Skip to main content
Posted in

ुरुषार्थ
बसमधून चढता-उतरता
किती सहजपणे स्पर्श करतात ते
गर्दीचा आसरा घेऊन
सर्वांगाला
साळसूदपणे

त्यांच्या विकृत मनात
शोध मादीचा
भोगाचा
पण...
मी तर असते
आई
बहीण
लेक
पत्नी
बहुरूपा
आणि ते पुरुष कामांध
फक्त जागवू पाहतात माझ्यातील मादीपण
नऊ कोंदणात जपलेला हिरा
आपला इतका सहज हाती लागेल?
थू%%
तुमच्या पुरुषार्थावर!
जया गायकवाड, इस्लामाबाद

मीसुद्धा...!
तो छोटा मुलगा म्हणाला, ``कधी कधी जेवताना माझ्या हातून सांडतं!''
उत्स्फूर्तपणे आजोबा म्हणाले, ``माझ्या हातूनसुद्धा सांडतं!''
तो छोटा मुलगा हळूच पुटपुटला, ``कधी कधी माझी चड्डी नकळत ओली होते!''
``माझीसुद्धा!`` काहीसे ओशाळत, पण लगेच मोठ्याने हसत,
मिश्कील नजरेने त्याच्याकडे पाहात आजोबा हळूच म्हणाले.
``खूप वेळा मी रडतो! मला रडू आवरतच नाही!''
``अरे, मी सुद्धा!'' आजोबांनी समजुतीच्या स्वरात कबुली दिली.
``पण सगळयात जास्त ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की मोठ्ठी माणसं
आपल्याकडे लक्षच देत नाहीत. चक्क - दुर्लक्षच करतात!''
आजोबा क्षणभर काहीच बोलले नाहीत.
क्षणभरानंतर, छोट्याला जाणवली ऊब
आजोबांच्या कापऱ्या सुरकुतलेल्या पंजाची...
``तू जे म्हणतोयस ते पटतंय मला.... कारण...मलाही ते जाणवतंय
आणि त्यांचंच सगळयात जास्त वाईटही वाटतंय!''
आजोबांच्या आवाजातली कातरता छोट्याच्या -
अंतर्मनाला भेदून गेली.
(इंग्रजी कवितेचे स्वैर रूपांतर)
श्यामलता काकडे
श्रुती-१, विसावा पार्क,
सातारा - ४१५००३
मला हे घर पुरत नाही
मला हे घर पुरत नाही
मला मोठं घर हवंय्
खूप साऱ्या खिडक्या दारांचं
मोकळं, हवेशीर, प्रसन्न...
त्यात हवेत गवाक्ष, सौंध, झरोके आणि कोनाडे
(`जुनं ते सोनं' प्रकारातले!)
त्यात असावेत स्लायडिंग विंडोज, टेरेस गार्डन,
व्हेंटिलेशन-इको फ्रेंडली (`नवं ते हवं' प्रकारातले)

हे घर मला पुरत नाही
मला हवाय् स्वच्छ प्रकाश-संशय मिटवणारा
मोकळे निळे आकाश-पैस सांभाळणारे
शुद्ध निरामय हवा-मुक्त श्वास घेत जगू देणारी
सर्व दिशांचे भलेबुरे वारे-सद्सद्विवेक जागवणारे
भिंती हव्यात लवचीक, सरकणाऱ्या, पारदर्शी
ज्यातून सहज आरपार जावेत -
नव्या काळाचे भान
नव्या नात्यांची जाण...
खिडक्या हव्यात उघड्या,
गंजलेले गज नसलेल्या,
पडदे सारलेल्या,
पूर्वग्रहविरहित अर्थ जाणून घेणाऱ्या, ज्ञानपिपासू,
घर आणि अंगणाचा दुवा सांधणाऱ्या...

घराला दारं हवीत चिक्कार
सर्व दिशांतून आत येणाऱ्या क्षणांचे
उदार, उबदार स्वागत करणारी
उंबरठ्यावर न ठेचकाळता
सूर्याला झेलणारी
पावसाने न फुगणारी
थंडीतही सताड उघडं राहण्याचं धैर्य दाखवणारी
वास्तवाला कणखरपणे झेलणारी
पण शिवेतराला निग्रहाने थोपवून
घट्ट बंद होणारी... हितचिंतक!

मला हे घर पुरत नाही
इथल्या छोटेखानी मांडणीत
मोठमोठ्या पुस्तकांचा संकोच होतोय
त्यांतील विचारांचे व्यापकत्व
दाराच्या आत गुदमरून जातंय
मांडणी मोडून पुस्तकं सांडतात, भांडतात
नुसती `पुस्तकी' न राहता
बांधणीतून मुक्त होऊन
सत्याला थेटपणे भिडताना ती फाटतात
विस्कटतात, चुरगळतात
(तैलात रक्षेत, जलात् रक्षेत, रक्षेत शिथिलबंधनात्!)

सगळीकडे नुसता पुस्तकांचा कोलाहल
प्राणांतिक कलकलाट
शब्द जिवंत होऊन तनामनाला भिडतात,
भोगतात, जाळतात सुद्धा...

हे घर मला पुरेल कसं?
उंबरठ्यावर ठेच लागते सारखी-अल्पसंतुष्टपणाची!
दाराच्या कड्या घट्ट झाल्यात -रूढींसारख्या!
खिडक्यांच्या चिट्ट्या दाटल्यात - अंधश्रद्धांसारख्या!
पाया खचल्यासारखा वाटतोय-जगण्याचा!
बैठक पक्की हवी आहे-विवेकाची!
भिंतींचे सांधे-चिरा लिंपायला हव्यात
छप्पर तोलायला नवे आधार हवेत
`चौथा कमरा' प्रशस्त करायचाय
तिथे घ्यायचेत शोध, बोध आणि वेध-
स्वत:चेच!
बापरे! किती हा पसारा!
मोहातून जमवलेल्या वस्तूंनी
व्यालीये ही वास्तू...
हा भला मोठा विस्तार
कोंबता येत नाही दाटीवाटीत
कोंबणं योग्यही नाही
कोंबणं म्हणजे आवरल्याचा आभास.
त्यापेेेक्षा हवा आहे अवकाय-विस्तारण्याला!
घर पुरत नाही,
तर ते मोठं करायला हवं,
वाढवायला हवं
खरंच, मला हवं आहे एक्सटेंशन
ज्यामुळे भेटेन मी मला... सहजपणे...
चला, शुभस्य शीघ्रम्...!
आश्लेषा महाजन
`मंजिरी', २३०, चित्ररेखा सोसायटी,
सहकारनगर क्र.१, पुणे - ४११००९
तची आत्मवेणा
रात्र झाली की तो कुशीत शिरतो
नि सूर्य नाचवू लागतो माझ्या आंत....
मी ही वेडी नाचवू देते!
नि प्रसवत राहते कुळाचार

त्याचे डोळे जांभूळ ओले
पिऊन टाकतात माझी तहान

मी हटकले
की त्याचा एक गोळा होऊन जातो
हातपाय नसलेला
निसटू म्हटले
तर कापूर होऊन जळू लागतो तो...

लामण दिव्याच्या प्रकाशासारखी मी
भरून आहे घरभर
त्याची पडछाया होऊ नये धुसर
म्हणून माझी थरथर...

.२ .
तो ओढत नेतो गाडी खाचखळग्यातून
मला कंदील करून
टांगलेलं गाडीखाली...

मला नसते स्वातंत्र्य विझून जाण्याचे
वा भडकून उठण्याचे
त्याची नजर असते मिसळलेली
माझ्यातील इंधनात

मी हळूहळू डोळे होत जाते त्याचे
नि आपसुकच ओढू लागते ओझे
तो सुटा पिटाळत राहतो गाडी
मी करत राहते कसरती
काचेरी देह माझा तडकू नये म्हणून...

. ३ .
मी सदा त्याच्या हाकेला बांधलेली
तो हिसडत राहतो मला
त्याला वाटेल तशी

तो आधी मुकी बहिरी
करीत नाही अपंग...

माझे हात बळ होतात
त्याचे असण्याचे
नि पाय होतात दिशा त्याची

मी बापडी करीत राहते याचना
माझी वाचा दे!
माझे डोळे दे!
माझे कान दे!
त्याने मला हिसडण्यापूर्वीच्या वेळेत

. ४ .
मी उभी असते दारात
त्याची वेळ होऊन

तो वारा होऊन भणाणत येतो
नि ढकलतो मला आत...

तो पेटवतो माझ्या देहाची वात
त्याला हवा तशी कमी जास्त करीत
मी जळत राहते नि तो निजून असतो
शांत... बिनधास्त माझ्या प्रकाशात
. ५ .
वेलीसारखं लावलं गेलंय मला
त्याच्या दाराशी...

त्याची नजर चरत जाते येताजाता
माझ्या देहावरून

तो करीत राहतो कटाई
नि वाकवतो मला कमानीसारखी

झडत राहणं नि पुन्हा पुन्हा बहरून येणं
इतकंच असतं हाती

. ६ .
रात्र नागिणीसारखी सळसळत
शिरते माझ्या देहात बिळात

तो गारुडी होऊन पुंृगी वाजवत
उभा असतो बिळाशी

रात्र सरपटत येऊ लागते बाहेर
तो डोलवत राहतो तिला
पुंगीच्या तालावर

मी कासावीस
त्याची पाठराखण झालेली
रात्र त्याला डसू नये म्हणून...
अशोक कोतवाल
`संदर्भ' ४८/१/५४, ब्लॉक, क्र. ६
शिवा अपार्टमेंटजवळ,
शिव कॉलनी, जळगाव - ४२५००२

jordan shoes

Their jordan shoes are polished and top of array. Most of the cheap jordan shoes available include the Rollins skinny design. The nike air jordan straight are also closefitting and make a best fit for the stylish young man jordan basketball shoes have something for these people.

north face denali jacket

Article XVI Volume XIX store a hundred people have also come to see live
north face denali jacket Article XIX volume store a hundred people have also come to see live