Skip to main content

काळोखलेला आसमंत

तुरुंगाच्या जवळ आल्यावर सुप्रियाची धडधड वाढू लागली. हाताला घाम फुटतो की काय वाटू लागले. कानशिलं काहीशी गरम झाली होती. अंग ताठरल्यासारखे वाटत होते. तिने ड्नयव्हरला उगीचच विचारले,
`नजदीक आ गये हम ?' त्याने आरशाच्या कोपऱ्यातून आपल्याकडे पाहिल्यासारखे वाटले.
`हां मॅडम, दो मिनिट लगेगा.' हा ड्नयव्हरही आपाल्याला कदाचित ओळखत असेल. सारखं टीव्हीच्या असंख्य चॅनेलवर आपण दिसत असतोच. आपल्याला काही चॅनेलवर जायची इच्छा नसते. पण हे मीडियावाले आपला पिच्छा सोडतील तर ना ? आपण नवऱ्याबरोबर क्रिकेटच्या मॅचला गेलो तरी क्रॅमेरा आपल्यावर ठेवतील. मॉलमध्ये जाऊन मजेत खरेदी करणे तर जमतच नाही. लगेच सगळे लोक जवळ येतात. कोणी सह्या घेण्याचा प्रयत्न करते ! कोणी आगाऊ प्रश्न विचारतात. जणू आपल्याला खाजगी आयुष्यच नाही. आपण काही सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्ती नाही आहोत, पण तसे नसते. आपल्यासारखी व्यक्ती सतत लोकांच्या नजरेत असते. इच्छा असो अथवा नसो. त्याचे कारण आपल्या गेल्या चार पिढ्यांनी या राज्यातील लोकांच्या मनावर राज्य केले. त्याला जवळपास शंभर वर्षांचा इतिहास आहे. आपले वडील या राज्याचे अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री होते. आपली आई त्यानंतर कधीही मुख्यमंत्री बनू शकली असती. आपले आजोबा, पणजोबाही ह्याच राज्याचे मुख्यमंत्री होते. पणजोबांच्या वडिलांनीही याच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून दिले. आपण पाचव्या पिढीचे प्रतिनिधी आहोत. सहा वर्षांचा रोहन सहाव्या पिढीचा आहे.
आपण बुरखा घालून यायला हवं होतं. हा ड्नयव्हर बाहेर जाऊन मीडियाला ह्याची बातमी द्यायचा. बातमी गुप्त ठेवण्याबद्दल त्याला सांगण्यात आलंय. म्हणून तर एवढा दूरवर आपण स्वत:ची कार घेऊन आलो नाही. सहाशे किलोमीटर प्रवास करावा लागला असता. विमानतळावरून हॉटेलला गेलो. तेथून ही कार भाड्याने घेतली व तशा सूचना हॉटेलला देऊन ठेवल्या. तरी कोणाचा भरवसा देता येत नाही. आपलं खाजगीपण जन्मत:च नष्ट झालंय हे आपण मान्य करायला हवं. आपल्या वाट्याला हे आयुष्य का आलं हे कधी कळलं नाही. जे आलंय ते स्वीकारायला हवं.
कारने तुरुंगापाशी एकदम ब्रेक घेतला.
`मॅडम, जेल आ गया' ड्नयव्हर काहीसा मोठ्यानेच बोलला. बहुधा आपली तंद्री लागली असावी. ती एकदम भानावर आली. दरवाजा उघडला. एकदम उन्ह आत आले. बाहेर उन्हाळयाची तीव्रता भयंकर जाणवत होती. क्षणभर वाटले कशाला दरवाजा उघडला ? आगीशी खेळ तर करत नाही आहोत ना ? पुरलेले मुडदे परत उकरतोय आपण. सगळयाचाच त्रास होईल. ह्यातून आपल्याला काय मिळणार, कुठलं सत्य आपल्याला गवसणार आहे ? कशासाठी हा उपद्व्याप आपण करायचा ? आईला हे सांगितले तर ती म्हणाली,
`सुप्रिया, तू आता मोठी झालीस. तुझे निर्णय तूच घेत आलीस. तुला तिला भेटावेसे वाटतेय, मग जरूर भेट. आपल्या निर्णयाशी नेहमी ठाम असावे. कधीकधी आपले चुकतेही. शेवटी आपणही माणूस आहोत. त्यांची शिक्षा भोगायची तयारी असायला हवी. सगळयाच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत.' ती नेहमी अशा शांतपणे सांगायची.
`मला तिला विचारायचंय तू असं का केलंस ? का आमच्या आयुष्याचे मातेरं केलंस? मला कधीकधी तिचा खूप राग येतो. खून करावासा वाटतो.'
`प्रत्येक माणसाला आयुष्यात कोणाचा न् कुणाचा खून करावासा वाटतो. हिंसा ही आपली मूलभूत प्रेरणा आहे. पण मला तसं वाटत नाही कारण आपण सुसंंस्कृत आहोत. खून के बदले खून करायला लागलो तर बेटा हे जग उरणारच नाही.'
`ह्या जगाला टिकवण्याची आपण काय ठेकेदारी घेतली आहे का ? कुणी कसंही वागायचं आणि आपण स्वत:ला सुसंस्कृत समजून इतरांना माफ करत जायचं. हा तुला भेकडपणा वाटत नाही ?' आईने तेव्हा मायेने जवळ घेतले होते. तिच्या डोळयांत पाणी दिसले. ते लपवत ती म्हणाली,
`ह्यांच्या जाण्याने सर्वात जास्त नुकसान कोणाचे झाले असेल? माझे ना ? माझा नवरा होता गं तो. त्याच्यासाठी मी नेसत्या वस्त्रानिशी घर सोडून आले, सगळयांशी भांडले होते. त्याच्यासाठी धर्म बदलला. तो माझ्या फार प्रेमाचा होता गं.'
`मग तरी तिला माफ का केलेस ? तिला चांगली फाशीची शिक्षा दिली होती. तिच्या लहान मुलीसाठी कोर्टाकडे फाशीऐवजी जन्मठेपेची याचना केली आणि तू मध्यस्थी करून कोर्टाला तिची विनंती मान्य करायला सांगितली. ती तेव्हाच मेली असती तर माझ्या मनातील प्रश्न अनुत्तरीत राहिले असते. मी तिच्याकडे जाण्याचा विचारच केला नसता.'
`समोरच्या व्यक्तीला माफ करणे ह्यातच आयुष्याची इतिश्री आहे. मला काय कमी त्रास झाला असेल ? तुम्ही दोघं तेव्हा किती लहान होता ? मी सगळं एकटीने कसं सहन केलं असेल ? दु:ख एकट्याने भोगण्यासाठी अज्ञातवासात तुम्हा दोघांना घेऊन गेले होते. तेव्हा जीवाची काहिली होत होती. स्वत:च्या रागावर, क्रोधावर विजय मिळवणे किती कठीण गेले असेल ?'
`मला ते नाही जमत, आई, पपा वॉज ब्लास्ट डेड. त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. ते आपल्याला धडपणे मिळालेही नाहीत. मिळालेल्या शरीराच्या तुकड्यांवर आपण अंत्यसंस्कार केले होते. काय गुन्हा केला होता त्यांनी ? मी तेव्हा जेमतेम पंधरा वर्षांची होते आणि प्रकाश सतरा वर्षांचा. मला पपांकडे बघवलेही नव्हते. नुसती धडाधड ओकत सुटले होते. मला तिला जाब विचारायचाय. का केले असेल तिने असे ? तिचा गळा धरणारेय. तुला माहितेय, त्याने आपले आयुष्य किती बदलून गेले ? अजूनही मी झोपेत बडबडते. कधीतरी दचकून उठते. सगळा संताप एक होतो. मशिनगन हातात घ्यावी आणि रस्त्यात जाऊन सर्वांवर गोळया झाडत सुटावेसे वाटते. हे आपल्या वाट्याला का यावे ? आपण काय गुन्हा केला होता?'
`देव असतो का मला माहीत नाही बेटा. मी ह्यानंतर जिझसकडे कित्येक वेळा प्रार्थना केली. वेगवेगळया मंदिरात गेले. शांतता मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. मग लक्षात आले, शांतता मनातच असते. ती बाहेर कुठेही मिळत नाही. मन शांत करण्यासाठी बाहेरचे प्रयत्न कमी पडतात. तात्पुरते बरे वाटते. ती आतच शोधावी लागते. नाहीतर वेड लागण्याची वेळ येते. माझे मनही असे सैरभैर झाले होते. सत्असत्चा खेळ सतत चालू असायचा. आता तसे होत नाही. मी माणसातच देव बघते.'
`तुला देवत्वाजवळ पोहचायचेय. मला नाही. मी आधी माणूस आहे आई. मला चार पिढ्या चालत आलेल्या राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही. त्या राजकारणाने माझ्या आजोबांचा घास घेतला आणि वडिलांचाही. आजोबांना गोळया घातल्या तेव्हा मी सात वर्षांची होते आणि पपा गेले तेव्हा पंधरा वर्षांची. माझ्यावर ह्याच दोन घटनांचे संस्कार झालेत. ह्याच वयात माणूस घडत जातो म्हणतात. मी अशी घडले.'
`प्रश्न आपण ठरवायचा नसतोच गं मुली. अशोकला कुठे राजकारणात यायचे होते ? त्याचा तर त्याच्याशी संबंधही नव्हता. स्वत:चा छान व्यवसाय करत होता. वडील मुख्यमंत्री असल्याचा त्याने कधी एक पैशाचा फायदा करून घेतला नाही. बाहेर कुठे तशी ओळखही द्यायचा नाही. स्वत:च्या जीवावर त्याने मोठे होण्याचा प्रयत्न केला. सगळे लोक त्याला हसायचे. पण तो तसाच होता. स्वतंत्र, निर्भय. डॅडींचे असे झाले आणि त्याला राजकारणात यावे लागले. मी त्याच्याशी तो राजकारणात येणार नाही ह्या अटीवर लग्न
केले होते हे तुला माहितीय ?'
`तू तसे मागे मला ओझरते म्हणाली होतीस.'
`मलाही तर राजकारणाचा तिटकारा होता. का ते समजत नाही. अशोकने राजकारणात येऊ नये असेच मला वाटायचे. तेव्हा तर राजकारण आजच्याइतके घाणेरडे नव्हते गं. तरीही माझी तीच भूमिका होती. आज मी राजकारणात आहे. मला त्यातले काहीही कळत नव्हते. माझ्या आयुष्याचे असे काही होईल अशी अशोकशी पस्तीस वर्षांपूर्वी लग्न करताना कल्पनाही केली नव्हती. हे प्रत्येकाचे नशीबच असते गं. यामागे तो जिझस आहे म्हणवत नाही. तो एवढा क्रूर असू शकत नाही. पण नशीब मात्र असते. ते का हे समजत नाही.
`तू स्वत:ला जिंकत गेलीस. मोहावर विजय मिळवत गेलीस. आपला पक्ष सत्तेवर येऊनही तू मुख्यमंत्री होण्याचे नाकारलेस. मला तसे जमत नाही गं. मला खूप राग येतो. खूप आनंद होतो, सगळे काही साध्या माणसासारखे होते.'
`तुझे वयच तसे आहे. त्यात तुझे काहीही चूक नाही. डू यू नो सुप्रिया ? अशोक गेला तेव्हा मी त्रेचाळीस वर्षांची होते. मेनोपॉजही आला नव्हता. गेल्या सतरा वर्षांत कोणाही पुरुषाबरोबर सेक्सही घ्यावासा वाटला नाही. ती तर माणसाची आदिम प्रेरणा आहे. पण माझी ती भावनाच मेलीय. तशी कधी इच्छाही झाली नाही. माझे जे काही होते ते सर्व अशोकबरोबर होते. ते कोवळे क्षण मी अगदी जपून ठेवलेत. आजूबाजूला तुम्ही दोघं असता, राजकारणाचा एवढा गोतावळा असतो पण ह्या सर्वांमध्ये बऱ्याच वेळेस अगदी एकटे वाटते गं. एकदम अशोकची आठवण येते. तो आजूबाजूला असल्याचा भास होतो. ह्या सर्वांचा खूप त्रास होतो. पण मी ते आता शांतपणे स्वीकारलेय.'
`मग मी तिला जाऊन भेटू ?'
`तुझी इच्छा. खाजगीपणा जपून भेट. हे मिडिआवाले त्यातही पराचा कावळा करतील. नको ते अर्थ काढतील. आपले घराणे कायम लोकांच्या नजरेत असते हे विसरू नकोस.'
आईबरोबर असे दीर्घ संवाद झाले की बरे वाटते. एकूणच तिच्या सहवासात असले की शांत वाटते. मनाची तगमग कमी होते. पण तिचा सहवास लाभतोच कुठे ? राजकारणात आल्यापासून तिच्या पायाला भिंगरी लागलीय. भेटणे कमीच झालेय. मग कधीतरी शांतपणे रात्री फोनवर बोलायचे. कधीकधी तिच्याबद्दलची काळजी एकदम दाटून येते. या वयात तिने एवढे संघर्ष करू नयेत असे वाटते. तसे बोलल्यावर ती म्हणते,
`अशोक गेल्यावर दहा वर्षे मी कुठे राजकारणात होते ? त्याची इच्छाच होत नव्हती. पक्षाचे प्रेशर वाढत होती. इथले लोक आपल्याकडे मसीहा असल्याप्रमाणे बघतात. त्यांना देवासारखे कोणी तरी लागते. पाच वर्षे आपला पक्ष विरोधात होता. ते सत्तेवर परत कधी येतील ह्याचं चिन्हंच दिसत नव्हते. राजकारणाचे प्रेम नसले तरी आपला तीन पिढ्यांनी उभा केलेला पक्ष वाऱ्यावर सोडून देेणेही जीवावर येत होते. अशोकच्या स्मृतीस्तंभासमोर उभे राहून त्याचाच कौल घेतला. तो कानात म्हटल्यासारखा वाटला राजकारणात येणे हेच तुझे प्राक्तन आहे. मी ते मानले. मग इथे आपल्यावर इथले नियम पाळावेच लागतात. आपल्याकडून आपण चांगले प्रयत्न करत राहायचे.'
`मॅडम, जेल आ गया' ड्नयव्हर परत बोलला आणि तिची तंद्री एकदम भंग पावली. ड्नयव्हरने कार एका झाडाखाली थांबवली होती. उन्हात पाच मिनिटे चालण्याची कल्पनासुद्धा असह्य झाली. पण पर्यायच नव्हता. स्वत:च्या इच्छेने आपण इथे आलो आहोत. कोणाला दोष देण्यात अर्थ नाही.
तुरुंगाच्या प्रवेशद्वारापाशी आल्यावर सिक्युरिटीने तिला एकदम सलाम ठोकला. ती एकदम बावचळून गेली. काय करावे हेच समजेना. हा सलाम ठोकतोय म्हणजे ह्याने आपल्याला ओळखले. मग ही बातमी सगळयांनाच माहिती होईल. तुरुंगात सुप्रिया कैद्याला भेटायला आल्या होत्या हे मिडिआमध्ये कळले की झाले ! तिला तसेच परत फिरावेसे वाटले. हे म्हणजे फारच झाले. तिने डोक्यावर ओढणी चटकन ओढून घेतली. एरव्ही उन्ह होतेच. आधीच तसे करायला पाहिजे होते. त्याने रस्ता दाखवल्याप्रमाणे ती सरळ तुरुंगाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेली. ते लगेच उठून उभे राहिले. आज आपला पक्ष सत्तेवर नसेल पण उद्या कधीही येईल हे ह्या नोकरशाहीला पक्के माहीत असते. ते बिचारे सगळया राजकारण्यांशी चांगले संबंध ठेवायला बघतात. आपणही राजकारणात आज ना उद्या येऊ याची त्यांना खात्री असावी.
`मॅडम, आपली सोय केली आहे. कैद्याला आपण भेटू शकता.'
`थँक्यू व्हेरी मच. किती वेळ मला तिच्याशी बोलता येईल?'
`मॅडम तुरुंगाच्या नियमानुसार पंधरा मिनिटेच मिळतात. पण तुमच्या स्पेशल विनंतीवरून तुम्हांला एक तास देण्यात आला आहे. एक वेगळया रूममध्ये तुम्ही तिला भेटू शकता पण तुमच्या सुरक्षेसाठी बाहेर शिपाई उभा असेल. शेवटी ती दहशतवादी आहे. तुम्ही त्याला कधीही हाक मारू शकता. ठरल्या वेळेआधी कधीही बाहेर येऊ शकता. फक्त मॅडम, एक विनंती आहे. एका तासापेक्षा जास्त वेळ घेऊ नका. बाहेर कळले तर माझी नोकरी धोक्यात यायची.'
`असे काहीही घडणार नाही. मी तुम्हांला संकटात येऊ देणार नाही. वेळ पाळण्याचा मी शक्यतोवर प्रयत्न करेन. पण कदाचित जमले नाही तर माफ करा. शेवटी हा वेळेचा नाही तर दोन आयुष्यांचा प्रश्न आहे.'
तुरुंगाधिकारी गप्पच बसले. त्यांनी शिपायाला बोलावले आणि सुप्रियाला आत जाण्याची दिशा दाखवली.
`आजपर्यंत तिचे आपण फक्त फोटो बघत आलो. टीव्हीवर बघितले. खूप ठिकाणी तिच्याबद्दल वाचले पण प्रत्यक्ष कधी बघितले नाही. कोर्टात तिच्यावर खटला चालला होता तेव्हाही आपण प्रत्यक्ष जाऊन कधी तिला बघण्याचा प्रयत्न केला नाही.
ेव्हा आपण लहान होतो आणि आईच मोठ्या धैर्याने सर्व गोष्टींचा सामना करत होती. आपल्याला तिने कायम संरक्षित अवस्थेत वाढवले. आता ह्या उघड्या जगासमोर जायचे आहे. सत्य जाणून घ्यायचे आहे.' आपण हा वेडेपणा तर करत नाही ? तिचे पाऊल एकदम थांबल्यासारखे झाले. मग निश्चयाने ती परत चालू लागली. एक बंद रुमसमोर ती आली. बरोबरच्या शिपायाने सांगितले.
`मॅडम, ती आत आहे. तुमची वेळ सुरू होतेय.' त्याने हातातली बेल वाजवली व घड्याळाकडे बघितले. दरवाजा उघडून ती आत गेली. एक मध्यमवयीन बाई एका बाकड्यावर बसली होती. काळा वर्ण, चेहऱ्यावर विझत गेलेले देवीचे व्रण, काहीसा लठ्ठ बांधा, चेहऱ्यावर निर्विकारपणा. अंगावर साडी. ती आत गेल्यावर एकदम अदबीने उभी राहिली.
`नमस्ते !' काहीसे झुकून ती म्हणाली. सुप्रिया एकदम अवघडली. मग पुढे जात तिचा हात हातात घेतला.
`बानो, तुम्ही बसा.' ती असे म्हटल्यावरही बानो अवघडून उभी राहिली.
`तुम्ही बसा ना. मी पण बसते.' मग दोघेही एकाच बाकड्यावर बसल्या. कोपऱ्यात एक खुर्ची होती. ती सुप्रियाने ओढून घेतली. काही क्षण नीरव शांतता पसरली. दोघींना काय बोलावे हेच समजेना.
`मी तुमच्या आईची खूप आभारी आहे. त्यांच्यामुळे माझी फाशीची शिक्षा टळली.' बानोच बोलली. सुप्रिया गप्पच.
`असा निर्णय घ्यायलाही खूप धाडस लागते. त्यांच्यामुळे मी त्या काळात माझ्या मुलीची काळजी घेऊ शकले. तेव्हा ती दोन वर्षांची होती. आज ती इंजिनीयरींगला आहे. खूप हुशार आहे. मला अधूनमधून भेटायला येत असते.'
`अरे वा. काय नाव आहे तिचं ?' आता सुप्रिया बोलू लागली.
`चिनू. स्वत:च्या गुणवत्तेवर इंजिनिअरींगला गेलीय. तिथेही चांगले गुण मिळवतेय. लोक मात्र तिच्याकडे वेगळया नजरेने बघतात.'
`म्हणजे ?'
`मी गुन्हेगार आहे. मला फाशी झाली होती. पण तिने काय गुन्हा केला ? माझ्या पोटी जन्मली हा तिचा गुन्हा असू शकतो ? लोक तिच्याकडे अजूनही तिरस्काराने बघतात. ती सगळयांशी मिळून मिसळून वागते. सर्वांना प्रेम लावायला जाते आणि लोक तिला टाळायला बघतात. तिला एकटेपणाची वागणूक देतात. आता त्यांच्या कॉलेजची ट्नीप गेली होती. एकतर मी तिला अशा गोष्टींना पाठवतच नाही. पैसे कुठे असतात ? तुरुंगात मी काम करते. त्याचे पैसे किती मिळतात ?'
`का ? तुमची संघटना तिला आर्थिक मदत करत असेल ना ? त्यांच्यासाठी तर तुम्ही हिरॉईन आहात. तुम्ही सर्वात मोठे शौर्य गाजवले आहे तुमच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे असेच तर तुम्हांला तेव्हा शिकवले होते तर?' सुप्रिया एकदम बिथरली. आपला तोल सुटतो की काय असे तिला वाटले आणि ती एकदम बोलायचे थांबली.
`तो इतिहास आहे. मला तेथे रमायचे नाही. माझी मुलगी ह्या देशाची स्वतंत्र नागरिक आहे. तिने कसलाही गुन्हा केलेला नाही. तिला चांगले आयुष्य जगायचेय. निर्भयपणे. ती माझी मुलगी असणे महत्त्वाचे नाही. माझ्या नातेवाइकांनी सांगितले होते की तिला माझे नाव लावू देऊ नका. त्यांच्यापैकी कोणाची मुलगी म्हणून तिला वाढू देत. मग तिला त्यापैकी कुठलेही त्रास झाले नसते. पण मला तसे करायचे नव्हते. ती माझी मुलगी आहे ह्याची लाज का बाळगायची ? ती माझ्यापेक्षा वेगळी असू शकते, खूप चांगली असू शकते. आमच्या संघटनेचेही लोक भेटायला आले होते तेही तिची जबाबदारी घ्यायला तयार होते. मी त्याला नकार दिला. मला त्यांची सावलीही नको होती. तिला माझ्याजवळ इथे लहानपणी वाढवले. तिच्यासाठी इथे बांबूकाम, सुतकताई, शिवणकाम सगळे शिकले. त्यातून थोडेफार पैसे मिळत होते. काही मदत नातेवाइकांनी केली. तिचे प्राथमिक शाळेपर्यंतचे शिक्षण माझ्याजवळच केले. याच तुुरुंगात ती लहानाची मोठी झाली. तिची समज त्यामुळे ह्या वयातही खूप जास्त आहे. नको तेवढी शांत झालीय.'
`आताच तुमच्या संघटनेची मदत का नको होती ? तेव्हा तर ते तुमचे मसीहा होते, तुमचे आयुष्य घडवणारे होते. त्यांनी सांगितले की तुम्ही मानवी बॉम्ब बनून कोणाचीही हत्या करायला तयार असायचात.' तिच्या स्वरातील तिरस्कार बानोलाही जाणवला असावा.
`आयुष्यात एकेक सटवीचे फेरे असतात. अशा वेळी बरेवाईट काही कळेनासे होते. कोणीतरी आपल्यावर जादूटोणा केला असावा असे आता वाटते.' ती शांतच होती.
`आता तुझ्या मुलीला त्रास होताहेत हे अगदी खरे, मग आम्हांला काय झाले असेल? हात-पाय धड काहीच जागेवर नसलेले माझ्या वडिलांचे शरीर मला आठवते आणि थरकाप उडतो गं. रात्री रात्री झोप येत नाही. हिस्टेरिक झाल्यासारखे होते. डिप्रेशन येते. सायकीअॅटि्न्स्टची मदत घ्यावी लागते.' सुप्रियाने एकदम आेंजळीत डोके लपवून घेतले. मग बानोच उठली. सुप्रियाच्या डोक्यावरून हात फिरवू लागली.
`मी तुझ्यापेक्षा सातआठ वर्षांनी तरी मोठी असेन. मला तुझे दु:ख समजते. ते आवरायलाच हवे. त्याशिवाय कसे जगता येईल गं ? शेवटी चांगलेपणाने जगणे महत्त्वाचे असते हे फार उशिराने समजले गं.'
`मग हे सर्व का ? कशासाठी ?'
`हे प्रश्न मलाही आता पडतात गं. तुम्हांला तरी सायकीअॅटि्न्स्ट असतात. निष्णात डॉक्टर असतात. सगळया देशाची सहानुभूती तुमच्या बाजूने आहे गं. माझ्या बाजूने कोण आहे ? एकही जण नाही. ही एकटेपणाची जाणीव काय असते हे तुला कळायचे नाही. तुझ्यासारखीच चार भिंतीच्या आड मीही मोठमोठ्याने रडलीय. तू जसे तुझ्या वडिलांचे कलेवर बघितलेय तसेच मीही धाकट्या बहिणीचे आणि मोठ्या भावाचे बघितलेय. ते मानवी बॉम्ब होते ना? त्यांच्या तर शरीराचे तुकडेतुकडे झाले. काही ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. तेव्हा माझी अवस्था काय झाली असेल ? लहानपणापासून ज्या बहिणभावाबरोबर खेळलो-बागडलो त्यांची ही अवस्था कशी बघवली असेल ? खरे तर मीसुद्धा त्यांच्याबरोबर मरणार होते. माझ्याही गळयात मानवी बॉम्ब होता. पण तो फुटलाच नाही. माझा बॉम्ब फुटू नये आणि त्यांचा फुटला ह्यात काय लॉजिक असेल ? ते बिचारे सुखी होते. लगेच मेले. मी अशी झिजत झिजत मरतेय.'
`हे तर तुमच्याच कर्तृत्वाचे फळ आहे. तुम्हीच तो प्लॅन बनवलात. माझ्या वडिलांना निर्र्घृणपणे ठार करण्याचा कट तुझा व तुझ्या संघटनेचा होता.' सुप्रिया काहीशी प्रक्षुब्ध झाली. खरेतर शांत राहायचे तिने अगदी ठरवले होते पण ते सगळे आठवले की मनात खळबळच उडते. शांत राहणे शक्यच होत नाही.
`तो इतिहास झालाय. ती आमची मोठी चूक होती.' बानो एकदम उठून उभी राहिली. तिचे अंग ताठरल्यासारखे झाले होते.
`मी त्याची सतरा वर्षे शिक्षा भोगतीय. अजून काही वर्षे राहिलीयत. त्या चुकीपायी माझे आयुष्य बरबाद झाले. तुझे वडील कायमचे गेले हे मान्य पण मी जिवंतपणी मरणयातना भोगल्या. हा तुरुंग काय असतो तुला माहिती आहे ?'
`नाही.'
`एक रात्र काढून बघ. साधा कैदी म्हणून. मी तर दहशतवादी. सर्वात वाईट माणूस. त्यात एवढ्या मोठ्या नेत्याला मारल्याची शिक्षा भोगणारी. मी काय हाल भोगले असतील ते माझे मलाच माहिती. सर्व तऱ्हेचे अत्याचार सहन केले. इथल्या तुरुंगाधिकाऱ्यापासून एकेक नामचिन गुंडापर्यंत कोणकोण माझ्यावर वाटेल ते अत्याचार करून गेला. शेकडो वेळा बलात्कार झाले. सगळयांची विविध प्रकारे कामवासना पुरवण्याचे मी यंत्रच बनले होते. त्यात वाटेल तसे कष्ट करून घ्यायचे. ढेकूण, डास, पिसवा हे तर आमचे मित्रच. रात्ररात्र मी झोपले नाही. पोटाचे त्रास कधीच सुरू झाले. आजारी पडलेय म्हटल्यावर कोणी धड बघणार नाही. आम्ही जिवंत असलो काय किंवा मेलो काय. बाहेरच्या जगाला काय फरक पडतोय. आम्ही तर जन्मठेपेचे शिक्षा झालेले कैदी. आमचे आयुष्यच कुठे उरले होते ? आम्हांला भविष्य तर असूच शकत नाही. भविष्य अंधकारमय व्हावे अशी तरतूद ह्या कैद्यांत आणि तुरुंगात केलेली. ह्यातून झगडत मी पुढे जात राहायचे ठरवले. डू यू नो ? मी एम.ए. तत्त्वज्ञानात केले. इथे बसून हजार वेळा कोलमडून पडली असेन, पण डगमगले नाही. तुरुंगातून विनवणी अर्ज करत चांगली वर्तणूक ठेवत सतत वाचत आले, अभ्यास करत आले. इथे आले तेव्हा जेमतेम मॅटि्न्क पास होते. आता माझी तत्त्वज्ञानात पीएच. डी. पूर्ण होत आलेय. माझे भविष्य कधीतरी उजेडाची तिरीप दाखवेल ही आशा धरत आलेय.'
`वंडरफुल ! हे सगळे गुण कुठून मिळवलेस ?'
`परिस्थितीने झगडत राहायचे हे माझ्या आईवडिलांनी त्यांच्या वर्तणुकीतून शिकवले असेल. ते फार गरीब होते. आम्हा तिघांना त्यांनी कसे वाढवले ते आम्हांलाच माहिती. उपासमार तर नेहमीचीच होती. वडील शेतमजूर होते. जमीनदारांचे अत्याचार तर होतेच आमची जमीन त्यांनी कधीच बळकावली होती. नंतर त्यांची नजर आमच्या आईकडे वळली होती. एक दिवस त्यांनी आईला भर घरातून आमच्यासमोर उचलून नेले. बरोबर चारपाच गुंड होते. दोनतीन दिवसांनी तिला घरी परत आणून सोडले तेव्हा ती अर्धनग्नावस्थेत आणि रक्ताळलेली होती. मी तेव्हा पंधरा वर्षांची होते. आम्ही सगळे मिळून खूप रडलो. बापसुद्धा रडला. स्वत:चे डोके फोडून घेत होता. पोलिसांकडे कित्येक वेळा गेला असेल. त्याची तक्रारही नोंदवून घेतली नाही. अन्याय दूर करणे तर सोडाच. तरी वडील आम्हांला नेटाने शिकवत होते. त्यांनी त्यांच्या भाषेत एकदा आम्ही तिघांना जवळ घेऊन सांगितले होते, `पोरांनो शिक्षण हेच आपल्याला ह्या खातेऱ्यातून सोडवू शकते. बाकी कोणी नाही. तुम्ही सर्वांनी शिकणे जरूरीचे आहे. त्यानेच आपले आयुष्य बदलेल. हे शेती वगैरे खरे नाही. नंतर तुम्ही शहरात जा. आमच्या आयुष्यात आता बदल होणार नाही. तुमच्या आयुष्यात होऊ शकतो. मी त्यासाठी वाटेल तेवढे कष्ट करायला तयार आहे.' एवढे चांगले बोलणारा बाप आम्हांला लाभला होता. आम्ही दुर्दैवाने त्याचा फायदा करून घेऊ शकलो नाही.' काही क्षण शांततेत गेले. कोणीच काही बोलले नाही.
`माझ्या वडिलांची हत्या केली ह्याचा आज तुला पश्चात्ताप होतो ?' काही क्षण परत शांततेत. कोणीच काही बोलले नाही. सुप्रिया तिच्याकडे श्वास रोखून बघत होती.
`हो. फार वाईट वाटते त्याबद्दल. तुझे वडील खूप चांगले होते पण त्यांना ह्या देशाच्या ग्राऊंड रिअॅलिटीज माहीत नव्हत्या. त्यांची मोठी स्वप्नं होती. ह्या देशाला, राज्याला त्यांना प्रगतिपथावर न्यायचे होते. चेहरामोहरा बदलून टाकायचा होता. काहीसा रोमँटिक आणि भाबडा आशावाद त्यांच्यात होता. ते ऑक्सफर्डमधे शिकले असल्यामुळे त्यांच्यावर पाश्चिमात्य विचारसरणीचा प्रभाव होता. आपले राज्यही तसेच घडवायचे हा त्यांचा निग्रह होता. त्यांचे प्रयत्न प्रामाणिक होते पण हा देशच त्यांना उमगला नव्हता.'
`हे बरोबर नाही. ते इथले प्रश्न समजाऊन घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत
होते. मला तेव्हा तितकेसे कळत नव्हते पण ते सतत दौऱ्यावर असायचे. नाहीतर कामात असायचे. त्यांच्या बोलण्यात नेहमी देशाचे, राज्याचे प्रश्न असायचे. ते सोडवण्याची धडपड असायची. त्यांचे प्रयत्न प्रामाणिक होते.'
`मी कुठे नाही म्हणतेय ? त्यांचे स्वत:चे असे सल्लागार होते. तेही असेच उच्चशिक्षित होते. ह्या राज्याला देशाचे सर्वात मोठे आयटी हब बनवले की सगळे प्रश्न सुटतील असे त्यांना प्रामाणिकपणे वाटत होते. त्यांच्यापैकी कोणी लबाड होते असे मी म्हणत नाही. म्हणजे ते त्यांचा स्वार्थ साधून घेत असतील पण त्यांना प्रश्नच नीट समजले नव्हते.'
`असे कसे म्हणता येईल ? मनुष्य एकावेळी सर्व तऱ्हेचे जीवन जगू शकत नाही पण समजून तर घेऊ शकतो ?'
`आज तू इथे कशी आलीस ?'
`मुंबईहून विमानाने मग तेथून कारने.'
`हेच तर मी म्हणतेय. ह्यातून तुला रस्त्यावरचे प्रश्न कसे समजणार ? इथल्या जगण्यातली गुंतागुंत व तेथील पेच कसे सोडवणार ? तू ट्न्ेनच्या सेकंड क्लासने आली असतीस व तेथून इथे एसटीने आली असतीस तर तुला ग्राऊंड रिअॅलिटी कळली असती. हा खरा भारत आहे.'
`तुझे म्हणणे आम्ही सुस्थितीत जन्मलो, चांगल्या घरात जन्मलो, आम्हांला तुझ्यासारखे काही सोसावं लागलं नाही हे आमचे पाप का ?'
`अजिबात नाही. कोण कुठे जन्मावा हे आपल्या हातातच नाही. मी हे पापकर्म करण्याआधी असाच चुकीचा विचार करायचे. जगातील सर्व सुस्थितीतील लोक मला शत्रू वाटायचे. हे सगळे लबाड वाटायचे. आमच्या विचारसरणीचे स्कूलच तसे होते. क्रांती हा आमचा नारा होता. सर्व समाजव्यवस्था उद्ध्वस्त करायची होती. तुझ्या वडिलांच्या गोंडस कल्पना होत्या तशा आमच्याही होत्या. सर्वंकष क्रांतीसारखे विचार आम्हांला शिकवले जायचे. त्यासाठी हिंसा आवश्यक आहे हे पटवले जायचे. ते करणे म्हणजे आयुष्याचे सार्थक वाटायचे. आता इस्लामचे लोक मदरशांतून दहशतवादी तयार करताना हेच जिहादचे स्वप्न सांगतात. तरुण पोरापोरींना कळत नाही. ते व्हलर्नेबल असतात. त्यांना दिशा माहिती नसते. मग धर्मगुरू, आमचे जहाल नेते सांगतील तेच खरे वाटू लागते. आमची दिशा चुकली होती गं.'
`कशाने ?'
`ह्या जगात देव असतो ह्यावर माझा तर विश्वास नाही. नाहीतर तू राजघराण्यात आणि मी शेतमजुराकडे का जन्मलो ? पण तसे घडण्याने पुढचे आयुष्य ठरत जाते. आमच्यावर सतत अन्यायच का व्हावा ? आमच्या नशिबी सतत नरकयातना का याव्यात ? माझी भाषा एरवी अजिबात बरी नव्हती. तुरुंगात नरकयातना भोगूनही मी ती सुधरवत आले कारण ही तुमची सो कॉल्ड सुसंस्कृत व चांगल्या जगाची भाषा आहे. मला त्या जगात प्रवेश हवा होता. ते तर झालेच नाही पण मी आणखी दलदलीत फसत गेले. हे का होते ते समजत नाही गं. म्हणजे आपला दोष नसतो असे नाही. मी नशीब, प्राक्तन ह्या भाकड गोष्टी मानत नाही तरी हे एकेकाच्या बाबतीत का घडत जाते ह्याचे उत्तर नाही. मी तत्त्वज्ञान अगदी आतून शिकत गेले. एवढे पुस्तक वाचत गेले आणि माझी जगण्याकडे बघण्याची दृष्टीच बदलून गेली. मी चक्क तुमच्यासारखी बनले. म्हणजे जगते आहे अजून त्याच खातेऱ्यात पण विचार मात्र तुमच्यासारखे अशी त्रिशंकूसारखी लोंबकळती अवस्था झाली.'
`माझ्या वडिलांना मारायचे कसे ठरवले?'
`कशासाठी भूतकाळात जायचे ? त्याने आपल्या दोघींना फक्त त्रास होईल.'
`होऊ दे. मी त्यावेळचा खटला पूर्ण वाचलाय. त्यावेळी वर्तमानपत्र, नियतकालिकांमधून छापून आलेले सर्व वाचलेय. त्याच्यावर काही पुस्तकंही प्रसिद्ध झाली तीही वाचलीत. तरीसुद्धा मला ते तुझ्या तोंडून ऐकायचेय. माझे वडील खूप चांगले होते गं. त्यांनी तुमचा काय गुन्हा केला होता ?' अकस्मातपणे सुप्रियाच्या डोळयांत पाणी आले आणि ती रडू लागली. बानोने तिला हलकेसे जवळ घेतले आणि थोपटले.
`तुझ्या वडिलांवर अन्याय झाला हे मान्य मग आम्ही काय पाप केले होते गं ? माझ्या आईवर बलात्कार किती जणांनी आणि कसा केला हे तुला माहिती आहे ? आमची जमीन कशी हिसकावून घेतली हे तुला माहीत आहे? आमच्या घरावरून नांगर कोणी फिरवला व का फिरवला हे तुला माहितीय ? कोणी ही समाजव्यवस्था निर्माण केली ? आम्ही किती दिवस व का अन्याय सहन करत राहायचा होता ? तुझे वडील आपल्या राज्याच्या राजधानीला सायबरसिटी बनवण्याचे खूळ डोक्यात घेऊन बसले होते. ते त्यांनी केलेही. आपले शहर जगाच्या नकाशावर आले. शहराचा नकाशाच बदलून गेला. त्याच्याआधी सगळीकडे पीसीओ/एसटीडी बूथ आणले. कम्युनिकेशनमध्ये त्यांनी क्रांतीच केली. आज देश त्यांच्या विकासाचे फळ चाखतोय हे मान्य आहे. पण आम्ही लोकांनी काय पाप केले होते ? मुंबई-पुणे म्हणजे महाराष्ट्न् नाही व आपले शहर, राजधानी म्हणजे राज्य नव्हते. आम्ही कुठून कॉम्प्युटर शिकायचा होता आणि ह्या क्रांतीमध्ये सहभागी व्हायचे होते ? आमच्या प्रेतावर नाचून तुम्ही विकास करणार होता? इथे आम्ही उजाड होतोय आणि तुम्ही मजेत जगताय. तुझ्या वडिलांना एका बिझनेस मॅगझिनने `बेस्ट सीईओ ऑफ द इयर' हे अॅवॉर्ड दिले असे या देशात प्रथमच घडले होते. एका मुख्यमंत्र्याला बेस्ट सीईओ संबोधले गेेले होते. तेव्हा आम्ही त्यांना उडवायचा प्लॅन बनवत होतो.'
`त्याने तुम्हांला काय मिळाले असते ?'
`आम्ही क्रांती करणार होतो. या संघटनेत आम्ही तिघे व नंतर माझा नवरा याच उद्दिष्टाने ओढले गेलो होतो. आम्ही एकेकाचा काटा काढत चाललो होतो. ज्या दिवशी त्या जमीनदाराचा खून करून आम्ही त्याच्या प्रेतावर नाचलो तेव्हा आम्ही अत्यानंदाने उड्या मारत होतो. एकमेकांना मिठ्या मारत होतो. आम्ही विकृत झालो होतो. आम्ही जमीनदाराच्या कुटुंबातील सहा जणांना मारले होते पण त्याच्या बायकोला हात लावला नव्हता. तितपत सभ्यता आम्ही जपली होती.'
`वा ! फारच छान !' सुप्रिया एकदम कुत्सितपणे बोलली. तिच्या बोलण्याचा रोख बानोच्याही लक्षात आला असावा.
`मग आमचे राज्य असताना आम्हीही तुझ्यावर असेच अत्याचार करून आनंद मिळवायला पाहिजे होता. टाळया वाजवायला हव्या होत्या.'
`ते तर अत्याचार तुम्ही न सांगताही ह्या तुरुंगात होतच राहिले. आपण एकेक व्यवस्थाच अशा बनवून ठेवल्यात की माणसाचे वाईट जनावर व्हायलाच हवे. मला माझ्या कुठल्याही कृत्याचे समर्थन करायचे नाही. पण कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी तर जायला हवे ना ? गुजरातमध्ये मारले तसे मुसलमानांना वेचून मारून प्रश्न सुटतील असे तुम्हांला वाटते का ? मुळात हे सर्व का घडतेय ते तर समजून घ्यायला हवे की नको ?'
`मी तुला समजून घेण्यासाठीच इथे आले ना ? मला तेच तर समजून घ्यायचेय. नाहीतर एक दिवस हे जगच संपुष्टात येईल.'
`तेच तर मी तुला सांगतेय. आयुष्य ह्या हिंसेमध्ये होरपळून घेतल्यावर सगळयांमधली व्यर्थता लक्षात येतेय. पण तरीही हे घडतच राहील. दहशतवादी तुम्ही कसे ठरवणार ? तुमच्या सोयीने? ब्रिटिशांना भगतसिंग, राजगुरू दहशतवादी वाटत असतील. औरंगजेबला संभाजी. त्यात गैर काय ? शेवटी हा ज्याच्या त्याच्या दृष्टीचा प्रश्न आहे. अमेरिकेचे टि्वन टॉवर्स पाडले ते दहशतवादी होते हे तुमच्या जगाने ठरवले पण दुसऱ्या जगाला ते मान्य नसेल तर ? त्यांच्या मते हे स्वातंत्र्य युद्ध, बंड असेल तर ? तुमचाच चष्मा खरा कशावरून ? तुम्ही म्हणता म्हणून? तुम्ही स्वत:ला त्या जगाचे नैतिक पुरस्कर्ते समजता म्हणून ? माझ्यावर अन्याय होत असेल तरी मी चूप राहण्यात शहाणपणा आहे की वेडेपणा ?'
`मग काय करावे आपण ? जंगलराज आणावे ? अशाच हत्या व घातपात करत राहावे ?'
`अन्याय होणार नाही अशी व्यवस्था का निर्माण करू नये ?'
`ती एका रात्रीत होत नसते. हे फार संथपणे घडत असते. समाज बदलण्याची प्रक्रिया फार हळूहळू होत असते.'
`तोपर्यंत हे होत राहील हे आपण मान्य करायला हवे. आपण आता यासकटच जगायला शिकायला हवे.'
`पण माझे वडील तर निरपराधी होते?'
`आम्ही पण निरपराधीच होतो. आम्ही मुख्यमंत्र्यांची हत्या करण्याआधी महसूलमंत्र्यांची हत्या करून सरकारला इशारा दिला होता. पण आपल्याकडे व्यवस्था ढिम्म हलत नाही. एक दिवस मिडिआमध्ये बोंबाबोंब होते, मग परत तेच सुरू होते. जणू आम्ही महसूलमंत्र्याची हत्या गंमत म्हणून केली होती. ह्यांच्याकडे दिवसाला अधिकृत आणि अनधिकृत किती महसूल जमा होतो, हे त्यांना विचारायला पाहिजे होते. तुम्ही परत म्हणताल की पक्षाला निधी लागतो. त्याशिवाय पक्ष चालत नाही. निवडणुकांनाच निधी लागतो. त्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. आपण अगदी बनचुकी व्यवस्था निर्माण केलीय. सर्व खोट्या व भ्रष्ट गोष्टींसाठी आपल्याकडे उत्तरे तयार असतात. मग आमच्यासारखे मूर्ख बगावत करणार. पैदा होत राहतात ते व्यवस्थेला हलवण्याचा प्रयत्न करतात. बदनाम आम्हीच होतो. तुम्ही हुतात्मा होता पण ही व्यवस्था काही बदलत नाही. माझ्यावर तुरुंगात एका रात्री दहा पुरुष चढले. कोणी बाहेरून गेस्ट तुरुंग बघण्यासाठी आले होते. त्यांनी इथेच मुक्काम ठोकला होता. त्यांची खातरजमा मी केली होती. कारण दिसायला मी बरी होते. तेव्हा एकेकाच्या पोटात सुरा खुपसावासा वाटला होता. ते मला शक्य होते. तसे केले असते तर मी आणखी बदनाम झाले असते. आणखी एक जन्मठेपेची शिक्षा झाली असती किंवा यावेळी कोणी दया दाखवली नसती. सरळ फाशी झाली असती. म्हणून काही बलात्कार व्हायचे थांबले नसते. मी काहीच केले नाही. तुमच्या दृष्टीने मी आदर्श कैदी ठरले कारण मलाही तुरुंगापलीकडचा उजेड बघायचाय. गेल्या सतरा वर्षांत तो बघितला
प्प राहिलेलेच बरे नाही का ?'
सुप्रिया एकदम शहारली. तिने काहीसे अंग चोरून घेतले.
`तू तुझ्या गुन्ह्यांचे, दहशतवादाचे उदात्तीकरण करते आहेस का? त्याचे तुला समर्थन करायचे आहे ? ती चंबळची डाकू चित्रपटाची हिरॉईन बनली तसे तुला बनायचे आहे ?'
`मी कुठलेच समर्थन करत नाही. अशा तऱ्हेचे आयुष्य जगण्याची कोणालाच हौस नसते. तुम्हांला असेल ? मला छानशा फ्लॅटमध्ये रहायला का आवडणार नाही ? एसी कारमधून फिरायला का आवडणार नाही ? पण ते तसे कधी वाट्यालाच आले नाही हो.' दोघी एकदम एकमेकींच्या जवळ येऊन उभ्या राहिल्या. तेवढ्यात बाहेरचा शिपाई आत आला.
`मॅडम, दीड तास होत आला. तुम्हांला आता निघावं लागेल.'
`मी निघू शकत नाही. मला अजून बरंच काही बोलायचं आहे.'
`पण तुरुंगाचे नियम ---'
`हेल विथ इट. मी माझंे बोलणं संपवल्यावर बाहेर येईन.' ती एकदम ताडकन बोलली. शिपाई एकदम थिजून गेला. त्याला काही सुचेचना. मग तो गुपचूप बाहेर निघून गेला. परत एकदा दोघींमध्ये नीरव शांतता पसरली.
`तुझ्या वडलांचे महसूलमंत्री विरोधक होते. तुझ्या वडिलांसाठी विरोधकाचा परस्पर काटा काढला गेला होता.'
`हे खोटे आहे. माझे वडील कधीच कोणाच्या मरणाची वाट बघणारे नव्हते.'
`मी कुठे तसे म्हटलेय ? त्यांची हत्या तर आम्ही केली होती. तुझ्या वडिलांचा त्याच्याशी कसलाच संबंध नव्हता. पण तरी त्यांना आतून बरे वाटले असणार.'
`हेही खोटेय.'
`माणूस जन्मतो तेव्हा तो अगदी निरागस व कोवळा असतो. वय वाढत जाते तसे त्याचे हिंस्र जनावरात रूपांतर होत जाते. कोणी माझ्यासारखे बनतात तर कोणी तुमच्यासारखे.'
`महसूलमंत्र्याच्या खुनाच्या मुळाशी या राज्याची तपासयंत्रणा कधी पोहचलीच नाही. नाहीतर आम्ही तेव्हाच पकडले गेलो असतो.'
`मग तुझं काय म्हणणं आहे ? माझ्या वडिलांनी त्यांच्या अधिकारात तो तपास हेतूपुरस्सर दाबून टाकला ?'
`हे सांगायला ते आता जिवंत नाहीत. आपण त्यांना संशयाचा फायदा देऊ. पण त्याचा फायदा आम्हांला झाला. आमच्या संघटनेला ही व्यवस्थाही उलथून टाकायची होती. त्यासाठी केऑस आवश्यक होता. त्यासाठी अशा मोठ्या व्यक्तींच्या नियमितपणे हत्या करणे आवश्यक होते. त्यांच्याशी आमचे व्यक्तिगत वैर काहीच नव्हते. तुझे वडील तर मलाही आवडायचे. फार देखणे व सभ्य गृहस्थ होते. माझा नवरा किंवा वडील असलेले खूप आवडले असते.'
`यू आर क्रॉसिंग युवर लिमिट्स.'
`मी खरे तेच बोलले. ते असेच होते. त्यांची हत्या करणे मलाही जीवावर आले होते पण संघटनेची तशी आज्ञा होती. मला त्याचे आज्ञापालन करणे आवश्यकच होते.'
`कोणाची ही संघटना ? कुठली ही संघटना ? त्यांच्याशी तुमचा काय संबंध ?'
`माझ्यासारखेच लहानपणापासून अन्याय सहन करत आलेले व त्याचा बदला घेऊ इच्छिणारे लोक एकत्र आले होते. आम्ही त्यांच्या छावणीत कसे सामील झालो हे आम्हांलाही समजले नाही. पण तेव्हा त्यांच्या विचाराने अगदी भारून गेलो होतो आणि आता तर ती संघटना चांगलीच फोफावलीय. देशातल्या सात राज्यात आणि आपल्या राज्यातील अकरा जिल्ह्यात ते सक्रिय आहेत. आणि दिवसेंदिवस ते वाढताहेत. आपल्या कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेस त्यांचा मुकाबला कसा करायचा हेच समजत नाहीय. ते सगळेच लोक दहशतवादी, बदनाम, डाकू तर असू शकत नाहीत ना ? आता त्याच्यातील फोलपणा लक्षात येतो.'
`आता का विचार बदलला ? खून का बदला खून हेच तुमचे तत्त्वज्ञान असते ना ?'
`आमची संघटना वाढूनही व्यवस्थेत बदल झालेला नाही. भ्रष्टाचार वाढतोय. अन्याय सहन होत नाहीय. `तुम्ही शायनिंग इंडिया'चा नारा देतात. इथे आम्हांला अंधारच अंधार दिसतो. लोकांच्या हत्या करूनही प्रश्न सुटत नाहीयेत.'
`का ? केऑस तर निर्माण होतोय ना ? तुम्हांला तेच पाहिजे?'
`जगात एकाही ठिकाणी असे करून शांतता, सहजीवन, समृद्धता आणल्याचा पुरावा नाही. एवढे वाचन केल्यावर हे लक्षात आलेय. प्रश्न बिकट होत चाललेत पण उत्तरच सापडत नाहीय. मी माझ्या मुलीच्या रूपाने त्याचे उत्तर वैयक्तिक पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करतेय. एक दिवस तिने इथे येऊन पंधरा मिनिटात मोठा गोंधळ घातला. एकदम चिडली होती. भेटल्यावर लगेच मला मारायला लागली. म्हणाली तू असे केले नसते तर मला असे जगावेच लागले नसते. गुन्हेगाराची मुलगी हे माझ्या कपाळावर लिहिले आहे ते आयुष्य कसे मिटता येईल म्हणाली, मी तिला काय उत्तर देणार होते ? आपले नशीब आपल्याला बदलता येतं का ? मी तरी तुरुंगाबाहेर पडून काय करणार आहे ? एवढे अन्याय सहन करूनही मी एवढे शिकले म्हणून हल्ली तुरुंगातही माझ्याकडे वेगळया नजरेने बघतात. तशा तऱ्हेचे अत्याचार माझ्यावर करण्याची आता कोणाची हिंमत होत नाही. लोक मला घाबरून असतात. पण इथून सुटल्यावर मी काय करणार आहे ? मला तेव्हा तरी उजेड बघायला मिळणार आहे का ?'
तिला म्हणावेसे वाटले `मिळेल की. मी तुला मदत करेल.' पण कोणास ठाऊक सुप्रियाची जीभ अडखळली. मग तिचे तिलाच आश्चर्य वाटले. ती खिडकीपाशी आली. उन्हं कलतीला आली होती. किती वेळ गेला हे कळले नाही.
`मी सरकारकडे अर्ज केलाय. माझी उरलेली शिक्षा माफ करण्याचा' बानो म्हणाली आणि सुप्रियाने एकदम मागे वळून बघितले.
`मलाही आता ओढ लागलीय तुमच्यासारखे नॉर्मल जगण्याची. पापभीरू जगण्याची. कुठल्या प्रकारचे जगणे चांगले असते हे मी सांगू शकत नाही. माझा नवरा संतोष माझ्या वाट्याला फारसा आलाच नाही. तो फार हुशार होता. खूप शिकलेला होता. इंजिनिअर होता तरी आमच्या संघटनेत आला होता. त्याने कधी हातात पिस्तुल धरले नाही पण आमचा थिंक टँक होता. तुझ्या वडलांच्या हत्येचे प्लॅनिंग त्यानेच केले होते.' सुप्रिया एकदम थरथरली.
`कुठे असतो तो आता ?'
`त्याला पोलिसांनी एनकाऊंटरमध्ये मारला. त्याला जाऊन चौदा वर्षे झाली. तो गेल्याचे मलाही इथे उशिराच कळले. मला येऊन भेटायचा. म्हणायचा तू एक दिवस जरूर सुटशील. मग आपण सुखानं संसार करू. माझ्या मुलीला त्याला सांभाळायचे होते. पण त्याच्याच मागे पोलीस लागले होते. त्याच्यावरील कुठलाच गुन्हा कधी सिद्ध होऊ शकला नाही. पण सगळयाचे मास्टर प्लॅनिंग तोच करायचा.'
`तुमच्या संघटनेत लग्नही करतात वाटतं? लग्न ही तर बुर्झ्वा संकल्पना आहे. त्याविरुद्धही तुम्ही बंडखोरी करायला हवी होती?'
`माझा सिद्धांत आहे सगळयांनाच ब्राह्मण व्हायचे असते. ते होता येत नाही तोपर्यंत ते ब्राह्मणांना शिव्या देतात. मी जातीवाचक अर्थाने बोलत नाही. ब्राह्मण म्हणजे समाजातील एस्टॅब्लिश्ड वर्ग. त्या अर्थाने सर्वांनाच आयुष्यात स्थिर व्हायचे असते, मान्यवर व्हायचे असते तसे होता आले नाही की लोक आपापले दुकान थाटतात. संतोष ब्राह्मण होता तरी आमच्याबरोबर होता.'
`त्याच्यावर कुठला अन्याय झाला होता?'
`प्रत्येकावर अन्याय व्हावाच लागतो असे नाही. संवेदनशील असेल तरी खूप असते. तो तसा होता. तो मध्यमवर्गीयच होता. वडील शिक्षक होते. ह्याला त्या काळी अमेरिकेत जायची संधीसुद्धा आली होती. ते सोडून तो आमच्याबरोबर राहिला. माझ्यात त्याने काय पाहिले कोणास ठाऊक ? मी ना त्याच्या जातीची न पातीची. त्याच्यासारखी शिकलेलीही नव्हते. तो मला सारखे शिक्षणाचे महत्त्व सांगायचा. माझी मुलगी त्याच्यावर गेली असेल.'
`तो गेल्याचे मला तुरुंगाधिकाऱ्याने कळवले....' ती परत बोलू लागली.
`त्याच रात्री त्याने माझ्यावर रेप केला. म्हणाला, आता तर नवराही मेला. कोणीतरी तुला हे सुख द्यायला हवेच ना ? कोणाला हे सांगूनही उपयोग नाही कारण तू आहेस दहशतवादी. मी आहे तुरुंगाधिकारी. तू माझ्याविरुद्ध काय तक्रार करणार ? मला त्याने एकांतात दु:खही भोगू दिले नाही. रात्रभर छळत राहिला.' ती निर्विकारपणे सांगत होती.
`माझ्या डोळयांतले पाणीच कधीचे निघून गेलेय. मला आता रडूच येत नाही. आयुष्यभर किती सोसायचे हेच समजत नाही. हे सगळे माझ्याच वाट्याला का यावे हेही समजत नाही.'
आपण आलो कशासाठी होतो आणि काय ऐकतोय हेच सुप्रियाला समजत नव्हते. कोणाचे दु:ख मोठे हेही समजेनासे झाले होते.
`बदला तरी कोणाकोणाचा घ्यायचा हेही समजेनासे झाले आणि मी आपोआप शांत होत गेले. आतल्या आत विझत गेले.'
`काय मिळवलेस हे सगळे करून ? काहीच बदलले नाही. तुझ्या आयुष्याची बरबादी झाली. माझे निरपराध वडील गेले ...'
`ते निरपराध होते का मला माहिती नाही' ती पटकन म्हणाली.
`ते ह्या व्यवस्थेचा भाग होते. मुख्यमंत्री म्हणून ते खूप काही बदलू शकले असते. त्यांच्या हातात अमानुष सत्ता असते. चांगल्या कामासाठी ते वापरू शकतात. पण ते कोणालाच जमत नाही. एकापरीने हे सर्व अपराधीच असतात.'
`त्यांनी तुझ्यासारखे शस्त्र हातात घेऊन एकेकाला मारत सुटायचे होते ?'
`असे नाही. पण सर्व यंत्रणा त्यांच्या हातात असते. अपराधी कोण हे त्यांना पक्के माहीत असते पण ते फक्त राजकारणाच्या चाकोरीतून प्रत्येक घटकाचा विचार करतात. त्यांच्या फायद्याचे काय आहे तेवढेच बघतात. ही व्यवस्था तशीच राहण्यात सर्वांचा फायदा असावा.'
`तू मुख्यमंत्री असती तर काय केले असतेस ?'
`कदाचित या यंत्रणेचा एक भाग बनून गेले असते.'
`मग इतरांना दोष कशाला द्यायचा ?'
`माणूस नामक प्राण्याचंच काय करावं हा प्रश्न पडतो. पण तसे आहे तर पाश्चिमात्य देशात सामान्य माणूस या तऱ्हेने भरडला गेलेला
आपण बघत नाही. आपण स्वत:च्या कुठल्या गोष्टीचा आणि परंपरेचा अभिमान धरायचा ? म्हणे आपल्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. कशाची ? मला एवढे वाचूनही कुठल्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. गोंधळल्यासारखे होते. मग तुमच्या एलीट गटात येऊन प्रस्थापित झाल्यावर कदाचित शांतही होईन. असे विचार मनात आले की स्वत:चीच लाज वाटते.'
परत शिपाई येऊन उभा राहिला. सुप्रियाने खिडकीतून बाहेर बघितले. बाहेर चक्क अंधारू लागले होते. तिने खोलीत लाईट लावला. शिपायाला सांगितले,
`आता थोडाच वेळ. आमचे झालेच. साहेबांना तसे सांग.' शिपाई परत निघून गेला. मग काही वेळ शांतताच होती.
`काही महिन्यानंतर निवडणुका आहेत. यावेळी तुमच्या पक्षाची जोरदार हवा आहे म्हणतात. तुम्ही नक्की निवडून येणार असे म्हटले जातेय.' बानो म्हणाली.
`माहिती नाही. एक तर मी राजकारणात नाही. आईची सगळी धडपड बघत असते. तीसुद्धा राजकारणात येऊन दहा तर वर्षे झाली. तिच्या इच्छेविरुद्ध आली. पपांनी राजकारणात यावे असेही तिला वाटत नव्हते. पण तू म्हणतेस तसे आहे. एकेकाचे योग असतात.'
`तूसुद्धा एक दिवस राजकारणात नक्कीच येशील. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनशील. तुझी आई मात्र धीराची आहे. तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सासरा आणि नवरा दोघेही घाणेरड्या राजकारणात बळी जाऊनही ती बाई मोठ्या धैर्याने राजकारणात आली.'
`तुझी फाशीची शिक्षा तिने कोर्टाला विनंती करून माफ करायला लावली म्हणून बोलते आहेस ?'
`ते तर आहेच. पण ते तेवढेच नाही. राजकारणाचा आणि देशाचा व्यापक विचार करून हे बोलतेय. राजकारणाशिवायही ती बाई व्यवस्थित जगू शकली असती. पण तिने एवढे मोठे धाडस दाखवले. आणि दुसऱ्यांना माफ करण्यासाठी मोठी हिंमत लागते गं. ती हिंमत तुझ्या आईमध्ये आहे. त्यांना माझे लाख सलाम सांग.'
`एक विचारू ?'
`माझे वय लहान असले तरी अख्खा देश मला मॅडम म्हणतो. तू तर माझ्या वडलांच्या हत्येच्या आरोपावरून शिक्षा भोगते आहेस. मग मला लगेच अगंतुगं कसं चालू केलंस ?'
बानू एकदम तिच्याजवळ आली. दोन्ही खांदे पकडले.
`आपल्या दोघींमध्ये कसलेच साम्य नाही. तुझे भविष्य उज्ज्वल आहे. माझे अंधकारमय. तू एवढ्या मोठ्या घराण्याची. मला कसलाच चांगला भूतकाळ नाही. पण तरी आपल्या दोघींमध्ये काही साम्य आहे. नाहीतर तू मला भेटायला एवढी दूर कशाला आली असतीस?'
सुप्रिया स्तब्धच.
`आज तुझ्यामुळे एवढ्या वर्षांनी माझ्या डोळयांत पाणी आले. आयुष्यात काही बरेही असू शकते असे पहिल्यांदाच वाटले. आपल्या दु:खात साम्य आहे. आपण खूप होरपळून गेलो आहोत. जवळच्या माणसाचा वियोग म्हणजे काय हे तुला समजते आणि मलाही. त्यामुळे तुला अगंतुगं म्हणण्याचे धाडस करू शकले. चुकले असले तर माफ कर.'
`नाही. नाही. चुकले असे नाही. अनेक कुतूहलांपैकी हे एक वाटले. मला आता निघायला हवे.' सुप्रियानेही तिला जवळ घेतले.
`तुझ्या वडिलांची मी हत्यारीन आहे. मी कसलेच समर्थन करत नाही. फक्त वस्तुस्थिती तू जाणून घेशील अशी अपेक्षा आहे. परत कधी भेटणारही नाहीस. फक्त एकच इच्छा आहे. तुझ्या कुशीत मला मोकळेपणाने रडू दे.'
`बानो, असेे काय करतेस ? एवढी वर्षे सगळे सहन करत आलीस आणि आता काय हे ? बी करेजस. तुझ्या मुलीचे नक्की चांगले होईल. मी त्यामध्ये लक्ष देईन.'
`तुला नाही समजायचं ते.' बानोने सुप्रियाच्या छातीवर डोके ठेवले आणि मोठ्याने रडू लागली.
सगळा आसमंत दु:खाने व्यापून गेलाय असे दोघींनाही वाटू लागले आणि सुप्रियानेही आतापर्यंत दाबून ठेवलेले सर्व दु:ख मोकळे करण्यास सुरुवात केली.
बराच वेळ निघून गेला. सुप्रियाने बानोचा हात हातात घेतला. `येते.' बानोने नुसतीच मान हलवली. बाहेरचा आसमंत पूर्णपणे काळोखला होता. सुप्रियाने जडपणे खोलीबाहेर पावले टाकायला सुरुवात केली.
पंकज कुरुलकर
५०४, ठक्कर पॅलेस, जनकल्याण नगर,
मार्वेरोड समोर, मालाड (प),
मुंबई ४०००९५

viagra

jpdiwwja viagra IszZis sildenafil price >:-OOO cialis KmDbA order viagra online 9592 cialis =-] cialis luaohZ

viagra

teqeneh http://pifzpq.com/ nfukykvs [url=http://mathyf.com/]nfukykvs[/url]

mliowncd

nbalwlmp

Alcuni degli ultimi revisione

Alcuni degli ultimi revisione borsa Louis Vuitton è emblematica tela monogram con i borse louis vuitton outlet graffiti, il disordine creativo che è amato da professionisti. Queste borse sono disponibili per diverse occasioni si possono ottenere per usura ufficiali e le funzioni di casuale o di altri, come la cena e gite. Ci sono quelli più grandi che possono essere utilizzati per il viaggio. La casa di moda offre uno dei marchi del lusso leader di portafoglio louis vuitton borse in tutto il mondo. Le borse Louis Vuitton sono disponibili nei colori che potete scegliere per soddisfare la vostra attrezzatura o accessori. Ci sono tipi semplici e stampati o ricamati. Questi sono più casual e specifiche per il vestito si fondono con.

Cheap Authentic

Cheap Authentic Handbags

cheap fashion handbags

cheap handbags online

handbags,handbags sale

cheap designer

Cheap Coach Handbags

Cheap LV Handbags

Cheap Gucci Handbags

Cheap Chanel Handbags

Cheap Prada Handbags

Cheap Coach Wallets

Cheap LV Wallets

Cheap Gucci Wallets

Cheap Chanel Wallets

Cheap Burberry Wallets

Cheap LV Sunglasses

Cheap Gucci Sunglasses

Cheap Chanel Sunglasses

Cheap Prada Sunglasses

Cheap DG Sunglasses

Cheap Burberry Handbags

Cheap Chloe Handbags

Cheap Christian Audigier Handbags

Cheap G Handbags

Cheap Dior Handbags

Cheap ED Hardy Handbags

Cheap Fendi Handbags

Cheap Guess Handbags

Cheap Juicy Handbags

Cheap Polo Handbags

Cheap Versace Handbags

Cheap ED Hardy Sunglasses

Cheap Oakley Sunglasses

Cheap Versace Sunglasses

NFL steeler Authentic sonline Jerseys

Ben Roethlisberger Jersey

Hines Ward Jersey

James Harrison Jersey

Troy Polamalu Jersey

Willie Parker Jersey

Antonio Brown Jersey

Brett Keisel Jersey

Casey Hampton Jersey

Emmanuel Sanders Jersey

Franco Harris Jersey

Heath Miller Jersey

James Farrior Jersey

Jeff Reed Jersey

Jerome Bettis Jersey

Joe Greene Jersey

Lamarr Woodley Jersey

Lawrence Timmons Jersey

Limas Sweed Jersey

Lynn Swann Jersey

Maurkice Pouncey Jersey

Mewelde Moore Jersey

Mike Wallace Jersey

Rashard Mendenhall Jersey

Ryan Clark Jersey

Santonio Holmes Jersey

Terry Bradshaw Jersey

Ziggy Hood Jersey

Archie Manning jerseys

Darren Sharper jersey

Deuce McAllister jersey

Devery Henderson jersey

Drew Brees jersey

Garrett Hartley jersey

Jeremy Shockey jersey

Jonathan Vilma jersey

Lance Moore jersey

Malcolm Jenkins jersey

Marques Colston jersey

Mike Bell jersey

Patrick Robinson jersey

Pierre Thomas jersey

Reggie Bush jersey

Robert Meachem jersey

Scott Fujita jersey

Sedrick Ellis jersey

Tracy Porter jersey

Saint Super Bowl jersey

Saints Men's jersey

Saints Replica jersey

Saints Premier jersey

Saints Authentic jersey

Saints Personalized jersey

Saints Women's jersey

Saints Kid's jersey

Saints Hats