रवीन्द्रनाथ टागोर हे असं एक प्रतिभावंत चैतन्य आहे, की कोणत्याही वाटेनं त्यांना भेटायला निघावं. कविता, कथा, नाटक, कादंबरी, निबंध, संगीत, पत्रं, चित्रं, नृत्य, श्रीनिकेतन, शांतिनिकेतन, विश्वभारती... कोणतीही वाट धरा, मनाला विसावा देणारं, दिलासा देणारं, बुद्धीला उजळवून टाकणारं आणि माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा जागृत करणारं काहीतरी मिळतंच.
निसर्ग आणि माणूस यांचं बदलणारं नातं म्हणण्यापेक्षा त्या नात्याचा बदलणारा पोत ही आजच्या युगातली पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वात मोठी चिंतेची गोष्ट आहे. निसर्ग आणि माणूस हे रवीन्द्रनाथांच्या अखंड आस्थेचे विषय होते. चिंतनाचे विषय होते. म्हणूनच त्यांना उपनिषदांची ओढही वाटत असे. पण तरी रूढ अर्थाने कोणत्याही तयार तत्त्वज्ञानाचाच त्यांनी प्रचार आणि प्रसार केला नाही. किंवा स्वत:चाच असा एखादा पंथही निर्माण केला नाही. माणसाची स्वयंप्रज्ञा, त्याची विचारशक्ती हीच त्यांना माणूसपणाची खूण वाटत होती.
देण्याघेण्याच्या हिशोबीपणाच्या, व्यवसायबुद्धीच्या पलीकडील एका निराळयाच शुभबुद्धीला जागे करण्याची आकांक्षा रवीन्द्रनाथांच्या मनात होती आणि ही शुभबुद्धी हेच खरे म्हणजे भारताच्याच नाही तर विश्वाच्या पर्यावरण समस्येचे उत्तर आहे.
या शुभबुद्धीची अनेक मनोहारी रूपं रवीन्द्रांच्या साहित्यात तर जागोजागी व्यक्त झाली आहेतच पण रवीन्द्रांनी ही शुभबुद्धी वाढावी म्हणून आयुष्यभर प्रयत्न केलेे. `शांतिनिकेतन' आणि `श्रीनिकेतन' ही त्यातलीच दोन सुंदर लेणी. शुभबुद्धीचा माणूस घडविण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न होता.
शांतिनिकेतन येथील शिक्षणपद्धतीत ज्या निसर्गाचा मनुष्य हा एक अविभाज्य घटक आहे, त्याच्यातच मुलांना नेऊन बसवणं हा विचार महत्त्वाचा होता. तत्कालीन शाळेच्या कोंडवाड्यात रवीन्द्रनाथ रमले नव्हते. पण मुळात त्यांच्या घरात विद्या, कला, संगीत यांना पोषक वातावरण होतं. आठव्या वर्षी कविता करणाऱ्या रवीन्द्रांचं वेगळेपण ओळखणारे वडील होते. वडिलांनी त्याला आपल्याबरोबर प्रवासास नेलं. लहान वयातच दोन सप्तपर्णी वृक्षांच्या सान्निध्यात `शांतिनिकेतन' इमारतीत वडिलांबरोबर जो काळ त्यांनी घालवला आणि नंतर हिमालयापर्यंत प्रवास केला, तेव्हा वडिलांकडून ते जे शिकले, त्यामुळे शिक्षणही किती आनंददायक असू शकतं हे त्यांनी अनुभवलं होतं. नंतर लेखक, कवी, वक्ता, गायक म्हणून त्यांचा नावलौकिक वाढत असतानाच वडिलांनी त्यांना जमीनदारीचा कारभार पाहायला पाठवलं. त्यामुळे त्यांना देशाची, `आपल्या' देशाची खरी ओळख झाली. देशातील दु:ख, दारिद्र्याचा, अज्ञान आणि कर्मकांड संस्कृतीचा परिचय झाला होता. देश चैतन्यशील, आनंदी, स्वतंत्र होण्यासाठी फक्त इंग्रजांनी येथून जाणं येवढंच पुरेसं नव्हतं. ते आवश्यक होतंच पण केवळ तात्कालिक कारणांपलीकडे पाहणंही आवश्यक होतं. त्यासाठीच शांतिनिकेतन ही फक्त शाळा नाही तर ती एक शैक्षणिक चळवळ म्हणून त्यांनी उभी केली. मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात वाढवताना निसर्गाच्या ऋतुमानाप्रमाणे बदलणाऱ्या लीलांचे जाणीवपूर्वक संस्कार मुलांवर व्हावेत असे अनेक उत्सव त्यांनी सुरू केले. `बाइशे श्रावण' या लेखात पु.ल.देशपांडे यांनी शांतिनिकेतन मधील वृक्षारोपणाचं फार हृद्य वर्णन केलंय. एक छोटा वृक्ष, तो वृक्ष लावणारी बालकं, पंचमहाभूतांना त्या वृक्षाची जपणूक करण्यासाठी करण्यात येणारं रवीन्द्रांच्या गाण्यातलं आवाहन आणि त्याला हजर राहून कौतुकाने न्याहाळणारे प्रौढजन. माणूस आणि निसर्गाच्या नात्याचा पोत किती कुशलतेने रवीन्द्र बदलत होते. निसर्गातल्या चैतन्यरूपाला वंदन करणारी भारतीयांची अभिजात वृत्ती ही आजही पर्यावरणाच्या संदर्भात महत्त्वाची आहेच पण त्याचबरोबर आधुनिक विज्ञानाने केलेली प्रगती, दरिद्री शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे ही आचही रवीन्द्रांना होती.
`शांतिनिकेतन'च्या जवळच जोडीने `श्रीनिकेतन'ची स्थापना केली. ती ग्रामसुधारणेची एक चळवळच होती. देशी-विदेशी अनेक तज्ज्ञांची मदत त्यासाठी त्यांनी मिळवली. शेती संशोधन, आरोग्य सुधारणा, शेतकऱ्यांना पूरक उद्योग, त्यांच्यातील कलागुणातून काही नवनिर्माण, कोलकत्यासारख्या ठिकाणी स्वदेशी भांडार, पौष मेळा, जत्रा... किती किती आणि काय काय! माणसाचं रोजचं जगणंच साधं, सुंदर आणि निसर्गाशी समन्वय साधणारं बनवून त्याची एक प्रसन्न आनंदयात्रा व्हावी हाच त्यांचा ध्यास होता.
आजच्या पर्यावरणाच्या समस्येच्या मुळाशी आहे तो आजचा माणूसच. खरं म्हणजे वयाने वाढलेले मूलच. रवीन्द्रनाथ म्हणत, की मुलाने पुढे मोठे होऊन मनुष्य बनावे असे जर आपल्याला वाटत असेल तर त्याला मनुष्य बनविण्याच्या क्रियेला लहान वयापासून आरंभ करायला पाहिजे. लहानपणापासून जर भाषेच्या शिक्षणाबरोबर माणसाचे भावही सुशिक्षण संपन्न होत राहिले, आणि त्या भावांच्या द्वारा जर माणसाचे सारे जीवन नियंत्रित होऊ शकले, तरच माणसाच्या जीवनात खरे सामंजस्य प्रस्थापित होऊ शकते. मगच आपण खरोखरी `माणूस' बनू शकतो आणि प्रत्येकच विषयाला त्याच्या योग्य अशा प्रमाणात आपल्या जीवनात स्थान मिळू शकत असते. रवीन्द्रांनी अगदी लहान मुलांसाठी लिहिलेल्या सहजपाठापासून त्यांच्या साहित्यातून, कथा कवितांतून माणूसपणाच्या भावाचे, शुभबुद्धीचे चित्र उमटलेले आहे. माणसाची संवेदना जागी ठेवणारी ही बुद्धी हेच तर पर्यावरण समस्येचे उत्तर आहे. ``आज माणूस नुसत्या धनोपार्जनाच्या आणि विषयसंपत्तीची उन्नती करून घेण्याच्याच मागे लागलेला दिसतो कारण त्याला शिक्षणाशी जीवनाचे सामंजस्य कसे साधता येईल याचे शिक्षणच मिळत नाही.'' असे रवीन्द्रनाथ म्हणत.
रवीन्द्रनाथांनी मुलांसाठी खूप लेखन केलं. त्यामध्ये बालपणातील सहजपणाने आनंदाने फुलण्याचं महत्त्व जागोजागी प्रकटलेलं आहे. या फुलणाऱ्या बालमनांची शिंपण रवीन्द्रनाथांची गाणी करायची. `` रोज वाटे एका फुला । कधी उडता येईल मला ।।'' असं त्यांच्या कवितेतून फूल म्हणायचं आणि बघता बघता फुलपाखरू होऊन उडायचं. तर दुसऱ्या मुलांच्या मनात हे असं चित्र जमत जायचं.
`काल होती साधी डहाळी । आज फुलांनी बहरून आली ।।
सांगा मला माळीदादा । अशी कशी जादू झाली? ।।
फुले वेलीत असतात जर । जातात कुठे वरचेवर? ।।
कुठे बघून लावून टक । कुठे फुलांचे असते घर? ।।
सावध असतात देऊन कान । दडून राहून पानोपान ।।
हवा देते हळूच हाक । ऐकू कशी येते छान? ।।
मग सुटते घाई भलती । झटपट तोंडे धुऊन निघती ।।
नाना रंगी कपडे करती । घर आपुले सोडून देती ।।'
अनुवाद : पु.ल.देशपांडे
अशा तरल कवितांच्या वातावरणात वाढणाऱ्या मुलांनाच आजही ती साद ऐकू येईल. निसर्गाचं आणि आपलं नातं रवीन्द्रनाथांच्या दृष्टीनं पाहण्याची सवय आपल्या मनाला लागली, की ``हवा वादळी होऊन आली / बाळपणीचे सूर / टपटप पाऊस पडतो बाई / नदीला आला पूर'' या गाण्यांतल्यासारखा बाळपणीचा सूर जपला जाईल. ह्या बालपणीच्या सुरातच रवीन्द्रनाथांनी निसर्गाचं सारं ऋतुचक्र गुंफलं. उगवणं- फुलणं-कोमेजणं- गळून पडणं, उत्पत्ती, स्थिती, लयाचं चक्र समजून घेत निसर्गाची मैत्री रवीन्द्रनाथांच्या शिक्षणविचारांतून आणि साहित्यातून विकसित होत जाते. चाफ्याची आणि कण्हेरीची निरोपाची वेळ आली हे ते गाण्यातूनच सांगतात. अशा गाण्यांच्या झडी आणि पावसाच्या सरी रवीन्द्रनाथांच्या साहित्यातून अशा बरसतात की
``मेघ बाऊल वाजवतोय एकतारी
कधीपासुनी झरझर झरती सरी मागुनी सरी ।।
बागेत पेरूच्या शेतात साळीच्या
गाण्यात जाहला मत्त, स्वत:च स्वत:च्या'' ।।
सर्वत्र नाचू नाचू झालं आहे. अशी अवस्था. स्वत:चा असा सूर लाभणं फार महत्त्वाचं आहे. त्यातूनच जीवनाचं प्रवाहित्व विलक्षण रीतीने जाणवतं. हे जाणणंच तर महत्त्वाचं. निसर्गात परंपरा आहे पण पुनरावृत्ती नाही. हे जाणणारा माणूस जागवण्याचं सामर्थ्य रवीन्द्रांच्या शब्दांत होतं. `आमि मानुषेर कवि' मी माणसांचा कवी असं त्यांनी स्वत:च म्हटलंय. हा माणूस जीवनावर प्रेम करणारा, सत्याचा
स्वीकार करणारा, मुक्तीचं मोल जाणणारा, चित्त भयशून्य करणारा म्हणून त्यांची प्रतिभा गात होती,
``मी ढाळीन करुणाधारा, फोडीन फत्तर कारा -
बुडवीन जगाला भटकत गाऊन गाणी
व्याकूळ पिसाटावाणी --
..... मी हसेन खळखळ,
गाइन कलकल......
तालावर देऊनी टाळी.....''
ईशोपनिषदाच्या पहिल्या मंत्राचा वारसा तर त्यांना वडिलांकडूनच मिळाला होता. या विश्वात जे जे आहे, ते ईश्वराचं वसतिस्थान आहे.त्यावर परमेश्वराची सत्ता आहे, जीवाची नाही हे लक्षात ठेवूनच त्याचा उपभोग घे. कोणत्याही धनाचा मनात लोभ धरू नकोस. जे तुझ्यापाशी येऊन पोहोचलं आहे, ते घेऊन आनंदी हो. हा अर्थ त्यांच्या मनात सतत होता. `आयुष्य' ही आपल्यावर सोपवलेली एक `जबाबदारी', `कामगिरी', `मिशन' आहे असंच ते समजत होते. विश्वस्त म्हणून या जगातला आनंद, प्रसन्नता, स्फूर्ती, चैतन्य उपभोगण्याची ही `शुभबुद्धी' हीच पर्यावरणाकडे पाहण्याची रवीन्द्रनाथांची दृष्टी. ही दृष्टी आजच्या सृष्टीचं रक्षण करो!
आशा साठे
१६/२३०, लोकमान्यनगर,
नवी पेठ, पुणे ३०.



nfl jerseys
absolutely this apparent marketing and promoting movement was firstly resisted by consumers, but then the persons accepted it soon. ideal subsequent all, the commercialization experienced been all a lot much more in comparison to planet already.
cheap Canada Goose
personalized nfl jerseys
nfl authentic jerseys
Boots is so welcomed that
Boots is so welcomed that might because of its classic design but not deficiency of fashion. Put on this pair of UGG Classic Short, you will really feel luxury and stylish. It is produced by premium fleece lining. Shoes by Colorand lining wick wetness away, which can keep your feet warm all the day, as well the light and flexible EVA outsole brings extra comfort. In the cold winter, this beautiful Fox Fur Boots can be the necessary daily companion for those women who always run after fashion. Our UGG boots sale online shop is dedicated to supply discount Ugg boots shoes with exquisite workmanship at aggressive price waiting for you to select this pair of UGG boots."
ईशोपनिषदाच्या पहिल्या
ईशोपनिषदाच्या पहिल्या मंत्राचा वारसा तर त्यांना वडिलांकडूनच मिळाला होता. या विश्वात जे जे आहे, ते ईश्वराचं वसतिस्थान आहे.त्यावर परमेश्वराची सत्ता आहे, जीवाची नाही हे लक्षात ठेवूनच त्याचा उपभोग घे. कोणत्याही धनाचा मनात लोभ धरू नकोस. जे तुझ्यापाशी येऊन पोहोचलं आहे, ते घेऊन आनंदी हो. हा अर्थ त्यांच्या मनात सतत होता. `आयुष्य' ही आपल्यावर सोपवलेली एक `जबाबदारी', `कामगिरी', `मिशन' आहे असंच ते समजत होते. विश्वस्त म्हणून या जगातला आनंद, प्रसन्नता, स्फूर्ती, चैतन्य उपभोगण्याची ही `शुभबुद्धी' हीच पर्यावरणाकडे पाहण्याची रवीन्द्रनाथांची दृष्टी. ही दृष्टी आजच्या सृष्टीचं रक्षण करो! braindumps oracle pmi braindumps vmware braindumps VCP-410 braindumps 350-001 braindumps 640-802 braindumps SY0-301 braindumps 70-680 braindumps ged prep books