मलकू देवकरानं सामानाची आवराआवर केली. त्यानं मारोतीच्याकडं तोंड करून पट भरला. सटवा पाटलाच्या पोराचं लग्न होतं. तेव्हा पाटलानं हा डांगर घातला होता. भोईवर हळदीकुंकवाची रांगोळी काढली. त्यावर कामायीची मूर्ती ठेवली. सूपात मांडलेला शिदा हेरला. लिंबं, पातळ, हिरवी काकणं, नाडापुडी सारं काही समोर ठेवलं. चुना लावलेल्या कळशीवरचा दिवा पेटवला. व त्यो केरबाला म्हणाला,
``ऐ, केरबा, घुमिव की ढोल... पूंजा व्हतीया...''
असं म्हणून त्यो पुन्हा पुन्हा पूजा करू लागला. केरबाचा ढोल ढूम..ढूम.डाक्...ढोल ढूम...ढूम..ढाक घुमू लागला. तसे गावातले पोरंसोरं, तरणीम्हातारी, बायकापोरी, पारासमोर जमू लागले. मलकूच्या समोर सटवा पाटलाचा पोरगा सुटाबुटात नवरदेव होऊन बसला होता. चहूकडून लोकांनी खळं केलं होतं. मध्यभागी केरबा ढोल वाजवीत होता. सटवा पाटील अण् मलकू कामायीची पूजा करीत होते.
उबडे पाय टाकून पूजा करीत बसलेला मलकू देवकर नवरदेवाच्याच वयाचा वाटत होता. दिसायला अत्यंत सुंदर, गोरागोमटा, धारदार नाक, दणकट असलं तरी स्त्रीचाळयांनी बहरलेलं त्याचं तारुण्य एखाद्या घरंदाज लावण्यवतीला शोभेल असंच होतं. त्यानं आज पोपटी लुगडं अगदी छाटून छाटून नेसलं होतं. त्या लुगड्याच्या इरकली पदराआडून दंडात काचणारी झंपर व त्यावर लेवलेले दागिने, याने त्यो आणखीनच ऊठून दिसत होता. लांबसडक केसांचा बुचडा पिळवटून बांधला होता. त्यात गजरा माळला होता. कपाळावर लालबुंद आडवं कुंकू लेवला होता. कानात डूल, नाकात नथ शोभून दिसत होती. त्याच्या रुबाबानं सारे पाहणारे त्याच्यावर फिदा होत होते. त्याच्या त्या नखरेल हळुवार हालचालीनं, त्याचं ते सौंदर्य व लावण्य स्त्रीसुलभ भासत होतं. त्याला प्रथम पाहणाऱ्याची फसगतच व्हायची. त्याला अनेक लोक स्त्रीच समजायचे. पण त्यो मात्र या स्त्री वेशात आपल्या पौरुषत्वाचं प्रेत सजवून मिरवीत होता.
असा हा मलकू देवकर आज मात्र काहीसा उदास दिसत होता. त्याची ती उदासी त्यो दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु ती त्याला न जुमानता त्याच्या सुकोमल चेहऱ्यावर उमटत होती. त्यानं कशीबशी पूजा आटोपली व त्यो केरबाला म्हणाला,
``मजी घुंगरं...?''
तशी केरबानं घुंगरं त्याच्यासमोर टाकली. त्यानं ती खाली मान घालूनच बांधली. त्यो पुन्हा पाय उबडे टाकून बसला. कामायीपुढं राळ बाळला. केरबाच्या ढोलानं ठेका घेतला होता. राळाच्या धुराचे गंधमय लोट आसमंतात भरू लागले. सारं वातावरण भारलं. तसा मलकू देवकरही घुमू लागला. त्याच्या सर्वांगात मुंग्यांचा संचार झाला. त्यानं हळूच तटकन् गजरा तोडला. अन् आपले केस मोकळे केले. मानेला एक लचका देऊन त्यानं नवरदेवाकडं नजर टाकली. गप्पकन् खालेमान घालून पडून राहिला. ढोल अधिकच घुमू लागला. त्याला आता मान वर करवेना, पण नाईलाज होता. त्याने स्वत:ला सावरले व त्यो एकदम घुमू लागला. ढोलाच्या तालात त्याचं घुमणं अगदी एकरूप झालं. राळेच्या धुराचे लोट उठतच होते. झाडाला अडकवलेली बत्ती तळपत होती. मलकूचा आत्तापर्यंत सुकोमल वाटणारा चेहरा एकदम भेसूर वाटू लागला. तो घुमत घुमतच हातातली घुंगरं असलेली पितळी सुपली वाजवून एकेका देवाला आवाहन करू लागला.
``मोरगावचा मोरेश्वर...पुजीला
शारगावचा इश्वेस्वर... पुजीला
अण् जेजुरीचा खंडेस्वर...पुजीला
डांगराला यावं गा... मोत्यातुऱ्यानं हार बोला...
गावचा मारुती, मौलाली...पुजीला
येशीची येसूबाई... पुजीली
चांदाच्या धुरपतबाई... पुजीली
बारडंची शितळाई... पुजीली
अण् हिरीची कामाई... पुजीली
डांगराला याव गा... मोत्यातुऱ्यानं हार बोला...''
असं म्हणत त्यो घुमू लागला. थोड्या वेळाने आवाहन थांबवून उठला. त्यानं सटवा पाटलाच्या पोरावून लिंबं ओवाळले व ते चारी दिशेनं चार फेकले. अण् त्यो परत घुमू लागला. एकदम थयथयाट करू लागला. लोक डोळयांत जीव आणून बघत होते. त्यातच मलकू गप्पकन् खाली बसला. केसांच्या खाली त्याचं डोकं झाकलं गेलं. काही वेळ तो तसाच पडून होता. ढोल थांबला. केरबा सगळं सामान गाठुड्यातून बांधू लागला. लोक पांगले. थोड्या वेळानं मलकू जागा झाला. त्याने पापणीवर तरळलेले आसू टिपले व तो केस बांधून उठला. सारे उठले. मलकूनं पदर कमरेला खोवला आणि तो गात्रातलं अवसान गळाल्यासारखा डोक्यावर कळशी घेऊन चालू लागला. त्याच्यासोबत सारे चालत होते. मागं घोड्यावर नवरदेव येत होता.
सकाळचे नऊ वाजत असतील. केरबानं खोली साफसूफ केली. त्यानं दोघांसाठी चुलीवर चहा ठेवला अण् तो मलकूला उठवू लागला.
``आरं ये... ऊठ की... नऊ वाजले नव्हं...'' असं म्हणून केरबानं त्याच्या अंगावरचं पांघरूण काढलं तर मलकू तापानं फणफणत होता. अंगात भयंकर ताप होता. केरबानं केस बाजूला सारून कपाळाला हात लावला.
``अररं... काय ताप भरलिया... ये देवकर ऊठ रं बाबा, आपून डाग्दरकडं जाऊतं..'' केरबा पुन्हा त्याला हालवीत म्हणाला. तसा मलकू जरासा जागा होत बडबडला, ``नाय म्या बाई नव्हं... गडी हावं गडी...'' असं म्हणून त्यो पुन्हा गप्प झाला. तसा केरबा घाबरला. त्यानं लगबगीनं खोलीचं दार आडवं केलं व तो दवाखान्यात गेला. मलकू कुसावर कुसा बदलीत होता व बडबडत होता. ताप तर वाढतच होता.
तेवढ्यात केरबा डॉक्टरीनबाईला घेऊन आला. बाइंर्नी मलकूला उठवलं व त्याला तपासून औषधी दिल्या. बाई आपलं सामान बॅगेत भरत म्हणाल्या, ``काय हो बाई रात्रभर जाग्रन करता. त्यामुळे होतंय असं... या औषधी घ्या आराम पडेल.'' असं म्हणताच केरबा खद्कण् हासला. बाईनं त्याच्याकडं आश्चर्यानं पाहिलं व त्या परत मलकूचा हात धरून नाडी पाहू लागल्या. तशी मलकूच्या अंगात चलबिचल झाली. त्याने डोळयांवर आलेले केस बाजूला केले व त्या तरुण डॉक्टरीणबाईच्या रेखीव देहावर दृष्टिक्षेप टाकला. बाईचा चंद्राकृती चेहरा त्याच्या नजरेत भरला अण् पांढरफटं कपाळ पाहून आश्चर्यही वाटलं. त्याच्या देहभर रोमांच उठले. त्याला प्रथमच स्त्रीचा स्पर्श झाला होता आणि रात्रभर मनात चाललेल्या चिंतनाने तो अधिकच भेदकपणे जाणवला. परंतु त्याने लगेच स्वत:ला सावरले. बाइंर्नी हात सोडला व त्या बॅग उचलीत म्हणाल्या,
``ठीक आहे. काळजीसारखं काही नाही. चार दिवसांनी येऊन भेटा दवाखान्यात... बरय... येते मी.'' असं म्हणून डॉक्टरीणबाई निघाल्या. केरबा त्यांना घेऊन दवाखान्यापर्यंत आला. बाईला सोडून तो परत फिरला. तशा बाई म्हणाल्या,
``काय हो... मगासी तुम्ही का हसलात?''
``त्याचं व्हय... मलकूला तुम्ही बाई म्हणालात. अण् त्यो रातभर म्या बाई नायी, बाई नायी म्हणून बडबडत व्हता... तवाशान् हासू आलं बघा...''
``म्हणजे ...? बाई आश्चर्याने म्हणाल्या.''
``व्हय त्यो बाई नव्हं. कामायीला सोडलेला देवकर हाय देवकर...'' असं म्हणून केरबा बाहेर पडला. बाई आश्चर्यानं आ वासून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिल्या.
दोन दिवसानंतर मलकूला आराम पडला. तो दवाखान्यात जावं म्हणून तयार होऊन निघाला. पिवळया लुगड्यात मलकूचा सुंदर देह कातीव मूर्तीसारखा भासत होता. चेहरा मात्र जरासा मलूल वाटत होता. वेणीत गुलाबाचं फूल खोचून त्यानं परसाचं दार लोटलं व तो रस्त्याला लागला. खाले मान घालून डौलदारपणे चालणाऱ्या मलकूकडं पाहून उंबऱ्याच्या पारावरची टारगट माणसं, पोरं चेकाळली होती. पाराला वळसा देऊन मलकू पुढं सरकला तसा शिन्द्याचा रमेशा त्याच्या समोर येऊन म्हणाला,
``अगं ये, देवकर... कुठं चाल्लास रं... कुण्या यारानं बोलिवलंय व्हय तुला..?''
मलकू गप्प उभा होता. यावर कवड्या किसन म्हणाला, ``जावदे बिचाऱ्याला... तुझ्या काय कामाचा नाय तो... इदर ना उदर, बीच में अदर...'' सगळे हसायला लागले. मलकूला मेल्याहून मेल्यासारखं झालं. त्यानं जाण्यासाठी पाय उचलला तवा रमेशा म्हणाला, ``इतकी रं... कसली घाई. आम्हांला बी जरा दे की...?'' असं म्हणून त्यानं पटकण् त्याचा मुका धेतला अण् परत थू थू करत म्हणाला,
``आरं रं मर्दा, हे तर यगळंच लागतंय.. छी छी.''
परत सारे हसू लागले. मलकूच्या मनात राग दाटला. त्यानं मनात दात खाल्ले. पर इलाज नव्हता. त्यानं निमूटपणे राग गिळला
``नवरा बोलिवतोय व्हय...? लेकरं लडत्यात... ?'' दूर बसलेला गण्या म्हणाला.
``आर, याला कुठला नवरा.. ज्यानं हात भरला त्याची हेव्ह. या की तूमी बी घ्या की जरा मजा... बघा... कसं लागतंया ते कट्लिंबू...'' किसन म्हणाला. तसे सगळे मलकूभवती जमले. त्यांनी मलकूला सळो की पळो करून सोडलं. कोणी ढोपराला हात लावी, तर कोणी पदर ओढी, कोणी झंपरात हात घाली, कोणी लुगडं वर करून बघी...बिचारा मलकू गप्प अगदी काठावर आलेले आसूही दिसू न देता आत पाठवीत होता. त्याच्या शरीराची ही एखाद्या निकामी वस्तूसारखी होणारी हेटाळणी पाहून त्यो स्वत:चीच कीव करीत होता. त्याचा आकांत अबोल, मुका होता. या जगात बोलक्या आकांताकडे कोणाचं लक्ष जाईना तिथं आपल्या मुक्या आकांतकडे कोण लक्ष देईल? असं वाटून त्यो असहाय्यपणे त्या गिधाडाच्या घोळक्यात उभा होता. थोड्या वेळाला परशा म्हणाला,
``आता जाऊ द्या त्याला, त्याचा काय उपेग...? उगं येळ बरबाद... तपरीस जाऊ की गुलबकावलीकडं !'' परशाची राय सर्वांना पटली. तसे सारे मलकूला सोडून बाजूला झाले. मलकूने आवरता आवरता टपकलेले आसू पदरानं टिपले. अण् त्यो झपाझप पावलं टाकीत दवाखान्यात आला. फाटकात येताच त्यानं डोळे पुसले. पदर सावरला व त्यो निर्विकारपणे बाईच्या दारावर गेला. आत डोकावून म्हणाला, ``येऊ का... डॉग्दरीनबाई ...?''
``हो... यस या...'' बाइंर्नी डोळयावरचा चष्मा उतरवला. त्या वर पाहत म्हणाल्या. तसा मलकू टेबलाशेजारी उभा राहत म्हणाला, ``तुम्ही याया सांगितलं व्हतं म्हणून आलेव...''
यावर बाई त्याला बसाया सांगत म्हणाल्या, ``अच्छा ! मलकू देवकर का ?''
``व्हय म्याच मलकू देवकर...'' मलकूनं मान खाली घातली.
``काय करतोय तू... म्हणजे व्यवसाय...''
``असं काय इच्चारता ? देवकर नव्ह, देवाचा डांगर घालतेव. लग्नात करमणूक करतो लोकायची...''
``म्हणजे ! लग्न वगैरे...'' बाई चाचपडत म्हणाल्या.
``माझं देवी संगट लगीन झालंया...'' मलकू लाजत म्हणाला.
``म्हणजे ?'' डॉक्टरीनबाइंर्ना परत आश्चर्य वाटले.
``म्हंजी बघा, तेचा लई मोठा इत्यास हाय... जाव द्या'' मलकू म्हणाला.
``हा व्यवसाय कधीपासून करतोस...?''
``जवा मला देवीला सोडली तवापासून.''
``केव्हा सोडलं तुला...? तुझी हरकत नसेल तर सांग...''
``काय करणार ऐकून ? हसणारच नव्हं घटकाभर ! देवानं आमचा जलमच लोकांना हसविण्यासाठी घातलाय नव्हं ? गड्यासारखा गडी असून हयेव बाईचा आवतार घेवून जगावं लागतंया...'' मलकूच्या मनात खदखदणारं वास्तव सहजपणे ओठावर आलं. बाई गोंधळल्या.
``नाही मी हसणार नाही. आणि हो, हे देवाच्या नावाने असे माजवलेलं अवडंबरी ढोंग मला अजिबात पटत नाहीत. मला सर्व सांग. आपण मार्ग काढू त्यातून...''
``कसला मार्ग म्हणत्याव सारं तरुणपण यात गेलं... आता'' मलकूचे डोळे पाण्यानं डबडबले. त्यो पुन्हा डोळे पुसत म्हणाला, ``तुम्ही सांगा म्हणताय तर सांगतो ते बी...'' असं म्हणून मलकू सांगू लागला,
``मह्या बाच्या घराण्याची रीत व्हती की ल्योकाच्या लग्नात कामायीचा डांगर घालण्याची. मज्या आजानं त्यो बा च्या लग्नात घातला नाही. नंतर मह्या बापाला पोरंबाळंच होईना. सारे उपाव झाले तर पोर झालं नाही. तवा आज्याच्या ही गोष्ट ध्यानात आली. मग त्याने कामायीला नवस केला, की बा ला झालेलं पहिलं पोर देवीला सोडन् म्हणून. मग पुढं बा ला पोरगं झालं. त्योच मी. पाच वर्सासनी मला चांद्यात नेऊन, केस भादरून सेंदूर लावून मज देविसंगट लगीन लावलं. तवा म्या खूप लडले पण मायबानं मला परत नेलं नाय, जाताना तू आमचा कोणी नव्हसं, आम्ही तुझे कोणी नव्हं. तवा ऱ्हा इथं देवकर म्हणून. असं सांगून निघून गेले. चांद्याम धा वर्सं पोतराजाकडं देवकर म्हणून रायलो. तिथूनच ह्यो बाईचा आवतार मिळाला. मग म्या गावाकडं आलो तवापासून हे केस म्या सांभाळतो. त्या धा वर्सांत मायबाप कधीसुद्धा आले नाहीत. आता गावातच रात्यात पर कधी मला घरला येऊ देत नाहीत...मज्या छोट्या भावाचं लगीन झालं. त्यो आपला राजाचा संसार करतोय...''
बोलता बोलता मलकूला रडू आवरलं नाही. त्यानं आपलं तोंड पदरात लपवलं व त्यो ओक्साबोक्सी रडू लागला. गर्भगळित होऊन ऐकणाऱ्या डॉक्टरीनबाई स्तंभित झाल्या होत्या.
काही दिवस असे गेले. मलकूनं आता डांगराच्या सुपाऱ्या घेणं बंद केलं होतं. त्यो एकसारखा कामायीच्या परडीपुढं बसून तास न् तास इच्चार करीत होता. त्याच्या या वागण्याचा, सुपाऱ्या परत पाठवण्याचा केरबाला अर्थच कळंना. तो बेचैन झाला. असं धंद्यावर पाणी सोडून आपण देशोधडीला लागू याची भीती त्याच्या मनाला पोखरू लागली. मलकूस इचारावं म्हणत होता पण त्याचा धीर होत नव्हता. आज मलकू जरासा खुलल्यासारखा दिसला. तेव्हा केरबा त्याच्याजवळ बसत म्हणाला,
``काय व्हय गा देवकर, सुपाऱ्या कावून घेत नाही... ?''
यावर मलकू गप्पच होता. हे बघून पुन्हा केरबाच म्हणाला, ``काय, सांग की काय तरी हाय तुज्या मनात ते... असं धंदा बंद करून...''
यावर मलकू म्हणाला, ``नाय म्या यापुढ डांगर घालणार नाही!''
``अरंरं... कसली दुरबुद्धी सुचली रं तुला ? कामायी देवी कोपंल की रं ! आरं तुझा तर नास व्हईलच पर म्या बी मरंन हकनाक...'' केरबानं दोन्ही हातांनी कपाळ बडीवलं तसा मलकूही खवळला,
``तुला तुझ्या पोटाचं पडलंय नव्हं, आर पर म्या गडी असून हेव्ह बाईसारखं... छे ! माझी जीनगाणी वाया गेली की रं ? मज्याबरोबरचाच नव्हं त्यो सटवा पाटलाचा ल्योक. झालं ना त्याचं लगीन... पर तुम्ही. माय बापानं स्वत:च्या कुळापायी मला या नरकात लोटलं अण् तू बी...''
मलकूचं बोलणं काटत केरबा गरजला, ``व्हय तर, तुला आता लगीन करावं वाटतंया व्हयं... आर पर ही देवीची परडी, डांगर ?... त्याच्यासी बैमानी करू नगस. तुझ्यासंगं साऱ्या गावाचा इस्कोट व्हईलरं...''
``काय बी का व्हयना... पर...'' मलकूला या सोंगातलं ढोंग चांगलंच ठाऊक होतं. त्याला देवीबिवीची भीती वाटत नव्हती.
``मर मंग.. अरं, काढून टाक खुळ हेव्ह. आपली जीनगाणी या
डांगरासंगच जाईल.'' केरबा मलकूचा निश्चय बघून वरमला.
इतक्यात परसाचं दार वाजलं तसा केरबा उठून बाहेर आला. पाहतो तर काय परसात डॉक्टरीन बाई उभ्या होत्या. त्यानं तिथूनच हाक मारली, ``आर यो देवकर, डागदरीनबाई आल्यात, बाहीर ये... म्या जरा गावात जाऊन येतूया...''
असं म्हणून केरबा बाहेर पडला व मलकू आपले केस बांधत आहेर आला. बाईला आपल्या घरी बघून त्याला नवलच वाटलं. त्यो बाईला बसाया सांगत म्हणाला, ``कस काय येणं केलंत ...?''
``आपलं सहज, इकडं झोपडपट्टी तपासीत होते. म्हटलं जावं तुझ्याकडं, भेटावं...'' बाई गालात हसत म्हणाल्या. तसा मलकू जरासा लाजला व आत जाण्यासाठी वळला तशा बाई म्हणाल्या,
``मला काही नको हं ! बैस जरा गप्पा मारू..''
बाजूच्या माचव्याजवळ बसत त्यो म्हणाला, ``काय म्हणताय सा...?''
``एक विचारू का तुला ...?''
``इचारा की....''
``नाही, तुला हे सारं करायला आवडतं ? हे रबरबित जीवन, तो वाईट हिणकस दृष्टीनं पाहणारा समाज, एकलकोंडेपण, हेटाळणी, अंधश्रद्धेचे लचांड, त्यात होणारी गुदमर... नाही बाहेर पडावं वाटत तुला यातून... सांग?'' बाईचा आवेश व डोळयांतलं कारुण्य पाहून, आपल्या दु:खाची कुणाला तरी ओळख आहे असं वाटून तो सुखावला. व काहीतरी बोलण्यासाठी त्याचे ओठ हलले. तशा बाई म्हणाल्या,
``नाही सांगायचं तर नको सांगूस... पण तुला नाही वाटत आपणही चारचौघांसारखं सन्मानानं जगावं म्हणून. लग्न, संसार, मुलंबाळं हे सारं तुला नको वाटतं... !'' बाई बोलत होत्या. मलकूच्या अगदी मनातलं. त्यो समाधी लागल्यागत टक लावून ऐकत होता. मध्येच बाई थांबल्या. तसा मलकू म्हणाला,
``वाटतं ना. लई वाटतं. पण काय उपेग ? आता यातून बाहीर निघून जावं कुठं ? कोण देईन मान आम्हांला ?.. आमच्या जीनगाणीची वस्तू भररस्त्यात निलाम व्हनारी. तिला कोण देव्हाऱ्यातला देव करील?'' बाई मलकूचं बोलणं काटत मध्येच म्हणाल्या, ``मी देईन तुला मान, जग इतकं छोटं नाही. तू हा व्यवसाय सोड. पोशाख बदल... शहरात जा. पुरुष होऊन नव्यानं जीवन जग... मग, मग लग्न कर...''
``नाही बाई, उगीच सपानं नका दाखू. नाय झेपायचं ते. आवं ंकोण करील माज्यासंग लगीन... कोण देईल मला पोरगी...?'' मलकू पदराच्या गोंड्याला पीळ घालीत निराशपणे म्हणाला.
``म्हणजे तुला यातून वर यायचं नाही तर... ठीक... येते मी.''
बाई उठू लागल्या तसा मलकू शरमला, त्याला स्वत:ची लाज वाटली. त्यो बाईला थांबवत म्हणाला,
``मला यातून बाहीर निघावं वाटतंय पण भ्या बी वाटतंय...''
``अरे, कसली भीती... टाकून दे सारं सोंग...''
``बाई, पर माझं हेव्ह बाईसारखं वागणं, बोलणं.... कसं बदलंल... ?''
``अरे वेड्या शिक्षणाने ! तू प्रौढ शाळेत जा. तिथं लिहायला, वाचायला शिक... नाहीतर मीच शिकवते तुला...''
``खरंच तुम्ही शिकवणार मला...''
``हो. शिकवीन मी, नाही तर हे जीवन काय उपयोगाचं..''
बाइंर्नी दीर्घ निश्वास सोडला. तसा मलकूचा चेहरा खुलला व त्यो म्हणाला,
``नाही करणार आजपासून ह्यो धंदा... मी शिकणं, माणूस व्हईन.''
``हां... '' बाईच्या चेहऱ्यावरही स्मित लकेर चमकून गेली.
आता मलकू रोज डॉक्टरीनबाईकडं पर्टरवर शिकायला जाऊ लागला. त्याला अन् आपल्या पोराला बाई रोज लिहायला वाचायला शिकवू लागल्या. ऐन तारुण्यात पतीच्या निधनानं पांढरं झालेलं कपाळ बाईच्या जीवनाचं चित्र डोळयांसमोर उभं करीत होतं. त्यांनी एका मुलावर आजपर्यंत दिवस काढले होते. डॉक्टरी पेशा सेवा म्हणून तर अपल्या प्रबोधनविचारांची बांधीलकी म्हणून या अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करीत होत्या. त्यांच्या या उपकाराचं अन् जीवनाचं कोडं मलकूला कधीच उलगडलं नाही व त्याचं धाडसही झालं नाही विचारण्याचं. तो दिवसेंदिवस वाचन लेखनात प्रगती करू लागला. बाईही त्याला तितक्याच जिव्हाळयाने समजावीत व शिकवीत होत्या. त्याच्यातल्या माणसाला आणि पौरुषत्वाला जिवंत करीत होत्या. मलकू बदलत होता. सहासात महिन्यांत तो पूर्णपणे वाचू लिहू लागला. त्याच्या वागण्या, बोलण्यातला बायकी ढंग कमी झाला. अन् एक दिवस त्याने आपले केस कापण्याचा निर्णय घेतला. बाइंर्ना समाधान वाटलं. त्यांच्या कार्याला यश येेत होतं.
इकडे गावभर बोंब उठली. केरबाचा तिळपापड जीव वर खाली होत होता. तो त्या डॉक्टरीनबाईला शिव्याशाप देत होता. त्यानं गावभर मलकूच्या या वागण्याचा डांगोरा पिटला होता. आपलं सामान अन् सारे पैसे घेऊन तो वेगळा राहू लागला. या गोष्टीनं मलकू धास्तावला. बाइंर्नी त्याला धीर दिला. केरबानं साऱ्या गावात मलकूनं डांगर बुडीवला. त्यो आता लग्न करणार आहे. त्याच्या संगे गावाचा इस्कोट होणार, कामायी देवी कोपणार, असं भलतंसलतं सांगून गावातील लोकांना भडकवण्याचा सपाटा उठवला होता. लोक सगळीकडं मलकू अन् डॉक्टरीनबाईची चर्चा करीत होते. बायापोरं शिव्या शाप देत होते. पण मलकू आपल्या निर्णयावर ठाम होता.
एक दिवस त्यानं बाईला सांगून आपले केस कापवले. त्याचे केस कापण्यासाठी वारकाची तयारी नव्हती. तेव्हा शहरात जाऊन केस कापले. शहरातूनच त्याच्यासाठी दोन ड्न्ेस आणले. आणि त्या दिवसापासून मलकू पुरुष झाला. त्याचं ते सौंदर्य आता खऱ्या अर्थाने बाणेदार वाटत होतं. तो स्त्री वेषात जितका सुंदर दिसायचा त्यापेक्षा अधिक रुबाबदार तो या पुरुषी वेषात दिसत होता. त्यानं लुगडं, झंपर, घुंगरं सारा देवकर उतरवून देवीच्या डांगराला परत केला होता. त्याची
प्रगती होत होती. तो आताशा फार गावात फिरत नसे. आपली खोली ते डॉक्टरीणबाइंर्ची पर्टर इतक्यातच ये-जा करीत असे. पण या घटनेची बातमी गावभर झाली. गावकरी चवताळले. सारे जण मलकूच्या खोलीवर आले. खोली बंद पाहून ते अधिकच रागावले. तेवढ्यात केरबा म्हणाला, ``बघताय काय ? आग लावा याच्या घराला. जाऊन बसला असनं त्या डागदरनीकडं... साऱ्या गावावर कामाईचा कोप होणार ! तो बी ह्या मलक्यामुळं...याला जित्ता जाळला पायजे जित्ता...''
``व्हय व्हय जित्ता जाळला पाहिजे... असं म्हणून सारे लोक मलकूच्या खोलीवर तुटून पडले. त्यांनी त्या खोलीला आग लावली. खोली सर्वांगाने पेटली. लोक आता डॉक्टरीनबाईच्या घराकडेे वळले. त्यांनी गोंधळ घातला. दार उघडत नाही म्हणून दगड मारू लागले. तेव्हा बाई दार उघडून बाहेर आल्या.''
``कुठं हाय मलक्या ?... त्याला भाईर काढा. साल्याला लगीन करावं वाटतंय काय ?...'' असं म्हणून टारगट पोरं ओरडत होती.
बाई म्हणाल्या, ``हे बघा गावकऱ्यांनो, तो आता इथं राहणार नाही. तो शहरात जाऊन नोकरी करणार आहे. तेव्हा आता तुम्ही परत जा.... अन्यथा मला पोलिसांना बोलवावं लागेल.''
तेव्हा मलकूचा बाप पुढे येत म्हणाला, ``तुम्ही कोण गा ? त्याला शहरात नेणाऱ्या ? त्यो मजा पोरगा हाय अण् या गावचा देवकर...''
``वा...वा...तुम्ही मलकूचे बाप ना ! आठवा ! ज्यावेळी तुम्ही त्याला देवीच्या स्वाधीन केलात, तो रडत होता पण तुम्ही त्याला म्हणालात की आता आम्ही तुझ्यासाठी मेलो. मग आता कुठून त्याचे बाप ? जा तुम्ही.'' बाई बोलत होत्या तेवढ्यात भिरकण् एक दगड येऊन त्यांच्या डोक्यात बसला. बाई कोसळणार इतक्यात मलकूने त्यांना सावरलं आणि आतमध्ये घेऊन आला. परत जाऊन दार बंद केलं. लोक बाहेर ओरडत होते. खिडकीतून, दाराच्या काचांतून दगड आत येत होते. मलकू भयंकर घाबरला होता. पुढं काय होणार काही कळत नव्हतं. तो आपला बाइंर्चं डोकं मांडीवर घेऊन सारखा रडत होता. शेजारी बाइंर्चा चिमुकला रडत होता. सारंच भयंकर होतं. तेवढ्यात कुणीतरी चौकीवर वर्दी दिली. तसे पोलीस आले. त्यांनी लोकांची पांगपांग केली. सारे निघून गेले.
बऱ्याच वेळाने बाइंर्ना जाग आली. त्या उठून दार उघडून व्हरांड्यात आल्या. त्यांच्यापाठोपाठ मलकूही आला. बाइंर्चा चेहरा उजळला होता. त्यांचं पांढरंफट् कपाळ रक्तानं माखलं होतं. त्या जळणाऱ्या मलकूच्या खोलीकडं हात करून म्हणाल्या,
``मी जिंकले. तो पहा तुझ्यातला देवकर कसा जळतोय...? त्या आगीत तुझ्यातली नटवी खोटी स्त्री आणि देवाचं अंधश्रद्ध रूप जळून खाक होतं आहे. तू मुक्त झालास...''
बाई काय बोलत होत्या, मलकूला काही कळत नव्हतं. तो मटकन् खाली बसला. त्याने बाइंर्चे पाय घट्ट धरले व तो रडू लागला. बाइंर्नी त्याला दोन्ही हातांनी उठवलं व त्या म्हणाल्या, ``तू आता पुरुष झालास, मलकू देवकर नाहीस. मल्लिकार्जुन देवकर ! चांगलीशी नोकरी धर... लग्न कर...'' बाई त्याच्या बाहूंना थोपटत म्हणाल्या. डोळयांतलं पाणी पुसत गोड स्मित करून, त्यानं होकारार्थी मान हलवली. तशा बाई त्याच्याकडे पाठ वळवून म्हणाल्या,
``त्या दिवशी तू म्हणाला होतास ना ?... कोण लग्न करील माझ्याशी म्हणून... मी करीन तुझ्याशी लग्न... अर्थात तुझी इच्छा असेल तर..'' मलकू आश्चर्याने अवाक् होऊन बाइंर्च्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. बाई पुढं म्हणाल्या,
``नाहीतरी एकटीच मी, माझा नवरा गेल्याला आज सात वर्षं झाली. माझा मुलगाच काय तो माझा आधार. मला ठाऊक आहे. बाहेरच्या जगात तुझ्याशी कोणी लग्न करणार नाही. आणि हेही ठाऊक आहे की, एकटं जगणं किती अवघड असतं ते. त्या जगण्याचं दु:ख मीही अनुभवलंय. मी तुला ज्या वैचारिक श्रद्धेसाठी त्या किळसवाण्या जगण्यातून वर येण्यासाठी मदत केली. तू वर आलासही. आता मला परत तुला एकटेपणाच्या अज्ञातवासात पाठवायचं नाही. तसं केलं तर माझी वैचारिक बांधीलकी बेगडी व कृतिशून्य ठरेल. आणि हो, आपणा दोघांसही तशी कुणाच्या तरी आधाराची गरज आहेच म्हणा. मग काय हरकत आहे आपणच एकमेकांना आधार दिला तर ..?''
मलकू खाली मान घालून अगदी गर्भगळितपणे ऐकत होता. बाई परत त्याच्या समोरून बाजूला सरकत म्हणाल्या, ``हां, या उपर तुझी मर्जी ! मी मदत केली म्हणून तुला अडविणार नाही. तू स्वतंत्र आहेस...'' असं म्हणून बाई घरात शिरल्या. तसा मलकू आत येत म्हणाला, ``नाही, मी तुम्हांला सोडून जाणार नाही. मी करीन लग्न तुमच्याशी. तुम्ही माझ्यामधला पुरुष जिवंत केलात, त्यावर हक्क तुमचाच असेल...''
तसा बाइंर्चा चेहरा उजळला. एकमेकांच्या आश्वासक नजरांनी एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली.
चार दिवसांनी बाइंर्नी बदलीचा अर्ज दिला. तो मान्यही झाला. काही दिवसांतच ते या गावाला, इथल्या अंधश्रद्ध माणसांना, आणि निष्ठूर देवांना सोडून जाणार होते. जळलेल्या मलकूच्या खोलीतल्या अर्धवट जळलेल्या कामायीच्या डांगराला त्या दोघांनी नदीच्या प्रवाहात सोडून दिलं. जणू त्या विसर्जनात धर्मानं मजबूर अशा मलकू देवकराच्या अस्तित्वाच्या अस्थींचंच विसर्जन केलं. दुसऱ्याच दिवशी सामानाची आवराआवर करून डॉक्टरीणबाई, मल्लिकार्जुन देवकर आणि त्या दोघांचा पोरगा यांनी ते गाव सोडलं.
क्षितिजावर उद्याची गोड स्वप्नं बोलवीत होती. गाडीनं वेग घेतला. सारी जुनी जळमटं मागे पडू लागली.
बाळू ना. दुगडूमवार, कुंटूर
मु.पो. कुंटूर, ता. नायगाव (खै)
जि. नांदेड, ४३१७२६
Posted in



borse louis vuitton
La Cina è fondamentale per i piani di crescita di, ed è alla ricerca di modi innovativi di fare un passo per i consumatori lì. Per la prima borse louis vuitton volta un brand occidentali in Cina, Louis Vuitton ha preso l'Museo Nazionale della Cina con una mostra estiva speciale dal titolo 'Voyages'. Il conglomerato di lusso francese era entrato in Cina 20 anni fa e si festeggia l'occasione Borse Louis Vuitton Donna attraverso questa mostra che mette in mostra bagaglio storico del marchio e le borse e il loro contributo al turismo di lusso. Il Museo Nazionale della Cina è forse il museo più famoso del paese e ha recentemente riaperto dopo un restauro lungo tre anni completi.
La mania del turismo di lusso in Cina sta crescendo di giorno in giorno e mercato turistico del paese è louis vuitton portafogli donna diretto a diventare il secondo più grande del mondo superando il Giappone entro la fine del decennio. Il turismo in uscita dalla Cina ha generato un fatturato di 1,5 miliardi di yuan che ha dato un grande impulso al settore delle compagnie aeree e hotel. Louis Vuitton si posiziona per ottimizzare i benefici di questo louis vuitton portachiavi boom di viaggi. Cui si rivolgono i viaggiatori, che hanno una maggiore usa e getta. Il passaggio del museo è destinato anche a sfruttare la rabbia arte in Cina. La Cina è ora il mondo il secondo più grande mercato per l'arte e di antiquariato.
The idea of vibram five
The idea of vibram five fingers come into being for impove this worse situation. Vibram five fingers has been proved by doctors which proved that vibram five fingers is fitness shoes, which can slove feet problems. It gives unmatched flexibility, comfort, and balance to human foot. The shoes fit in foot as a sock-like glove with toes. In addition to the comfort factor, they may offer other health benefits. vibram five fingers bikila shoe-gloves have stretchy synthetic uppers and thin rubber soles, promoting better foot health and stimulating the muscles in the feet and lower legs for greater balance, agility and strength..
Michael Vick Authentic
Michael Vick Authentic Jersey
DeSean Jackson Authentic Jersey
Nnamdi Asomugha Authentic Jersey
Brent Celek Authentic Jersey
LeSean McCoy Authentic Jersey
DeSean Jackson Jersey
Michael Vick Jersey
Nnamdi Asomugha Jersey
Brent Celek Jersey
LeSean McCoy Jersey
Asante Samuel Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Nathaniel Allen Jersey
Randall Cunningham Jersey
Reggie White Jersey
Stewart Bradley Jersey
Wes Hopkins Jersey
Dominique Rodgers-Cromartie Jersey
Customized
LaDainian Tomlinson Authentic Jersey
Darrelle Revis Authentic Jersey
Nick Mangold Authentic Jersey
Mark Sanchez Authentic Jersey
Dustin Keller Authentic Jersey
Jets Jersey
New York Jets Jersey
Cheap Jets Jersey
Antonio Cromartie Jersey
Bart Scott Jersey
Brett Favre Jersey
D'Brickashaw Ferguson Jersey
Darrelle Revis Jersey
Dennis Byrd Jersey
Dustin Keller Jersey
Dwight Lowery Jersey
Joe Klecko Jersey
Joe Namath Jersey
Kyle Wilson Jersey
LaDainian Tomlinson Jersey
Laveranues Coles Jersey
Leon Washington Jersey
Mark Gastineau Jersey
Mark Sanchez Jersey
Muhammad Wilkerson Jersey
Nick Mangold Jersey
Plaxico Burress Jersey
Santonio Holmes Jersey
Shonn Greene Jersey
Thomas Jones Jersey
Vernon Gholston Jersey
Wesley Walker Jersey