Skip to main content

नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन

नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन ह्याचा ढोबळमानाने अर्थ माझ्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा संयमित वापर असा आहे. आपण प्राणिशास्त्राचे अथवा वनस्पतिशास्त्राचे अभ्यासक असाल किंवा गडकिल्ल्यांवर भटकंती करणारे असाल किंवा पक्षीनिरीक्षणाचा छंद बाळगून असाल तर अभयारण्ये, राष्ट्नीय उद्याने, औषधी वनस्पती संवर्धन क्षेत्रे अशा सरकारी पातळीवरून होणाऱ्या निसर्गसंवर्धनाच्या प्रयत्नांशी परिचित असाल. लोकांच्या पुढाकाराने राखल्या गेलेल्या देवराया, देवतळयांविषयीही आपण थोडेफार परिचित असाल. ह्याशिवाय वैयक्तिक पातळीवरील संवर्धन प्रयत्नांबद्दलही आपल्याला थोडीशी माहिती असेल. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या हौसेसाठी पिकांचे दुर्मिळ वाण टिकवून ठेवले आहेत. पेट्नेल, डिझेलसारख्या इंधनांचा आणि वीजेचा संयमित वापर; पाणी अडवा, पाणी जिरवा; मातीची धूप रोखणे, सेंद्रिय शेती हेसुद्धा निसर्ग संवर्धनाचेच भाग आहेत. जगभरातील सर्व देशांत कमी अधिक प्रमाणात असे निसर्ग संवर्धनाचे प्रयत्न आढळून येतात.
माझा परदेशवारीचा अनुभव मॉन्टि्न्यल, कोलंबो आणि पललंपूर एवढाच मर्यादित आहे. ह्या तीनही ठिकाणी भेटी देण्याचे एकमेव कारण आंतरराष्ट्नीय पातळीवरील जैवविविधता संवर्धनाबाबतीत वेगवेगळया देशांची धोरणे आणि नीती ह्यांचे संशोधन हे होते.
प्रगत राष्ट्नंची काही लक्षणे म्हणजे दैनंदिन उपजीविकेसाठी केवळ निसर्गावर अवलंबून अशा लोकसंख्येचे तुरळक प्रमाण, बहुतांशी शहरी लोकसंख्या, सर्वदूर पोहोचलेले तंत्रज्ञान आणि परिणामत: छोट्या छोट्या बाबतीतही यांत्रिकीकरण. ढोबळमानाने असे म्हणता येते की, एखादे राष्ट्न् जितके अधिक प्रगत तितका त्या राष्ट्नचा निसर्गसंवर्धनातील वाटा कमी. म्हणजे राष्ट्नची प्रगती आणि निसर्गसंवर्धन यांचे व्यस्त नाते असते. अमेरिका, क्रॅनडा, पूर्वेकडील काही अपवाद वगळता युरोपातील बहुतांशी राष्ट्न्े, अस्ट्न्ेिलॉया, न्यूझिलंड आणि जपानमध्ये गेल्यावर तिथे असणारे रस्त्यांचे प्रचंड जाळे, वाहतुकीची वैयक्तिक साधने, वातानुकुलित घरे आणि इमारती ह्या सर्वांमुळे अचंबित होतो. ह्यात भर घालतो तिथला आखीव-रेखीव निसर्ग. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी झाडे, वेगवगळया ऋतूंमधील त्यांच्या मोहक रूपांमुळे येणारी शोभा, ठिकठिकाणी असणारी फुलझाडांची मोहक बेटे ह्या सर्वांना आपल्या नकळत आपण दाद देतो. भारतात हे दृश्य सार्वत्रिक का नाही ह्याची खंत आपल्याला वाटते. आपणही प्रगत राष्ट्नंस भेट दिली असेल आणि त्यावेळी असा विचार केला असाल तर वाचकहो, सावधान ! संतवचन आहे; काय भुललासी वरलिया रंगा. प्रगत राष्ट्नंतील उंचावलेले राहणीमान निसर्गसंवर्धनदृष्ट्या संयुक्तिक नाही. क्लायमेट चेंजसाठी कारणीभूत असणाऱ्या वायूंच्या उत्सर्जनातील ७०% वाटा प्रगत राष्ट्नंचा आहे. ही केवळ तोेंडदेखली माहिती नाही तर तसे अभ्यास उपलब्ध आहेत.
निसर्ग संवर्धन म्हणजे आज सुखासीनतेचा त्याग करून भविष्यासाठी तरतूद करून ठेवणे. कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात उतरण्यापूर्वी त्याबद्दलची जाणीव निर्माण होणे हे महत्त्वाचे असते. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाच्याबाबतीतही हे लागू आहे. जाणीव असेल की कृती होते हे गृहितक आणि जाणीव असूनही कृतीत उतरवणे अवघड जातंय हे वास्तव असे मजेदार मिश्रण परदेशवाऱ्यांतून पाहायला मिळाले. अजून एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे निसर्ग संवर्धन कृतीत उतरवण्याला आर्थिक, सामाजिक महत्त्वाकांक्षा आणि हितसंंबंध आड येतात.
ऑक्टोबर २००४च्या माझ्या मॉन्टि्न्यल वास्तव्यादरम्यान एका महत्त्वाच्या खटल्याचा निकाल क्रॅनडातील सर्वोच्च न्यायालयाने दिला. आर्थिक हितसंबंध आणि पर्यावरणाची काळजी ह्यासंबंधातील हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. २००४ मध्ये पर्सी श्यायजर ह्या शेतकऱ्याचे मोनसॅन्टो ह्या बहुराष्ट्नीय कंपनीसोबतचे भांडण मोठे गाजत होते. पर्सी श्यायजर हा क्रॅनोला(मोहोरीसारखे तेलबियांचे पीक) उत्पादक शेतकरी आहे. त्याने सर्वसाधारण वाण लावून क्रॅनोला उत्पादन करणे आजही चालू ठेवले आहे. मोनसॅन्टो कंपनीने जनुकात बदल केलेला क्रॅनोलाचा वाण मोठ्या प्रमाणावर प्रसारित केला आहे. पर्सी श्यायजरच्या आजूबाजूचे सर्व शेतकरी मोनसॅन्टाने प्रसारित केलेला जनुकीय बदल केलेला वाण वापरत आहेत. ह्या वाणावर मोनसॅन्टोचा नोंदणीकृत अधिकार आहे. झालं काय की मोनसॅन्टोच्या अधिकाऱ्यांना तपासणीत असे आढळून आले की पर्सी श्यायशरच्या शेतातही त्यांच्या नोंदणीकृत वाणाची झाडे उभी होती. पर्सी श्यायजरनी मोनसॅन्टोचे बियाणे खरेदी केले नव्हते. त्यामुळे त्याच्या शेतात नोंदणीकृत वाणाची झाडे सापडणे म्हणजे काहीतरी गडबड होती. मोनसॅन्टोचे उत्पन्न बुडवून, फसवणूक करून श्यायजरनी लागवड केली असा आरोप केला गेला. ह्याची सुनावणी पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. श्यायजरचे म्हणणे होते की आजूबाजूचे सर्व शेतकरी जनुकीय सुधारणा केलेला वाण वापरत असल्यामुळे पर्सी श्यायजरच्या शेतातही काही झाडे नैसर्गिकरित्या येणे हे क्रॅनोलाच्या बाबतीत पूर्णपणे शक्य आहे. दुर्दैवाने ह्या प्रकरणाचा निकाल श्यायजरच्या विरुद्ध लागला. एकंदरीतच ह्या प्रकरणाबद्दल अनेक उलटसुलट मतप्रवाह आहेत. जागतिक पातळीवर जनुकीय सुधारणा केलेल्या पिकांच्या वाणांच्या विरोधात पर्यावरणप्रेमींची अनेक आंदोलने सुरू आहेत. जनुकीय सुधारणा केलेले पिकांचे वाण जोपर्यंत त्यापासून असणारे धोके चांगल्या तऱ्हेने लक्षात येत नाहीत तोपर्यंत प्रसारित करू नयेत असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. मोनसॅन्टोची जनुकीय सुधारणा केलेले पिकांचे वाण संशोधित करण्यासाठीची आर्थिक गुंतवणूक निश्चितच महत्त्वाची आहे. पण पर्यावरणाची दुरुस्त न होणारी हानी त्याहीपेक्षा महत्त्वाची आहे. जागतिक पातळीवर आर्थिक हित आधी की निसर्ग संवर्धन आधी ह्यात बहुतांशी वेळेला निसर्ग संवर्धनाला दुर्दैवाने माघार घ्यावी लागते.
जाणीव असेल की कृती होते ह्या गृहितकाची अंमलबजावणी वैयक्तिक पातळीवर प्रभावीपणे होताना दिसते. खाजगी वाहनांचा वापर जेवढा अधिक तेवढे प्रदूषणही अधिक. त्यामुळे खाजगी वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणे हे पर्यावरणाबद्दलच्या जागरूकतेचे एक लक्षण आहे. क्रॅनडात मॉन्टि्न्यलमध्ये क्रॅथी आणि ब्रेन्डेनकडे मी राहत होतो. क्रॅथी पेशाने वकील आहे. ती एका वकिली सल्लागार संस्थेची कर्मचारी आहे. गेली अनेक वर्षे ती मॉन्टि्न्यलची रहिवासी आहे. स्वत:च्या घरापासून तिचे नोकरीचे ठिकाण अंदाजे तीस किलोमीटर म्हणजे पुण्याहून सासवड इतके दूर आहे. स्वत:च्या मोटारीने रोज कामाच्या ठिकाणी जाणे ह्यात तिच्यासाठी विशेष काही नाही. खरंतर सोयीचा विचार करता, मोटारीने जाणेच तिच्यासाठी सर्वात सोयीचे आहे. क्रॅथीचा नवरा ब्रेन्डेन विद्यापीठात भाषाशास्त्राचा प्राध्यापक आहे. ब्रेन्डेनलाही मोटारीने जाणे सोयीचे आहे. दोघांची कामाची ठिकाणे शहराच्या दोन वेगवेगळया टोकांना आहेत. आपल्या परिचितांमध्ये जरा चौकशी करा किंवा तुमचा स्वानुभवही असेल. क्रॅनडासारख्या प्रगत राष्ट्नंतील क्रॅथी आणि ब्रेन्डेनच्या ह्या उदाहरणात दोघांच्या दोन मोटारी असणे ह्यात विशेष काहीच नाही. परंतु क्रॅथी आणि ब्रेन्डेन दोघेही स्वेच्छेने मॉन्टि्न्यलच्या भुयारी रेल्वेचा वापर करतात. मॉन्टि्न्यलमध्ये जाण्याचे मुख्य कारण मारीसोबतचा एक संशोधन प्रकल्प होता. मारीही पेशाने वकील आहे. तीही मॉन्टि्न्यल रहिवासी आहे. एका पर्यावरण विषयक आंतरराष्ट्नीय संस्थेत ती सल्लागार आहे. मारीचा नवरा डॅनचे कामाचे
ठकाणही शहराच्या बाहेर आहे. क्रॅथी आणि ब्रेन्डेनच्या उदाहरणाप्रमाणेच, मारी आणि डॅनही शक्यतोवर मॉन्टि्न्यलच्या सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करतात.
आर्थिक आणि सामाजिक महत्त्वाकांक्षांमुळे निसर्ग संवर्धनाबद्दल जाणीव असूनही त्यादृष्टीने पावले उचलणे अवघड जातंय हे वास्तव ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मलेशियातील हिजाम आणि श्रीलंकेतील नंबी हे माझे परिचित. आताआता एप्रिल २००८ मध्ये माझी हिजामशी ओळख झाली. तो पललंपूर (मलेशिया) विद्यापीठात संशोधक आहे. शहरातील राहत्या ठिकाणापासून ते शहराबाहेरील विद्यापीठापर्यंतचा रोजचा प्रवास काही दिवसांपूर्वी दुचाकीने करायचा. आता अर्थिक स्थिती उत्तम झाल्यामुळे शक्यतो स्वत:च्या मोटारीनेच प्रवास करतो. सामाजिकरित्या मोटारीने प्रवास करणे हे त्याच्यासंदर्भात चांगल्या आर्थिक स्थितीचे आणि उच्च मध्यमवर्गीयपणाचे निदर्शक आहे. गेल्या दहा वर्षांपासूनचे त्याचे स्वप्न नुकतेच साकार झाले आहे आणि त्याचा पुरेपूर आनंद त्याने घ्यायचे ठरवले आहे. कोलंबोतील पहिल्या चार पाच दिवसांनंतर नंबी माझा चांगला परिचित झाला होता. मी राहत होतो त्या हॉटेलच्या स्वागत कक्षात तो अर्धवेळ काम करत होता. खरंतर तो हॉटेल मॅनेजमेंटचा पदविकाधारक होता आणि पदवीचे शिक्षण घेत होता. घरची पार्श्वभूमी पूर्णत: शेतीची होती. नंबीच्या भाषेत सांगायचे तर कोलंबोमध्ये तो आयुष्य घडविण्यासाठी आला होता. नुकतीच त्याने एक दुचाकी विकत घेतली होती. एकदम नवी नव्हती, थोडीशी वापरलेलीच होती. अनुभव घेताना पदवी शिक्षण पूर्ण करायचे आणि त्यानंतर गल्फमध्ये जाऊन खूप पैसा कमवायचा हे त्याचे साधेसरळ स्वप्न होते. कोलंबोपासून थोड्या दूर असणाऱ्या आपल्या आई-वडिलांना म्हातारकाळी तरी शहरात येताना मोटारीने आणीन ही नंबीची जिद्द आहे.
प्रथमदर्शनी असे वाटते की क्रॅनडातील आपली मित्रमंडळी निसर्ग संवर्धनाच्या बाबतीत मलेशियातील आणि श्रीलंकेतील मित्रमंडळींपेक्षा अधिक जागरूक आहेत. पण सरसकट असे म्हणणे किंवा तुलना करणे योग्य नाही. ह्याला थोडा ऐतिहासिक संदर्भ आहे. मनुष्याची वाटचाल नेहमी सुखासीनतेकडे असते. सर्वांची रोजची धडपड ही सद्यस्थितीपेक्षा अधिक सुखासीनता कशी मिळेल ह्यासाठी असते. प्रगत राष्ट्नंतील बहुसंख्य नागरिकांना ही सुखासीनता मिळून बराच काळ लोटलाय. प्रगतीशील राष्ट्नंना प्रगत राष्ट्नतील सुखासीनता आताशिक कुठे दिसू लागली आहे. गरीब राष्ट्नंना अजून पुष्कळ मजल मारायची आहे. प्रगत राष्ट्नंनी पाहिजे तेवढा आणि पाहिजे तसा उपभोग घेतला आणि आता आमची वेळ आली तर पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी. ह्या कारणास्तव बऱ्याचशा गोष्टींपासून आम्हांला परावृत्त करतायत अशी भावना प्रगतीशील आणि गरीब राष्ट्नंत आहे. राष्ट्नंतर्गत पातळीवरही साधारणपणे हीच परिस्थिती लागू आहे. जागतिक पातळीवर ज्याप्रमाणे प्रगत, प्रगतीशील आणि गरीब राष्ट्नंचे वर्तन आहे त्याचप्रमाणे राष्ट्नंतर्गत पातळीवर सधन, मध्यम आणि निर्धन वर्गांचे वर्तन आहे. जागतिक पातळीवर प्रगत देशांचे अनुकरण इतर सर्व देश करत आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्नंतर्गत पातळीवर समाजातील सधन वर्गाचे अनुकरण मध्यम आणि निर्धन वर्ग करत असतात. नंबी आणि हिजाम ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.
तात्पर्य असे की जाणीव असणे आणि निसर्ग संवर्धन प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हे निसर्ग संवर्धनाचे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. जैवविविधतेच्या शास्त्रीय अभ्यासाचे जनक प्रोफेसर ई.ओ. विल्सन ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक सजीवाला जन्मत: चराचर सृष्टिबद्दल जिव्हाळा असतो. त्यामुळे निसर्ग संवर्धनाची जाणीव असणे ह्या संदर्भाने परदेशातील आणि भारतातील असा भेद करणे फारसे संयुक्तिक नाही. निसर्ग संवर्धनाच्या जाणिवेेचे रूपांतर कृतीत होणे हे अधिक महत्त्वाचे आहे. प्रगत, प्रगतीशील व अप्रगत राष्ट्न्े आणि त्यांच्यातील सधन, मध्यम आणि निर्धन समाज ह्यांच्या कृती पातळीवरील निसर्ग संवर्धनात चांगलीच तफावत आढळते. ह्या तफावतीचे मूळ आर्थिक, सामाजिक महत्त्वाकांक्षा आणि हितसंबंधांमध्ये शोधता येते.
रघुनंदन वेलणकर
८९/ए/१८ अ, `सार्थक',
शिक्षकनगर, उत्सव कार्यालयासमोर,
पुणे ३८.

पर्यावरन

खुप चान्गले