मनुष्यजात सध्या बदलत्या सांध्यावर आहे. दिवसेंदिवस आपण आपल्या पृथ्वीवर जास्त जास्त बदल करतो आहोत. औद्योगिक क्रांतीनंतर पृथ्वीवरच्या नैसर्गिक संसाधनांचा आपण अफाट वापर केला. पृथ्वीचं वातावरण आपण बदलून टाकलं. मोठ्या प्रमाणावर दूषित वायू हवेत सोडले. आपण निसर्गात ढवळाढवळ केली आणि काही जीव नष्ट करण्यापर्यंत त्यांना धोका निर्माण केला. हे असंच चालू राहिलं तर मानवजातीलासुद्धा धोका आहे. या परिस्थितीत बदल करावयाचा असला तर आपल्या राहण्याच्या पद्धतीतच बदल करावा लागेल. म्हणून म्हणायचं की आपण बदलत्या सांध्यावर आहोत. आपण नेहमीसारखं वागत राहणार की आपली जीवनशैली बदलणार हा प्रश्न आहे.
पृथ्वीवरल्या हवामानातले अनेक वर्षांमधले बदल बघितले, तर त्यात खूप चढउतार सापडतात. दहा हजार वर्षांपूर्वी शेवटचं हिमयुग होतं. त्यावेळी पृथ्वीच्या तापमानात बदल होऊ लागला. वापरासाठीची जमीन वाढली. शेती सुरू झाली. गेल्या दोनशे वर्षांत मात्र लोकसंख्या इतकी वाढली की निसर्गावर ताण येऊ लागला. पूर्वी कधीही नव्हती एवढी तापमानात वाढ झाली. याचा अर्थ आपल्या सध्याच्या जगण्याच्या पद्धतीमुळे हवामान प्रचंड प्रमाणात बदललं.
शाश्वत विकासाचा अर्थ असा की, भावी पिढ्यांनासुद्धा आपल्यासारखं जीवनमान मिळावं अशी आपली जीवनशैली ठेवणं. सध्याच्या परिस्थितीमधून तसं घडेल असं दिसत नाही. निसर्गचक्र झपाट्यानं बदलत चाललं आहे. गेल्या काही वर्षांत दुष्काळ, पूर, आगी, वादळं, यांची तीव्रता वाढली आहे. हाहाकार माजतो आहे. पूर्वीच्या ग्रंथांमध्ये पंचमहाभूतांचा उल्लेख आढळतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही पंचमहाभूतं आपल्या विरुद्ध जाऊ लागली आहेत. ती आपल्या नियंत्रणाबाहेर जातील, तेव्हा मनुष्यजातीला धोका निर्माण होईल. त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येईल का? या लेखात मी पर्यावरणाच्या काही प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे.
पृथ्वी
पृथ्वी आपल्याला पायाखालची जमीन देते. घर बांधायला दगड देते. शेतीसाठी माती देते. आपली संस्कृती शेतीभोवतीच निर्माण होते. आपल्या पूर्वजांनी अनेक प्रकारच्या धान्याची शेती केली. पण गेल्या काही वर्षांंत मात्र आपण हायब्रीड पिकांना जन्म दिला. अन्नधान्याचं उत्पादन वाढावं म्हणून सुधारित बियाणं वापरू लागलो. पूर्वी आपलं अन्न जिथे उगवायचं तिथेच वापरलं जायचं. पण आता जागतिकीकरणामुळे अन्न जगाच्या दुसऱ्या टोकाला नेलं जातं. उदा. इंग्लंडमध्ये जी सफरचंद खाल्ली जातात ती न्यूझीलंडहून येतात.
भारतात वापरलं जाणारं सोयाबीन ब्राझीलमधून येतं आणि अमेरिकेत वापरलं जाणारं पामऑईल मलेशियातून येतं. एवढ्या अंतरावर अन्न न्यायचं तर त्यावर प्रक्रिया करावी लागते. तरच ते चांगलं राहतं. यामुळे असं झालं की आपल्या मातीशी आपलं नातं राहिलं नाही. आपण जे वापरतो, ते मुळात कुठून येतं हे आपल्याला माहीत नसतं. वस्तूंचा वापर बेसुमार वाढला.अन्नाची मागणी वाढली. अधिक जमीन शेतीखाली आणावी लागली. त्यासाठी पृथ्वीवरची जंगलं नाहीशी झाली. खतं आणि किटकनाशकं वापरून जमिनीचा कस कमी झाला. जगाचं रूपच बदलून टाकलं.
हा प्रवाह उलटा वळवता येईल का? जगभर हा प्रश्न विचारला जातो आहे. काही ठिकाणी याचं उत्तरही शोधलं जात आहे. काही लोक आग्रहानं स्थानिक अन्नधान्यच वापरतात. जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत अन्न न्यायचं तर किती ऊर्जा खर्च होते, त्यानं अन्नाची किंमत किती वाढते? याचाही विचार होऊ लागला आहे. अनेक देशांत सेंद्रिय शेतीची चळवळ वाढू लागली आहे. उदाहरणार्थ, इंग्लंडमध्ये विक्रेते स्थानिक, सेंद्रिय पालेभाज्यांच्या टोपल्यांचा पुरवठा करू लागले आहेत. शेतीविषयक धोरणं ठरवणारे लोक वेगळा विचार करत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर थोडं जंगल राखण्यासाठी उत्तेजन दिलं जात आहे. मानवाखेरीज इतर जीवांना जगण्यासाठी सोय ठेवायला हवी हा विचार रुजतो आहे. बदल घडतो आहे, पण त्याचा वेग पुरेसा नाही. जागतिक अर्थशास्त्र आयात-निर्यातीवर अवलंबून आहे. त्यामुळे धोरणं ठरवणाऱ्यांना ती बदलायची इच्छा नाही. आपल्या विचारात आमूलाग्र बदल करायला हवा आहे. ताबडतोबीच्या समृद्धीकडे न पाहता शाश्वत विकासाचा विचार व्हायला हवा आणि फार उशीर होण्याआधी तो विचार कृतीत यायला हवा.
पाणी
सर्वच जीवांना पाणी आवश्यक आहे. शेतीसाठी पाणी लागतं. पाण्यापासून ऊर्जा निर्माण होते. त्यावर कारखाने चालतात. आपलं संपूर्ण जीवन पाण्यावर अवलंबून आहे. नदीकाठी प्राचीन संस्कृती उदयाला आल्या. मेसापोटेमिया, सिंधु, गंगा या नद्यांनी मोठ्या लोकसंख्येला आसरा दिला. कालांतरानं लोकसंख्या वाढली. आणि नदीच्या खोऱ्यापासून लांबवर वस्ती करावी लागली. परिणाम असा झाला की पाणी साठवण्याची सोय करावी लागली. पाणी वाहून नेण्याची गरज भासू लागली. पाण्याचे मोठे साठे करून ठेवावे लागले. धरणं झाली. कालवे झाले. या सगळयामुळे दोन प्रकारे बदल झाले. ज्या भागात पाणी नव्हतं, तिथे पाणी आलं. आणि जिथे ते विपुल प्रमाणात होतं, तिथून ते दुसरीकडे नेण्यात आलं. यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. आपण निसर्गाच्या विरुद्ध जाऊन पूर्वी ज्या भागात काही पिकत नव्हतंं तिथे पिक घेऊ लागलो. पूर्वी पावसाच्या नैसर्गिक पाण्यावर आपण अवलंबून होतो, आता मात्र कुठेही, कोणतीही पिकं आपण घेऊ शकतो आहोत. नैसर्गिक जलचक्र आपण विस्कळीत केलं त्यामुळे पावसाचं प्रमाण बदललं, पूर आणि दुष्काळ वाढले.
यात बदल कसे करता येतील? शेतीचा पुनर्विचार केला तर पाण्याच्या वापराविषयीही नवा विचार करता येईल. त्या त्या ठिकाणच्या पाण्यावर जी पिकं येतात तीच घेतली गेली पाहिजेत. पाणी साठवण्याची सोय असावी पण प्रचंड प्रमाणात पाणी साठवणं आणि कालव्यांचं जाळं बांधून काढणं यांची गरज नाही. छोटे तलाव जागोजागी विखुरलेले असणं याची गरज आहे. छोटे बंधारे जरूर करावेत पण मोठी धरणं बांधू नयेत. यातूनच पूर आणि दुष्काळ यांना आळा बसेल. पाण्याचं व्यवस्थापन अतिशय काळजीपूर्वक करण्याची जरुरी आहे.
तेज (अग्नी)
अग्नी आपल्याला ऊर्जा देतो. अन्न शिजवण्यासाठी आणि उबेसाठी अग्नी लागतो. नैसर्गिकपणे आग लागू शकते. पृथ्वीच्या काही भागात आगी लागणं हा नैसर्गिक चक्राचा भाग आहे. आदिमानवाच्या काळापासून माणसाला अग्नीचा उपयोग माहिती होता. वैदिक संस्कृतीत अग्निपूजा होत असे. अग्नीची काळजी घेतली तर अग्नी आवश्यक ती ऊर्जा पुरवतो हे माणसानं ओळखलं होतं. अलीकडे आपण ऊर्जेसाठी इतर मार्ग शोधले. खनिज तेलं, कोळसा, पाण्यापासून ऊर्जा, अणुऊर्जा इ. आणि तरीदेखील मोठी लोकसंख्या लाकूड जाळण्यावरच अवलंबून आहे. विकसनशील देशात ग्रामीण जनतेला रोजचं अन्न शिजवायला लाकूडफाटाच लागतो. लाकूड हे ऊर्जेचं शाश्वत संसाधन आहे. ते पुन्हा पुन्हा वाढवता येतं. खनिज तेलासारखी त्याची परिस्थिती नाही. खनिज तेलांचे साठे मर्यादित आहेत. झाडांना वाढायला पुरेसा वेळ दिला तर पुन्हा पुन्हा लाकूड मिळत राहातं. भविष्यात या संसाधनांवर आपल्याला अवलंबून राहता येईल. सूर्यशक्तीदेखील आपण अद्याप वापरलेली नाही. सौरऊर्जा जवळजवळ सगळीकडे उपलब्ध आहे आणि वर्षभर मिळू शकते. ती वापरून घरांसाठी, उद्योगांसाठी, वाहनांसाठी वीज मिळू शकेल आणि पृथ्वीचा विनाशही टळेल.
जंगलात लागणाऱ्या आगी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. जागतिक तापमानवाढीमुळे अनेक ठिकाणचं तापमान वाढलं आहे. आणि कोरडेपणाचा कालावधी वाढला आहे. याचा अर्थ असा की आगी नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. मोठा भूभाग भस्मसात करू शकतात, त्यांच्या वाटेत येणाऱ्या मानवी वस्त्या खाक करू शकतात. साधं सिगरेटचं थोटुक निष्काळजीपणे फेकलं आणि त्यातून मोठ्या आगी लागल्या, पसरत गेल्या असंही झालेलं आहे. अग्नीवर काळजीपूर्वक नियंत्रण ठेवावंच लागेल. तसं झालं नाही तर अग्नी आपला शत्रू होऊ शकतो आणि प्रचंड नुकसान करू शकतो.
वायू
पृथ्वीवरचं तापमान योग्य राखण्यासाठी वाऱ्याची गरज असते. याशिवाय वाऱ्यापासून ऊर्जा मिळते. पृथ्वीवरच्या बहुतेक जीवांना श्वसनासाठी प्राणवायू लागतो. पृथ्वीवरच्या वायूंचं संतुलन जीवनासाठी आवश्यक आहे. आपण आपल्याच कृतींमुळे वायूंचं संतुलन बिघडवलं आहे. प्रमाणापेक्षा जास्त कर्बवायू आपण हवेत सोडला. प्रदूषण वाढलं. त्याचा त्रास होऊ लागला. प्रदूषित हवा श्वसनावाटे शरीरात घेतल्यामुळे शरीराचं संतुलन बिघडलं. वातावरणात आपण जेवढा कर्बवायू सध्या सोडतो आहोत त्याचं प्रमाण कमी करण्याची गरज आहे. कारखान्यांमधून सोडल्या जाणाऱ्या दूषित वायूंवर नियंत्रण ठेवायला हवं. जेवढी विमानं आज उडत आहेत त्यांचं प्रमाण कमी करायला हवं. कारण विमानं प्रचंड प्रमाणात कार्बन हवेत सोडतात. गुरांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली तर हवेत सोडल्या जाणाऱ्या मिथेन वायूचं प्रमाण वाढतं. त्यावरही नियंत्रण हवं. या सगळयाचा अर्थ असा होतो, की आपली जीवनशैली आपण बदलली पाहिजे. उद्योग, वाहतूक आणि अन्न या तिन्हीचाही पुनर्विचार करण्याची गरज आहे.
पृथ्वीभोवती काही वारे वाहात असतात. त्यांच्यामुळे वातावरण बनतं. पृथ्वीवरचा ७०% भाग समुद्रानं व्यापलेला आहे त्यामुळे हे वारे निर्माण होतात. जमीन आणि समुद्र यांच्या प्रमाणातल्या फरकामुळे पृथ्वीवरच्या वातावरणाचे प्रकार तयार होतात. या वातावरणाच्या प्रकारांची पृथ्वीवरच्या जीवांना सवय झालेली असते. त्याप्रकारे त्यांची उत्क्रांती झालेली असते. आपल्या कृतीमुळे समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान वाढलं आहे. जमिनीवर वाळवंटं निर्माण झाली आहेत.ती उजाड झाली आहेत. वातावरणातल्या विविध वायूंची प्रमाणं बदलली आहेत. यामुळे अनैसर्गिक गोष्टी घडू लागल्या आहेत. उदा. वादळं, वावटळी, अॅसिड रेन्स. अशा घटना पुन्हा पुन्हा आपल्याला इशारे देत आहेत की आपण आपल्या कृतींमध्ये बदल घडवला पाहिजे. आपल्या कृतीचा परिणाम आपण ज्या भूभागावर राहतो, त्याच्यापुरताच मर्यादित नसतो, तर पृथ्वीच्या इतर भागांवरही तो परिणाम होतो, जलचक्रावर होतो, तापमानावर होतो, आर्द्रता कमी होण्यावर होतो. आणि सर्वात महत्त्वाचा परिणाम वातावरणावर होतो. त्याचा आपण अनुभव घेत आहोत.
अवकाश
अवकाश दिसत नाही पण त्याचं अस्तित्व सगळीकडे असतं. त्याच्यावर पृथ्वीचं आरोग्य अवलंबून असतं. पृथ्वीवरचे रहिवासी म्हणून या सर्वव्यापी अवकाशाचा सन्मान राखणे ही आपली जबाबदारी आहे. हा सन्मान आपल्या दृष्टिकोनातून, कृतीतून आपल्या वृत्तीतून दिसायला हवा. आपलं पर्यावरणाबद्दलचं तत्त्वज्ञान काय आहे याचीच आता परीक्षा आहे. आपल्याला दरवर्षी वाढत जाणारी अल्पायुषी आर्थिक समृद्धी हवी आहे (असं आपल्याला आपले राजकारणी पटवून देत असतात) की आपल्या भावी पिढ्यांचा विचार आपल्या डोळयांसमोर आहे? येनकेन प्रकारेण आपल्याला आपल्या शेतीतून जास्तीतजास्त उत्पादन काढायचं आहे की आपण अन्न वाया जाऊ नये आणि त्याचं वितरण व्यवस्थित व्हावं याकडेही लक्ष देणार आहोत? आपल्याला ज्यांचा वरवर पाहता उपयोग नाही,
अशा जीवांकडे आपण दुर्लक्ष करणार आहोत की आपल्याएवढाच त्यांनाही जगण्याचा हक्क आहे या गोष्टीचा आग्रह धरणार आहोत? हे वाचताना आपल्याला असं वाटेल की याची उत्तरं तर उघड आहेत. पण खरं पाहता हे प्रश्नच कठीण आहेत.
ताबडतोबीनं या प्रश्नांची उत्तरं शोधायलाच लागतील. गांधीजींचा भर स्थानिक विकासावर होता. जागतिकीकरणावर नव्हता याचा अर्थ कळू शकतो. त्यांच्या स्वावलंबन, अहिंसा आणि असंग्रह या व्रतांमध्ये आजच्या पर्यावरणाची उत्तरं आपल्याला शोधायला लागतील. आपल्या समाजानं स्थानिक संसाधनांवर भर द्यायला हवा, अन्नाच्या अवास्तव वाढलेल्या गरजा कमी केल्या पाहिजेत आणि शाकाहारावर भर दिला पाहिजे. मांस निर्माण करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वापरावी लागते आणि मोठ्या प्रमाणावर प्रदूषणही वाढतं. आपण चंगळवाद नाकारायला शिकलं पाहिजे. या सर्व वरवर पाहता छोट्या कृती वाटतील, पण त्यांच्यामुळे जो बदल घडून येईल तो फार मोठा असेल.
तात्पर्य
पर्यावरणाच्या ज्या समस्या आपल्याला भेडसावत आहेत, त्यांना उत्तर म्हणून अनेक माणसं आपली जीवनशैली बदलत आहेत. सेंद्रिय शेती लोकप्रिय होत आहे. शेतकऱ्यांना तसं प्रोत्साहन मिळत आहे.सेंद्रिय उत्पादनांना बाजारात योग्य किमती मिळतील अशीही व्यवस्था होते आहे. ज्या शेतांमध्ये सेंद्रिय शेती होते त्यांना बक्षिसं, शिफारसपत्र देण्याची व्यवस्था होते आहे. माणसानं कब्जा केलेल्या भूभागावर इतर प्राण्यांनी, जीवांनीही घरं बांधावीत यासाठी शेतकऱ्यांनी शेताच्या काही भागात जंगलं ठेवावीत यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. कारण जंगलाचा झालेला नाश ही काळजीची गोष्ट आहे. सेंद्रिय पद्धतीनं शेती करायची तर उत्पादनात घट होते, त्यामुळे किंमत वाढते. यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा तोटा भरून काढण्यासाठी मोबदला द्यावा लागतो. संख्येनं कमी असतील पण असेही काही लोक आहेत की जे स्वत:च्या परसातच स्वत:च्या गरजेपुरता भाजीपाला, धान्य निर्माण करतात आणि ते लांबून आणायला नकार देतात. काही लोक स्वत:ला लागणारी वीज सौरऊर्जा वापरून, पवनचक्क्या वापरून निर्माण करतात. आपल्या कृतींनी पृथ्वीचं नुकसान होऊ नये आणि भावी पिढ्यांना पुरेशी संसाधनं मिळावीत याची ते काळजी घेत आहेत.
अनेक लोकांच्या अशा छोट्या कृतींनीदेखील मोठे बदल घडतील. नष्ट झालेली जंगलं पुन्हा वाढवता येतील. इतर जीवसृष्टीला वाढण्यासाठी सुयोग्य वातावरण निर्माण होईल. जलचक्र पुन्हा सुधारता येईल. जागतिक तापमानवाढीची दिशा अजून उलटी वळवता येईल. अधिक भूभाग हिरवा करून अग्नीवर नियंत्रण ठेवता येईल. ऊर्जेच्या शाश्वत उपलब्धतेसाठी अधिकाधिक झाडं वाढवता येतील. प्रदूषणाला आळा घालता येईल. आपल्या पर्यावरणीय धोरणांचा पुनर्विचार करता येईल. शाश्वत विकासाकडे नेणारी जीवनशैली अंगीकारता येईल. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाशाचं शोषण आपल्याला थांबवता येईल.
आणखी एका प्रवादाचा उल्लेख करायलाच हवा. जेम्स लव्हलॉक यांनी १९८०मध्ये गाया नावाचा हायपोथिसिस मांडला होता. त्या कल्पनेप्रमाणे पृथ्वी ही देखील एक जिवंत वस्तू आहे. स्वत:चं भलंबुरं पृथ्वीला स्वत:ला कळतं. अगदी भलतंसलतं पृथ्वी होऊ देणार नाही. मानवाला किंवा कुठल्याही प्राण्याला करू देणार नाही. पृथ्वीचं स्वत:चं जीवनचक्र आहे. त्या जीवनचक्राप्रमाणे फार उष्णता वाढली की गारवा निर्माण होईलच. आणि फार गारवा निर्माण झाला की उष्णता निर्माण होईलच. थोडक्यात काळजीचं कारण नाही. या विधानामुळे फार मोठ्या गैरसमजुती निर्माण झाल्या. काहीच करण्याची गरज नाही असं काहींना वाटू लागलं. मूळ मुद्दा असा आहे की पृथ्वीचं जीवनचक्र १०,००० वर्षांचं आहे. आणि मानवाच्या एका पिढीचं आयुष्य १०० वर्षांचं आहे. सगळं आपोआप दुरुस्त होणार असलं तरी तोपर्यंतच्या मानवी पिढ्यांची काय अवस्था होईल? त्यांचा बचाव करण्यासाठी पर्यावरणवाद्यांचे सगळे सल्ले, त्यांनी सांगतिलेले उपाय अमलात आणण्याला पर्यांय नाही.
डॉ. शोनील भागवत
Posted in



viagra
kiauym http://verlgh.com/ kjxnhrb [url=http://wglkqz.com/]kjxnhrb[/url]
vQByaGgwOTEfUYVyBQp
buy tramadol online no prescription - tramadol buy online
AtmZcTTrXOYxIxfM
tramadol discount - tramadol online pharmacy
HTRPnkEfAvJiZEzLO
buy valium no prescription - Purchase valium overnight delivery
ZUTnSuWRJs
buy valium online - valium without prescription
rXAAMyLcmtyVbYmPQ
tramadol online no prescription - tramadol overnight
YwWGdTUHtpzXCB
Canadian generic valium - buy valium online
xuxTxzLDMxh
Generic valium overnight - Purchase valium overnight delivery
kcFamuuGcjQ
tramadol 100mg online - buy tramadol online
WGtAmiVcWUXhxoQnt
buy xanax no prescription - Buy cheap online xanax
rLsaThzEuSYpHnTm
Best ambien price - ambien online no prescription
UnyqkzsZESFHne
Cheap ambien without a prescription - Cheap ambien usa
iejwuoIiisQce
Cheap canadian xanax - online xanax
VLCUgqsRbIvKomgqY
order xanax - discount xanax
gEcjbJVVgv
Buy xanax uk - Cost xanax online
vFcZcBSWTtTmXwID
Purchase overnight xanax
NujUyAyRwvIJpXzhff
order xanax xr
kuZzEVZSebQcioR
xanax - xanax order
bTdUllByJAXlZsu
Buy cheap online xanax - Discount xanax online
CZGapXcTdxoCIl
ambien lowest price - cheap ambien online
zvFyiuzOvKhOzNeUMFN
online klonopin - generic klonopin online
iwXHNgUJVDFhGKcVWc
order cheap xanax - Buy cheap online xanax
bZlhJCxsIBqgcZNb
ambien no prescriptions - ambien to buy
asYbEoYCSmdvKx
klonopin online canada - klonopin no prescriptions
TxYZWbVRxaywFOIyE
cheap xanax online - Low price xanax
uPXUbpjgIcilzhfAsaA
Cheap xanax now - xanax
fugSRDeqDYqSjyfq
cheap klonopin online - klonopin buy online
yPItKQABNIIlp
ambien to buy - Canadian generic ambien
czOGnyfzHjPmOYth
valium buy online - online valium
DAuydOzRAC
ambien online no prescription - purchase ambien
bUMPvbInMQYuvc
Generic ambien overnight - cheap ambien online
LxeZIurgAdAqRfo
valium buy - Buy valium online canada
NBIvDvAmjsVgeJrBt
Purchase xanax overnight delivery - xanax buy
PsBxHOmmhrSOjHqp
purchase ambien - Buy cheap online ambien
XyvMAtelRAulI
buy cialis online - purchase cialis
fxdURQbOmnuJVNY
buy cheap valium - Buy valium online usa
HYqEEXNuAMhYk
tramadol cheap - buy cheap tramadol
LBfKrEeMlPMGShyc
valium to buy - generic valium online
WSkeoLBOaaiKcTlS
buy cialis - order cheap cialis
jVrGPnuyXtwxrzChnc
discount adderall without rx - adderall generic without rx
WdwoBUzbWynitwa
buy viagra - viagra no prescription cheap
ZdgroTUiTFRtnZfriqT
ambien buy online - ambien online order
yJLvSeqhnDvO
tramadol cheap - tramadol online no prescription
gzrpbPUrGgvtLDMvoAG
viagra generic - without a rx generic viagra
sHjPaVwMcSBD
ambien delivered overnight - Buy ambien online usa
SAiKPXGDLzlNATQCrf
online tramadol - tramadol buy online
HVvXfhCZpPfYtQIb
viagra generic - online buy generic viagra
XJZmXakYKWqpb
buy soma no prescription - order soma online no prescription
fqgkHMIASC
xanax no rx - xanax overnight shipping
fzzlMlKwFEZ
order ambien - Buy ambien uk