राजेश तणतणतच घरातून बाहेर पडला. बॅग एका बाजूने गरम लागत होती.
``आई, तू भाजी इतकी गरम कशाला भरते गं ?''
``तू जेवेपर्यंत गार होईल राजा'' - ``आता इतका वेळ काय काख शेकत बसू बॅगेने ?''
त्या संगीताला एकदा सणकवायला पाहिजे. त्या संतोषबरोबर नेहमी बोलते. काय तर म्हणते क्लासचं विचारायचं असतं ! मग तिकडे काय ही झक मारायला जाते ? आईला सांगितलं तर ती तिचीच बाजू घेणार. बाबा गेल्यावर तिचेच लाड. माझं काय ? तरी बरं मोठ्या दोन्ही बहिणींची लग्न झाल्येत. टेन्शन तेवढं कमी. त्या दिलीपबरोबर दिसतो संतोष कधीतरी. त्याला सांगून ह्याला एकदा खोपच्यात घ्यावा का ? तसा कधी हात वगैरे लावत नाही बहिणीला पण दम दिला तर लाईनीत राहील.
स्टेशनवर येईपर्यंत राजेशचा स्वत:शी काहीतरी संवाद होऊ शकायचा. ट्न्ॅिफकचा आवाजही त्याला चालत असे. पण एकदा का तो गाडीत बायकांच्या डब्यात शिरला की त्या बायांचे आवाज ऐकून घेत घेत तो पुरता पकून जायचा.
पोलीस ट्न्ेिंनगला होतो तेव्हा सतत बरोबर इतर गडी असायचे पण ते कधी मॅचचा स्कोअर सांगायचे, कधी इलेक्शनच्या गप्पा व्हायच्या, तरी पण आपण सारखे कुठे बोलायचो ?
इथे लेडीज कम्पार्टमेंटची ड्यूटी सुरू झाली तर बाकीचे काय पण मस्करी करायला लागले, ``वा राव ! तुमची मजा आहे आता! पण हिरोगिरी करू नका. ड्युटीवर आहात हे ध्यानात ठेवा.''
आपल्याला पण तेव्हा गुदगुल्या झाल्या. काय तरी गंमत होणार असंच वाटायचं !
गाडीत धरायचा उभा बार तसाच दारात उभा पोलीस. त्याहून जास्त आपल्याकडे कोणी बघत नाही हे पहिल्याच दिवशी कळलं!
जी ती आपल्याच नादात. आणि शिवाय बडबड ! सतत बडबड!
लेडीज बायका सतत इतक्या कशा काय बोलू शकतात ? मोबाइलवर एफएम घ्यायला पाहिजे होता. गाणी ऐकत गाड्यांच्या राऊंड केल्या असत्या.
``मला वाटलं तू दहा मिनिटं लवकर निघालीस, तेव्हा आधीच्या गाडीने गेली असशील.''
``नाही गं, वाटेत भाजी, काकडी, टोमॅटो घेतले. भाजी उद्याला, कोशिंबीर रात्री. सासूबाई आल्यात ना ! दोन्ही वेळी वेगळा स्वयंपाक करावा लागतो! ''
बांेबला ! सासरचा उद्धार म्हणजे आवडीचा विषय.
``काय सांगू गं, आमचा मंदार कसं तरी गपा गपा चार घास जेवतो आणि पळतो कॉलेजला.'' रेडिओवर आपण गाणी आवडली नाही की बदलतो तसा राजेश वेगळया गप्पांवर फोकस करू लागला.
``घरी गेल्यावर पोळया उरतात त्या बघते ना मी. मग विचारलं की राग येतो. एक आई आहे म्हणून सांगते दुसरं कोण विचारील त्याला की बाबा जेवलास का पोटभर म्हणून ?''
``उद्या आईला सोडून कुठे बाहेरगावी नोकरीची वणवण मागे लागली की आठवेल आई. चारी ठाव जेवण बनवून सकाळी रेल्वे गाठत होती तर आपल्याला किंमत नव्हती ते !''
हे बोलणं राजेशला ओळखीचं होतं, त्याने पुन्हा चॅनेल बदलला. बाहेरची धावती झाडं, झोपड्या, रस्ते, बिल्डिंग, एकीकडे कानावर येणाऱ्या गप्पा, गाडीचा वेग, तिची लय, मंद झोके या सगळयाचं मिळून एक वेगळंच मिश्रण व्हायचं आणि राजेश त्या तंद्रीतच जायचा.
``काल तू आपल्या नेहमीच्या गाडीला नव्हतीस का सकाळी आणि आजपण ?''
``अगं, गावाकडून पाहुणे आले, मग काल सुटी घेतली आणि आज थोडी उशिरा निघाले जरा जास्त जेवण बनवून. मागल्या आठवड्यात आक्का आली तर घरी थांबले होते. मग काल कामावर गेले असते तर नवऱ्याला वाटलं असतंच ना की माझी माणसं आली तेव्हा हिने सुट्टी घेतली नाही. तसा बोलत नाही तो पण तरीही...''
कुणी काही न म्हणताच काय विचार करेल याचं टेन्शन घ्यायची गरजच काय ?
``काल बघ ना गं, काय लफडं झालं. राखी आणायला जाणार तर दादा बोलला एक राखी अजून आण आणि त्या सूरजला बांध. मला इतका राग आला. कॉलेजहून निघताना आम्ही सगळे बरोबर निघतो, मग स्टेशनला उतरेपर्यंत थोडेच उरतो आणि आमच्या एरियात येईपर्यंत दोघंच. मग काय नंतर वेगळं वेगळं चालत यायचं का ? दादा नेहमी त्याला खुन्नस देतो. बाबा पण मग त्याला काल बोलले की ते फ्रेंड आहेत तर कशाला एवढा चिडतो ?''
``आपल्याला काय अक्कल नसते ? हे भाऊ लोक स्वत:ला बहिणीचा बॉडीगार्ड समजतात.''
बाहेर अंधार गडद होत चालला. संगीता आपल्याबद्दल मैत्रिणींशी असंच बोलते की काय ?
कळवा स्टेशनवर गाडी थांबली. एक माणूस टाईट होऊन मुद्दाम लेडीजसमोर उभा. पॅन्टकडे हात नेत भंकस करायला लागला. राजेश उतरला. त्याच्या दोन-तीन थोबाडीत दिल्या, गाडी हलली, तो दुसऱ्या डोअरला चढला.
बायका त्याच्याकडे कौतुकाने बघायला लागल्या. तर त्याला जरा लाजल्यासारखंच झालं.
परत राजेश डब्यातल्या मुलींची आणि मध्यस्थाने सांगितलेल्या मुलीची तुलना करू लागला. ती काय फार शिकली नाही, यांच्यासारखी स्मार्ट नसणार.
इथेच बघतो म्हटलं तर म्हणे त्यांच्या गावाकडच्या माणसांना आपल्याला बघायचंय, आपले गाववाले पण मग पुढे होणारच. परत आता दोन दिवस सुटी काढून त्यांच्या गावी जा. मग ते आपल्या गावी येणार. टाईमपास नुसता.
आईला तर मुली सांगून येतात हेच मोठं वाटतं. तिचं पण बरोबर आहे. वडिलांनी दारूपायी आयुष्य नासवले. त्यांचे आणि थोडेफार आपलेपण. पुढे आजारी पडले, त्यातच गेले. मग जास्त काय शिकणार? आपण पण नोकरीला लागलो, बाप नाही, काका गावी म्हटल्यावर काय, आता येतात त्या मुलींमध्येच पसंत करावं लागणार.
दर्शना दहावी झाली होती. आता कुठे दुकानात नोकरी करते म्हणे.
दुसऱ्या दिवशी तो संगीताबद्दल आईकडे काहीच बोलला नाही. गरम भाजी घेऊन मुकाट्याने निघाला.
परत लग्नाचाच विचार. बोलून मोकळा तरी कोणाजवळ होणार? पहिल्यापासून घरच्या परिस्थितीने हैराण. मित्र फार कधी जोडताच आले नाहीत. वडील होते तेव्हा तरी काही सांगण्याशिकवण्याएवढे शुद्धीवर कधीच नव्हते.
चुलत भावंडं, काका आपल्याहून मोठे पण त्यांना काय सल्ला विचारणार ? बायको जास्त शिकली नाही तर काय बिघडलं असंच म्हणतील. गावच्या लोकांचा विचार वेगळा पडतो.
या बायकांचं बरं आहे. बोलबोलून मनातलं ओकून टाकतात. कॉलेजच्या मुलींचाच फक्त एका वयाचा ग्रूप.
सर्व्हिसवाल्या बायका लग्न न झालेल्यांपासून केस पांढरे झालेल्यांपर्यंत सगळया एकमेकींशी बोलतात. जेवणाचे पदार्थ कसे करायचे ते विचारतात आणि असंच काहीबाही.
त्यांना कमीपणा कसा नाई वाटत विचारायला ? सरळ बोलून टाकतात की मला यातलं काही समजत नाही, माहीत नाही तर बाई तुम्ही मला सांगाल का ?
त्याच्या डिपार्टमेंटमधला गणेश राणे. त्याला दहा वर्षं सिनिअर. त्या दोघांची थोडी जास्त सलगी होती. लग्न करतोयस की नाही ? असे गणेशने त्याला विचारलंही होतं मागे. राजेशलाही तो लाईनशीर वाटे. मग एकदा मनाचा कमीपणा घेऊन तो राणेला घेऊन नाश्ता करायला हॉटेलमध्ये गेला. आपणच आपल्या लग्नाचा विषय आडून आडून काढला आणि आपला प्रॉब्लेम सांगितलाच.
``मुलगी दहावीच आहे. माझी परिस्थिती काय मजबूत नाही. पण मी डिग्री झालो, नोकरी चांगली आहे. तिचा फोटो ठीक वाटतो पण....'' राणे समजला.
``ती नोकरी करते ना ? मग नंतरही करेल की. तुझी आईपण कुठे कामाला जाते का ?''
``नाही! वडील गेल्यावर थोडे दिवस करत होती. आता मला सर्व्हिस भेटल्यावर मी तिला घरीच आराम करायला सांगितलं.''
``मग बघ तू. तुझ्या बायकोला आधीच्या कामावर जाऊ दे. नाहीतर छोटा-मोठा कोर्स करून आधीपेक्षा चांगली सर्व्हिस भेटत असेल तर तसं ठरव.''
``बाईची संसारातली हुशारीही बघायची असते. नुसतं शिक्षण, पैसा बघत राहिलास तर वय वाढेल तुझे. वेळीच लग्न केलं तर चव असते त्याची. एका पिढीत फार उडी मारता येईल याची गॅरंटी नसते. तू मुलांना मात्र शिकव हां ! आणि ते कसंपण करून जमवायचं हे ध्यानात ठेव.''
राजेशला ते पटलं. लहानपणी आपण झोपडपट्टीत राहिलो. सर्व्हिस भेटल्यावर या पक्क्या चाळीत रूम घेतली. तीही आधीपेक्षा मोठी. आताच कोणकोण त्याच्या बरोबरच सर्व्हिस जॉईन झालेले, घरासाठी लोन घेत होते. संगीताचं लग्न लावल्यावर आपणही लोन घेऊन छोटा फ्लॅट घेऊ. मुलांनाही डबल डिग्री तरी करूच.
पुढील संसाराची `अपवर्डली मोबाईल' स्वप्ने बघतच तो घरी आला. तर आईशी बाजूवाल्या मावशी बोलत होत्या.
``काय राजेश, बरीच लग्नाची घाई करतोस ? संगीताचं बघ जरा. आमची ज्योती तिच्याएवढीच असेल. तिचं पोर वर्षाचं झालं पण.''
``मग तिला करायचं तर करू दे की ! मी कुठे आडवा आलोय तिला ?'' तो हसत म्हणाला. आईने त्यांना लसूण दिली.
त्या गेल्यावर संगीताने किती तमाशा केला.
``मला अजून शिकायचंय, दादा, कॉम्प्युटर कोर्स झाला की मी सर्व्हिस करीन, मग लग्न. मला तुम्ही खड्ड्यात लोटू नका इतक्यात.''
पूर्वी राजेश तडकून कायतरी बोलला असता. आता त्याला कळलं होतं - एवढंसं बोललेलं बायका फार मनाला लावून घेतात. का ? ते या जन्मात काय कळणार नाही.
त्याने डोकं शांत ठेवलं. सॉरी बोलला. सर्व्हिसला लाग मग तुझ्याच पसंतीने लग्न ठरवू असं पक्कं सांगितलं.
संगीताला आता नवल वाटलं. दादा इतका तुसडेपणाने बोलायचा तो इतका कसा बदलला ?
आईचा मीटर सुरू झाला. मावशींनी भरवल्यासारखं झालं. संगीताने सर्व्हिस भेटल्यावर लग्न करायचं म्हणजे अजून दोन वर्षं तरी. मग आजूबाजूच्या सगळयाच तिच्या मैत्रिणींची लग्न होऊन तोपर्यंत पोरं होतील. शिवाय शिकलेल्या मुलाला शोधून खर्च किती वाढवणार? मनाचा मीटर सुरू झाला की तिच्या काळजीला काही बांधच नसायचा. संगीताला राहवलं नाही.
``आई, तू काळजी नको करू गं. जास्त खर्च मागणारी माणसं आपण बघायचीच नाहीत. आणि मी पण कमवीन ना.''
राजेशला थक्क व्हायला झालं. वडिलांपाठी आपण लवकर मोठे झालो. जबाबदारी घेतली असं तो समजत होता. आपली पाठची बहीण इतकी शहाणी कधी झाली ?
``मी आमच्या मॅडमना घरातलं सांगितलं तर तेव्हापासून त्या मला काय काय सांगतात, पेपरमधून वाचायला देतात.'' - संगीता.
``पण तू त्यांना घरातलं कशाला सांगितलं ?'' - राजेश.
``फी साठी तारीख वाढवून हवी होती.'' - संगीता.
``आणि काय काय सांगतात त्या ?''
``स्वत:चा पैसा बाईने थोडा तरी कमवायला हवा. लग्नात जास्त खर्च करू नये. व्यसन नसलेला, शिकलेला मुलगा बघ, पगार कमी असला तरी चालेल. तू पण कमव आणि एकदोनच मुलं होऊ द्यायची. नाहीतर त्यांच्याकडे नीट बघता येत नाही आणि....''
राजेश थक्क होऊन ऐकत राहिला. बायका किती बोलतात!!!
सोनाली
बी १२, सुनीता बिल्डिंग,
वर्षा सोसायटी, नौपाडा, ठाणे (प.)



Michael Vick Authentic
Michael Vick Authentic Jersey
DeSean Jackson Authentic Jersey
Nnamdi Asomugha Authentic Jersey
Brent Celek Authentic Jersey
LeSean McCoy Authentic Jersey
DeSean Jackson Jersey
Michael Vick Jersey
Nnamdi Asomugha Jersey
Brent Celek Jersey
LeSean McCoy Jersey
Asante Samuel Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Nathaniel Allen Jersey
Randall Cunningham Jersey
Reggie White Jersey
Stewart Bradley Jersey
Wes Hopkins Jersey
Dominique Rodgers-Cromartie Jersey
Customized
LaDainian Tomlinson Authentic Jersey
Darrelle Revis Authentic Jersey
Nick Mangold Authentic Jersey
Mark Sanchez Authentic Jersey
Dustin Keller Authentic Jersey
Jets Jersey
New York Jets Jersey
Cheap Jets Jersey
Antonio Cromartie Jersey
Bart Scott Jersey
Brett Favre Jersey
D'Brickashaw Ferguson Jersey
Darrelle Revis Jersey
Dennis Byrd Jersey
Dustin Keller Jersey
Dwight Lowery Jersey
Joe Klecko Jersey
Joe Namath Jersey
Kyle Wilson Jersey
LaDainian Tomlinson Jersey
Laveranues Coles Jersey
Leon Washington Jersey
Mark Gastineau Jersey
Mark Sanchez Jersey
Muhammad Wilkerson Jersey
Nick Mangold Jersey
Plaxico Burress Jersey
Santonio Holmes Jersey
Shonn Greene Jersey
Thomas Jones Jersey
Vernon Gholston Jersey
Wesley Walker Jersey