``तुझ्या मायची चूत तं् म्हना..!''
``कित्तीक मस्ती आला म्हना भडव्या..!''
``कोन्हाच्या बळे मस्ती आला तं् पहातो..!''
``येवढा कसा माजला म्हना बोकडावानी..?''
``थांब तुहे आंडस कुटतो..!!!''
नाना डेपूटी भर गल्लीनं गाया देत चाल्ला व्हता. आला बी गाया देतस तो. तो गल्लीनं चाल्ला ताव्हा घरातले लोकं भाईर येत व्हते. काय झालं म्हणून डोकावत व्हते. नाना डेपूटीकडी डोये तानून पहात होते. नाना डेपूटी चालत व्हता. झपाझपा चालत व्हता. म्होट्या म्होट्यानं नल्डा तानत व्हता. गंध्याफटक गाया देत व्हता. जोरजोरानं हातवारे करत व्हता. यका हातानं बाह्या आवरत व्हता, दुसऱ्या हातानं धोतर सावरत व्हता. लोकं समजून गेल्हे की काहीतरी झालं. काय झालं? जो तो येकमेकाले इचारत व्हता. उमज मातर पडत नव्हता. काय झालं - कोन्ही सांगत नव्हतं. थेट नाना डेपूटीले इचाऱ्याचा संबंध नव्हता. तशी कोन्हाची हिम्मत नव्हती. तो न्याऱ्याच आवेशात व्हता. कोन्हाचं आयकून घ्याच्या तयारीत नव्हता. चालत व्हता, गाया देत व्हता,
``कसा मस्ती आला तं् पहातो साल्याले...''
``कोन आडवा येतो त्येल्हे बी पाहातो..''
``कोन तुह्या बाजूनं खिजतो त्येल्हे बी पाहतो...''
``पाहतो साल्याची!...''
कोन्हाची पहातो समजत नव्हतं. बरं आझून तो थांबला नव्हता की नाव घ्यून गाया देत नव्हता. त्येच्यानं उमज पडत नव्हता. नाना डेपूटीच्या शेपटावर कोन्हं पाय देल्हा त्ये समजून येत नव्हतं. परकार काय हाये त्ये बी कळून येत नव्हतं. यकून परकरन गंभीर वाटत व्हतं. त्येचानं लोकं चकायले व्हते. हातातला कामधंदा सोडून रस्त्यानं चालत व्हते. नाना डेपूटीच्या मांघी गोंडा घोयत व्हते. तो धडाधड चालत व्हता...
पुढी गेल्ह्यावर काय केल्हं त्येन्हं - थोडा थांबला. तठी यक बैलगाडी उभी व्हती. तिचं शिंगाडं काढलं.खसकन् उपसलं तलवारीसारकं, कोन्हाच्या कंबरड्यात टाकतो? लोकं पुढी सरसावले. आवराआवर कऱ्याले लागले,
``जावू द्या व्हो नानाभू% ! कोन्हाले मारता ?''
``हां% हां% ! कोन वाटी गेल्हं तुमच्ह्या ?''
``जावू द्या हो नानाभू% ! कायदा हातात घ्यू नका.''
`समजून सांगा. कोन्हं काय केल्हं तं...''
लोकं मधारकी पडल्यावर जास्तस चेव आला नाना डेपूटीले. शिंगाडं जावू देल्हं त्येन्ह हातातलं. म्होट्यानं बोंबलून उठला,
``खबरदार कधी कोन्ही मंधी आला तं् %% !''
यका डरकाळीत लोकांल्हे मांघी सारलं त्येन्हं. आन् सोता उडी मारली डुकरावानी. चवताळून गेल्हा दामूच्या घरावर,
``वो % तुह्या मायचा दाम्या % भाईर निंघरे % तु घराच्या %%''
निस्ता तोंडानं बांेबल्ला नि तो. दामूच्या घरावर चाल करून गेल्हा. दामूचं घर काही धाब्या, पत्रा, सिमिटाचं नव्हतं. काडीगयतनाचं व्हतं. त्या घराच्या दाराशी हा उभा राहला राकशासारका. तोंडाचा भाता सुरू. झोपडीच्या वसाऱ्यात हात खुपसला. वसाऱ्यातला वासा उफसला. दामू व्हता घरात. काय गडबड हाये म्हणून आला पाह्याले भाईर. आधीस भेदरून जायेल व्हता तो. काही समजायच्या आधी धरला नाना डेपूटीनं. डापकं केल्हा न मारला उपटून. वऱ्हून लाथा बुक्क्यांचा मार सुरू केला. दे की दनादन. लाकडाच्या वाशाचा मार देल्हा. खपाखप बोखारा चेंदला. पाठीवर वासा फोडला. डोखंगिखं फोडून रक्तभंबाय केल्हा. दाम्या बोंबलत राहाला,
``मेल्हो रे, बाप्पा %''
``कोन्ही आवरा रे, दादा %%''
``मल्हे मारु नकोर रे %, दादा %%''
``मीन्ह काय केल्हं रे, बाप्पा %?''
बोंबलून बोंबलून दाम्याचा आवाज बसला. कोन्ही पुढी आलं नि. काहून की परकरन गंभीर वाटत व्हतं. तसस निघालं! दामूनं नाना डेपूटीच्या भाऊकीतल्या यका विधवा बाईचं नाव घेतलं व्हतं. आत्तास तशी बांेब फुटली व्हती. त्येच्यानं कोन्ही मंधी पडयाले तयार नव्हतं.
``खबरदार भडव्या ! पुन्हा कधी आमच्ह्या शेपटावर पाय देल्हा तं्% ! वऱ्हून काय केल्हं म्हन्तू का?''
चांगला खंुदलून घेतला डेपूटीनं दाम्याले. यक सबद आयकून घेतला नि. बोंबलू देल्हा नि. सम्द्या गावासमोर धुतला न् माघारी फिरला. परतीच्या परवासात बी तोंड तानत व्हता तो,
``नाव घ्या म्हना फक्त कोन्ही साल्या व्हो %%...''
``येचं कंबर मोल्डं. दुसऱ्याले खल्लास करीन...''
``नल्डीचा घोट घिन...''
``काय समजले म्हना...''
वल्गना करत तो सुनंदाच्या दारी धडकला. तिच्या दारी आधीस बाया जमा व्हयेल व्हत्या. सुनंदा रडत व्हती. बाया तिच्याजो जमा व्हयेल व्हत्या. नाना डेपूटीले पाहून बाया बाजूला झाल्या. पधरं गिधरं सावरून उभ्या राहाल्या. सुमनचं रडणं थांबलं. मान खाली गेल्ही तिची. तिच्याकडी पाहात नाना डेपूटी बोल्ला,
``काही घाबऱ्याचं नि कोन्हाले. मी बशेल हाये. आत्ता कंबल्ड मोडून आलो त्या भडव्याचं. पुन्हाघडी नाव घेणार नि. तोस काय दुसऱ्या कोन्हाची हिम्मत व्हनार नि. कोन्ही काही बोल्ल तं् मी हायेस...''
सुनंदाचा कैवार घ्यून निंघून गेल्हा नाना डेपूटी. थोड्या टायमानं बाया येल व्हत्या त्या बी गेल्ह्या. शेवटी पारबती न् सुनंदा उरली. सुनंदा रड्याले लागली. तिल्हे समजवत पारबती बोल्ली,
``बस्स कर नं व माय %!''
``.............''
``चांगलं ठेसलं डेपूटीनं त्या कुत्र्याचं थोबाडं...''
``त्येचं तोंड ठेसालं पन महे तोंड काये झालं न् व बहे.''
``कशाले काये व्हईन तुहे तोंड कान्नू %! उलट चांगलं झालं. नही तं त्या मेल्याची हिम्मत वाढली आस्ती. आज बोल्ला काल्दी हात धरला आस्ता तुह्या त्येन्हं. तुह्यामांघी कोन हे? रांड मुंड बाई तू!``
आपण रांडमुंड बाई हाये याची जाणीव झाली व्हती आज सुनंदाले. आधलोंग काही वाटलं नव्हतं तिल्हे. काहून की तसा परसंगस गुदरला नव्हता. नवरा गेल्ह्यापासून. काही कोन्ही बोल्लं नव्हतं का कोन्हाची वाईट नजर पडली नव्हती. उलट सहानुभूतीनं पाहात व्हते लोकं तिच्याकडी. आडी आडचणीले मदत करत व्हते. चांगलं बोलत व्हते. काही कोन्हाच्या मनात वाईट हेतू नव्हता. सुनंदाची वागणूक बी तशीस व्हती. कधी डोख्यावरच्हां पधर खाली पडू देल्हा नि की ऱ्ही नजर करून चाल्ली नि. दुसऱ्याच्या आथीवर मोलमजुरीनं जात व्हती. आपलं पोट भरत व्हती. कधी काही चाहाय आला नि. कोन्हीशी बोल्नं नि की चाल्न नि. लांडीलबाडी केल्ही नि. आशी तिची वागणूक व्हती.
कालचास दिवस दुव्वाड निंघाला. कधी त्ये आक्रीत घडलं. कधी नि त्ये काल्दी पारबीबरबर गेल्थी रानात. काड्या आन्याले गेल्थ्या त्या दोन्ही. कधीनवत गेल्ही तं आशी बोंब झाली. काड्यागिड्या काढल्या. त्येन्हं भारेगिरे बांधले. भारे उचलून द्यासाठी दाम्याले हाक मारली व्हती पारबतीनं. यका हाकीवर आला दाम्या. त्यालागी ढोरं चारत व्हता तो. भारेगिरे देल्हे उचलून त्येन्हं. चाल्ला गेल्हा ढोरांकडी. जातांना यक खोडी केल्ही त्येन्हं. केल्ही की नि केल्ही - पारबतीनं सांगलं,
``का वं सुनंदा, काय बोल्ला वं तो ?''
``मल्हे नि मायथी, काय बोल्ला तं माय !''
चालत चालत थोड्या पुढी आल्या त्या. गावाच्या रस्त्यानं लागल्या. पारबतीनं पुन्हा विषय काढला,
``दाम्या काय इचारत व्हता म्हनलं ?''
``काय ?''
``तुह्या बाऱ्यात इचारत व्हता तो.''
``काय ?''
``म्हने सुनंदा `करु'दिन का ?''
``काही लाज त्या रांडमेल्याले! मढं जावो त्येचं त्येल्हे माय बहीन नि कां? आन् तुम्हींनं तठीस काहून सांगलं नि मल्हे ?''
- आसं म्हनत डोक्यावरचा भारा खाली फेकला व्हता सुनंदानं. तयापायातली आग मस्तकात गेल्थी तिच्या. लालभडक झाल्थी. रस्ता चाल्नं सोडून म्हनली व्हती,
``चाला तं त्येचं तोंड फोडते मी.'' पायातली वहाण काढली व्हती तिन्हं तठीस. पारबतीले ठणकावलं व्हतं. तोंडावर तोंड - सयगाई कऱ्याची म्हणत व्हती. चप्पलनस झोडते म्हणे दाम्याले. तोंड फोडते म्हणे त्या मेल्याचं.
पारबताबाई काय समज्याचं त्ये समजली. सावरा सावर करू लागली. आवरती घेत न्हनली,
``जावू दे न् माय ! तुल्हे कुठी बोल्ला तो.''
``आता तुम्हीनस त् सांगलं.''
``जावू दे न् माय ! तू बी काय लावून धरती.''
``नही. नही. आसं कसं काय? आठी का इज्जत रस्त्यावर पडेल हाये का?''
``रस्त्यावर नि पन गावात बोंब व्हईन माय%! कायन्ही न् माहीनी बट्टा लागून जाईन माय%.''
सुनंदा आयकून घ्याले तयार नव्हती. त्ये तोंडावर तोंड कऱ्याचं म्हनत व्हती. दाम्याचं तोंड फोड्याचं म्हनत व्हती. पारबताबाई मातर मोडा घालत व्हती. समज घालत व्हती. भीती दाखवत व्हती. तसस केल्हं मंग तिन्हं. सुनंदाचा भारा उचलून देल्हा. सोता बी उचलला. न् पुढी घालून घ्यून आली सुनंदाले गावात.
घरी आल्या आल्या सुनंदा रडत राहाली. नवऱ्याच्या फटुकडी पहात राहाली. लय वाईट वाटत व्हतं तिल्हे. कधी नि आशी गोस्ट घडली व्हती. तशी पहाली तं् काही घडली बी नव्हती. आन् घडली बी व्हती. नुस्ता खरखरा वाटत व्हता. पस्तावा व्हत व्हता. नाहक गेल्ही मी काड्यांल्हे. नस्ता गेल्ही मी पारबताबाईसंग. आशानं आसं तशानं तसं! काहीमाही इचार डोक्यात येत व्हते. इचार करत व्हती, रडत व्हती. संध्याकायी चूल्हा पेटवला नि की जेवन केल्हं नि तिन्हं. तुकडा खायाले जीव धजावत नव्हता. तशीच झोपून-पडून राहाली. दुसऱ्या दिशी बी त्यास घोकात राहाली. आपली आपली. काही कोन्हा जो बोल्ली नि की चाल्ली नि.
सुनंदा आपल्या इचारात - रडबोंबल मंधी - घोकामंधी राहाली न् गावात `हे' माजन उभं राहालं. कसं राहालं - कुठून राहलं? काही काही कळून येत नव्हतं. यकायकी फिरलं व्हतं वारं. नुस्त वारं नि वारावाधन सुटलं व्हतं. सम्दं गाव चकायलं व्हतं. गावभर माज चढला. नाना डेपूटी दाम्याले झोडपून आला. खूद सुनंदाले बी दटावून गेल्हा. कैवार घ्यून गेल्हा. सोताच्या आंगावर वढून घेतलं त्येन्हं सम्दं. डंखा बजावून गेल्हा.
कोन्ही काही कोन्ही काही बकत व्हता. तोंडात यीन ते बकत व्हता. उलट सुलट बोलत व्हता. काय झालं? कसं झालं? सुनंदाले काही कळत नव्हतं. आपल्या भवती काय घोरपड आणली? कोन्ह आणली? का तिची तिची आली? काही काही कळून येत नव्हतं तिल्हे. काय झालं-कसं झालं-काही काही कळून येत नव्हतं. तिचं डोखं चालत नव्हतं. रडत व्हती, बोंबलत व्हती. खराखरा करत व्हती. जिवाले खात व्हती. डोखं खाजवत व्हती. डोखं चालत नव्हतं तिचं. पारबताबाई बसून व्हती तिच्याजो. डोखं दाबून धरत व्हती. धीर देत व्हती,
``जावू दे न् माय आता काहून रडून राहाली.''
``रडू नि तं् काय करू व बहे मी ?''
``धीर धर ! सम्द नेम्भन व्हईन. व्हईन काय झालस समजा.''
``काय झालं?''
``नाना डेपूटीनं दटावलं त्येल्हे. आता नाव नि घेणार तुहे तो. तोस काय दुसरा कोन्हीस घ्यू शकत नि तुहे नाव आता.''
``कसं काय?''
``कसं काय म्हणजे %! नाना डेपूटी नि का तुह्या मांघी आता. नाना डेपूटीले कमी समजली का तू. ढाण्या वाघ हाये म्हणलं तो. त्येचा पंजा ज्येच्यावर पडला त्येल्हे खाल्याबगर राहात नि तो.''
``म्हन्जे?''
``म्हन्जे काय म्हन्जे वाघाचे पंजे, तुल्हे नि समझणार, थांब तू जराक...''
- आसं म्हणून विषय मोडता घेतला पारबतीनं. तिचं म्हन्नं आसं व्हतं की, जे व्हतं त्ये चांगल्या करता व्हतं. झालं गेल्हं इसरून जाय. घाबरू नको. भविष्याची फिकीर करू नको. काहून की नाना डेपूटी तुह्या मांघी हे. आझून काय पायझे तुल्हे? नेमकी हेस गोस्ट सुनंदाले नको व्हती. नाना डेपूटीच्या कानालोंग हे गोस्ट जायाले नि पायझे व्हती. काहून की नाना डेपूटी तिच्या भावकीतला व्हता. नात्यानं म्होटा जेठ लागत व्हता. शिवाय तो गावाचा पुढारी व्हता. डेपूटी सरपंच व्हता.गावात इज्जत व्हती त्येची. वजन व्हतं. आपल्यामेती आपल्या जेठाचं नाव खराब व्हायाले नको. आपल्या भावबंदकीची इज्जत जायाले नको. घराण्याचं नाव कमी व्हायाले नको, आसं तिचं म्हन्न व्हतं. आन् नेमकं उलट घडलं व्हतं. सऱ्या गावभर डफडं वाजलं व्हतं.
सऱ्या गावभर डफडं वाजवलं? काही काही कळून येत नव्हतं सुनंदाले. नाना डेपूटीलोंग गोट गेल्हीस कशी? काही कळून येत नव्हतं तिल्हे. पारबतीले इच्याऱ्याले गेल्ही त् त्ये हात उच्चे कऱ्याले लागली. दाबून माऱ्याले लागली. सुनंदाले बोल बोलू देत नव्हती. वऱ्हून उल्टी तंगडी करून मुतत व्हती. जे झालं ते चांगलं झालं, आसं पटावून सांगत व्हती. आपलं टुमनं लावून धरले तिन्हं.
घेतली सुनंदानं बी मंग मनाची समज घालून. नाईलाज झाला तिचा. पारबतीपुढी टिकाव लागला नि तिचा. तग धरू शकली नि. पारबतीचा रेटा वाढत गेलहा. वाढत्या रेट्यात वाहात गेल्ही सुनंदा. आपल्या कामात लागून गेल्ही. झालं गेलं इसरून गेल्ही.
- काही दिवस आशेस गेल्हे. कोन्ही काही बोल्ल नि. काही कोन्ही आलं नि. चुकून तिचं नाव घेतलं नि कोन्हं. पारबताबाई बी जास्त आली नि. मधून मधून येत राहिली. सांग सवर करत राहिली. यकादिशी दुफारी आली त्ये. म्हन्ते कशी,
``माय सुनंदा, नाना डेप्युटी इचारत वहते तुह्या बाऱ्यात.''
``काय इचारत व्हते व बहे?''
``महनत व्हते की, सुनंदाचा घरकुलामंदी नंबर लावना पडीन.``
``चांगलं व्हईन्न माय मंग!''
``रांडमुंड बायांल्हे भेटतो तो पगार बी सुरू करन्हार हायती त्ये तुह्या.''
``मंग तं लय चांगलं व्हईन व बहे.''
``चांगलं व्हईन न?''
``हाव्व माय ! तू कर माय सांग सवर त्येंल्हे तशी. तुह्या लय राशी हायती त्ये. लावून दे माय महया बी वशीला.''
``त्येची नको फिकीर करू तू. मी, बशेल हाये न्...''
``लवकर करा म्हणा दादा बाप्पा !''
``करतीन वं माय, धीर धर तू जराक...''
``बरं व्हईन माय मंग!''
``पाहाय बयन्हा ! जे व्हतं त्ये चांगल्या करता व्हतं की नि?''
``जावू दे वं बहे !''
- आसं म्हणून लाजली सुनंदा. मोडा देल्हा तिन्हं. बरं बी वाटलं. बरं काय चांगलीच कळी खुल्ली. तिची कळी खुलेल पाहून पारबतीनं गेम खेळला. लगोलग बोल्ली,
``आज संध्याकायीस येन्हार हायती मंग नाना डेपूटी तुह्या घरी.''
``काम्हू व बहे?''
``हेस! पगाराचं... घरकुलाचं... पाह्याले... काही कागदपत्रकं करने हायती म्हणे...त्यंेच्यावर तुह्या सह्या आंगठे घेने पडती न्ना?''
``हाव !''
पुढे बोलू पावली नि सुनंदा. पारबतीच्या बहकाव्यातून यून गेल्ही. गुमान बसून राहाली. नाना डेपूटची वाट पाहात राहाली. संध्याकाय झाली. अंधार पडला. सामसूम झाल्यावर आला नाना डेपूटी. त्येच्या मागून पारबती. नाना डेपूटीले घरात घुसू देल्हा न् त्ये निंघाली भाईर. भाईरून `कडी' लावून चाल्ली गेल्ही...
Posted in



Office 2007 Many of our MS
Office 2007 Many of our MS Office 2010 own beta users cheap microsoft office 2007 possess got installed Office 2010 Professional onto their low purchase microsoft office 2007 notebook Personal computers microsoft office 2010 product key This specific provides download Office 2007 standin towards the office professional plus 2010 calm column and Office Professional 2007 considerably grows mere Office 2010 Pro fascinatio. Everyon who Microsoft Office 2007 Enterprise .
Michael Vick Authentic
Michael Vick Authentic Jersey
DeSean Jackson Authentic Jersey
Nnamdi Asomugha Authentic Jersey
Brent Celek Authentic Jersey
LeSean McCoy Authentic Jersey
DeSean Jackson Jersey
Michael Vick Jersey
Nnamdi Asomugha Jersey
Brent Celek Jersey
LeSean McCoy Jersey
Asante Samuel Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Nathaniel Allen Jersey
Randall Cunningham Jersey
Reggie White Jersey
Stewart Bradley Jersey
Wes Hopkins Jersey
Dominique Rodgers-Cromartie Jersey
Customized
LaDainian Tomlinson Authentic Jersey
Darrelle Revis Authentic Jersey
Nick Mangold Authentic Jersey
Mark Sanchez Authentic Jersey
Dustin Keller Authentic Jersey
Jets Jersey
New York Jets Jersey
Cheap Jets Jersey
Antonio Cromartie Jersey
Bart Scott Jersey
Brett Favre Jersey
D'Brickashaw Ferguson Jersey
Darrelle Revis Jersey
Dennis Byrd Jersey
Dustin Keller Jersey
Dwight Lowery Jersey
Joe Klecko Jersey
Joe Namath Jersey
Kyle Wilson Jersey
LaDainian Tomlinson Jersey
Laveranues Coles Jersey
Leon Washington Jersey
Mark Gastineau Jersey
Mark Sanchez Jersey
Muhammad Wilkerson Jersey
Nick Mangold Jersey
Plaxico Burress Jersey
Santonio Holmes Jersey
Shonn Greene Jersey
Thomas Jones Jersey
Vernon Gholston Jersey
Wesley Walker Jersey