेहबंध तयार झाले होते. आठ दिवसांतील मुक्कामात, त्याच्या घरचा एकवेळचा पाहुणचारही ठरलेला असायचा. प्रकाशचे आई-वडील, बहीण, बायको या अगत्यशील कुटुंबाचा, एखाद्या तासाचाही सहवास स्नेहाचे नाते घट्ट करीत आला होता.
आज मात्र या नात्यानेच डॉक्टरांच्या सुटीचा आनंद स्वस्थपणा हिरावून घेतला होता. अपेक्षा असतात तेथेच अपेक्षाभंगाचे दु:खही कुठेतरी लपलेले असते, याची खोलवर जाण डॉक्टरना होती. म्हणून तर अग्निहोत्रींच्या घराशी, कोणत्याही अपेक्षेविना असलेला स्नेह, नात्या-गोत्यात न अडकलेला स्नेह त्यांना सुखद वाटत आला होता. आज ही सुखद भावनाही गढुळली गेली होती.
खरं तर येथे आल्यापासून डॉक्टर एकांतवासाचे सुख, पुस्तकात हरवून जाण्याचे सुख भरभरून लुटत होत्या. संध्याकाळी घाटावर येऊन भागिरथीचा मवाळसा खळखळाट ऐकतानाच डोळयापुढून कधी दुपारी वाचलेल्या पुस्तकातील ओळी सरकत जायच्या, तर कधी मनाच्या स्वच्छ कोऱ्या पाटीवर, समोरून जाणाऱ्या-येणाऱ्या व्यक्तींची तर्कचित्रे रंगविण्यात वेळ निघून जायचा. ही व्यक्ती निव्वळ फिरायला आली असेल की देवदर्शनाला? या व्यक्तीने एवढ्या तरुण वयात भगव्या कपड्यांचा आधार का घेतला असेल? कोण-कोण असेल त्याच्या घरी? कुठल्या दु:खापासून तो दूर पळत असेल? सुखाचा शोध त्याला या विरक्तीत लागला असेल का? एक ना हजार विषय. जे घाट सोडून हॉटेलवर परतताच अंगावरच्या पाण्यासारखे निथळून गेलेले असायचे. मन पुन्हा लख्ख मोकळया आकाशासारखे.
आज मात्र तसे होत नव्हते. कसली तरी हुरहूर - काहीतरी शोधण्यातील अस्वस्थपणा, धडपणाने पुस्तकातही थांबू देत नव्हता की समोर दिसणाऱ्या लाटांवरही जोजावत नव्हता. मनावर कसलं मळभ दाटलंय तेही नेमकं कळत नव्हतं. पुस्तकातील ओळी जवळ करीत नाहीत म्हटल्यावर त्या थोड्याशा लवकरच घाटावर येऊन बसल्या होत्या. या बाजूला तशी तुरळकच ये-जा होती. समोर, पलीकडील घाटावर मात्र गर्दी दाटायला लागली होती. थोड्या वेळाने आरती सुरू होईल. घंटानाद, शंखध्वनी, आरत्यांच्या आवाजाने शांतता शोषली जाईल. मग भरून राहील तो कल्लोळ. भागिरथीचा जयघोष. दूरवरून तो सगळा माहोल निरखताना नेहमीची अलिप्तता मात्र आज गैरहजर होती. आरत्यांचा तो कल्लोळ लवकर सुरू होईल तर बरे असेच वाटत होते.
आज एकटेपणा अगदीच नको वाटायला लागलाय. दीनानाथ आले असते तर- बोलण्यात, जुन्या आठवणीत, पुस्तकांविषयी बोलण्यात वेळ गेला असता. घरापासून, मुलाबाळांपासून, स्वत:च्या दवाखाना-पेशंटपासून एवढ्या लांब आपण एकट्याच. कशासाठी? माझे येथे कोणीही नाही. मी कोणाचीही नाही. खरं तर येथे आल्यानंतरचे दोन दिवस, नेमकी हीच भावना तर सुखावत होती. मन कसं सावरीच्या कापसासारखं मुक्तपणाने भटकत होते. आज मात्र ही, हीच एकटेपणाची भावना असुरक्षित करतेय. घाटावरचा - हा भागिरथीच्या पाण्याला स्पर्श करून येणारा संध्याकाळचा मंद वारा हे तर इथल्या मुक्कामाचे एक आकर्षण. पण आज तोही मनाला स्पर्श करत नव्हता. काही तरी घडावे, कशात तरी मन गुंतून जावे, या दिशाहीन भटकणाऱ्या मनाला आवरणारे काहीतरी काम मिळावे, त्या कामात मन गुंतून जावे असं वाटतंय.
पण इथं कसलं आलंय काम? नकळत घडलेली एखादी चूक आठवून, पुढच्या दिवसभराच्या कामाच्या घाईतही परत परत ती चूक आठवावी, असं काहीतरी होतंय. पेशंटच्या दुखण्याचे, जुनाट किचकट आजाराचे नेमके कारण सापडेपर्यंत येणारा अस्वस्थपणा, पुढच्या कामाची लय बिघडवतो - तसं झालं होतं आता. व्यवसायाच्या सुरुवातीपासूनची ही सवय परिपूर्णतेच्या आग्रहातून आली होती की यशस्वी होण्याच्या गरजेतून हे कळत नव्हतं, पण -
यशस्वी होण्याची गरज! दगड-मातीत, पालापाचोळयात गाडलं गेलेलं तळघराचं दार अचानकच उघडलं गेलं. श्वासाला मोकळेपणा आला. घाटावरचा वारा परत सुरू झाला.
दुपारी प्रकाश अग्निहोत्रीची बायको- ज्योती-भेटायला आली होती. स्वत:ची घुसमट, काळजी डॉक्टरांकडे सोपवून थोड्याशा निश्चिंतपणानेच ती परत गेली. त्या वेळेपासून डॉक्टर काहीतरी शोधत होत्या. आता ते अचानकच हाती आले.
रूढीप्रिय परंपरांच्या चाकोरीतून चालणाऱ्या त्या कुटुंबाला साजेलशीच प्रकाशची बायको दिसली होती. स्वत:च्या घरात सासू-सासऱ्यांच्या देखत न बसणारी-बोलणारी ज्योती आज दुपारी, एवढ्या उन्हातही एकटीच डॉक्टरांना भेटायला आली तेव्हा डॉक्टरांना आश्चर्यच वाटलं होतं.
ती आल्यानंतर डॉक्टरांनी पुस्तक बाजूला ठेवून तिच्याशी खूप वेळ गप्पा मारल्या होत्या. डॉक्टर दीनानाथ अजून आलेले नाहीत. डॉक्टर एकट्याच पुढे आल्या आहेत, याची तिला कल्पना असावी. म्हणूनच ती डॉक्टरांना भेटायला आली होती. गप्पातून ती मोकळी होत गेली तसे डॉक्टरांना जाणवत गेले, तीे फक्त पदवीधर साक्षर नाही तर खरोखरच सुशिक्षित आहे. स्वत:ची मते, स्वत:चे विचार असणाऱ्या ज्योतीला डॉक्टरांची मदत पाहिजे होती. त्यासाठीच तर भर उन्हात ती एकटीच डॉक्टरांना भेटायला आली होती.
पहिल्या मुलीनंतर तिला परत दिवस गेले होते. निसर्गक्रम तर बरोबर होता. मुलगी आता अडीच वर्षांची झाली होती. इतके कमी अंतर डॉक्टरांना खटकले तरीही त्यांनी तिचे अभिनंदन केले. फक्त उन्हातून आल्यामुळेच नव्हे तर या कारणामुळेही तिचा मूळचा गोरा रंग आणखी लालसर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. एक प्रसूतीतज्ज्ञ म्हणून तिला काय सूचना करता येतील हे डॉक्टरांनी ठरवायला सुरुवात केली. तोच ती म्हणाली, ``डॉक्टर, इस बार मुझे आपसे मदद चाहिये। आपही इस मामले में कुछ कर सकती है।''
दिवस राहिल्याचे कळताच तिच्या सासूने चेकअप करून घेण्याच्या नावाखाली गर्भ-लिंग तपासणीही करून घेतली होती. मवाळ स्वभावाच्या नवऱ्याच्या- प्रकाशच्या मान्यता-अमान्यतेचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी त्याला अन् सासऱ्यांनाही बायकांच्या या प्रश्नात लक्ष घालायला वेळही नव्हता अन् इच्छाही. आणखी एकदा सोनपावलं घरात दुडदुडणार या बातमीने झालेला आनंद स्थिरावण्याआधीच, `फक्त वारसा चालविण्यासाठी नातूच पाहिजे, बाहेर जाणारी नात नको, या सुप्त आग्रहाने आकार घ्यायला सुरुवात केली होती. `मुलगी नको' हा सुरुवातीला आडवळणाने सूचित होणारा विचार आता उघडपणे अंगावर यायला लागला होता. ज्योती ऐकून न ऐकल्यासारखे करते आहेसे दिसल्यानंतर घरातील सर्वांनीच सकाळ-संध्याकाळ, मुलगी नकोचचा आग्रह बटबटीतपणे पुढे सरकवायला सुरुवात केली होती.
आतापर्यंत घराचे हे न दिसलेले विद्रूप रूप पाहून ज्योती गांगरली. स्वत:च्या अस्तित्वाला आणची एक कोंभ फुटणार, याचा आनंदही तिला मोकळेपणाने घेता येईना. जावळ कुरवाळण्यासाठी उत्सुक असणारे हात, त्या अपत्याच्या नरड्याभोवती आवळले जातायत. पण त्यामुळे आपलाच दम घुसमटतोय, या भासाने-कल्पनेने ती सैरभैर झाली होती. स्वत:चे, आपल्या दोघांचे अपत्य, त्याची स्वप्ने यात रमायला लागलेले मन भरकटायला लागले. कसलाच शेंडा-बुडखा नसलेल्या विचारांनी, भीतीने मन व्यापून गेले होते. समोर भिंत आहे की पारध्याचे जाळे, याचा विचार न करता मन-पाखरू आंधळेपणाने भिरभिरतच राहिले अन् परत-परत घायाळही.
यातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असणारी ज्योती आज डॉक्टरांची मदत मागायला आली होती. डॉक्टरांनी सांगितलं, समजावलं तर घराचा विचार बदलेल, बाळाच्या येण्याची वाट मोकळी होईल, याची तिला खात्री वाटत होती.
आतापर्यंत हे सगळं त्रयस्थपणाने, अलिप्तपणाने ऐकणाऱ्या डॉक्टरांना तिची अपेक्षा ऐकून अनपेक्षितपणे रंगमंचावर ढकलल्या गेलेल्या पात्रासारखी स्वत:ची अवस्था वाटायला लागली. भूमिका-संवादाची यत्किंचितही कल्पना नसणाऱ्या डॉक्टर, घरी येऊन सर्वांना समजावतील असा त्यांचा शब्द घेऊन जाताना ज्योती काहीशी निश्चिंत होऊन गेली. डॉक्टर मात्र संभ्रमित झाल्या होत्या. जाते वेळी ज्योतीने स्वत:चा सगळा अस्वस्थपणा डॉक्टरांच्या हवाली केला होता.
वर्षभरातील सुटीचा एकमेव आठवडाही गढुळला जात होता. सुटीच्या अवधीत व्यवसायाची आठवणदेखील त्यांना नको असायची. त्यासाठी तर ते दोघे इतक्या दूरवर येऊन राहायचे. फक्त पुस्तके अन् सकाळ-संध्याकाळचे भागिरथीच्या काठचे फिरणे, यात आठ दिवसातील क्षण न् क्षण भरून घ्यायचे आज मात्र ही असली सक्तीची, अनपेक्षितपणे वाट्याला आलेली भूमिका. त्यात सोबतीला दीनानाथ नाहीत.
मनात विचार उसळी मारत होता, काही कुणाला समजावून सांगण्याच्या भानगडीत पडू नये. काय संबंध अन् काय अधिकार आपल्याला या प्रकरणात अग्निहोत्रींना समजावण्याचा? वर्षातील एखाद्या तासाच्या सहवासाने तो तासही औपचारिक पाहुणचाराचा- अग्निहोत्री कुटुंबाला सल्ला देण्याचा आपल्याला काय अधिकार ? असला भोचकपणा करण्याचा आपला स्वभावही नाही. मग हे सगळं मनाविरुद्ध, स्वभावाशी विसंगत काम कशासाठी करायचे? कोण आहे ज्योती आपली?
पण-पण मग हे ज्योतीलाच आपण स्पष्टपणे का नाही संागितलं? `मी येईन-मी समजावेन' असं आश्वासन कशासाठी दिलं? का नाही झटकून टाकलं जागेवरच? दीनानाथ असते तर बरं झालं असतं आज. आपल्या भिडस्त स्वभावामुळे हे गळयात पडलेलं नकोसं काम, त्यांनी सुरुवातीलाच स्पष्टपणे नाकारलं असतं. अजूनही आपल्याला हे का जमत नाही? असला कसला आपला स्वभाव? डॉक्टर स्वत:वरच चिडायला लागल्या.
दुपारपासूनच्या अस्वस्थपणाचे नेमके कारण आता ध्यानात आले होते एवढंच. आजार कळल्याचं अर्धवट समाधान हाती आले होते. उपचार मात्र ठरविता येईना. विषयही मनातून जाईना. मात्र यातून आणखी एक दुसरीच आठवण चरचरीतपणे वर आली. असहाय्यतेची, पराभवाची ती गाडलेली आठवण, रासवटपणे संध्याकाळ तुडवत, मस्तवाल वळूसारखी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यात उंडारत राहिली.
इंटर्नशिप संपल्यानंतरचे ते दिवस होते. आता स्वतंत्रपणे उभे राहण्याचे, स्थिरावण्याचे वेध लागले होते. दीनानाथचे इंग्लंडमधील एक वर्ष बाकी होते. तो येथे परतल्यानंतर ते दोघे लग्न करणार होते. दरम्यानच्या काळात कुठेतरी, अनुभवासाठी, एखाद्या सिनिअर गायनंॅकॉलॉजिस्टकडे काम करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे संधी मिळालीदेखील. डॉक्टर टाकळकरांना त्यांच्या प्रसूतिगृहासाठी निवासी डॉक्टरची गरज होती. दीनानाथच्या ते ओळखीचेही होते. पुण्यापासून लांब, आडबाजूच्या गावात त्यांचा दवाखाना होता. पण भरपूर अनुभव मिळेल याची खात्री असल्याने डॉक्टरांनी ती संधी स्वीकारली होती. त्यावेळी नवी दुर्मिळ असणारी सोनोग्राफी मशीनसारखी साधने दवाखान्यात होती. त्या सगळया कामाचा अनुभव घेता येणार होता. राहण्याची सोय चांगली होती. पैसेही बऱ्यापैकी मिळणार होते.
पुढचे वर्ष अखंडपणे कामात बुडालेले होते. कित्येक वेळा टाकळकरांच्या गैरहजेरीत, स्वतंत्रपणे, आठवड्याची सुटीही न घेता डॉक्टर कामाचे समाधान घेत होत्या. आजूबाजूच्या गावात दवाखानाच नसल्याने हा दवाखाना पेशंट्सनी कायमच भरलेला असायचा. दवाखान्याचे आवारदेखील अडल्या-नडल्या स्त्री पेशंट्सनी भरलेले असायचे. डॉक्टरी शिक्षणाच्या पूर्ण काळात,त्यानंतरच्या प्रशिक्षण काळातही पेशंट्सची, त्यांच्या आजार-अडचणींची इतकी विविधता पाहायला मिळाली नव्हती. डॉक्टर टाकळकरांच्या हाताला असलेल्या गुणाचा झेंडा परिसरात दिमाखाने फडकत होता. डॉक्टरांना सहकाऱ्याची वागणूक मिळत होती. शक्य तेवढे कामातील स्वातंत्र्यही होते.
पेशंट्सही या नव्या डॉक्टरांबरोबर अधिक मोकळेपणाने बोलत होत्या. एक स्त्री म्हणूनही असेल कदाचित, पण डॉक्टर त्या पेशंट्सना खूपच जवळच्या वाटू लागल्या होत्या. कामाचे समाधान डॉक्टरांनाही पुरेपूर मिळत होते. एवढ्यातच तो खडा लागला.
त्या भागातील प्रसिद्ध नेते प्रतापराव लहाने पाटील एकदा त्यांच्या बायकोला घेऊन आले होते. डॉक्टर टाकळकर दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. दवाखान्याची पूर्ण जबाबदारी या नव्या डॉक्टरवर होती. याआधीही त्यांनी काही वेळा ही जबाबदारी समर्थपणाने पार पाडलेली होती.
प्रतापराव लहाने पाटलांच्या पत्नीला दिवस गेले होते. मोठे डॉक्टर नाहीत म्हटल्यावर प्रतापराव विचारात पडल्याचे दिसले. या नवख्या डॉक्टरवर विश्वास ठेवावा की नको... अशा विचारात ते टाकळकरांच्या केबिनमध्येच खूप वेळ बसून होते. त्यांना तेथेच सोडून डॉक्टर इतर पेशंट्सना बाहेरच्या खोलीत तपासत होत्या.
थोड्या वेळाने काहीतरी विचार करून प्रतापराव त्यांच्याकडे येऊन सहजगत्या म्हणाले, ``डॉक्टर, मोठे डॉक्टर नाहीत म्हणून काय झालं? तुमच्याविषयी खूप चांगलं ऐकलंय आम्ही. म्हटलं एकदा अनुभवच घेऊ या. तपासून टाका आमच्या मंडळींना. अगदी सगळया तपासण्या करा.काहीही शिल्लक ठेवू नका. तुमचे ते सोनोग्राफी का काय ते नवं मशीन- त्यातल्याही तपासण्या होऊ द्यात. शंका राहायला नको कसली. पोरगा-पोरगी काहीही असलं तरी आपल्याला काय फरक नाही. सगळं व्यवस्थित असलं म्हणजे झालं.''
प्रतापरावांच्या त्या अकारण, ऐसपैस हसण्या-बोलण्याने दवाखान्यात ते आल्यापासूनच्या त्यांच्या वागण्याने डॉक्टरांच्या, मनात एक अढी तयार झाली होती. त्यात हे `तपासून टाका' म्हणजे काय? कारखान्यात तयार झालेला माल तपासायचा होता का? येथे आपल्यापासून डॉक्टरांनी या माणसाविषयी बरंच काही ऐकलं होतं. पण आपला त्याच्याशी संबंध नाही, हे मनाला बजावत त्यांनी प्रतापरावांच्या बायकोला तपासण्यासाठी आत घेतलं.
एखादे वठत चाललेले- तरीही कुठल्यातरी कोपऱ्यात नवी पालवी वलाविणारे झाड दिसावे तशी दिसणारी प्रतापरावाची बायको आत आली. चाळिशीकडे झुकत चाललेली ती बाई होणाऱ्या अपत्याला सांभाळण्याइतकी सक्षम दिसत नव्हती. या वयात कशासाठी हा अट्टहास? हा मनातील प्रश्न बाजूला ठेवत डॉक्टरांनी नेहमीच्या प्राथमिक तपासण्या केल्या. सोनोग्राफीसाठी आत घेतल्यानंतर मात्र प्रतापरावाची बायको फारच अस्वस्थ झाल्याचं जाणवलं. ``काही त्रास होतोय का?'' या डॉक्टरांच्या प्रश्नाने तर तिचा बांध फुटला होता.
तिने सांगितलेल्या हकिकतीने डॉक्टर तर हतबुद्धच झाल्या होत्या. हिल्या दोन मुली होत्या. त्यांनंतर तीन वेळा दिवस गेले होते. नेमक्या त्या दरम्यान, मुलगा की मुलगी हे सांगणारे, हे तिच्याच भाषेत - मशीन या दवाखान्यात आले होते. त्या वेळेपासून तिचे धिंडवडे सुरू झाले होते. इस्टेट आणि राजकारणातील वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी प्रतापरावांना मुलगा पाहिजे होता. तो जन्माला येईपर्यंत ते या दवाखान्यात येतच राहणार होते. अन् दरवेळी नको असलेला जीव अंकुरतानाच खुडला जाणार होता. प्रत्येक वेळी बायको एक मरण भोगत, संपत चालली होती.
``डॉक्टर, यावेळी तरी तुम्ही यांना समजावून सांगा. देवानं पाठवलेलं हे लेकरू- मुलगा-मुलगी काहीही असू दे, येऊ दे. मग एवढ्यावरच थांबू देत पाळणा. आता नाही सोसवत हे प्रत्येक वेळचं मरण. मोठ्या डॉक्टरला सांगून झालंय हे सगळं पहिल्याच तपासणीच्या वेळी. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तुम्ही तरी समजावा. तुमचं ऐकतील ते.''
एवढं सगळं बोलतानाही दम लागला होता तिला. त्यात, येणाऱ्या जीवाची अन् स्वत:च्याही जगण्याची भीक मागितल्याची अगतिकता होती. केविलवाणी याचना होती.
अस्वस्थ अन् याचकापेक्षाही दरिद्री भावनेने घेरलेल्या डॉक्टरांनी, रिपोर्ट्स मोठे डॉक्टर आल्यावर मिळतील असे सांगून सुटका करून घेतली होती. जन्म देऊ शकणाऱ्या हातांचा, बुद्धीचा वापर एखाद्या अर्भकाची या जगात येण्याची वाटच बंद करण्यासाठी करावा हे काही त्यांचा सद्विवेक स्वीकारण्यास तयार नव्हता. हे पातक निदान आपल्या हातून व्हायला नको ही भावना यामागे होतीच. शिवाय कोणीतरी कुणाची तरी समजूत घालण्याने काही साध्य होईल यावर मुळात त्यांचा विश्वासही त्यावेळी नव्हता. त्यापेक्षा व्यवसायातील अलिप्तताच त्यावेळी महत्त्वाची वाटली होती. पण याचकाच्या नजरेला नजरही देण्याचे बळ नसणाऱ्याचे दारिद््र्य मात्र त्यांना खूप दिवस भोगावे लागले होते.
पुढे कधीतरी, डॉक्टर सुटीवर असतानाच्या काळात डॉक्टर टाकळकरांनी, प्रतापराव लहाने पाटलांचा वारस येण्याची वाट बंद केल्याचे समजले. प्रतापरावांची बायको परत नव्या मरणाची वाट चालू लागली असावी. डॉक्टरांना हे कळल्यावर, काहीही संबंध नसताना अपराधीपणाची भावना काही काळ तरी सतावत राहिली. ``हे टाळता आले नसते का?'' प्रतापरावांना कशासाठी आपण इतकी सर्व या बाबतीत मदत करतोय?'' असं डॉ. टाकळकरांना त्यांनी विचारले देखील. त्यावर, यशस्वी व्हायचे असेल तर हे असं करावंच लागतं. ग्रामीण भागात हॉस्पिटल चालवायचे तर असली मंडळी सांभाळावी लागतातच. नीती-अनीतीचा, विवेक विचाराचा बाऊ करणे परवडणारे नसते' असं सांगून डॉक्टर टाकळकरांनी तो विषय संपविला होता. या असल्या बुळबुळीत युक्तीवादाने स्वत:ची सुटका करून घेण्याइतपत यश त्यांनी नक्कीच मिळविले होते. असले डॉक्टर हेरण्याचे, मिळविण्याचे यश प्रतापराव लहाने पाटलांना मिळाले होते. त्यांची बायको, फक्त नाकारली जाणारी उत्पादने तयार करणारी एक फॅक्टरी झाली होती. यश-अपयशाचा अन् तिचा काही संबंधच राहिला नव्हता. अकारण पराभवाच्या भावनेने घेरल्या गेल्या होत्या त्या फक्त डॉक्टरच.
वर्षभरानंतर डॉक्टरांनी तो दवाखाना सोडला होता. पुढील आयुष्यात सद्विवेकाशी तडजोडी न करताही यशस्वी होता येतं, हे त्यांनी दीनानाथांच्या सोबतीने सिद्ध केले होते.
आज येथे भागिरथीच्या काठावर, त्या पराभवाची विद्रूप आठवण अलगदपणे वर असली. एखाद्या चिरेबंदी वाड्याच्या भिंतीत मूळ धरलेल्या पिंपळाला कितीही वेळा खुडून काढले तरी काही काळानंतर तेथे परत पालवी फुटावी तसे झाले होते. आयुष्यात श्रेयस मिळाल्याची सुखद भावना मनावर आताशा साय धरू लागली होती. आज एका साध्यासुध्या भेटीने, त्या सुखभावनेला विस्कटून टाकले होते.
एक तर काय होतंय, का होतंय हेच दुपारपासून उमजत नव्हते. जेव्हा लक्षात आले तेव्हा स्वत:च्या शक्तिहीनतेची जाणीव छळायला लागली. अग्निहोत्रींचं कुटुंब किती रूढिप्रिय, परस्परांच्या भक्कम गढीत बसलेलं आहे याची त्यांना कल्पना होती. याविषयी अनेक वेळा त्यांचं दीनानाथांबरोबर बोलणंही झालं होतं. पण घराच्या रूढिप्रियतेशी, आचारविचारांशी कधीच आपला संबंध येणार नाही, इतके अंतर असल्याची, अलिप्ततेची जाणीवही होती. वर्षभरातील एखाद्या तासाच्या सहवासाने, त्या वाराबंद घरातील कुणाची तरी घुसमट वाट्याला येण्याचे कारणच काय? जेथे कसली गुंतवणूक नाही तेथे कमावण्या-गमावल्याचं सुखदु:ख वाट्याला येणार तरी कसे?
प्रकाशची बायको येऊन गेल्यानंतर या अलिप्ततेला खिंडार पडले होते. त्या घरातील ज्योतीची घुसमट डॉक्टरांचाही दम तोडायला लागली. यातून सुटका करून घ्यायची तर, अग्निहोत्रींच्या घराला समजावण्याशिवाय पर्याय नाही असे मन सांगत होते. पण आपल्या समजावण्या-सांगण्याने, एखाद्या फुंकरीने त्या घरातले आकाश मोकळे होणार नाही ही वास्तव जाणीव डॉक्टरांना मागे खेचत होती. परत परत घायाळ करत होती. कारण नसताना अलिप्ततेच्या भिंती अन् त्याचबरोबर मनाचे स्वास्थ्यही कोसळायला लागले होते. वर्षभरातील एखादा हक्काचा आठवडाही हातातून खेचला जातोय याची चीडही त्या पराभवात मिसळलेली होती.
समोरच्या घाटावर आता आरती सुरू झाली. तो आवाज परिसराला वेढायला लागला. एका पाठोपाठ एक असा आरत्यांचा ओघ सुरू झाला. परिसरातील शांतता हळूहळू मागे हटविली गेली. आरत्यांबरोबरच्या झांज-टाळांचा आवाज सगळीकडे भरून राहिला. त्या स्वरांनी, आवाजाने डॉक्टरांचाही ताबा घेतला. थोडा काळ तरी ते स्वर, तो सगळा कल्लोळच हवाहवासा वाटायला लागला. त्या आवाजात सगळंच विसरायला झालं. कधी नव्हे ती त्या स्वरमंडलाची जादू डॉक्टरांवर गारूड करायला लागली. ते सगळं कधी थांबूच नये असं वाटायला लागलं.
पण उतरणीला लागल्या वयासारखे ते आवाज, तो कल्लोळ मंदावत गेला. अन् सम गाठल्यासारखा भागिरथीचा गंगा-मैय्याच्या, आभाळाला पोहोचणाऱ्या जयजयकाराने थांबला देखील. मग सुरू झाला तो डोळयांचा सुखद उत्सव. आता दिव्यांचा प्रवास सुरू झाला होता. द्रोणातून, पाना-फुलांनी सजविलेल्या परड्यांतून हजारो दिवे भागिरथीच्या लाटांवर स्वार झाले. हजारो दीपकळया नृत्यांगना बनून एकाच वेळी जलमैदानात उतरल्याचे दृश्य दिसायला लागले. अभेद्य अशा काळोखाला हजार ठिकाणी भगदाडे पाडत निघालेले ते प्रकाशदूत विजयाच्या आनंदाने उसळतच पुढे झेपावत होते. पाठोपाठ तेवढेच दिवे श्रद्धेचे बळ घेऊन उतरत होते. लाटांवरील त्यांचा प्रवास सुरू होताक्षणी, त्यांना असणारी स्वरांची साथ मात्र सुटत होती.
नंतरचे त्यांचे मूळ प्रवास कधी एकट्याने, कधी साथ संगतीने, कधी क्षणाचा तर कधी तो दिवा दृष्टीआड होईतो निरखताना डॉक्टर हरखून गेल्या.
माणसांचा, विचारांचा प्रवास असाच असेल का? किती अन् कसा? कुणाला कळलाय तो? किती अन् कसले अडथळे येतील त्यात? त्यात भोवंडायला होईल का? त्यातून प्रवास थांबेल की आणखी वेगच मिळेल? सारंच अनिश्चित. यालाच आयुष्य म्हणायचं का?... भागिरथीच्या प्रवाहात दीप सोडणारे कुठे एवढा त्या दिव्यांच्या प्रवासाचा, यश-अपयशाचा विचार करतात? दीप प्रवाहात सोडतेवेळी तरी फक्त अपार, दृढ अशी श्रद्धाच फक्त मनात असते. पुढचे सारे गंगामैय्याच्या हवाली. दिवा लावणे महत्त्वाचे. श्रद्धेने तो भागिरथीला अर्पण करणे त्याहूनही महत्त्वाचे. आयुष्याला कर्तव्यपूर्तीचे समाधान देणारे हे दीपदान. जिवंतपणाची कड गाठताना, या दानासाठी मनातील श्रद्धेचा दीप आयुष्यभर जपणारे ते भाविक... त्या काठावर अन् आपण...
लाटांवरील त्या दिव्यांच्या रांगा आता डॉक्टरांच्या मनात उजळत गेल्या. अग्निहोत्रींच्या घरातील कर्मठ विचारांशी आपल्याला काय देणे-घेणे? माझे समजावणे-सांगणे ते स्वीकारतील-ऐकतील की नाही? त्यातून ज्योतीची नको त्या शस्त्रक्रियेपासून सुटका होईल की नाही? हे सारेच त्या दिव्यांच्या प्रवासाएवढेच अनिश्चित असेल. पण भागिरथीमध्ये दीप सोडण्याची श्रद्धा मनात असलीच पाहिजे. त्या विचाराचे-समजावण्याचे प्राक्तन, परिणाम असेल ते असोत. दीपदानाच्या त्या अनामिक समाधानाचे संचित तरी माझेच असेल हे काय कमी आहे? इतकी वर्षे आपण येथे राहतोय. का नाही त्या पलीकडील काठावरील श्रद्धावंताच्या मेळाव्यात गेलो. इकडे स्वान्तसुखाय अलिप्तता तरी कुठे पुरेपूर समाधान देतेय? आजच्यासारखी कुरतडतच असते की! प्रतापराव लहाने-पाटलांच्या बायकोचा दीनवाणा चेहरा आयुष्यभर - कधीमधी येऊन छळतोयच ना? दुपारी ज्योती येऊन गेल्यानंतर मनाला आलेली ही कफल्लकता घालवायची असेल तर... तर श्रद्धेचे पाठबळ देऊन विचाराचा हा दीप अग्निहोत्रींच्या घरात चेतविलाच पाहिजे. जाचणाऱ्या-खुपणाऱ्या अलिप्ततेच्या पिंजऱ्यातून सुटका करून घेण्याची ही संधी आता मात्र गमावायची नाही.
उद्याच ज्योतीच्या पाठीवर हात ठेवण्यासाठी अग्निहोत्रींच्या घरी जायचे. पलीकडील काठावरील आरतीच्या कल्लोळात सामील व्हायचे असा निर्णय घेऊन डॉक्टर उठल्या तेव्हा भागिरथीचे दोन्ही किनारे शांतपणाने निद्रेकडे चालले होते.



fwmEzqKSVtWoXX
cheap klonopin usa - buy online cheap klonopin
OnMZLbyuLboHv
alprazolam - buy cheap generic xanax
GQIPfHCRcdN
online pharmacy no prescription - buy ambien online canada
qQBogwsnexRXlZWr
klonopin buy online medication - generic klonopin
ovFVSGejTzdwTz
buy xanax 2mg - buy xanax us pharmacy
RPLZmcTGDJXAWdMz
overnight delivery buy ambien online - buy ambien online overnight discount
mXHTXhQYlZoMaOeFSM
fVchkk usxqhetkdhys, [url=http://zqlnrrshvyfl.com/]zqlnrrshvyfl[/url], [link=http://mneoglreujzn.com/]mneoglreujzn[/link], http://swrvnmfbvpnj.com/
generic viagra
hcpdqb generic viagra UpJViI where to buy viagra %-[[[ cialis OJFXOj ordering tadalafil 8148 cialis USpiNU viagra 5926
sildenafil price
tqbmngo sildenafil price 8]]] generic cialis 2314 viagra 8101 cialis sale %-[[[ kamagra cialis cialis apcalis gXfCh order sildenafil online ungUH
CjoXcSxIYoFpZRKhTT
Buy cheap canadian klonopin - klonopin online no prescription
HrOPYrKrpUMyvVuYdd
Buy ambien online wthout prescription - cheap ambien
AUCCLGaUefkJGgmG
Buy ambien online canada - Low price ambien
KVtxGTZWRdqzhq
order tramadol - buy tramadol
xXdYevxLFXnHnDAN
klonopin no prescription - Cheap canadian klonopin
wNAvfVkDzQXt
ambien online - generic ambien online
MnKIcxkwhdoSVDefIgr
buy valium online - cheap valium
odYjjbQMaawglqbd
klonopin price - Purchase klonopin overnight delivery
IQPvotxRil
tramadol online 100 mg - tramadol overnight
mIWyeWKMFgpjeqRSryO
Buy valium online wthout prescription - Cheap canadian valium
OtekNVRelybBcMnQfb
klonopin no prescriptions - buy klonopin online
JchNxInSNryV
tramadol overnight - generic tramadol online
ALtwIFfcocdXjs
Buy cheap online ambien - Buy ambien online canada
ZNyNhJYsrVwmdApBw
buy tramadol no prescription - tramadol cheap
jucWEMVaRdKratHin
Buy ambien online usa - Discount ambien online
bAbMzzNAIJkfHnfHgCp
Cheap xanax usa - Buy xanax uk
QwjXzaOWSKAlzEoUF
buy tramadol overnight - tramadol cheap
Drew Brees Jersey Jimmy
Drew Brees Jersey
Jimmy Graham Jersey
Darren Sproles jersey
Mark Ingram jersey
Drew Brees Authentic Jersey
Darren Sproles Authentic jersey
Mark Ingram Authentic jersey
Brett Keisel Jersey
Mike Wallace Jersey
Antonio Brown Jersey
Brett Keisel Authentic Jersey
Mike Wallaces Authentic Jersey
Antonio Brown Authentic Jersey
Maurkice Pouncey Jersey
Hines Ward Jersey
Troy Polamalu Jersey
James Farrior Jersey
James Harrison Jersey
NFL Shop Coupons
NFL Shop Coupon Codes
NFL Coupon Codes
Cheap Authentic jersey
Montreal Canadiens Jersey
Pittsburgh Penguins Jersey
Chicago Blackhawks Jersey
Cheap Cowboys Jersey
Demarcus Ware Jersey
Demarcus Ware Authentic Jersey
Miles Austin Jersey
Miles Austin Authentic Jersey
Dez Bryant Authentic Jersey
Dez Bryant Jersey
Jason Witten Jersey
Jason Witten Authentic Jersey
Marion Barber Jersey
Marion Barber Authentic Jersey
Adam Jones Jersey
Bill Bates Jersey
DeMarco Murray Jersey
Emmitt Smith Jersey
Felix Jones Jersey
Jay Novacek Jersey
Jay Ratliff Jersey
Michael Irvin Jersey
Mike Jenkins Jersey
Roger Staubach Jersey
Roy L. Williams Jersey
Roy Williams Jersey
Tashard Choice Jersey
Terence Newman Jersey
Terry Glenn Jersey
Tony Dorsett Jersey
Tony Romo Jersey
Troy Aikman Jersey
Tyron Smith Jersey
Zach Thomas Jersey
Aaron Rodgers Jersey
Clay Matthews Jersey
Aaron Rodgers Authentic Jersey
Clay Matthews Authentic Jersey
Charles Woodson Jersey
Greg Jennings Jersey
Donald Driver Jersey
Cheap Lions Jersey
Calvin Johnson Jersey
Calvin Johnson Authentic Jersey
Matthew Stafford Jersey
Jahvid Best Jersey
Barry Sanders Jersey
Ndamukong Suh Jersey
Nick Fairley Jersey
Matthew Stafford Authentic Jersey
Jahvid Best Authentic Jersey
Barry Sanders Authentic Jersey
Ndamukong Suh Authentic Jersey
Nick Fairley Authentic Jersey
Wholesale Cheap jewelry
Cheap Fashion jewelry
Cheap Tiffany Jewelry
Cheap Chanel Jewelry
Wholesale Tiffany Jewelry
Wholesale Chanel Jewelry
Wholesale pandora Jewelry
Wholesale D&G Jewelry
Cheap NFL Jewelry
Cheap Coach Jewelry
Wholesale LV Jewelry
Wholesale Bvlgari Jewelry
VaCnmAHouOmMtPQVQMt
ambien lowest price - Cheap ambien now
FaJfLsRXpiOw
order tramadol online - buy tramadol online
GKklGbLqLWl
Oqo2Rh Cheap xanax usa - Buy xanax online canada
wgdRKcxZwVMvcT
valium discount - valium online pharmacy
OcZtBWJnFRfRQ
discount ambien - Buy ambien uk
bktLDAAwnsh
Best valium price - Discount valium online
kHBCfLITCOkSTAzsAm
10 mg valium - 10 mg valium
llZfpCFrVll
valium without prescription - valium online order
fDAKxsWXbcRVChwxRH
Generic xanax overnight - Buy xanax online usa
RNqcyxRBPQb
buy valium denver - cheap valium rx online
vwudqDAfMFxXg
buy diazepam cheap - buy diazepam 10mg india
EblyeaXDYAzB
valium cheap - valium online canada
viagra
jhevhax http://wxefoy.com/ lxdrtbcz [url=http://txrlsy.com/]lxdrtbcz[/url]
viagra
fajtajbb http://bofwhy.com/ xcucjb [url=http://ajtjox.com/]xcucjb[/url]
WqntATrXMzKuZsSBmU
Cost xanax online - Purchase xanax overnight delivery
uKcerSPTpqnzVceX
xanax to buy - Buy cheap canadian xanax
viagra
kawixuae http://cbplta.com/ fcieafty [url=http://tpgpuu.com/]fcieafty[/url]
tiffany jewelry tiffany
tiffany jewelry
tiffany co
tiffany jewellry
tiffany uk
tiffany necklaces
tiffany earrings
tiffany rings
tiffany bangles
tiffany bracelets
tiffany key rings
tiffany cuff links
vibram five finger
vibram 5 fingers
vibram five finger kso
vibram five finger bikila
vibram five finger shoes
http://www.uvibramfivefingers.com/vibram-five-fingers-men-s-shoes.html
http://www.uvibramfivefingers.com/vibram-five-fingers-women-s-shoes.html
http://www.uvibramfivefingers.com/vibram-new-arrival.html
swarovski
swarovski australia
swarovski crystal
dgbjnu
sxxvyhk
svhcymc
aspdtntq
lGLtgbTCmcq
cheap xanax online - buy cheap xanax
YiGxAzUlRwS
Cheap canadian xanax - xanax drug
DilPVWKYwXgaxVIpum
valium online no prescription - buy discount valium