Skip to main content

पत्नीला अचानक जाग आली. पत्नीनं बंद खिडकीच्या काचेच्या
दिशेनं पाहिलं. खोलीतला काळोख आणि खिडकीच्या काचेबाहेरचा,
रस्त्यावरच्या दिव्यांचा परावर्तित प्रकाश ह्यांचा तुलनात्मक अभ्यास
तिनं केला. त्यावरून अंदाज येईना की किती वाजले असतील.
आसमंतात सगळीकडे शांतता होती. शांततेच्या घनतेवरून किती
वाजले ते कळू शकतं. पत्नीनं तर्क केला की रात्रीचे दोन अडीच
वाजले असावेत. शनिवार संपून रविवार सुरू झाला असेल! पत्नीला
वाटलं सरळ घड्याळातच पाहावं, पण जवळ घड्याळ नव्हतं.
उद्या रविवार. तेव्हा शनिवारच्या रात्री, निर्विघ्न व बाधारहित
झोप मिळावी म्हणून तिच्या पतीने घड्याळ जवळ ठेवलंच नव्हतं.
शनिवारी रात्री पतीला घड्याळाच्या टिकटिकीचाही आवाज झालेला
चालत नसे. पतीनं मोबाईल स्वीच ऑफ केला होता. लँडलाईन
फोन डिसकनेक्ट केला होता. डोअरबेल बंद करून टाकली होती.
तसेच खोलीच्या सर्व खिडक्या बंद करून, त्यानं बाहेरची वाहनं,
कुत्री, सोसायटीच्या बागेतील पिंजऱ्यातली बदकं इत्यादींचा
आवाजही खोलीत येऊ नये अशी व्यवस्था केली होती. घरातल्या
पोपटाचा पिंजराही त्यानं बाल्कनीत अडकवून टाकला.
हा झाला श्रवणमार्गे होणाऱ्या त्रासाचा बंदोबस्त. दृकत्रासाचा
बंदोबस्त करण्यासाठी त्यानं रुमालानं डोळे घट्ट बांधून टाकले होते.
शनिवारची ती रात्र पती शांत झोप घेणार होता. सोमवार ते शनिवार
तो कॉम्प्युटरवर डोळे रोखून असतो. तो दमतो. त्याचं डोकं, मान,
पाठ आणि डोळे दमतात. शनिवारी रात्री मिळणाऱ्या संपूर्ण, सलग
झोपेवर पतीचा हक्क असतो. पती झोपला होता. आणि पत्नीला
अचानक जाग आलेली.
आपल्या श्वासोच्छ्वासाच्या आवाजामुळे त्याची निद्रा भंग पावू
शकेल ह्या भयाने तिनं अजिबात आवाज होऊ न देता श्वास घेतले
होते. इतकी काळजी घेतल्यानंतर आता पत्नीला अचानक जाग
आली आताना, ह्या परिस्थितीत पावलांचा आवाज होऊ न देता
त्यांच्या खोलीचे दार उघडून बाहेरच्या हॉलमध्ये जाऊन, तिथं
झोपलेल्या तिच्या दोन मोठमोठाल्या मुलींची झोप चाळवू न देताघड्याळ बघणे हे पत्नीला अवघड कामच वाटले.
अत्यंत दबकत दबकत तिने सावकाश कूस बदलली. मंद गतीने
श्वासोच्छ्वास करीत फक्त पडून राहायचे, आपल्या अस्तित्वाचा
कोणालाही त्रास होऊ न देता, गुपचूप निद्रा घेण्याचा प्रयत्न करायचा,
असा तिनं निश्चय केला. खरंतर आलेली परिस्थिती स्वीकारण्याची
आजन्म सवयच होती तिला, पण तिचे अचपळ मन आज ऐकेच ना.
अगदी `नावरे आवरिता'च करायला लागलं. पत्नीला गप्प पडवेनाच.
पत्नीचं मन म्हणालं, `ऊठ, मस्त दिवा लाव आणि तुझं आवडतं
पुस्तक वाच.' परंतु लगेचच तिच्या लक्षात आलं की तिच्या
मोठमोठाल्या मुलींच्या खोलीत अभ्यासासाठी टेबल लँप आहे, पण
तिच्या खोलीत असा टेबललँप अस्तित्वातच नाहीये. दुसरं म्हणजे
तिला स्वत:ची वेगळी अशी खोलीच नाहीये. जी आहे ती तिची
आणि तिच्या पतीची संयुक्त खोली आहे. तेही शयनगृह आहे. इथे
तिनं पतीच्या शेजारी नियंत्रित श्वासोच्छ्वास करीत फक्त झोपणेच
अपेक्षित आहे. इथं दिवा लावल्यास पतीच्या नेत्रांवर प्रकाश पडणे
यासारखी परिस्थिती उद्भवू शकते. शिवाय तिच्यापाशी पुस्तकंही
नाहीत. त्यांच्या घरात पतीने हौसेने विकत घेतलेली काही इंग्रजी
पुस्तके आणि मुलींची अभ्यासाची पुस्तके होती. आजार आणि
घरगुती उपचार, गृह सजावट आणि त्वचेची निगा ही पुस्तकेही होती.
हे पत्नीला कबूल करावेच लागले.
एकूण मनाला कितीही उद्वेग आला तरी झोपलेच पाहिजे.
झोपावे अथवा जागेही राहण्याचे स्वातंत्र्य घ्यावे पण त्यांना रात्रीचे
वाचता येणार नाही हे पत्न्यांनी लक्षात घ्यावे.
मग झोपून झोपून कंटाळा आला तर अशा अपरात्री करावे तरी
काय?
लता, रफी, आशा, शमशाद, नूरजहाँ इत्यादी नामांकित गायक
गायिकांची गीतं ऐकावीत का? इतर झोपले त्यांना त्रास न होता
अशी गीतं ऐकण्याची सोय आधुनिक युगात वॉकमन आणि आयपॉड
ह्या उपकरणांच्या साहाय्याने सहज उपलब्ध झाली आहे. मात्र
पत्नीच्या लगेच लक्षात आले की आयपॉड मुलींच्या खोलीत असून
इयरप्लग्ज कानात खुपसलेल्या अवस्थेतल्या त्या निद्राधीन झाल्या
आहेत. दुसरा पर्याय वॉकमनचा. मात्र तिला वॉकमन कुठे ठेवला
आहे, त्यात सेल आहेत की नाहीत तसेच त्याचा हेडफोन कुठे आहे
हे स्मरेना. मुख्य म्हणजे घरात लता, रफीच्या क्रॅसेट्स आहेत की
नाहीत तेही स्मरेना.
अशी अचानक जाग आली असताना दृक्श्राव्य माध्यमांपैकी
टीव्ही हे माध्यम उपयुक्त ठरू शकतं पण त्याच्या ध्वनी आणि
प्रकाशाचा, सोम ते शनि काम करून थकलेल्या निद्रिस्त माणसाला
त्रास होऊ शकतो. शिवाय टीव्हीवर रात्री कोणत्या सिरियल्स
दाखवतात हेही तिला स्मरेना.
स्मरणशक्तीच अशक्त होण्यासारखे दुसरे दुर्दैव नाही.
तिला असहायपणे रडू आले. रडू म्हणजे काय तर एकच अश्रू.
सिरियलमधल्या नायिकेचा ओघळतो, तसा तिच्या गालावरून
ओघळला.
तेवढ्यात तिच्या पतीने कूस बदलली. आपल्या डोळयातल्या
अश्रूने ओघळताना आवाजबिवाज केला की काय ह्या आशंकेनं ती
निस्तब्धपणे दचकली. पण पती लगेच झोपी गेल्याची चाहूल घेऊन
तिने आवाज न करता अश्रू पुसला आणि आवाज न करता नि:ेशास
सोडला. स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी काम करणे हा एक पर्याय
होता. मात्र त्यातही भांड्यांचा आवाज होणे, स्वयंपाकघर बेडरुमला
चिकटूनच असल्यामुळे तो आवाज पतीला ऐकू जाणे, स्वयंपाकघरात
लावलेल्या दिव्याच्या प्रकाशाची मंद आभा मधल्या पॅसेजमध्ये पडून
पतीच्या रुमालाने घट्ट बांधलेल्या डोळयांना ती आभा जाणवणे इत्यादी
धोके होतेच.
पत्नीला वाटलं आपण घरात एकटेच राहात असतो तर किती
बरं झालं असतं! पती नको, मुली नकोत. घरात कुणीच नको. सगळं
घर एकटीचं. ती वाटेल तेव्हा झोपेल. वाटेल तितके तास झोपेल.
वाटेल तेव्हा उठेल. मोठ्यांदा गाणी लावेल. त्यावर नाचेल. ५ बादल्या
पाण्यानं एक तास अंघोळ करेल. एखादाच आवडता पदार्थ शिजवेल
किंवा बाहेरून मागवेल. बाहेर भटकेल. सिनेमा पाहील, भेळ खाईल.
काहीही करेल. ती कुणालाही स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही.
पत्नीला मुळी कुणी कसले प्रश्नच विचारायचे नाहीत. विचारणाऱ्याचा
शिरच्छेद केला जाईल. पत्नीभोवती कुंपणं घालणाऱ्यांना हत्तीच्या
पायी दिलं जाईल. हे जग कोण लागून गेलं? उचलून फेकून देईन हे
जग कृष्णविवरात. तिनं हात उंचावला. तिच्या हाताला कॉटची कड
लागली.
काय करावं? कसा संपवायचा हा वेळ? कशी काटायची रात्र?
कसा घालवायचा कंटाळा? किती काळ असं निष्क्रिय पडून राहायचं?
अख्खीच्या अख्खी अंगावर आलेली ही रात्र कशी संपवायची हा
एक मोठाच प्रश्न तिला खायला उठला.
जुनी गाणी आठवावीत का? नको. त्या गाण्याशी जुळलेल्या
आठवणी मनाला ओरबाडायला लागतात. ते ओरखडे नकोत.
त्यापेक्षा बोअरडम पत्करला.
जीवनातले अविस्मरणीय प्रसंग आठवावेत का? म्हणजे कुठले?
तर माझा आणि माझ्या पतीचा विवाह, माझ्या पहिल्या अपत्याची
चाहूल उर्फ संसारवेलीवर उमललेलं फूल. मग दुसऱ्यांदा त्याच वेलीवर
उमललेलं दुसरं फूल. त्यांचे `मधुर स्वप्न' ही अक्षरं भरलेल्या अभ््रयांच्या
उशीवर पालथे टाकून काढलेले फोटो. मनारंजनासाठी जुन्या
आठवणीत रमणे. ह्या प्रकारात पहिली मुलगी झाल्यावर वाईट वाटलं
ते आठवायचं नाही. दुसरीही मुलगीच झाल्यावर दवाखान्यात रात्री
एकट्याच रडलो तेही आठवायचं नाही.
आपण शिकलेल्या आणि आधुनिक विचारसरणीच्या, तसंच
जे येईल ते हसतमुखानं स्वीकारणाऱ्या, अशी सर्वांची समजून तब्बल
एक महिन्यांनी जी काय एकदोन माणसं दुसऱ्या मुलीला बघायला
आली. त्यांना आपण सांगितलं, `मुलगा मुलगी समानच आहेत.
मुलीच प्रेमळ असतात. आईवडिलांना सांभाळतात. मृत्यूनंतर मुलाने
अग्नी दिल्यासच मोक्ष मिळतो ह्याला पुरावा नाही. आपलं नाव मुलगा
लावतो पण नातू लावत नाही. मुलगा म्हातारपणी आपल्यालासांभाळतोच असं नाही. तो अमेरिकेत स्थायिक झाला तर? त्यानं
तिथूनच आपल्या फ्यूनरलच्यावेळी इंटरनेटवरून बुकेचं चित्र पाठवलं
म्हणजे? मुलगा अमेरिकेत असणं म्हणजे इकडे आपण निपुत्रिक
असण्यासारखंच आहे.''
पत्नीचं इतकं सगळं वक्तृत्व ऐकून आलेली माणसं कंटाळून आणि
दिपून जात. जाता जाता `मुलगी होणंच चांगलं' असं स्वत:च्या
गालावर तळहातानं थापट्या मारत कबूल करत. मुलीच्या हातात,
त्यांच्या मुलाच्या बारशाला आलेलं झबलं-टोपडं ठेवून निघून जात.
हे आठवायचं?
मुलगी झाल्याबद्दलचा दु:खाक्रोश आपला आपल्याला ऐकू येऊ
नये म्हणून स्त्रीमुक्तीवाल्या मासिकात छापून आलेलं, किती मोठ्या
आवाजात आणि किती वेळ बोलायचो आपण? आपलं सामान्यपण
स्वीकारण्याचा वकूब नव्हता आपल्या अंगात.
न का विचारेना मला म्हातारपणी. मंत्राग्नी आणि मोक्षही गेले
भाडमध्ये. पोटी मुलगा जन्माला येणं. तो घरात, आजूबाजूला
अस्तित्वात असणं हेच किती सुखकारक असतं. एकतरी मुलगा
बापाशप्पत आपल्याला अगदी हवाच होता हे कित्येक रात्री रडताना
स्वत:शी कबूल केलं, मग बाहेरच्या जगाजवळ का नाही कबूल
केलं? आपण एक सामान्य फडतूस बाई आहोत हे का नाही
स्वीकारलं? आपली प्रतिमा जपण्याच्या हट्टापायी खोटं जगलो आपण.
प्रतिमा जपणं म्हणा किंवा मुखवटा चढवणं म्हणा. मुखवटा
चेहऱ्यावर फिट्ट करून टाकला. तो झोपताना आणि अंघोळ करतानाही
काढला नाही. झोपताना मुखवट्याच्याच पापण्या मिटायच्या आणि
अंघोळ करताना मुखवट्यालाच साबण लावायचा.
पत्नीनं जी जी इच्छा व्यक्त केली, त्याला त्याला नियती तथास्तु
म्हणाली.
नकळत्या वयात कुठल्याशा एका वादविवाद स्पर्धेत तिनं आपलं
एक मत मांडलं की, `आपला नवरा इतरांपेक्षा श्रेष्ठच हवा असा
आग्रह स्त्रीनं का धरावा? यात तिची मानसिक गुलामगिरीच दिसते.
नियती म्हणाजी, `तथास्तु'. आणि नियतीनं कसलीच
महत्त्वाकांक्षा नसलेला एक सामान्य माणूस तिच्या पदरात नवरा म्हणून
टाकला. पत्नी म्हणाली, `मुलगाच हवा हा हट्ट कशासाठी? नियतीनं
तथास्तु म्हणत तिच्या पदरात दोन्ही मुलीच टाकल्या.
पत्नी म्हणाली, `एका खोलीत, अडचणीत राहावं लागलं म्हणून
काय बिघडतं? माणसाचं मन सात खोल्यांएवढं मोठं हवं. नियतीनं
तिला वनरुम हॉल किचनमध्ये जन्मभर राहायला लावलं.
पत्नी म्हणाली, `नोकरी करून पैसे मिळवून आणण्यातच सार्थक
आहे असं स्त्रीनं का समजावं? घरकाम करण्यातही श्रमप्रतिष्ठा आहे.
स्वयंपाक करण्यातही नवनिर्मिती आहे.'' पत्नीला आयुष्यात कधीच
नोकरी मिळाली नाही. तिनं जन्मभर स्वयंपाक केला त्यात तिला
नवनिर्मितीचा आनंद सापडला नाही.
नंतरनंतर पत्नीला नवनिर्मिती कशात आहे हे शोधायचा कंटाळा
आला. कुठंच, कसलाच हुरूप वाटेना.
तिचा पती सामान्य असला म्हणून काय झालं? तो चांगला होता.
पत्नी नोकरी करून, कमवून आणत नसतानासुद्धा तो तिला बटाटे
चिरायला मदत करायचा. साडी आणायचा. पाडव्याला एकदा त्यानं
तिला ओवाळणीत कुड्याही घातल्या होत्या. त्यांना दोन्ही मुलीच
झाल्या याचं कारण समागमाच्या वेळी दोन्ही खेपेला आपल्याचकडून
`क्ष' रंगसूत्र दिलं गेलं हे ओळखून त्या सुशिक्षित माणसानं तिला
कधीच दोष दिला नाही.
त्यानं घरात एक लांबडा तीन सीटर आणि दोन वनसीटर कोच
आणले. पत्नीनं त्यावर हातानं भरतकाम केलेली बॅक कव्हर्स टाकली.
पतीनं घरात एक फ्रीज तर आणलाच पण त्यावर चिकटवायला
गणपतीचा एक लोहचुंबकवाला स्टीकरही आणला. त्यानं टीव्ही
आणला. टेपरेकॉर्डर आणला. आत्ता अलीकडे व्हीसीडी प्लेअरही
आणला.
पत्नीनं त्याच्या बहिणींची बाळंतपणं केली. त्याच्या
आईवडिलांची सेवा केली. ते दोघं वारल्यावर त्यांचे फोटो त्यानं फ्रेम
करून आणले. त्या फोटोंना पत्नीनं जयंती मयंतीला हार घातले.
मुलींना त्यानं कॉम्प्युटरच्या क्लासला घातलं. ट्नीपला पाठवलं. ते
दोघेही अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग यात्रा करून आले. माथेरान,
महाबळेेशर, शिवाय रत्नागिरी इथंही जाऊन आले. ते चौघे अधूनमधून
डोसा खायला बाहेर पडत. बटाटेवडाही खात. धाकटी म्हणाली
म्हणून ते दोनदा चायनीज खायलाही गेले होते.
मुलींच्या देखतही तो पत्नीला कधी कधी जवळ घेतो. फ्लाइंर्ग
किसही देतो.
पण... पत्नीला लाजायलाच होतं नाही. त्याचा स्पर्श झाला
तरी अंगातून झण्णकन वीज जात नाही.
पहिल्या रात्रीही अंगात वीज सळसळली नव्हती. असोशी,
आवेग, हुरहुर, जोश, उत्साह, थरथर, बेभान होणं हे कधी घडलंच
नाही. सगळं जगणंच सपक, निर्जीव, मचूळ, बेचव, निरर्थ.
तिखट, मीठ नीट पडलेलं असूनही वांग्याच्या बुळबुळीत
भरतासारखं.... जगणं.
जगणं चटकदार, चविष्ट, चटपटीत नव्हतंच कधीही
ते साचलेलं पाणी होतं. ते वाहतं पाणी नव्हतंच कधीही.
साचलेल्या डबक्यात बसून राहिलो. खळाळत्या खोल पाण्यात
सूर मारलाच नाही कधी. एक बाईमाणूस म्हणूनच स्वत:कडं पाहिलं
सदैव. स्वत:मधला माणूस कधी शोधलाच नाही. जे पाहिले, वाचलं,
ऐकलं त्यात वाहावत गेलो. प्रभावित झालो. तीच आपली जीवनमूल्यं
असा विचार न करता ठरवूनच टाकलं. आपल्याच्यानं कोणती मूल्यं
निभतील ते शोधलंच नाही. तपासलंच नाही.
ऐन उमेदीची वर्षं कशात गेली कळतच नाहीये. जमाखर्चाचा
ताळमेळ लागत नाहीये.
आता पन्नाशी ओलांडली.
आवडती गाणी ऐकायची राहिली. जुन्या मैत्रिणींशी गप्पा
मारायच्या राहिल्या. शाळेतल्या मास्तरांना गुरुपौर्णिमेला नमस्कारकरायला जायचं राहिलं. आजी, मावशी. काकू, आई, बाबा, काका
म्हातारे होऊन मरूनसुद्धा गेले. पण त्यांना भेटायचंच राहिलं.
नदीच्या काठी गुणगुणत, रमतगमत चालायचं राहिलं.
पौर्णिमेच्या चांदण्यात समुद्रकिनाऱ्यावर झोपून चंद्राकडं पाहायचं
राहिलं. ताजमहाल राहिला. जिम कार्बेट राहिलं, काश्मीर राहिलं,
कांचनगंगा राहिलं, दार्जिलिंग राहिलं, नैनिताल राहिलं, हावडाब्रीज
राहिला.
लहानपणी जमवलेला जुन्या नाण्यांचा संग्रह हरवला. वहीत दाबून
ठेवलेली पिंपळाची जाळीदार पानं हरवली. देवानंदचे जमा केलेले
फोटो हरवले.
माहेरच्या अंगणातलं भरभरून सुगंध देणारं बकुळीचं झाड उभंच्या
उभं वाळून गेलं.
वाळून गेलं म्हणून तोडलं गेलं.
जुनं सगळंच हरवलं.
नवं काहीच गवसलं नाही.
सगळं आयुष्यच निरर्थ झालं.
हे सगळं रात्र झाली की पत्नीला आठवतं. सगळं जग झोपलेलं
असताना, रात्रीच्या अंधारात तिला एकटीलाच गाठून आठवणीच्या
राक्षसिणी तिच्यावर हल्ला करतात.
ह्या हल्ल्यात ती विद्ध होते. कळवळते.
हे सगळं आणखी किती तास, किती मिनिटं सहन करायचंय
ह्याचा निदान एक अंदाज तरी त्या रात्रीनं आपल्याला द्यावा असं
तिला वाटतं.
ती आवाज न करता उठून बसते.
खिडकीकडे पाहते.
बाहेरचा काळोख फटफटत असतो.
पहाट होत असते.
तिच्या उरावरचं रात्रीचं ेशापद उठून दूर होतं. ती सुटकेचा नि:ेशास
सोडते.
तिच्या गळयाभोवतीचे काळेकुट्ट, धारदार नख्यांचे हात रात्रीनं
काढून घेतलेले असतात.
क्षितीजावर दिवसाचे दूत उभे असतात.
पत्नी उठते. दात घासते. तोंडावर पाणी मारते. पत्नीला प्रसन्न
वाटतं.
आता चहा करूया. गवती चहा, आलं टाकूया. तो मस्तपैकी
पिऊया.
दिवस सुरू झालाय. कदाचित हा दिवस वेगळं, नवं काहीतरी
घेऊन आलेला असेल. कदाचित.
ती बाल्कनीत गेली. उगवता सूर्य पाहायला. सोसायटीच्या
बागेतल्या पिंजऱ्यातली बदकं आनंदानं प्ॅक, प्ॅक करत होती.
नीता गद्रे
५०२, पराग, वसंतलीला,
घोडबंदर रोड, ठाणे - (प.)

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!

नीता गद्रेंचे ’निरर्थ’ हे 'कथन'

माणसांच्या आयुष्य़ात कोणत्या ना कोणत्या लहानमोठ्या प्रतिकूल घटना अंतर्‍यापायऱ्यांनी घडत रहाणारच ही चिरंतन वस्तुस्थिती असूनही पतीपत्नींनी परस्परांबद्दल केवळ आदर आणि प्रेमभावनाच नव्हे तर पूर्ण एकात्मभावना राखून दिनक्रमणा करण्याने त्या दोघांनाही त्यांच्या आयुष्यात विपुल शांती आणि आनंद लाभतात ही साधीसरळ गोष्ट आहे.

पण वर लिहिलेली साधीसरळ गोष्ट लक्षात न घेता नव्या जमानातल्या सुशिक्षित स्त्रिया ’सुखाच्या शोधा’करता कशा सैरभैर धावत आहेत त्याचा एक नमुना नीता गद्रेंच्या ’निरर्थ’ ह्या ’कथना’त प्रदर्शित झाला आहे. (हे कथन गद्रेंनी ’पत्नी’ नावाच्या स्त्रीच्या तोंडी घातले असले तरी ते त्यांचे ’आत्मकथन’ असल्याचे उघड दिसत आहे, पण समजा तसे नसले तरी तो मुद्दा गौण आहे.)

नीता गद्रेंच्या ह्या ’(आत्म)कथना’च्या शेवटाजवळ त्यांनी लिहिलेला काही मजकूर मी इथे उद्धृत करतो:

----------------------------------------------------------------------------------

...नदीच्या काठी गुणगुणत, रमतगमत चालायचं राहिलं. पौर्णिमेच्या चांदण्यात समुद्रकिनाऱ्यावर झोपून चंद्राकडं पाहायचं राहिलं. ताजमहाल राहिला. जिम कार्बेट राहिलं, काश्मीर राहिलं, कांचनगंगा राहिलं, दार्जिलिंग राहिलं, नैनिताल राहिलं, हावडाब्रीज राहिला....सगळं आयुष्यच निरर्थ झालं.

-----------------------------------------------------------------------------------

नव्या जमानातल्या सुशिक्षित स्त्रियांचे ’सुखाच्या शोधा’करता सैरभैर धावत रहाणे पाहून माझ्या मनात कणव उत्पन्न होतो.

============================================================

नीता गद्रेन्ची कथा

फारच छान..
सुन्दर..

The beauty of Thomas Sabo

The beauty of Thomas Sabo Charms is that you can build up your thomas sabo onlineshop carrier until it's really full and keep adding to it - it's great to watch it grow! The charms are great presents too - it's a fantastic idea to buy somebody a carrier for one special occasion and then the charms could be bought as presents for different occasions and the amount of charms would gradually grow with each represent thomas sabo charms like a birthday or Christmas.military trench coat
long trench coat
short trench coat
distressed leather jacket
wholesale leather jackets
plus size leather jacket
quilted leather jacket
cheap leather jackets for women